२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२०


श्रीलंकेमध्ये १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान पार पडेलली चवथी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, वेस्ट इंडीजने जिंकली.[][][] आशिया खंडातील ही पहिलीच टी२० विश्वचषक स्पर्धा, या आधीच्या तीन स्पर्धा, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मध्ये झाल्या होत्या. श्रीलंकेचा तेजगती गोलंदाज लसिथ मलिंगा ह्याला आयसीसीतर्फे या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडण्यात आले. [] स्पर्धेच्या स्परूपानुसार प्राथमिक फेरीत प्रत्येकी तीन देशांचे चार गट होते. भारत आणि इंग्लंडच्या 'अ' गटात आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, अफगाणिस्तान होता. पात्रता फेरीतील विजेता संघ आयर्लंड, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या 'ब' गटात होता. 'क' गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे, तर 'ड' गटात पाकिस्तान, न्यू झीलंड आणि बांगलादेशचा समावेश होता. []

२०१२ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - श्रीलंका श्रीलंका
संघ १२
यजमान देश श्रीलंका श्रीलंका
विजेता संघ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  (१ वेळा विजेते)
उपविजेता संघ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सामने   २७
सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन (२४९)
सर्वाधिक बळी श्रीलंका अजंता मेंडीस (१५)
मालिकावीर भारतविराट कोहली
२०१० (आधी) (नंतर) २०१४

सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने २१ सप्टेंबर २०११ रोजी जाहीर केले. [] आणि त्याच दिवशी त्यांनी स्पर्धेचा लोगो "मॉडर्न स्पिन"चे सुद्धा अनावरण केले.[]

पार्श्वभूमी

संपादन

२०१२ विश्व ट्वेंटी२० ही ट्वेंटी२० स्पर्धेची चवथी आवृत्ती आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या स्पर्धेतील चित्तथरारक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून ट्वेंटी२० जेतेपद मिळवले होते. परंतु २००७ मधल्या अंतिम सामन्यातील पराभूत पाकिस्तानने इंग्लंडमध्ये पार पडलेला, २००९चा टी२० विश्वचषक श्रीलंकेचा पराभवकरून जिंकून घेतला. वेस्ट इंडीज मधील २०१० टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंडने जिंकला होता.[]

स्वरूप

संपादन

२०१० च्या ट्वेंटी२० विश्वचषका प्रमाणेच ह्या विश्वचषकाचे स्वरूप होते. प्राथमिक फेरीतील चार गटांमध्ये कसोटी खेळणाऱ्या दहा देशांसोबत दोन असोसिएट देशांचे संघ होते, जे संयुक्त अरब अमिरातीमध्ये १३-२४ मार्च २०१२ दरम्यान झालेल्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२ फेरीतून पात्र ठरले होते.

'अ' ते 'ड' गटामधील प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर ८ फेरीमध्ये गट १ आणि २ मध्ये खेळले. सुपर ८ मधल्या दोन गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

सुपर ८ मधल्या गट १ मध्ये गट अ आणि क मधील अव्वल मानांकन असलेले संघ तसेच गट ब आणि ड मधील दुसरे मानांकन असलेल्या संघांचा समावेश होता, गट २ मध्ये गट ब आणि ड मधील अव्वल मानांकन असलेले संघ तसेच गट अ आणि क मधील दुसरे मानांकन असलेल्या संघांचा समावेश होता. स्पर्धेच्या सुरुवातीला संघांना मानांकने दिली गेली होती, ज्यावर गट फेरीतील निकालांचा काहीही परिणाम होणार नव्हता. जर बिगरमानांकित संघाने मानांकन असलेल्या संघाला बाद केले तर बाद झालेल्या संघाचे मानांकन त्यांना बहाल करण्याची तरतूद होती. []

गट फेरी आणि सुपर ८ मध्ये दिले जाणारे गुण खालील प्रमाणे:

निकाल गुण
विजय २ गुण
अनिर्णित/रद्द १ गुण
पराभव ० गुण

स्पर्धेच्या कोणत्याही सामन्यात बरोबरी झाल्यास सुपर ओव्हरच्या मदतीने विजयी संघ निवडण्यात येईल. []

गट फेरी किंवा सुपर ८ फेरीमधील प्रत्येक गटातील संघांना खालील निकषांवर क्रमांक दिले गेले:[१०]

  1. सर्वाधिक गुणसंख्या
  2. समान असल्यास, सर्वाधिक विजय
  3. तरीही समान असल्यास, उच्च निव्वळ धावगती
  4. तरीही समान असल्यास, कमीत कमी गोलंदाजी स्ट्राइक रेट.
  5. तरीही समान असल्यास, एकमेकांसोबतच्या सामन्याचा निकाल.

