बिलिमोरा
बिलीमोरा हे भारतातील गुजरात राज्याच्या नवसारी जिल्ह्यातील छोटे शहर आहे. अंबिका नदीच्या काठावर वसलेले हे शहर गणदेवी तालुक्यात आहे. हे शहर सुरत महानगरक्षेत्रात आहे. बिलिमोरा सुरत शहराच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर (४३ मैल) अंतरावर आहे. बिलिमोरा सुरत महानगरक्षेत्राच्या दक्षिण भागात आहे आणि ते रा.म. ६ आणि रा.म. ८८ ने सुरतेशी जोडलेले आहे.
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात, बडोदा संस्थानाने बिलीमोरा पासून सुमारे ४० मैल (६४ किमी) अंतरावरील बंदरावर येथे आरमारी तळ स्थापला होता. सुरतेच्या दक्षिणेस असेलेले हे बंदर बिलिमोरा सुबा आरमार म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच लोकांपासून समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी ५० जहाजांचा ताफा येथे तैनात होता. यात बव्हंश शिडाची गलबते, व्यापारी मालवाहू जहाजे आणि लढाऊ जहाजे होती. [१]
वाहतूक
संपादनबिलीमोरा हे रस्ते, रेल्वे आणि समुद्राद्वारे इतर शहरांशी जोडलेले आहे. मुंबईहून येथे येण्यासाठी रेल्वेने साधारण ३-३.५ तास आणि रस्त्याने ४ ते ५ तास लागतात. बिलिमोराला सर्वात जवळचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ ७९ किमी अंतरावर आहे.
बिलीमोरा हे पश्चिम रेल्वेच्या ( भारत ) मुंबई विभागातील हे एक रेल्वे जंक्शन आहे. येथून डांग जिल्ह्यातील वघई येथे येण्यासाठी एक नॅरोगेज लाइन ब्रॉड लाइनपासून विभक्त होते. या नॅरोगेज लाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून ती मनमाडपर्यंत वाढवण्यात येणाच्या बेत आहे. याने बिलीमोरा महाराष्ट्राशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाईल. बिलिमोरा राष्ट्रीय महामार्ग ८ पासून १० किमी पश्चिमेस आहे.
संदर्भ
संपादन- ^ "280 years ago, Baroda had its own Navy". The Times of India. 27 September 2010. 3 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.