सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन)
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | |
Ministry अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र | महाराष्ट्र शासन |
मुख्यालय |
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई |
वार्षिक अंदाजपत्रक | महाराष्ट्र शासन नियोजन |
जबाबदार मंत्री |
|
संकेतस्थळ | सार्वजनिक बांधकाम मंत्रालय |
खाते |
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[१][२]
कार्यालय
संपादनमहाराष्ट्रचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासन Minister Public Works (Including Public Undertakings) of Maharashtra | |
---|---|
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | सार्वजनिक बांधकाम मंत्री |
सदस्यता |
|
निवास | वर्षा निवास, मुंबई |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई |
नामांकन कर्ता | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी |
सुभाष देसाई प्रभारी (२०२२ - २०२२) |
निर्मिती | १ मे १९६० |
पहिले पदधारक | मारोतराव कन्नमवार (१९६०-१९६२) |
उपाधिकारी | 29 जून 2022 पासून रिक्त |
अंतर्गत विभाग
संपादन- सार्वजनिक बांधकाम विभाग
- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.
इतिहास
संपादनया विभागास सुमारे १५० वर्षांचा इतिहास आहे.या विभागाकडे मुख्यत: रस्याचे बांधकाम व देखरेख/सुचालन, पुलांची बांधणी व शासकीय ईमारती हे काम आहे. हे खाते महाराष्ट्र शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते. फार पूर्वी, पाटबंधारे, रस्ते व पुल तसेच सार्वजनिक ईमारतींचे बांधकामही या विभागाकडे होते.सन १९६० मध्ये जेंव्हा वेगळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यानंतर या विभागाचे दोन विभागांमध्ये विभाजन करण्यात आले.पाटबंधारे विभाग आणि ईमारती व दळणवळण विभाग. सध्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग तसाच राहीला.[३]
करण्यात येणारी कामे(थोडक्यात)
संपादनशासनाचे नेमून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे करणे. शासकीय इमारतींचे बांधकाम, राज्यातील जनतेच्या सोयींसाठी रस्ते, पुल इत्यादिंचे निर्माण व त्यांचे सुचालन/देखरेख, वाहतूक निविघ्नपणे व सुरळीत रहावी या दृष्टीने बांधकामविषयक उपाययोजना, आकस्मिक आपत्ती जसे पूर, अतिवृष्टी, भूकंप इत्यादींमध्ये तातडीच्या उपाययोजना करणे.महाराष्ट्र शासन किंवा त्यांचे अखत्यारित असणाऱ्या कोणत्याही स्थानिक संस्थेने डिपॉझिट करून सोपविलेली कामे स्वीकारणे व पूर्ण करणे. रोजगार हमी योजने-अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करणे.अति-महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिपॅडचे बांधकाम करणे. खाजगी ईमारती शासनाच्या कार्यालयांसाठी हव्या असल्यास त्याचा किराया/भाडे निर्धारीत करणे.हवाई वाहतूकीसंबंधी धावपट्ट्यांचे आरेखन, बांधकाम,सुचालन व दुरुस्ती करणे. महत्त्वाच्या सार्वजनिक ईमारतींचे बाजूस किंवा सभोवताल बाग-बगीचे तयार करणे लँडस्केपींग[मराठी शब्द सुचवा] तयार करणे.शासकीय विश्रामगृहांचे आरक्षण करणे.रस्त्यांचे कडेस असणाऱ्या फळझाडांच्या फळांचा लिलाव करणे.रस्याचे कडेस झालेले अतिक्रमण हटविणे. सिनेमा रेल्युलेशन ॲक्ट प्रमाणे सार्वजनिक वावराच्या ईमारतींना (चित्रपटगृह) आवश्यक ते स्थिरता प्रमाणपत्र व त्यांचे विद्युतीकरण तपासून आवश्यक ते प्रमाणपत्र देणे.उद्वहन(लिफ्ट)साठी प्रमाणपत्र देणे. आवश्यक ते अहवाल शासनास पाठविणे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांची,महाराष्ट्र राज्याचे अधिनियमंची अंमलबजावणी करणे.इत्यादी.[४]
कार्यक्षेत्र
संपादनसंपूर्ण महाराष्ट्र राज्य
कार्यक्षेत्राचे दृष्टीने विभाजन
संपादनप्रमुखत:, कामावर योग्य ते नियंत्रण रहावे म्हणून विकेंद्रीकरण व स्थानिक पातळीवर लक्ष देण्याचे अनुषंगाने व प्रशासकिय दृष्टीकोनातून याचे खालील विभाग करण्यात आलेले आहेत. या सर्व क्षेत्रांचे प्रमुख 'मुख्य अभियंता' हे असतात:
विभागीय मुख्यलये
संपादन- साबां पुणे क्षेत्र, पुणे
- साबां मुंबई क्षेत्र, मुंबई
- साबां विशेष प्रकल्प,मुंबई
- साबां नागपूर क्षेत्र, नागपूर
- साबां नाशिक क्षेत्र, नाशिक
- साबां औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद
- साबां अमरावती क्षेत्र, अमरावती
- साबां राष्ट्रीय महामार्ग क्षेत्र, मुंबई
- साबां विद्युत क्षेत्र, मुंबई
- मुख्य अभियंता जलसंधारण विभाग (यंत्र)
या विभागातर्फे प्रकाशित पुस्तके
संपादनइंग्रजी:
- BRIDGES IN MAHARASHTRA - प्रकाशन - १९९७
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
संपादन- रस्त्याचे विविध प्रकल्प प्रस्तावित करणे त्यांचे चालन करणे.
- विनिर्देशित रस्ते प्रकल्पांचे नियोजन, अन्वेक्षण/सर्वेक्षण,आरेखन, बांधकाम व व्यवस्थापन करणेव त्यांचे क्षेत्रांचा विकास
- शासनातर्फे महामंडळास सोपविण्यात आलेल्या कोणत्याही बांधकामांच्या कामांबाबत किंवा इतर बाबतीत आवश्यक तो करार करणे
- महामंडळाच्या सर्व कामांचे दृष्टीने निविदा, बोल्या व प्रगटने आमंत्रित करणे
- वाहतूक प्रकल्प व त्यांचे क्षेत्राच्या विकासाबाबत, जसे नियोजन,अन्वेक्षण, आरेखन, बांधकाम किंवा व्यवस्थापनासाठी कोणत्याही व्यक्तिस, मंडळास किंवा कंपनीस, व्यक्तिगत संघटनेस कंपनीगत असेल किंवा नसेल तरीही, सहभागी करून घेण्याबाबत बढती देणे
- ज्या कामांसाठी या महामंडळाची स्थापना झाली आहे अश्या कोणत्याही योजना अथवा कामे, एकतर इतर कॉर्पोरेट मंडळांशी अथवा संस्थांशी किंवा शासन अथवा स्थानिक प्रशासनाशी किंवा अभिकरण म्हणून स्वीकार करणे व त्यासंबंधी सर्व बाबींसह.
- शासनाने प्रदत्त केलेली इतर कोणतेही प्रकल्प अथवा कामे स्वीकारणे[५]
हे ही पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
- ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
- ^ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल. दिनांक ०३/०१/२०१७ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळावर त्या खात्याबद्दलची माहिती. दिनांक ०२/०१/२०१७ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाबद्दलची माहिती. दिनांक ०२/०१/२०१७ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |