आदिपुरुष
आदिपुरुष[१] हा आगामी भारतीय हिंदू पौराणिक चित्रपट रामायण या हिंदू महाकाव्यावर आधारित आहे.[२] या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे आणि टी-सीरीज फिल्म्स आणि रेट्रोफिल्स यांची ही संयुक्त निर्मती आहे. या चित्रपटाचे मुख्य निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर आहेत.[३] हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आलेल्या या चित्रपटात श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहेत. ५०० कोटी (US$१११ दशलक्ष) च्या बजेटमध्ये बनलेला, आदिपुरुष हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे.
आदिपुरुष | |
---|---|
दिग्दर्शन | ओम राऊत |
निर्मिती | टी-सीरीज फिल्म्स आणि रेट्रोफिल्स |
कथा | ओम राऊत |
प्रमुख कलाकार |
|
संगीत | अजय-अतुल |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १६ जून २०२३ |
निर्मिती खर्च | ₹५०० कोटी |
या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये शूटिंगच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये 3D आणि आयमॅक्स या मानक स्वरूपात प्रदर्शित होणार आहे.
७,००० वर्षांपूर्वी, श्रीरामाची पत्नी सीतेचे लंकापती रावणाने अपहरण केले होते. देवी सीतेला सोडवून आणण्यासाठी भगवान राम आपल्या सोबत्यांसह श्रीलंकेवर आक्रमण करतात आणि रावणाचा वध करून सीतेला सोडवून परत आणतात. या हिंदू महकाव्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
- राघवाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास राजू
- सीतेच्याभूमिकेत अभिनेत्री कृती सेनॉन
- लंकेश भूमिकेत अभिनेता सैफ अली खान
- लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग
- हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे[४]
- वत्सल शेठ[५]
- सोनल चौहान[६]
- तृप्ती तोरडमल[७]
निर्मिती
संपादनहा चित्रपट, हिंदू धर्मातील महाकाव्य रामायणाचे रूपांतरण असल्याचे १८ ऑगस्ट २०२० रोजी प्रचारात्मक पोस्टरद्वारे घोषित करण्यात आले. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास ने ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली भगवान श्रीरामाची भूमिका केली आहे. ओम राऊत यांनी यापूर्वी तान्हाजी (२०२०) हा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला होता.[८] ओम राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते १९९२ चा जपानी कार्टून चित्रपट रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा पाहून मोहित झाले होते. राऊत यांनी भारतातील कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली. प्रभासला लगेचच हा प्रकल्प आवडला आणि T-Series Films ही प्रोडक्शन कंपनी या प्रोजेक्टसाठी ऑन-बोर्ड होती. [१]
५०० कोटी (US$१११ दशलक्ष) च्या बजेटसह आदिपुरुष हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. त्यापैकी २५० कोटी (US$५५.५ दशलक्ष) व्हिज्युअल इफेक्टवर खर्च केल्याचा अंदाज आहे.[९] हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये शूट केला गेला असून यात 3D प्रभाव जोडण्यात आला आहे. [१०]
चित्रीकरण
संपादनया चित्रपटाचे मोशन कॅप्चर शूट १९ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाले.[११] मुहूर्ताचा शॉट आणि शूटिंगचा औपचारिक सुरुवात २ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत करण्यात आली आहे. [१२][१३] [१४] त्याच दिवशी मुंबईतील चित्रीकरणाच्या ठिकाणी भीषण आगीची दुर्घटना घडली.[१५] त्यानंतर हुबेहूब डुप्लिकेट सेट परत त्याच पद्धतीने उभारण्यात आले.[१६] ऑक्टोबर २०२१ मध्ये सैफ अली खान आणि कृती सेनॉन यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली.[१७] नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रभास राजूने आपले शूटही पूर्ण केले. १० नोव्हेंबर २०२१ रोजी चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण झाले.[१८]
प्रदर्शन
संपादनआदिपुरुष हा एक हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपट असून, तो तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये देखील रिलीज होणार आहे. हा चित्रपट १६ जून २०२३[१९] रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.[२०] यापूर्वी याच्या प्रदर्शनाची तारीख ११ ऑगस्ट २०२२ घोषित करण्यात आली होती, परंतु नंतर लाल सिंग चड्ढाच्या प्रदर्शनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.[२१][२२][२३] या चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर २०२२ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टीझरला पहिल्या २४ तासांत ६९ दशलक्ष व्ह्यूज आणि १ दशलक्ष लाइक्स मिळाले आहेत. याचा टिझर के.जी.एफ. २ नंतर सर्वाधिक पाहिलेला हा दुसरा भारतीय चित्रपट बनला आहे.[२४] याचे मुख्य कारण म्हणजे, सीजीआय आणि व्हीएफएक्सची सुमार आणि दर्जाहीन कामगिरी असून सर्वसामान्य जनता यावर धार्मिक विडंबनेचा आरोप करत आहे.[२५]
विवाद आणि खुलासे
संपादन- या चित्रपटतील पौराणिक पात्रांची विडंबना पाहून सामान्य जनतेत रोष पसरला. या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स देणाऱ्या कंपनीवर टीकेचा भडिमार सुरू झाला. सोशल मीडियावर यावर प्रखर टीका आणि व्यंग करणे सुरू झाले. अजय देवगण ची मालकी असलेल्या 'एनवाय व्हीएफएक्स वाला' कंपनीने यावर खुलासा केला आहे की, त्यांनी या चित्रपटात केवळ स्पेशल इफेक्ट्स दिलेले असून यात दिसणारे सी जी आय व्हीएफएक्स इफेक्ट्स त्यांचे नाहीयेत.[३][२६]
संदर्भ
संपादन- ^ a b c d Ramachandran, Naman (22 February 2022). "Prabhas-Starring 'Adipurush': Director Om Raut Reveals Details of Epic 'Ramayana' Adaptation (EXCLUSIVE)". Variety (इंग्रजी भाषेत).
