विपणन (इंग्लिश:- मार्केटिंग) एक सतत प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत विपणन मिश्रण (उत्पादन, मूल्य, स्थान, प्रोत्साहने अनेकदा 4पी म्हणले जाते) नियोजित आणि अंमलात आणली जातात. ही प्रक्रिया व्यक्तींच्या आणि संस्थांमधील उत्पादने, सेवा किंवा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी केली जाते. विपणन हे एक सर्जनशील उद्योग म्हणून पाहिले जाते, ज्यामध्ये जाहिराती, वितरण आणि ग्राहकांच्या भविष्यातील गरजांशी संबंधित विक्री यांचा समावेश आहे.