सातवाहन नाण्यांवरील बिरुदे
प्राचीन भारतातील अशा सातवाहन राजवंशाची नाणी इ. स. पू. १५० च्या सुमारास तयार झाल्याचे दिसून येते. ही नाणी दक्षिण विदर्भ आणि उत्तर तेलंगणामध्ये आढळतात. मौर्योत्तर काळात प्राचीन ‘दक्षिणापथा’त अनेक लहान-लहान स्वतंत्र राजघराण्यांचा उदय झाला. त्यांपैकीच सातवाहन हे एक होते. सातवाहनांच्या उदयापूर्वी दक्षिणपथात आहत नाणी (इंग्लिश:Punch marked coins) चलनात होती. सातवाहन राजांनी राजनामांकित नाणी चलनात आणली. दक्षिणपथात अशा प्रकारची नाणी चलनात आणणारे सातवाहन राजघराणे हे प्रथम होते. तांबे, शिसे, पोटीन (potin) व काही प्रमाणात चांदीची नाणी होती. नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी व खरोष्ठी लिपीचा प्राधान्याने उपयोग केला आहे. नाण्यांवरील बिरुदे गोलाकार, नाण्याच्या डाव्या बाजूला मुख्यतः आहेत.
राजा सातवाहन (सातवाहन राजघराण्याचा पूर्वज) यांनी सर्वप्रथम स्वतःचे नाव कोरलेले नाणे चलनात आणले.या राजाची तांह्याची नाणी औरंगाबाद, हैदराबाद, अकोला या ठिकाणी उत्खननात सापडली. नेवासा, कोंडापूर या ठिकाणी उत्खननात शिशाची नाणी सापडली.
नाण्यांवरील बिरुदे ( Legends on Satvahana coins)
संपादन● राजा सातवाहन: राणो सिरी सदावाह(नसा) असे नाण्याच्या पुढील बाजूला डाव्या भागात कोरलेले आहे. शिशाच्या नाण्यावर सिरी सदावाह, राणो सिरी सतवाहनस असे कोरलेले आहे. तज्ञांच्या मते ही नाणी सातवाहन राजघराण्याच्या पूर्वजाच्या नावे छापली गेली असावीत.
● राजा सिमुक: तांबे, शिसे यांपासून बनवलेली नाणी आंध्रप्रदेशात सापडली. त्यावर राणो सिरी सिमुक सतवाहनस असे बिरूद आढळते. तसेच नाण्याच्या मागील बाजूस हत्ती, श्रीवत्स इत्यादी चिन्हे आहेत.
●राजा सातकर्णी I: हैदराबाद येथे सापडलेल्या शिशाच्या नाण्यांवर राणो सिरी सातकनिसा हे बिरूद कोरलेले आहे. त्याच्या मागील बाजूला पाच पाने असलेले झाड मध्यभागी, तर उजवीकडे श्रीवत्स चिन्ह आहे. पोटीन नाण्यांवर राणो सिरी सातकनी हे बिरूद कोरलेले आहे. जुन्नर येथे राजा सातकर्णी I व नागनिका यांचे नाणे सापडले, ज्यावर राणो सिरी सातक,नागनिकाया ही दोन ओळींची बिरुदे सापडतात. या बिरूदांच्या डाव्या बाजूला घोड्याचे चिन्ह आहे तर मागील बाजूला स्वस्तिक आहे. कदाचित हे नाणे अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी छापलेले असावे.
●राजा शक्ती: बेसनगर(प्राचीन विदिशा)येथे सापडलेल्या नाण्यांवर राणो सिरी सतिसा हे बिरूद सापडते.नाणेघाट येथील शिलालेखात उल्लेख असलेल्या सत-सिरी/श्री शक्ती या राजाचे हे नाणे असावे,ज्याचा उल्लेख जैन साहित्यात शक्ती-कुमार असाही केलेला आहे. कर्नुल जिल्ह्यात सापडलेल्या शिशाच्या नाण्यांवर कुमार सिरी सतिसा हे बिरूद सापडते. नंतर सत्ता ग्रहण केल्यावर याच राजाने राजन् या नावाने नाणी चलनात आणली.
