प्रताधिकारांविषयी

संपादन

आपण केलेल्या सूचनेत प्रताधिकारांविषयी कल्पना द्यावी असे विचारले आहे.म्हणजे नक्की काय सूचीत करायचे आहे ? मला ह्याविषयी काहीच माहिती नाही मी चढविलेली चित्रे आंतरजालातून घेतलेली आहेत.आता त्यावर प्रताधिकार असण्याचे काहीच कारण नसावे.किंवा कुणाचे असावे ह्याविषयी मला विशेष माहिती नाही.कॉपीराईट्स कुणाचे असावे ह्याविषयी आपणच मार्गदर्शन करावे. Unfortunately हा अगदीच सोप्पा शब्द आहे राव,दुर्दैवाने असे मराठीत म्हणतात त्यास.செ.प्रसन्नकुमार १७:२५, २३ जुलै २०१० (UTC)

  • माहितगार साहेब,मी ह्याआधीच संकल्प द्रविड ह्यांच्या संदेशास उत्तरात माझे मत सांगितले आहे,द्या उडवून बिनधास्त,आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे,माझ्या संचिका आपण खुषाल उडवू शकता.इथूनपुढे प्रताधिकार वगैरे बघूनच संचिका चढवेन म्हणतो..ठिक आहे..कळविण्याबद्दल धन्यवाद.माझ्या चित्रांना काढून टाकावे अशी विनंतीवजा सूचना.செ.प्रसन्नकुमार ०६:४५, २४ जुलै २०१० (UTC)
  • होय आपण दिलेला साचा मी थोड्याचवेळात तयार करून ठेवीन.काम चालू.செ.प्रसन्नकुमार १४:४५, २४ जुलै २०१० (UTC)

साच्याबद्दल

संपादन

आपला साचा तयार आहे कृपया एकदा पाहून कळवावे..आणि त्यातील जो लपविलेला दूवा आहे तो देखील बदलावयाचा असेल तर मला त्वरीत कळवावे.செ.प्रसन्नकुमार १५:३७, २४ जुलै २०१० (UTC)

  • आपण मला साचा निर्माण करण्याची संधी दिल्याबद्द्ल धन्यवाद,भविष्यात असे साचे करण्यास मला नक्कीच आवडेल.कळावे,लोभ असावा.

चे.प्र.कुमार ०६:२०, २६ जुलै २०१० (UTC)

  • आहो माहितगार तुम्ही आता काही बदल केलात का माझ्या चर्चा विभागात?? ते मला वादग्रस्त म्हणून काय दर्शवत आहे?? आणि ते आपोआप का बदलत आहे.कळवावे.चे.प्र.कुमार ११:०८, २६ जुलै २०१० (UTC)

साचा:Marathihelp

संपादन

साचा:Marathihelp ठिक वाटतो.काहीच प्रॉब्लेम वाटत नाही.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:५५, २६ जुलै २०१० (UTC)

विकिपीडिया:सजगता

संपादन

येथे आपण आवाहन केले नसतानाही, मला योग्य वाटेल ते नविन प्रस्तावित बदल/सुधारणा/टंकनदुरुस्त्या केल्या आहेत. आपणास योग्य वाटेल ते ठेवा नाही तर उलटवा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०९:४७, २६ जुलै २०१० (UTC)

  • आपल्या लेखाला सुरक्षित कसे करावे ते देखील कळविले तर अधिक दर्जेदार लेखांमध्ये अनावश्यक बदल होण्याचे टळेल.ते कसे करावे ते कृपया सांगावे.Half Secured/Partially Secured/Non Editable etc. Terminologies.How to Do it ? While securing our own Articles.-चे.प्र.कुमार ११:१८, २६ जुलै २०१० (UTC)

विकिमार्गदर्शक

संपादन

कृपया सदस्य:203.92.60.42‎ हे पान बघा. वि. नरसीकर (चर्चा) १०:०४, २७ जुलै २०१० (UTC)

दालन:क्रीडा

संपादन

दालन:क्रीडा चांगली संकल्पना आहे, मी नक्कीच माझे योगदान जमेल तसे देईल.

Maihudon १०:२१, २८ जुलै २०१० (UTC)

मुत्तैया मुरळिदरन विषयी

संपादन

नमस्कार माहितगार, मी वरील लेखात काही सूचना केल्या आहेत,त्या पहाव्यात आणि आणखी एक दोन जणांचे मत घेऊन योग्य ते शिर्षक निवडावे,बाकी तुम्ही दिलेल्या दूव्यांवर लवकरच काम सुरू करेन,कळावे,चे.प्र.कुमार ०६:५०, ३० जुलै २०१० (UTC)

 

ही नुकतीच चढविलेली संचिका कृपया बघा.अशीच संचिका हवी होती काय?