पात्रता

संपादन

आयसीसीच्या विकास समितीने विश्व ट्वेंटी२० साठी जागतिक पात्रता प्रणाली वाढवली, ज्यामुळे नियामक मंडळाच्या सहकारी आणि संलग्न सभासदांना स्पर्धेत सहभागी होण्याची संघी प्राप्त झाली. फेब्रुवारी २०१० मधील आठ संघांसहित एकूण १६ संघ २०१२ मध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत लढले.

अंतिम सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तानचा पराभव करून पात्रता फेरीचे जेतेपद मिळवले आणि दोन्ही संघ २०१२ ट्वेंटी२० विश्व चषकासाठी पात्र ठरले.

स्थळे

संपादन

सर्वच्या सर्व सामने खालील तीन मैदानांवर खेळवले गेले:

पल्लेकेले कोलंबो हंबन्टोटा
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान रणसिंगे प्रेमदासा मैदान महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान
   
प्रेक्षक क्षमता: ३५,००० प्रेक्षक क्षमता: ३५,००० प्रेक्षक क्षमता: ३५,०००

सामनाधिकारी

संपादन

२१ सप्टेंबर २०११ रोजी गट जाहीर झाले.[]

वेळापत्रक आणि निकाल

संपादन

आयसीसी विश्व ट्वेंटी२० मध्ये १२ सामने गट फेरीत, १२ सुपर ८ फेरीत, २ उपांत्य सामने आणि अंतिम सामना असे एकूण २७ सामने खेळवले गेले. [११][१२]

सर्व वेळा श्रीलंका प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३०)

सराव सामने

संपादन

गट फेरी

संपादन
संघ मानांकन सा वि नेरर गुण
  भारत अ२ +२.८२५
  इंग्लंड अ१ +०.६५०
  अफगाणिस्तान -३.४७५
१९ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१५९/५ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१३६ (१९.३ षटके)
विराट कोहली ५० (३९)
शापूर झाद्रान ५/३३ (४ षटके)
भारत २३ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: विराट कोहली, भारत
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
  • नजीबुल्लाह झदरानचे अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण.

२१ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१९६/५ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
८० (१७.२ षटके)
गुलबोदीन नईब ४४ (३२)
समित पटेल २/६ (३ षटके)
इंग्लंड ११६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ल्यूक राईट, इंग्लंड
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड आणि भारत सुपर ८ फेरीसाठी पात्र आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद
  • अफगाणिस्तानच्या सर्वबाद ८० ह्या २०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० च्या सर्वात कमी धावा.

२३ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१७०/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
८० (१४.४ षटके)
रोहित शर्मा ५५* (३३)
स्टीव्हन फिन २/३३ (४ षटके)
क्रेग कीस्वेटर ३५ (२५)
हरभजनसिंग ४/१२ (४ षटके)
भारत ९० धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अलिम दार (पा) आणि असद रौफ (पा)
सामनावीर: Harbhajan Singh (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • इंग्लंडच्या सर्वबाद ८० ह्या २०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० च्या सर्वात कमी धावा.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील इंग्लंडची निचांकी धावसंख्या.
  • इंग्लंडच्या सर्ववाद ८० ही कसोटी खेळणाऱ्या संघांपैकी आयसीसी विश्व टी२० मधील निचांकी धावसंख्या.


