शाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट)
शाही रक्षक (फ्रेंच: Garde Impériale) म्हणजे नेपोलियन बोनापार्टच्या हुकमतीखाली असलेली, फ्रेंच सैन्यातील निवडक सैनिकांची तुकडी होती. कालौघात या रक्षकतुकडीचे स्वरूप बदलत गेले. ही तुकडी नेपोलियनाचे अंगरक्षक, तसेच रणांगणावरील राखीव तुकडी म्हणून भूमिका बजावत असे. शाही रक्षकांमध्ये स्वीय कर्मचारी, भूदल, घोडदळ, तोफखान्याच्या रेजिमेंटी, तसेच सॅपर व मरीन सैनिकांच्या बटालियनी अशा प्रकारे वर्गवारी होती. याखेरीज काही वेळा प्रदीर्घ अनुभवापासून अल्प अनुभवापर्यंतच्या प्रतवारीनुसार जुने रक्षक, मध्यम रक्षक व तरणे रक्षक अशा गटांमध्ये रक्षकांच्या तुकडीची गटवारी केली जाई.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |