हिब्रू भाषा

(हिब्रु भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

हिब्रू ही सामी भाषासमूहामधील एक प्रमुख भाषाइस्रायल देशाची सह-राष्ट्रभाषा (अरबीसह) आहे. हिब्रू जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून ती ज्यू धर्मामधील सर्वात महत्त्वाची भाषा मानली जाते. तोराह हा ज्यूंचा धर्मग्रंथ तसेच हिब्रू बायबल प्राचीन हिब्रूमध्ये लिहिले गेले आहे.

हिब्रू
עברית
प्रदेश इस्रायल, वेस्ट बँक, गोलन टेकड्या
ज्यू धर्माची पवित्र भाषा
लोकसंख्या ५३ लाख
भाषाकुळ
लिपी हिब्रू वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर इस्रायल ध्वज इस्रायल
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ he
ISO ६३९-२ heb
ISO ६३९-३ heb[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
एलीझर बेन-येहुदाला १९व्या शतकातील हिब्रूच्या पुन्नरूज्जीवनाचे श्रेय दिले जाते.

प्रागैतिहासिक काळापासून वापरात असलेल्या हिब्रूचा इ.स. २०० ते इ.स. ४०० दरम्यान काहीसा ऱ्हास झाला होता. ह्या काळात ज्यू व्यक्ती हिब्रूऐवजी ॲरेमाईक अथवा ग्रीक भाषांचा वापर करीत असत. मध्य युग काळामध्ये हिब्रू लुप्त होण्यापासून बचावली व १९व्या शतकामध्ये हिब्रूची पुन्हा वाढ होऊ लागली. सध्या जगभरात सुमारे ९० लाख हिब्रू भषिक आहेत ज्यांपैकी ७० लाख इस्रायलमध्ये आहेत. अमेरिका देशामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हिब्रू भाषिक वसले आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • हिब्रू भाषेचा इतिहास
  • Zuckermann, Ghil'ad, 2020 Revivalistics: From the Genesis of Israeli to Language Reclamation in Australia and Beyond, Oxford University Press आयएसबीएन 9780199812790 / आयएसबीएन 9780199812776
  • Zuckermann, Ghil'ad, 2003 Language Contact and Lexical Enrichment in Israeli Hebrew, Palgrave Macmillan आयएसबीएन 9781403917232 / आयएसबीएन 9781403938695