संघ मानांकन सा वि नेरर गुण
  ऑस्ट्रेलिया ब१ +२.१८४
  वेस्ट इंडीज ब२ -१.८५५
  आयर्लंड -२.०९२
१९ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१२३/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२५/३ (१५.१ षटके)
केविन ओ’ब्रायन ३५ (२९)
शेन वॉटसन ३/२६ (४ षटके)
शेन वॉटसन ५१ (३०)
केविन ओ’ब्रायन १/१८ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी आणि २९ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अलिम दार (पा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: शेन वॉटसन (ऑ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

२२ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९१/८ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१००/१ (९.१ षटके)
ख्रिस गेल ५४ (३३)
मिचेल स्टार्क ३/३५ (४ षटके)
शेन वॉटसन ४१* (२४)
फिडेल एडवर्डस् १/१६ (२ षटके)
ऑस्ट्रेलिया १७ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अलिम दार (पा) आणि असद रौफ (पा)
सामनावीर: शेन वॉटसन (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • पावसामुळे ९.१ षटकांनंतर सामना सोडून देण्यात आला.
  • डकवर्थ/लुईस नियमानुसार ९.१ षटकांनंतर विजयासाठी १ बाद ८३ धावसंख्या गरजेची होती, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
  • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया सुपर ८ फेरी साठी पात्र



२४ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१२९/६ (१९ षटके)
वि
नील ओ’ब्रायन २५ (२१)
ख्रिस गेल २/२१ (३ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना १९ षटकांचा करण्यात आला.
  • वेस्ट इंडीजचा डाव सुरू होण्याआधी सामना रद्द करण्यात आला.
  • सरस निव्वळ धावगतीमुळेवेस्ट इंडीज सुपर ८ फेरी साठी पात्र आणि आयर्लंड स्पर्धेतून बाद


संघ मानांकन सा वि नेरर गुण
  दक्षिण आफ्रिका क२ +३.५९७
  श्रीलंका क१ +१.८५२
  झिम्बाब्वे -३.६२४
१८ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१८२/४ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१०० (१७.३ षटके)
श्रीलंका ८२ धावांनी विजयी
महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: अजंता मेंडीस (श्री)

२० सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
९३/८ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
९४/० (१२.४ षटके)
क्रेग एर्विन ३७ (४०)
जॅक कॅलिस ४/१५ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी व ४४ चेंडू राखून विजयी
महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि रिचर्ड कॅटेलबोरो (इं)
सामनावीर: जॅक कॅलिस (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळेदक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका सुपर ८ फेरीसाठी पात्र आणि झिंबाब्वे स्पर्धेतून बाद

२२ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
७८/४ (७ षटके)
वि
  श्रीलंका
४६/५ (७ षटके)
कुमार संगकारा १३ (११)
डेल स्टेन २/१० (२ षटके)
दक्षिण आफ्रिका ३२ धावांनी विजयी
महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
पंच: रिचर्ड कॅटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला, आणि प्रत्येकी ७ षटकांचा खेळवण्यात आला.


संघ मानांकन सा वि नेरर गुण
  पाकिस्तान ड१ +०.७०६
  न्यूझीलंड ड२ +१.१५०
  बांगलादेश -१.८६८
२१ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१९१/३ (२०.० षटके)
वि
  बांगलादेश
१३२/८ (२०.० षटके)
ब्रँडन मॅककुलम १२३ (५८)
अब्दुर रझाक २/२८ (४ षटके)
नासिर हुसेन ५० (३९)
टीम साऊथी ३/१६ (४ षटके)
न्यू झीलंड ५९ धावांनी विजयी
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, पल्लेकेले
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: ब्रँडन मॅककुलम (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी

२३ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१७७/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१६४/९ (२० षटके)
नासिर जमशेद ५६ (३५)
टीम साऊथी २/३१ (४ षटके)
रॉब निकोल ३३ (२८)
सईद अजमल ४/३० (४ षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान सुपर ८ फेरी साठी पात्र.



