आग्नेय इंग्लंड
आग्नेय इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या आग्नेय भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये तिसऱ्या तर लोकसंख्येनुसार पहिल्या क्रमांकावर असलेला आग्नेय इंग्लंड हा एक सुबत्त प्रदेश आहे. लंडनच्या जवळ असल्यामुळे येथील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. लंडनचा गॅट्विक विमानतळ येथेच असून युरोपला ब्रिटनसोबत जोडणारी बव्हंशी वाहतूक येथून हाताळली जाते.
आग्नेय इंग्लंड South East England | |
इंग्लंडचा प्रदेश | |
आग्नेय इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान | |
देश | युनायटेड किंग्डम |
मुख्यालय | गिलफर्ड |
क्षेत्रफळ | १९,०९५ चौ. किमी (७,३७३ चौ. मैल) |
लोकसंख्या | ८६,३५,००० |
घनता | ४५२ /चौ. किमी (१,१७० /चौ. मैल) |
संकेतस्थळ | secouncils.gov.uk |
विभाग
संपादननकाशा | औपचारिक काउंटी | एकल काउंटी | जिल्हे |
---|---|---|---|
1. बर्कशायर | a) वेस्ट बर्कशायर, b) रेडिंग, c) वोकिंगहॅम, d) ब्रॅकनेल फॉरेस्ट, e) विंडसर व मेडनहेड, f) स्लाऊ | ||
बकिंगहॅमशायर | 2. बकिंगहॅमशायर | a) साउथ बक्स, b) चिल्टर्न, c) वायकोंब, d) आयल्सबरी व्हेल | |
3. मिल्टन केनेस | |||
ईस्ट ससेक्स | 4. ईस्ट ससेक्स | a) हास्टिंग्स, b) रॉथर, c) वील्डेन, d) ईस्टबोर्न, e) लुईस | |
5. ब्रायटन व होव्ह. | |||
हॅम्पशायर | 6. हॅम्पशायर | a) फारेहॅम, b) गोस्पोर्ट, c) विंचेस्टर, d) हॅव्हन्ट, e) ईस्ट हॅम्पशायर, f) हार्ट, g) रशमूर, h) बॅसिंगस्टोक व डिॲन, i) टेस्ट व्हॅली, j) ईस्टलाय, k) न्यू फॉरेस्ट | |
7. साउथहॅंप्टन | |||
8. पोर्टस्मथ | |||
9. आईल ऑफ वाइट | |||
केंट | 10. केंट | a) डार्टफर्ड, b) ग्रेव्हशॅम, c) सेव्हनओक्स, d) टॉनब्रिज व मॉलिंग, e) टनब्रिज वेल्स, f) मेडस्टोन, g) स्वेल, h) ॲशफर्ड, i) शेपवे, j) कॅंटरबरी, k) डोव्हर, l) थॅनेट | |
11. मेडवे | |||
12. ऑक्सफर्डशायर | a) ऑक्सफर्ड, b) चेरवेल, c) साउथ ऑक्सफर्डशायर, d) व्हेल ऑफ व्हाईट हॉर्स, e) वेस्ट ऑक्सफर्डशायर | ||
13. सरे | a) स्पेल्टहोम, b) रनीमेड, c) सरे हीथ, d) वोकिंग, e) एल्म्सब्रिज, f) गील्डफर्ड, g) वेव्हर्ली, h) मोल व्हॅली, i) एप्सम व एव्हेल, j) रायगेट व बॅन्स्टिड, k) टॅंडरिज | ||
14. वेस्ट ससेक्स | a) वर्दिंग, b) एरन, c) चिचेस्टर, d) होर्शाम, e) क्रॉली, f) मिड ससेक्स, g) एडर |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत