२०१७ ऑस्ट्रेलियन ओपन
२०१७ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २९ जानेवारी २०१७ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.
२०१७ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १३ – २९ | |||||
वर्ष: | १०५ वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रॉजर फेडरर | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
हेन्री कोंटीनेन / जॉन पीअर्स | ||||||
महिला दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / ल्यूसी सफारोवा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
अबिगेल स्पीअर्स / जुआन सेबॅस्टिअन काबा | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१७ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
नोवाक जोकोविच आणि अँजेलिक कर्बर हे गतविजेते होते आणि दोघांनाही त्यांचे गतविजेतेपद राखता आले नाही. रॉजर फेडरर याने प्रतिस्पर्धी रफायेल नदालला पाच सेटमध्ये पराभूत करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे त्याचे अठरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते. महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्सने तिची बहीण व्हीनस विल्यम्स हीला हरवून विजेतेपद पटकावले. त्यामुळे स्टेफी ग्राफचा विक्रम मोडून २३ ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह पुरुष किंवा महिला एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम सेरेना विल्यम्सने तिच्या नावे केला.
विजेते
संपादनपुरुष एकेरी
संपादन- रॉजर फेडरर ने रफायेल नदालला –6–4, 3–6, 6–1, 3–6, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
संपादन- सेरेना विल्यम्स ने व्हीनस विल्यम्सला 6–4, 6–4 असे हरवले.
पुरुष दुहेरी
संपादन- हेन्री कोंटीनेन / जॉन पीअर्स ह्यांनी बॉब ब्रायन / माइक ब्रायन ह्यांना 7–5, 7–5 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादन- बेथनी मॅटेक-सँड्स / ल्यूसी सफारोवा ह्यांनी आंद्रेया लावाकोव्हा / पेंग शुआय ह्यांना 6–7(4–7), 6–3, 6–3 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादन- अबिगेल स्पीअर्स / जुआन सेबॅस्टिअन काबा ह्यांनी सानिया मिर्झा / इव्हान डोडिक ह्यांना 6–2, 6–4 असे हरवले.