२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा आहे. उप प्रादेशिक स्पर्धा जून आणि जुलै २०२१ मध्ये फिनलंड आणि बेल्जियममध्ये होणार होत्या तर प्रादेशिक अंतिम फेरी ऑक्टोबर २०२१ मध्ये स्पेनमध्ये होणार होती. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले गेले.

कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा अनेकवेळा पुढे ढकलाव्या लागल्यानंतर सरतेशेवटी मे २०२१ मध्ये आयसीसीने उप प्रादेशिक फेऱ्या रद्द केल्या. उपप्रादेशिक पात्रता रद्द केल्याचा परिणाम म्हणून ३० एप्रिल २०२० पर्यंत आयसीसी पुरुषांच्या ट्वेंटी२० संघ क्रमवारीत आपापल्या गटातील संघांपैकी अव्वल स्थानी असल्यामुळे इटली, जर्मनी आणि डेन्मार्क अनुक्रमे गट अ, ब आणि क मधून पात्र ठरले, जर्सी आधीच २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर प्रादेशिक अंतिम फेरीत पोचला होता.

पार्श्वभूमी संपादन

प्रत्येक उप प्रादेशिक गटातील विजेता संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरला. प्रादेशिक अंतिम फेरीमधून विजेता आणि उपविजेता संघाला दोन पैकी एका जागतिक पात्रता स्पर्धेत बढती मिळाली. १ जानेवारी २०२० रोजी आयसीसी क्रमवारीत अव्वल राहिलेल्याने जर्सीने थेट प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २८ जानेवारी २०२० रोजी आयसीसीने पात्रता स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांची आणि यजमानांची यादी जाहीर केली ज्यात फिनलंडला पहिली वहिली आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी नेमले होते.

मूलत: उप प्रादेशिक स्पर्धा मे आणि नोव्हेंबर २०२० दरम्यान स्पेन, बेल्जियम आणि फिनलंड मध्ये होणार होत्या. परंतु २४ मार्च २०२० रोजी कोव्हिड-१९ मुळे ३० जून २०२० पर्यंतच्या सर्व आयसीसी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे आयसीसीने जाहीर केले. सरतेशेवटी उप प्रादेशिक स्पर्धा रद्द करण्यात आली आणि स्पेन मध्ये प्रादेशिक अंतिम फेरी खेळवण्याचे निश्चित करण्यात आले.

सहभागी देश संपादन

खालील देश उप प्रादेशिक फेरीत सहभाग घेणार होते.

टीप : ठळक अक्षरात लिहिलेला देश प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये पात्र ठरला.

गट अ गट ब गट क

प्रादेशिक अंतिम फेरी संपादन

२०२१ ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता
तारीख १५ – २१ ऑक्टोबर २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान   स्पेन
विजेते   जर्सी
सहभाग
सामने १२
सर्वात जास्त धावा   जाँटी जेनर (१७५)
सर्वात जास्त बळी   चार्ल्स पारचर्ड (१०)
  बेंजामिन वॉर्ड (१०)
२०१८-१९ (आधी)

प्रादेशिक अंतिम फेरीचे सामने १५ ते २१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान स्पेन मध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. आयसीसीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळापत्रक जारी केले. सर्व सामने अल्मेरिया मधील डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले.

स्पर्धा द्विगट पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघाने इतर संघांशी दोन सामने खेळले. गट फेरीत अव्वल दोन संघ पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. सहापैकी पहिले पाच सामने जिंकत ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत स्थान मिळवणारा जर्सी पहिला संघ ठरला. दुसऱ्या स्थानासाठी जर्मनी आणि इटली यांच्यात अटीतटीचा मुकाबला झाला. इटली ने १ धावेने जर्मनीचा पराभव केला. परंतु जर्मनीपेक्षा इटलीची निव्वळ धावगती कमी असल्याने जर्मनीने जागतिक पात्रता स्पर्धेत प्रगती केली.

गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  जर्सी १२ ०.७५२ जागतिक पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र
  जर्मनी ०.०८५
  इटली -०.३३९
  डेन्मार्क -०.५०३

सामने संपादन

१५ ऑक्टोबर २०२१
१०:१५
धावफलक
जर्सी  
१३७/७ (२० षटके)
वि
  जर्मनी
१३३/५ (२० षटके)
हॅरिसन कार्ल्यॉन ५० (४४)
साहिर नकाश ३/३० (४ षटके)
तल्हा खान ३२ (२८)
चार्ल्स पारचर्ड २/३२ (४ षटके)
जर्सी ४ धावांनी विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: हॅरिसन कार्ल्यॉन (जर्सी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • जर्सीने स्पेनमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • फैसल मुबाशीर (ज), असा ट्राइब आणि झॅक ट्राइब (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ ऑक्टोबर २०२१
१५:१५
धावफलक
डेन्मार्क  
१००/९ (२० षटके)
वि
  इटली
१०१/४ (१७.५ षटके)
सूर्या आनंद ३१ (२४)
जसप्रीत सिंग २/१० (३ षटके)
जियान मीडे २८ (२८)
देलावर खान २/५ (३ षटके)
इटली ६ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: जियान मीडे (इटली)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • शकेरुल्लाह सफी, शंगेव थानिकैथासन (डे), गॅरेथ बर्ग, माडुपा फर्नांडो, जेमी ग्रसी, दमिथ कोसला, निकोलाए स्मिथ आणि ग्रँट स्टुअर्ट (इ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • याआधी इंग्लंडतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळल्यानंतर अमजद खान याने या सामन्याद्वारे डेन्मार्कतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • याआधी इंग्लंडतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळल्यानंतर जेड डर्नबाख याने या सामन्याद्वारे इटलीतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • इटली आणि डेन्मार्क या दोन्ही देशांनी स्पेनमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