२५ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१७५/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१७८/२ (१८.४ षटके)
शकिब अल हसन ८४ (५४)
यासीर अराफत ३/२५ (३ षटके)
इम्रान नाझीर ७२ (३६)
अबुल हसन २/३३ (३ षटके)
पाकिस्तान ८ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, पल्लेकेले
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: इम्रान नाझीर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड सुपर ८ फेरी साठी पात्र आणि बांगलादेश स्पर्धेतून बाद
  • १७५/६ ही बांगलादेशची आयसीसी विश्व ट्वेंटी२० मधील सर्वोच्च धावसंख्या.(याआधी वेस्ट इंडीज विरुद्ध १६५/३)
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील पाकिस्तानचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग [१४]
  • बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील सर्वोच्च यशस्वी पाठलाग
  • शकिब अल हसनच्या ५४ चेंडूत ८४ धावा ही कोणत्याही फलंदाजाच्या पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील सर्वोत्तम कामगिरी.[१५]


सुपर ८ फेरी

संपादन

स्पर्धेच्या सुरुवातीला संघांना मानांकने दिली गेली होती, ज्यावर गट फेरीतील निकालांचा काहीही परिणाम होणार नव्हता. जर बिगरमानांकित संघाने मानांकन असलेल्या संघाला बाद केले तर बाद झालेल्या संघाचे मानांकन त्यांना बहाल करण्याची तरतूद होती.[]

संघ[१६] सा वि नेरर गुण
  श्रीलंका +०.९९८
  वेस्ट इंडीज -०.३७५
  इंग्लंड -०.३९७
  न्यूझीलंड -०.१६९
२७ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१७४/७ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१७४/६ (२० षटके)
रॉब निकोल ५८ (३०)
अकिला धनंजय २/३२ (४ षटके)
सामना बरोबरीत. श्रीलंकेचा सुपर ओव्हर मध्ये विजय
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, पल्लेकेले
पंच: अलिम दार (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • अकिला धनंजय (श्री) याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण

२७ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७९/५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१६४/४ (२० षटके)
आयॉन मॉर्गन ७१* (३६)
रवी रामपॉल २/३७ (४ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • आयॉन मॉर्गनच्या २५ चेंडूतील ५० धावा ह्या इंग्लंडतर्फे आयसीसी विश्व ट्वेंटी२० मधील सर्वात जलद धावा.

२९ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१४८/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४९/४ (१८.५ षटके)
इंग्लंड ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, पल्लेकेले
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ल्यूक राईट (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

२९ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१२९/५ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१३०/१ (१५.२ षटके)
महेला जयवर्धने ६५* (४९)
रवी रामपॉल १/३९ (४ षटके)
श्रीलंका ९ गडी व २८ चेंडू राखून विजयी
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, पल्लेकेले
पंच: अलिम दार (पा) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑ)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्री)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी

१ ऑक्टोबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१३९ (१९.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
१३९/७ (२० षटके)
ख्रिस गेल ३० (१४)
टीम साऊथी ३/२१ (४ षटके)
रॉस टेलर ६२* (४०)
सुनील नारायण ३/२० (४ षटके)
सामना बरोबरीत; वेस्ट इंडीज सुपर ओव्हर मध्ये विजयी
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, पल्लेकेले
पंच: अलिम दार (पा) आणि असद रौफ (पा)
सामनावीर: सुनील नारायण (वे)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड स्पर्धेतून बाद

१ ऑक्टोबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१६९/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१५०/९ (२० षटके)
समित पटेल ६७ (४८)
लसिथ मलिंगा ५/३१ (४ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका आणि वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र आणि इंग्लंड स्पर्धेतून बाद


संघ[१६] सा वि नेरर गुण
  ऑस्ट्रेलिया +०.४६४
  पाकिस्तान +०.२७२
  भारत -०.२७४
  दक्षिण आफ्रिका -०.४२१
२८ सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१३३/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३६/८ (१९.४ षटके)
उमर अकमल ४३* (४१)
डेल स्टेन ३/२२ (४ षटके)
पाकिस्तान २ गडी व २ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: उमर गुल (पा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी

२८ सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१४०/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४१/१ (१४.५ षटके)
इरफान पठाण ३१ (३०)
शेन वॉटसन ३/३४ (४ षटके)
शेन वॉटसन ७२ (४२)
युवराज सिंग १/१६ (२ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड कॅटेलबोरो (इं)
सामनावीर: शेन वॉटसन (ऑ)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

३० सप्टेंबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१४६/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४७/२ (१७.४ षटके)
शेन वॉटसन ७० (४७)
मॉर्ने मॉर्केल १/२३ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व १४ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: शेन वॉटसन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी

