आल्बेर्तो फुहिमोरी
आल्बेर्तो फुहिमोरी फुहिमोरी (स्पॅनिश: Alberto Fujimori Fujimori; २८ जुलै १९३८:लिमा, पेरू - ११ सप्टेंबर, २०२४:लिमा, पेरू) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष होता. जपानी वंशाचा असलेला फुहिमोरी १९९० ते २००० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्याला पेरूची अर्थव्यवस्था सुधारण्याचे व पेरूमधील माओवादी अतिरेकी संघटनेला पराभूत करण्याचे श्रेय दिले जाते. त्याचबरोबर फुहिमोरीवर हुकुमशाही गाजवण्याचे व मानवी हक्कांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली करण्याचे आरोप देखील झाले.
आल्बेर्तो फुहिमोरी | |
पेरूचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २८ जुलै १९९० – २२ नोव्हेंबर २००० | |
मागील | ॲलन गार्शिया |
---|---|
पुढील | अलेहांद्रो तोलेदो |
जन्म | २८ जुलै, १९३८ लिमा, पेरू |
मृत्यू | ११ सप्टेंबर, २०२४ |
राष्ट्रीयत्व | पेरूवियन, जपानी |
धर्म | रोमन कॅथलिक |
ह्या आरोपांवरून खटला भरला जाण्याच्या भितीने फुहिमोरीने पेरूमधून पळ काढला व तो जपानमध्ये दाखल झाला. तेथूनच त्याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला परंतु पेरूच्या संसदेने तो नामंजूर करून फुहिमोरीला निलंबित करून त्याच्याविरुद्ध अटकपत्र जाहीर केले. २००५ साली फुहिमोरीला चिली देशाच्या सान्तियागो शहरामध्ये अटक करण्यात आले. २००९ साली पेरूच्या सर्वोच्च न्यायालयाने फुहिमोरीला भ्रष्टाचार, कत्तल, मारहाण, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावली.
बाह्य दुवे
संपादन- व्यक्तिचित्र Archived 2010-07-11 at the Wayback Machine.