जेम्स वेल्स (चित्रकार)


जेम्स वेल्स (इंग्लिश: James Wales ;) (इ.स. १७४७ - इ.स. १७९५) हा स्कॉटिश चित्रकार होता.

जेम्स वेल्स याने रंगवलेले सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांचे समूहचित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)

वेल्स अ‍ॅबर्डीनलंडन येथे व्यक्तिचित्रे रंगवून व्यावसायिक चित्रकला करत होता. इ.स. १७९१ साली तो भारतात आला. सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस, महादजी शिंदे इत्यादी मराठा साम्राज्यातील तत्कालीन राज्यकर्त्या व्यक्तींची चित्रे त्याने चितारली. आजपावेतो (इ.स. २०११ सालापर्यंत) ज्ञात असलेली मराठा राज्यकर्त्यांची विश्वासार्ह व्यक्तिचित्रणे जेम्स वेल्साच्या चित्रांमुळेच उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात त्याच सुमारास शोध लागलेल्या वेरूळघारापुरीच्या लेण्यांची रेखाचित्रे व आराखडे बनवण्यातही त्याने मोलाची भूमिका बजावली.

चित्रे चितारण्यासोबतच जेम्स वेल्साने पुणे दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट चार्ल्स मॅलेट व पेशव्यांच्या मदतीने पुण्यात कलाशिक्षणार्थ चित्रशाळा सुरू केल्याचे सांगितले जाते. पुण्याच्या चित्रशाळेत वेल्साच्या हाताखाली शिकलेल्या गंगाराम चिंतामण तांबट नावाच्या कलाकाराने पुढे वेरूळ व घारापुरीच्या लेण्यांची रेखाचित्रे, आराखडे बनवण्याच्या कामी त्याचा मदतनीस म्हणून काम केल्याचे संदर्भ आढळतात.

बाह्य दुवे

संपादन