३० सप्टेंबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१२८ (१९.४ षटके)
वि
  भारत
१२९/२ (१७ षटके)
शोएब मलिक २८ (२२)
लक्ष्मीपती बालाजी ३/२२ (३.४ षटके)
विराट कोहली ७८* (६१)
रझा हसन १/२२ (४ षटके)
भारत ८ गडी व १८ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रिचर्ड कॅटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

२ ऑक्टोबर
१५:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१४९/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
११७/७ (२० षटके)
नासीर जमशेद ५५ (४६)
मिचेल स्टार्क ३/२० (४ षटके)
मायकेल हसी ५४* (४७)
सईद अजमल ३/१७ (४ षटके)
पाकिस्तान ३२ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रिचर्ड कॅटेलबोरो (इं)
सामनावीर: रझा हसन (पा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे सरस निव्वळ धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र आणि दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद.

२ ऑक्टोबर
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१५२/६ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५१ (१९.५ षटके)
सुरेश रैना ४५ (३४)
रॉबिन पीटरसन २/२५ (४ षटके)
फाफ डू प्लेसी ६५ (३८)
झहीर खान ३/२२ (४ षटके)
भारत १ धावेने विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे सरस धावगतीच्या जोरावर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र आणि भारत स्पर्धेतून बाद.
  • सलग चार वेळा २०-२० विश्वचषक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ.


बाद फेरी

संपादन
  उपांत्य फेरी अंतिम सामना
                 
①१    श्रीलंका १३९/४ (२० षटके)  
②२    पाकिस्तान १२३/७ (२० षटके)  
    ①२    वेस्ट इंडीज १३७/६ (२० षटके)
  ①१    श्रीलंका १०१ (१८.४ षटके)
①२    वेस्ट इंडीज २०५/४ (२० षटके)
②१    ऑस्ट्रेलिया १३१ (१६.४ षटके)  

उपांत्य सामने

संपादन
४ ऑक्टोबर
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१३९/४ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१२३/७ (२० षटके)
मोहम्मद हफीझ ४२ (४०)
रंगना हेराथ ३/२५ (४ षटके)
श्रीलंका १६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
प्रेक्षकसंख्या: ३५,०००
पंच: सायमन टफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

५ ऑक्टोबर
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२०५/४ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१३१ (१६.४ षटके)
ख्रिस गेल ७५* (४१)
पॅट कमिन्स २/३६ (४ षटके)
जॉर्ज बेली ६३ (२९)
रवी रामपॉल ३/१६ (३.४ षटके)
वेस्ट इंडीज ७४ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो.श्रीलंका
प्रेक्षकसंख्या: २२,३४५
पंच: अलिम दार (पा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: ख्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी


अंतिम सामना

संपादन

उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक खेळी केल्यानंतर, अंतिम सामन्यात मात्र ख्रिस गेल अवघ्या ३ धावांवर बाद झाला आणि त्या वेळी ५.५ षटकांत वेस्ट इंडीजची धावसंख्या होती २ बाद १४. त्यानंतर मार्लोन सॅम्युएल्सने ५५ चेंडूंत ७८ धावांची वेगवान खेळी केली, ज्यामध्ये स्पर्धेतील सर्वात लांब १०६ मी.चा षट्कार समाविष्ट होता त्यासोबतीला कर्णधार डॅरेन सामीच्या १५ चेंडूंतील २६ धावांच्या खेळीमुळे ११ ते २० षटकांदरम्यान वेस्ट इंडीजने १०८ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेला ८ षटकांमध्ये ३९/१ असा आवर घातला. श्रीलंकेचे दोन फलंदाज धावचीत झाले आणि त्यांच्यातर्फे सर्वाधिक ३३ धावा केल्या त्या कर्णधार महेला जयवर्धनेने. नुवान कुलसेकराने शेवटी १६ चेंडूंत २६ धावा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतू, तळाच्या फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत आणि श्रीलंका विजयी लक्ष्यापासून ३६ धावा दूर रहिली. सॅम्युएल्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, त्याने सामन्यात सर्वाधिक ७८ धावा केल्या तसेच चार षटकांत फक्त १५ धावा देऊन एक बळी घेतला.