- ^ "Prabhas spotted in Mumbai, to start shooting for Adipurush in March". India Today (इंग्रजी भाषेत). 28 February 2021. 28 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 March 2021 रोजी पाहिले.
Adipurush is a mythological film, which is based on the epic Ramayana.
- ^ a b c ""आम्ही चित्रपटासाठी कोणतेही..." 'आदिपुरुष' चित्रपटाचे व्हीएफएक्स करणाऱ्या कंपनीने केला खुलासा". लोकसत्ता. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Popular actor to play Hanuman in Adipurush". Telugu Bulletin (इंग्रजी भाषेत). 26 June 2021. 18 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "I'm proud of everything that I've done so far: Vatsal Sheth on his acting career and being a part of Adipurush - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 31 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Sonal Chauhan joins the cast of Prabhas and Saif Ali Khan starrer Adipurush". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 12 April 2022. 12 April 2022 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive! Trupti Toradmal on her Bollywood debut with Prabhas starrer 'Adipurush': Its a dream come true moment for me". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 12 March 2021. 27 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Prabhas' Big Announcement - Adipurush, A 3D Action-Drama". NDTV (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Makers of Prabhas' Adipurush Will Spend Rs. 250 crore on VFX". Filmfare. 21 August 2020.
- ^ "Prabhas' 3D epic 'Adipurush' adds 'Penguin' cinematographer Kharthik Palani". The New Indian Express. 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Motion capture work on Prabhas-Saif Ali Khan's 'Adipurush' begins". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Prabhas' Adipurush: Makers kickstart the shoot with a formal pooja in Mumbais". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). 2 February 2021. 2021-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Prabhas and Saif Ali Khan starrer Adipurush starts shooting from today". filmfare (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush: Shooting Of Prabhas And Saif Ali Khan Starrer To Commence From February 2!". Yahoo News (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush: Massive fire breaks out on set of Saif Ali Khan, Prabhas starrer. Watch video". India TV News (इंग्रजी भाषेत). 2 February 2021. 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush: Massive Fire Breaks Out on Sets of Prabhas-Saif Ali Khan's Film". News18 (इंग्रजी भाषेत). 3 February 2021. 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush director Om Raut announces shoot wrap for Saif Ali Khan; shares pictures from sets". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 9 October 2021. 9 October 2021 रोजी पाहिले.
- ^ "Om Raut finishes Prabhas' Adipurush shoot in 103 days, Kriti Sanon is in awe of him for 'wrapping such a massive film so soon'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 12 November 2021. 18 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "'आदिपुरुष'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, चाहते म्हणतात – लूक आणि VFX बदला, तारीख नाही". Vande Maharashtra. 7 November 2022. रोजी मूळ पानापासून संग्रहित2022-11-07. 7 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Prabhas, Saif Ali Khan, and Kriti Sanon starrer Adipurush to release in 3D on January 12, 2023". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 1 March 2022. 1 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush: Prabhas And Saif Ali Khan's Film To Release On This Date". NDTV (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Prabhas' 'Adipurush' to Akshay Kumar's 'Ram Setu': Bollywood's upcoming mythological films to look forward to". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 4 December 2020. 4 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Aamir Khan Announces New Release Date For Laal Singh Chaddha, Thanks Adipurush Makers". NDTV (इंग्रजी भाषेत). 16 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush Teaser Report For 24 Hours: Record Views And Likes In All Languages". Telugu Filmnagar (इंग्रजी भाषेत). 2022-10-03. 2022-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-03 रोजी पाहिले.
- ^ "Adipurush director Om Raut says he's 'not surprised' with negative reaction to teaser: 'It's not made for small screen'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 4 October 2022. 5 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "'आदिपुरुष'मधील व्हीएफएक्सवर होणाऱ्या टीकेवर कंपनीचा खुलासा, हे आम्ही केलंच नाही!". महाराष्ट्र टाइम्स.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील आदिपुरुष चे पान (इंग्लिश मजकूर)