आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन

एक इंग्लिश सेनापती
(आर्थर वेलेस्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

फील्ड मार्शल आर्थर वेलेस्ली, वेलिंग्टनचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Sir Arthur Wellesley, 1st Duke of Wellington; मे १, इ.स. १७६९ - सप्टेंबर १४, इ.स. १८५२) हा एक इंग्लिश सेनापती होता.

आर्थर वेलेस्ली

कार्यकाळ
२२ जानेवारी १८२८ – २६ नोव्हेंबर १८३०
राजा चौथा जॉर्ज
मागील एफ. जे. रॉबिन्सन
पुढील चार्ल्स ग्रे
कार्यकाळ
१४ नोव्हेंबर १८३४ – १० डिसेंबर १८३४
राजा चौथा विल्यम
मागील विल्यम लॅम्ब
पुढील रॉबर्ट पील

जन्म १ मे, १७६९ (1769-05-01)
डब्लिन, आयर्लंड
मृत्यू १४ सप्टेंबर, १८५२ (वय ८३)
केंट, इंग्लंड
राजकीय पक्ष टोरी
सही आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टनयांची सही

ब्रिटनच्या इतिहासातील एक अत्यंत चाणाक्ष सेनापती, ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे. नेपोलियनसारख्या महान सेनापतीला त्याने वारंवार जेरीस आणले आणि वॉटर्लूच्या युद्धात त्याचा अंतिम पराभव करून युरोपमधील नेपोलियनची सद्दी संपुष्टात आणली.त्याद्वारे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. वेलस्ली भारताच्या,खासकरून मराठ्यांच्या इतिहासात एक महत्त्वाची व्यक्ति आहे. नेपोलियनला जेरीस आणायच्या आगोदर वेलस्लीने भारतात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. मराठ्यांच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे मराठी साम्राज्याला देखील उतरती कळा आणली त्यानंतर काही वर्षांत मराठी साम्राज्य लयाला गेले.

भारतातील दिवस

संपादन

म्हैसूरमधील संघर्ष

संपादन

१७९६ मध्ये वेलस्लीने भारतातील रेजमेंटमध्ये नियुक्ती करून घेतली. त्यामागे त्याचा चाणाक्ष हेतु होता. त्यापुढील वर्षीच त्याचा भाऊ रिचर्ड वेलस्ली याची नियुक्ती भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून झाली. त्याचा फायदा त्याने आपली बढती करून घेण्यास केला.सन १७९८ मधील टिपू सुलतान बरोबरच्या युद्धात त्याला आर्मी डिव्हिजनची जबाबदारी देण्यात आली. टिपूचा पाडाव झाल्यानंतर रिचर्डने त्याची नियुक्ती श्रीरंगपट्ट्णचा गव्हर्नर म्हणून केली.

मराठ्यांविरुद्धची मोहीम

संपादन

दुसऱ्या बाजीरावने इंग्रजांशी संगनमत केल्यावर शिंदे आणि इंग्रजाच्यात दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. मराठ्यांबरोबरच्या युद्धात, भॉगोलिक परिस्थितीचा वापर आपल्या सैन्याचा बचावासाठी कसा करावा याच्या तंत्रात तो निपुण झाला. त्याने मराठ्यांचा जालना जिल्ह्यात आसई येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पराभव केला. तसेच अकोला जिल्ह्यातील आडगाव येथे पुन्हा मराठ्यांवर मात केली. अमरावती जिल्ह्यातील गाविलगड येथे किल्यावर आक्रमण करून पुन्हा एकदा पराभव केला. त्याने किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्याचे महत्त्वाचे भाग निकामी केले. त्यानंतर इंग्रजाचे मराठ्याविरुद्धच्या किल्यांवरील युद्धात हीच योजना कायम राहिली.

स्पेन, पोर्तुगालमधील आघाडी

संपादन

भारतातील अनेक आघाड्यांवरील बजावलेली कामगिरी पाहून वेलस्लीला परत इंग्लंडला बोलवणे आले. सुरुवातीला वेलस्लीला पोर्तुगालच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. तिथेही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली.

त्याकाळात नेपोलियनची पूर्ण युरोपमधील अन्य सत्तांवर दहशत होती. समुद्रावर आणि जगात इतरत्र जरी इंग्रजांची चलती असली तरी नेपोलियने संपूर्ण युरोपवर आपले स्वामित्व गाजवायला सुरुवात केली होती. एवढा प्रबळ शेजारी असणे इंग्लंडला परवडणारे नव्हते. वेलस्लीने पटकन जाणले कि फ्रेंच सैन्य बहुतांशी अशा देशात लढते, ज्या ठिकाणी चांगल्या दळणवळणाच्या सोयी आहेत. त्याने पोर्तुगालमध्ये पहिल्या प्रथम फ्रेंचाचे रसद व दळणवळणाचे मार्ग यांचा संपर्क तोडला आणि अनेक पोर्तुगीजांना फ्रेंचाविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. त्याची युद्धपूर्व तयारी अत्यंत काटेकोर असे आणि आपल्या सोयीच्या जागी युद्ध करण्यास शत्रूला भाग पाडण्याचे वेलस्लीचे धोरण होते.