वि. नरसीकर (चर्चा) ०८:१५, ३० जुलै २०१० (UTC)

विज्ञानातील लेखांच्या लिखाण/ भाषांतरासाठी काही उपयुक्त शब्द

संपादन

आपण कृपया सदस्य:अनिकेत जोगळेकर/धुळपाटी हे पान पाहू शकाल का? अशाप्रकारची यादी जतन करावयाची आहे. ती वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द या पानावर करू का? हे भौतिकशास्त्रात सतत लागणारे शब्द असून भौतिकशास्त्रातील इतर इच्छुक लेखकनांही याचा चांगला उपयोग होईल असे वाटते. अनिकेत जोगळेकर १४:४६, ३० जुलै २०१० (UTC)

वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द हा वर्ग कृपया तपासावा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) १५:१२, ३० जुलै २०१० (UTC)

लेख पहा

संपादन

नमस्कार, मी ताम्रमुखी टिटवी हा लेख आत्ताच लिहिला असून हा लेख तुम्ही एकदा पहावा. यात अनेक यातायात करून आवाज चढविला आहे. मला लहान गावात राहून शक्य झाले तसे (यथाशक्ती) काम आहे. एकदा पाहून (ऐकून) हे विकिपीडियाच्या लायक आहे का ते पहावे. काही उणे असल्यास सांगावे, अगदीच टाकावू असेल तर ते काढावे. त्यानुसार मी आणखी काही पक्ष्यांचे आवाज चढवू शकेन. ogg फाईल सोबत कामाचा अनुभव नाही. या बॉक्स शेजारीच या पक्ष्याचा आवाज ऐका सारखे काही लिहावे का? मला ते जमले नाही. काही सदस्यांवर प्रांतीक हल्ले झाल्याचे पाहिल्याने तुम्हाला विनंती. यात स्टार धारी सदस्यांचे वागणे खटकले. तसेच लहान गावात राहतो म्हणूनही (यावेळी पहिल्यांदाच) काही कमतरता जाणवली. तुम्ही मुख्य मुद्दा लेख आणि आवाज तपासून सांगावे. इतर बाबी गौण आहेत. Gypsypkd ०६:१७, ३१ जुलै २०१० (UTC)

ग्लोबल टेंडर नोटिस

संपादन

कृपया मी आपल्या याहुच्या अकाउंटवर पाठविलेली मेल बघा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३६, ३१ जुलै २०१० (UTC)


पुनर्प्रवेश

संपादन

पुन्हा येथे येताना अडीच - तीन वर्षांचा कालावधी बराच आहे खरा; परंतु पूर्ण नाही तर नाही तरी जमेल तसा तरी वेळ काढावा म्हणतो.

श्रीहरि १२:३३, ४ ऑगस्ट २०१० (UTC)

भाषांतरण

संपादन

helping Again and again? हा परिच्छेद भाषांतरणात आपल्या सव्डीनुसार सहाय्य हवे आहे, ह्यातल्या कोणत्या भागाचे भाषांतरण हवे आहे? ते कळवावे.Prasannakumar १२:१२, ६ ऑगस्ट २०१० (UTC)

नागद्वार

संपादन

कृपया नागद्वार हा लेख बघावा.त्यावर आपली नेहमीप्रमाणे निष्पक्ष व सडेतोड प्रतिक्रिया आमंत्रित करतो.वाट बघत आहे.अशा प्रकारचे लेख लिहावेत काय?ते सयुक्तिक वगैरे आहेत काय ईत्यादी. वि. नरसीकर (चर्चा) ०३:५७, ७ ऑगस्ट २०१० (UTC)

सदस्य:Preeti यांनी आज चढविलेल्या संचिका कृपया बघाव्यात.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:४०, ७ ऑगस्ट २०१० (UTC)

विक्रम साळुंखे

संपादन

सदस्य:Svikram69हे प्रबंधक कधीपासुन आहेत? वि. नरसीकर (चर्चा) ०५:२८, ८ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार, मी q:साचा:व्यक्ती हा साचा (कॉपी करून) तयार केला. हा साचा तेथील लेखात लावायचा आहे. व्यक्ती असे {{}} कंसात लिहिले असता साचा दिसतो पण त्या समोर (असलेले पर्याय) कसे लिहावे हे कळले नाही. साचा प्रत्यक्ष वापरण्यासाठी काय करावे? आतापर्यंत मी पक्षी चौकट साच्यातील सर्व पर्याय कॉपी केले असल्याने मला साचा नाव असे लिहून साचे कसे वापरावे हे माहीत नाही. तसेच तेथे अन्य दोन तीन साचे तयार केले आहेत तेही एकदा पहावे. विकिवर जसे तुमचे नाव लिहा पासून देवनागरी अक्षरे ते नेहमी लागणारे साचे असे संपादन करीत असलेल्या पानाच्या खाली तयार आहे तसेच क्वोटसाठी करावयाचे आहे. देवानागरीत लिहिता येण्यासाठी काही फाईल कॉपी करून नवीन पाने तेथे तयार केली आता यासाठीही तुमची मदत पाहिजे. Gypsypkd १३:०९, ८ ऑगस्ट २०१० (UTC)

