अचला किल्ला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अचला किल्ला हा अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे किंवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापुतारा मार्गे देखील जाता येते.
अचला | |
नाव | अचला |
उंची | ४०४० फुट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | पिंपरीपाडा |
डोंगररांग | सातमाळ |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
इतिहास
संपादनशिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मुघलांना चकवा देण्याकरिता खजिना दोन भागात विभागला गेला त्यागील एक भाग हा गोंदाजी नारायण या मराठा सरदाराने खजिना या किल्ल्यात लपविल्याची आख्यायिका आहे .
छायाचित्रे
संपादनगडावरील ठिकाणे
संपादनगडमाथा अत्यंत अरुंद आहे. गडावर फारसे पाहण्यासारखे काही अवशेष नाहीत. गडावर पण्याची एक-दोन टाकी आहेत. याशिवाय भग्नावस्थेत असणारे एक मंदिर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
संपादननाशिकमार्गे वणी गाठावे. वणीहून एस.टी. ने पिंपरी-अचलाकडे जावे. हे अंतर साधारणपणे १२ कि.मी. चे आहे. अचला गावात उतरून पिंपरीपाडा गावाकडे सरळ चालत जावे. हे अंतर अर्धा तासाचे आहे. पिंपरीपाडा हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावासमोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत एक छोटेसे देऊळ दिसते त्याच्या दिशेने वर चढत जावे. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. ही वाट पुढे कडा डावीकडे ठेवून त्याला चिटकून वर जाते. पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. खिंडीतून माथा गाठण्यास अंदाजे दीड तास पुरतो.
गडावरील राहायची सोय
संपादनगडावरील खाण्याची सोय
संपादनगडावरील पाण्याची सोय
संपादनगडावर जाण्याच्या वाटा
संपादनमार्ग
संपादनजाण्यासाठी लागणारा वेळ
संपादनसंदर्भ
संपादनहे सुद्धा पहा
संपादन
बाह्य दुवे
संपादन- ट्रेक्क्षितीज वरील माहितीपृष्ठे Archived 2021-01-20 at the Wayback Machine.