१८१० मध्ये त्याने सर्वोत्तम फ्रेंच मार्शल आंद्रे मासिना पोर्तुगालमधून माघार घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने स्पेनमधील फ्रेंच ठाण्यांवर प्रत्याक्रमण सुरू केले व त्यात सालामांका, विटोरिया येथे लक्षणीय विजय मिळवले.

नेपोलियनच्या रशियामधिल घोडचुकीनंतर १८१४ मध्ये नेपोलियनचे साम्राज्य कोसळले. त्यानंतर वेलस्लीने फ्रांसमध्ये आक्रमण करून टुलोज येथे विजय मिळवला

वॉटर्लूचे युद्ध

संपादन

१८१५ मध्ये नेपोलियन एल्बा येथून नजरकैदेतुन सुटल्या नंतर पुन्हा पॅरिसला आला आणि आपले साम्राज्य पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न त्याने सुरू केले. त्याने आपले मोठे सैन्या पुन्हा एकत्र केले आणि आपल्या जुन्या शत्रूंविरुद्ध आघाडी उघडली. नेदरलँड्स, प्रशिया, बेल्जियम व ब्रिटन यांनी देखील प्रत्युतर म्हणून नेपोलियनविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्व वेलस्लीकडे देण्यात आले. १८ जून १८१५ रोजी वाटर्लुयेथे दोन्ही फॉजा एकमेकांना भिडल्या.

वेलस्लीने नेहमीच्या पद्धतीने युद्ध केले. त्याने युद्धभूमीवर आगोदर येउन आपल्या सैन्यासाठी टेकडीच्या उताराची उपयुक्त जागा निवडली होती. त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व युद्द करायला भाग पाडले. त्यावेळी युद्ध करणे लाभाचा नाही हे नेपोलियनजाणत होता मात्र वाट बघितली असती तर पाठीमागून येत असलेल्या प्रशियच्या सैन्याशीदेखील त्याला लढावे लागले असते त्यामुळे त्याने वेल्सलीच्या सैन्यावर आक्रमण सुरू केले. सुरुवातीला वेल्सलीने प्रशियन सैन्याच्या आगमनाची वाट पहात बचावाचे धोरण स्वीकारले. याकाळातनेपोलियनची विविध आक्रमणे त्याच्या सैन्याने मोठ्या धैयाने परतवून लावली. सरतेशेवटी नेपोलियनने आपले शेवटच्या इंपिरीयल गार्डसना आक्रमणासाठी पाठवले. मात्र इंपिरियल गार्डचे आक्रमणही फसले. इंपिरियल गार्ड नंतर नेपोलियनकडे महत्त्वाची प्रहारक्षमता शिल्लक नसल्याचे पाहून वेल्सलीने आपल्या सैन्याला आक्रमणाचा आदेश दिला व काही वेळातच नेपोलियनच्या महान सेनेचा पराभव केला. नेपोलियनच आणि सैन्याचा पाडाव झाला.

साहित्यात

संपादन

इंग्रजी भाषेमध्ये बर्नाड क्रोमवेल यांची प्रसिद्ध शार्पे या काल्पनिक व्यक्तिमत्त्वाबद्दल कांदबऱ्यांची शृंखला आहे. यात रिचर्ड शार्प नावाचा ब्रिटिश सैन्यामधील साधा सैनिक त्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच ते नेपोलियनच्या युद्धापर्यंत वेलिंग्टनच्या दलात असतो. या व्यक्तिमत्त्वाबरोबरच वेलिंग्टनची लष्करी कारकीर्द सादर करायचा प्रयत्न केला आहे. याच कादंबऱ्यावर आधारित शार्प्स सिरिज म्हणून ब्रिटनमध्ये दूरचित्रवाणी मालिका तयार केली आहे. यात शॉन बीन याने रिचर्ड शार्पेची भूमिका केली आहे तर ह्यू फ्रेजर याने वेलिंग्टनची भूमिका केलि आहे.

संदर्भ

संपादन
  • William Crompton- 100 Military leaders who shaped the world history- Gemini publication Delhi india
  • Benard Cromwell- Sharpe's Story and Sharpe`s Fortress