सवाई माधवराव किंवा माधवराव नारायण (अन्य नामभेद: दुसरा माधवराव) (जन्मः इ.स. १७७४ ; किल्ले पुरंदर, मराठा साम्राज्य - मृत्यू :इ.स. १७९५ ; शनिवारवाडा, पुणे, मराठा साम्राज्य) हा मराठा साम्राज्याचा पेशवा, अर्थात पंतप्रधान होता. याने इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरावाचा हा पुत्र होता. सातारा दरबाराच्या संकेतांनुसार पदारूढ पेशव्याचा पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे, माधवराव नारायणाचा पेशवेपदावर कायदेशीर हक्क होता. परंतु नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाईवर हक्क सांगणाऱ्या रघुनाथरावाला पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवेपदापासून दूर ठेवले व माधवराव नारायणास साताऱ्याच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होतेवेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.

सवाई माधवराव पेशवे
सवाई माधवराव पेशवे (चित्रकार: जेम्स वेल्स; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२)
अधिकारकाळ इ.स. १७८२ - इ.स. १७९५
पूर्ण नाव माधवराव नारायणराव भट(पेशवे)
जन्म इ.स.१८ एप्रिल १७७४
किल्ले पुरंदर, मराठा साम्राज्य
मृत्यू इ.स. १७९५
शनिवारवाडा, पुणे, मराठा साम्राज्य
पूर्वाधिकारी नारायणराव पेशवे
उत्तराधिकारी दुसरा बाजीराव
वडील नारायणराव पेशवे
आई गंगाबाई
पत्नी यशोदाबाई
इतर पत्नी राधाबाई
राजघराणे पेशवे

चित्रदालन

संपादन