ब्राह्मी लिपी प्राचीन भारतात वापरली गेलेली एक लिपी आहे. देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मीवरून झाली. साधारणतः २,५०० ते १,५०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात ही लिपी वापरात असल्याचे संकेत आहेत. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात.

साधारण १,५०० वर्षांपूर्वी गुप्त साम्राज्यकालात ब्राह्मी लिपीत स्थित्यंतरे होऊ लागली व सहाव्या शतकानंतर या लिपीवरुन अनेक स्थानिक लिप्या तयार झाल्या व त्यांचा वापर सुरू झाल्यावर मूळ ब्राह्मी लिपी लुप्तप्राय झाली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.