सापुतारा
भारत देशातील गुजरात राज्यातील गाव
माहिती
संपादनसापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे ९१ कि.मी. अंतरावर नाशिक-डांग-सुरत रस्त्यावर आहे. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वांसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. मुंबई अथवा अहमदाबाद येथून रेल्वेने बिलिमोरा या स्थानकापर्यंत जाऊन तेथून बसने अथवा टॅक्सीने येथे येता येते. गुजरात-महाराष्ट्र राज्यसीमा येथून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर असलेले सापुतारा हे स्थान सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे.
तपमान
संपादनउन्हाळ्यात येथे २७० ते ३१० सेल्सियस एवढे तापमान असते. .हिवाळ्यात ते ९० ते २०० सेल्सियस या दरम्यान राहू शकते.
पाहण्यासारखी ठिकाणे
संपादन- अॅक्वेरियम
- एको पॉईंट
- कलाकारांचे खेडे (आर्टिस्ट्स व्हिलेज)
- मध संकलन केंद्र
- गीरा धबधबा
- बोट क्लब
- म्युझियम (संग्रहालय)
- रोप-वे
- सनराइज पॉईंट
- सनसेट पॉईंट
- हथगढ किल्ला