वेस्ट इंडीजचा हा विजय २००४ आयसीसी चॅम्पियनशीप नंतर पहिलाच आयसीसी स्पर्धेतील विजय तर १९७९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतरचे पहिलेच आयसीसी जगज्जेते पद. तसेच आयसीसीच्या सर्वच्या सर्व तीन जागतिक स्पर्धा (विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्व ट्वेंटी२०) जिंकणारा हा भारताशिवाय दुसराच संघ.

७ ऑक्टोबर
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१३७/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१०१ (१८.४ षटके)
वेस्ट इंडीज ३६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
प्रेक्षकसंख्या: ३५,०००
पंच: अलिम दार (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • वेस्ट इंडीजचे पहिलेच जेतेपद.


आकडेवारी

संपादन

फलंदाजी

संपादन
सर्वाधिक धावा
फलंदाज[१७] डाव धावा सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्तम धावसंख्या १०० ५०
  शेन वॉटसन २४९ ४९.८० १५०.०० ७२ १९ १५
  महेला जयवर्धने २४३ ४०.५० ११६.२६ ६५* २९
  मार्लोन सॅम्यूएल्स २३० ३८.३३ १३२.९४ ७८ १४ १५
  ख्रिस गेल २२२ ४४.४० १५०.०० ७५* १९ १६
  ब्रॅन्डन मॅककुलम २१२ ४२.४० १५९.३९ १२३* २० १०

गोलंदाजी

संपादन
सर्वाधिक बळी
गोलंदाज [१८] डाव बळी सरासरी इकॉनॉमी डावात सर्वोत्तम स्ट्राईक रेट ४ ब ५ ब
  अजंता मेंडीस १५ ९.८० ९.६ ६/८ ९.६
  शेन वॉटसन ११ १६.०० ७.३३ ३/२६ १३.०
  मिचेल स्टार्क १० १६.४० ६.८३ ३/२० १४.४
  लक्ष्मीपती बालाजी ९.७७ ७.३३ १/१९ ८.०
  सईद अजमल १८.११ ६.७९ ४/३० १६.०
  सुनील नारायण १५.४४ ५.६३ ३/९ १६.४४

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ "सॅम्युएल स्पेशल द स्पर फॉर एपिक वेस्ट इंडीज विन" (इंग्रजी भाषेत). 2012-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "विश्व ट्वेंटी२० च्या पहिल्या सामन्यात इंग्लंडची गाठ पात्रता फेरीतील संघाशी" (इंग्रजी] भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  3. ^ "आयसीसी टी२० विश्वचषक २०१२ वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). 2012-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-19 रोजी पाहिले.
  4. ^ "मलिंग ट्वेंटी२० विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसिडर" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "विश्व ट्वेंटी२० मध्ये इंग्लंडचा मुकाबला भारताशी" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "पात्रता फेरीतील संघाबरोबर भारताचा विश्व टी२० मधील पहिला सामना" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी२० चे पुर्वावलोकन" (इंग्रजी भाषेत). 2012-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-18 रोजी पाहिले.
  8. ^ a b "आयसीसी विश्व ट्वेंटी२० / गट" (इंग्रजी भाषेत).
  9. ^ "खेळाच्या अटी" (इंग्रजी भाषेत). 2008-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-18 रोजी पाहिले.
  10. ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी २० खेळाच्या अटी" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2008-09-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-04-18 रोजी पाहिले.
  11. ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी२० वेळापत्रक".
  12. ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी२० निकाल".
  13. ^ "मेंडीसमुळे श्रीलंकेचा मोठा विजय" (इंग्रजी भाषेत).
  14. ^ "आकडेवारी क्षणचित्रे: पाकिस्तान वि. बांगलादेश, विश्व ट्वेंटी२०" (इंग्रजी भाषेत).
  15. ^ "Mushfiq's sympathy for Shakib" (इंग्रजी भाषेत).
  16. ^ a b "आयसीसी विश्व ट्वेंटी२० गुणफलक".
  17. ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी२० सर्वाधिक धावा".
  18. ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी२० सर्वाधिक बळी".

बाह्यदुवे

संपादन