१६ ऑक्टोबर २०२१
१०:१५
धावफलक
डेन्मार्क  
११०/६ (२० षटके)
वि
  जर्मनी
११२/४ (१८.२ षटके)
फ्रेडेरिक क्लोकर २९* (२८)
विष्णू भारती २/१५ (४ षटके)
फैसल मुबाशीर ३६ (३७)
सैफ अहमद १/१३ (४ षटके)
जर्मनी ६ गडीइ राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: फैसल मुबाशीर (जर्मनी)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • फयाज खान (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१६ ऑक्टोबर २०२१
१५:१५
धावफलक
जर्सी  
१३९/५ (२० षटके)
वि
  इटली
९८ (१८.२ षटके)
जेमी ग्रसी २० (२२)
चार्ल्स पारचर्ड २/१६ (३.२ षटके)
जर्सी ४१ धावांनी विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: बेंजामिन वॉर्ड (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.

१७ ऑक्टोबर २०२१
१०:१५
धावफलक
जर्सी  
९४ (१९.३ षटके)
वि
  डेन्मार्क
८९ (१९.५ षटके)
बेंजामिन वॉर्ड ३२ (३९)
बशीर शाह ३/६ (४ षटके)
देलावर खान २४ (३१)
चार्ल्स पारचर्ड ४/१४ (३.५ षटके)
जर्सी ४ धावांनी विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: चार्ल्स पारचर्ड (जर्सी)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • डॅनियेल बिरेल (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१७ ऑक्टोबर २०२१
१५:१५
धावफलक
इटली  
१०३/५ (२० षटके)
वि
  जर्मनी
१०४/६ (१८.४ षटके)
ग्रँट स्टुअर्ट २७ (२५)
मुस्लीम यार ३/१८ (४ षटके)
डायलन ब्लिगनॉट ३६* (४८)
माडुपा फर्नांडो २/२० (४ षटके)
जर्मनी ४ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: डायलन ब्लिगनॉट (जर्मनी)
  • नाणेफेक : इटली, फलंदाजी.
  • अमीर शरीफ (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२१
१०:१५
धावफलक
इटली  
१४१/४ (२० षटके)
वि
  डेन्मार्क
१३२/९ (२० षटके)
ग्रँट स्टुअर्ट ५१ (३१)
सैफ अहमद २/२१ (४ षटके)
सूर्या आनंद ३६ (२६)
जियान मीड ३/१८ (४ षटके)
इटली ९ धावांनी विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: ग्रँट स्टुअर्ट (इटली)
  • नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
  • बिलाल आफताब (डे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२१
१५:१५
धावफलक
जर्मनी  
८५ (१९.५ षटके)
वि
  जर्सी
८६/६ (१७.१ षटके)
डायलन ब्लिगनॉट २७ (२७)
बेंजामिन वॉर्ड ४/१८ (४ षटके)
झॅक ट्राइब २५ (२३)
साहिर नकाश २/९ (२ षटके)
जर्मनी ४ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: बेंजामिन वॉर्ड (जर्सी)
  • नाणेफेक : जर्मनी, फलंदाजी.
  • चार्ली ब्रेनान (जर्सी) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२० ऑक्टोबर २०२१
१०:१५
धावफलक
इटली  
१००/८ (२० षटके)
वि
  जर्सी
१०४/२ (१८.२ षटके)
जॉय परेरा २३ (२५)
डॅनियेल बिरेल २/१५ (४ षटके)
जर्सी ८ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: हॅरिसन कार्ल्यॉन (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी, क्षेत्ररक्षण.

२० ऑक्टोबर २०२१
१५:१५
धावफलक
जर्मनी  
११९/५ (२० षटके)
वि
  डेन्मार्क
१०७ (१९.४ षटके)
मायकेल रिचर्डसन ६१* (५३)
सैफ अहमद ३/१२ (४ षटके)
शंगेव थानिकैथासन ३५ (३२)
मुस्लीम यार ३/२५ (४ षटके)
जर्मनी १२ धावांनी विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: मायकेल रिचर्डसन (जर्मनी)
  • नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
  • अब्सर खान (डे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ ऑक्टोबर २०२१
१०:१५
धावफलक
इटली  
११७ (२० षटके)
वि
  जर्मनी
११६/६ (२० षटके)
जॉय परेरा ४५ (५३)
डायलन ब्लिगनॉट ४/१८ (२ षटके)
डीटर क्लीन २८* (१८‌)
माडुपा फर्नांडो २/१५ (४ षटके)
इटली १ धावेने विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: डीटर क्लीन (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.

२१ ऑक्टोबर २०२१
१५:१५
धावफलक
डेन्मार्क  
१३०/६ (२० षटके)
वि
  जर्सी
१३१/६ (१८.५ षटके)
जाँटी जेनर ९६* (६६)
बशिर शाह २/१६ (३ षटके)
जर्सी ४ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: नितीन बाठी (ने) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: जाँटी जेनर (जर्सी)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.