●राजा अपिलकः बिलासपूर जिल्ह्यात तांब्याची नाणी उत्खननात मिळाली, ज्यावर सिव सिरीस अपिलकस हे बिरूद कोरलेले आहे.
●राजा गौतमीपुत्र सातकर्णी: पोटीन नाण्यांवर सिरी सातकनिसा हे बिरूद सापडते. बालपूर येथे झालेल्या उत्खननात चांदीचे नाणे सापडले. हे गौतमीपुत्र सातकर्णी याचे चित्र कोरलेले portrait coin आहे. यावर गोतमी हे बिरूद सापडते. पुर्नचलन केलेली नाणी जोगळटेंभी येथे सापडली, त्यावर राणो गोतमीपुतसा सिरी सातकनिसा असे बिरूद कोरलेले आहे.
●राजा वशिष्ठीपुत्र पुलुमवी: विदर्भात सापडलेल्या पोटीन नाण्यांवर राणो सिरी पुलुमाविसा, राणो सिव सिरी पुलुमाविसा असे कोरलेले आहे. सांगली जिल्ह्यातसापडलेल्या शिशाच्या नाण्यांवर राणो वशिठी-पुतसा सिव सिरी पुलुमाविसा हे बिरूद सापडते. Portrait नाण्यांवर राणो वसिठी-पुतसा सिरी पुलुमाविसा असे बिरूद सापडते.
●राजा वशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी: विदर्भा सापडलेल्या पोटीन नाण्यांवर राणा सिरी खद (स्कंद)सातकनिसा हे बिरूद तर शिशाच्या नाण्यांवर राणा वशिठीपुतसा सिरी कंद सतकनिसा असे बिरूद गोलाकार लिहिले आहे. चांदीच्या portrait नाण्यांवर राणो.........सिरी कंद सतकनिसा असे पुढील बाजूला कोरलेले आहे तर मागील बाजूला ‘.........सत-कनिसा’ असे बिरूद आढळते.
●राजा वशिष्ठीपुत्र विजय सातकर्णी: (ज)य सतकनिसा, वशिठी-पुतसा सा, अरा.......वशिठी-पुतसा हिरू-विजय हता (कनिसा)
●राजा वशिष्ठीपुत्र सातकर्णी : शिशाच्या नाण्यांवर गोलाकार, राणो वशिठीपुतर सिव सिरी सातकनिसा असे बिरूद कोरलेले आहे. चांदीच्या portrait नाण्यांवर राणो वशिठीपुतसा सिरी सातकनिसा असे बिरूद कोरलेले आहे.
●राजा यज्ञ सातकर्णी: गुजरात, विदर्भ, महाराष्ट्र येथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या पोटीन नाण्यांवर राणो सिरी याना सातकनिसा असे बिरूद गोलाकार कोरलेले आहे. राणो समिसा सिरी याना सतकनिसा असे बिरूद शिशाच्या नाण्यांवर आढळते. सौराष्ट्र येथे चांदीची portrait नाणी उत्खननात मिळाली, ज्यावर राणो गोतमीपुतसा सिरी याना सातकनिसा असे पुढील बाजूला तर मागील बाजूला अरह-नस गोतमीपुतसा हिरू याना हताकनिसा अशी बिरूदावली आहे.
●राजा मधारीपुत्र शक सातकर्णी: शकसा सातकनिसा राणो मधारी
●राजा वशिष्ठीपुत्र चंद्रस्वाती: राणो वशिठीपुतसा सिरी चंद सतिसा
●पुलुमवी III: पुलुहमवी [१]
- ^ सातवाहन नाणी, मराठी शब्दकोश.