मुख्य मेनू उघडा

सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. यांनी मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.

सुधीर जोशी
जन्म इ.स. १९४८
मृत्यू १४ डिसेंबर, इ.स. २००५
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

जीवनसंपादन करा

सुधीर जोशी यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. मुंबईतल्या ब्लॅकी ॲंड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी [१] होते. कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले.

कारकीर्दसंपादन करा

चित्रपट-कारकीर्दसंपादन करा

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. १९८५ अनंतयात्रा हिंदी गोडबोले
इ.स. १९८७ गंमत जम्मत मराठी
प्रेमासाठी वाट्टेल ते मराठी
इ.स. १९८९ भुताचा भाऊ मराठी
बाळाचे बाप ब्रह्मचारी मराठी
आत्मविश्वास मराठी डॉ. बाळासाहेब सरपोतदार
इ.स. १९८८ अशी ही बनवाबनवी मराठी सरपोतदार
इ.स. १९९१ आयत्या घरात घरोबा मराठी
इ.स. १९९४ वझीर मराठी
इ.स. १९९५ लिमिटेड माणुसकी मराठी ॲड्व्होकेट भास्करराव
इ.स. २००६ मातीच्या चुली मराठी श्रीपाद दांडेकर

नाट्य-कारकीर्दसंपादन करा

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
टुर टुर मराठी
हसता हसता मराठी

दूरचित्रवाणी-कारकीर्दसंपादन करा

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
कॉमेडी डॉट कॉम मराठी

मृत्यूसंपादन करा

नोव्हेंबर, इ.स. २००५ मध्ये "हसता हसता" या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली [२]. तेथून मुंबईत परतल्यानंतर १४ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी दुपारी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. शिवाजी पार्क येथील शुश्रूषा इस्पितळात नेले जात असताना त्यांचे निधन झाले [२].

या सुमारास "मातीच्या चुली" या जोशी यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या भूमिकेचे उरलेले काम अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी पुरे केले [३].

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ विपणन अधिकारी (इंग्लिश: Marketing Executive, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह).
  2. a b "अभिनेते सुधीर जोशी यांचे निधन" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. १४ डिसेंबर, इ.स. २००५. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  3. ^ "मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला" (मराठी मजकूर). ऐक्य. २५ डिसेंबर, इ.स. २०१२. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 


बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.