इतिहासात बरेच हुकूमशाह होऊन गेले. आजच्या भाषेत एखादा नेता वा नेतेमंडळी कायदा, घटना तसेच राज्यातील राजकीय किंवा सामाजिक निर्बंध चिरडून निरंकुश सत्ता करतात तेव्हा त्याला हुकूमशाही म्हणतात.

काही विद्वानांच्या मते अधिकारशाही (en:authoritarianism) हुकूमशाहीत प्रकारात शासन प्रजेच्या परवानगीशिवाय शासनाचा अधिकार गाजवते. तर सर्वकषसत्ता (en:totalitarianism) प्रकारात शासन प्रजेने सार्वजनिक व वैयक्तिक जीवन कसे जगायचे ते ठरविते. म्हणजे अधिकारशाही शासनाचा अधिकार कोणी दिला ह्यावर अवलंबून असते तर सर्वकषसत्ता हा शासनाचे अधिकार किती व्यापक आहेत त्यावरून ठरते.

ह्या व्याख्येनुसार अधिकारशाही ही लोकशाहीच्या विरुद्ध टोकाची आहे तर सर्वकषसत्ता ही बहुत्ववादाच्या (en:pluralism)च्या उलटी आहे.

अन्य काही विद्वान ह्यावर भार देतात की शासनाचे सर्वशक्तिमत्व (omnipotenence) (ज्यात प्रजेचे हक्क निलंबित केले जातात) ही हुकूमशाहीची मुख्य ओळख आहे व अधिकाराचे असे संकेन्द्रण (concentration) वैधिक (legitimate) आहे किंवा नाही हे परिस्तीथी, उद्दिष्टे व शासनाची पद्धत यावर अवलंबून आहे.

लोकशाही ही प्रजेच जीवन सुखकर सुसह्य होण्यासाठी सर्वोत्तम शासन व्यवस्था आहे. परंतु तिच्यामध्ये असणारे फायदे आणि कायद्याचे निर्वहन करणारे कर्मचारी हे संपूर्णतः कार्यान्वित असले पाहिजेत, कुठल्याही पूर्वग्रह दोषाने दूषित नसले पाहिजेत. त्याच प्रकारे त्यांच्या नियुक्ती आहे त्यांच्या गुणवत्तेवर आधारित असल्या पाहिजेत (ज्या पदावर नियुक्त करायचे आहे त्या पदाला साजेशी गुणवत्ता हवी).

हे सुद्धा पहा

संपादन