साचे त्रूटी दूर करण्यात सहाय्य हवे

संपादन

तुमचा प्रश्न असा होता कि जिथे तुम्ही {{विअप}} वर्गातील साचे वापरनार ते पान [वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा] मध्ये समाविष्ट झाले पाहिजे.मी सध्या थोडे बदल केले आहेत व सध्या तसे होतांना मला दिसते आहे.

तुमचा प्रश्न हाच होता का ?

Maihudon ०४:४८, १० ऑगस्ट २०१० (UTC)

मी काहि बदल केले आहेत. वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा पान पहावे. "विशीष्ट अर्थ पहा" हा शब्दसमुह दिसेल, प‍रंतु वर्ग पानावर त्यासाठी दुवा देणे सध्यातरी शक्य दिसत नाही आहे.
Maihudon १०:५०, १० ऑगस्ट २०१० (UTC)
मी सध्या q:साचा:व्यक्ती मध्ये q:साचा:विकिपीडिया हा साचा आंतर्भूत केला आहे. तो कसा दिसेल हे पहाण्यासाठी q:आशा भोसले हा लेख पाहावा.
Maihudon १०:४१, १० ऑगस्ट २०१० (UTC)

सांगोला

संपादन

नमस्कार, सांगोला लेखातील जाहीरात सदृष्य मजकूरही बदलावा. मी प्रयत्न केले, जमले नाही. Gypsypkd ०५:१६, १० ऑगस्ट २०१० (UTC)


सहमती

संपादन

आपण दिलेल्या निर्देशाचे पालन आवश्य करीन सदस्य:Svikram69 २०:४४, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

चर्चा:नागद्वार

संपादन

बघतो.टिप्पणीबद्दल आभार. वि. नरसीकर (चर्चा) १४:०६, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

विक्शनरीविषयी

संपादन

नमस्कार,मी आजच संकल्प द्रविड ह्यांना विक्शनरी विषयावर संदेश पाठविला आहे,त्यांचा अद्याप प्रतिसाद नाहीये,तेव्हा आपण विक्शनरीचे समन्वयक असल्याने आपल्याशी खालील विषयावर जाणून घ्यायला आवडेल.

  1. विक्शनरी मध्ये इतर भाषेतील शब्द चालतात का? e.g.Tamil Words.
  2. विक्शनरीचे लेख कसे निर्माण करतात?
  3. दुभाषी-त्रिभाषी अशी काही व्यवस्था असते का? Bilingual-trilingual.
  4. विक्शनरीचा प्रचालक किंवा प्रबंधक झाल्याने काही विशेष बदल करता येतील का? मी ते करू शकतो का? अधिक अधिकारांचा योग्य उपयोग करून नविन प्रकल्प हाती घेता येण्यासाठी.
  5. इतर भारतीय भाषांशी तुलना करता मराठी विक्शनरी फारच तुटपुंजी आहे त्याविषयी आपल्या काय योजना आहेत?

सध्या मला विक्शनरी वर काम करण्याची इच्छा आहे,त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव झाला पाहिजे किंवा काय करणे आवश्यक आहे ते कळवावे.Prasannakumar १७:५५, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

  • माझी तमिळ-मराठी-इंग्रजी किंवा मराठी-तमिळ अशी साधारणपणे १००० शब्द असणारी डिक्शनरी करण्याची इच्छा आहे.ते कसे करावे ते कळवावे.Prasannakumar १८:२२, १२ ऑगस्ट २०१० (UTC)
  • मी विक्शनरीचा प्रबंधक होऊ इच्छितो,कृपया कौल पहावे.संदर्भासाठी माझ्या तमिळ आणि मराठी विक्शनरीवरील चर्चा पहाव्यात.
  1. http://mr.wiktionary.org/wiki/सदस्य_चर्चा:Prasannakumar (मराठी विक्शनरीवर झालेली चर्चा ज्यात सेल्वाकुमार ह्यांनी काही त्रुटी मांडल्या आहेत,विस्ताराने मी आपल्याला इतर मुद्दे सांगेन.)
  2. http://ta.wikipedia.org/wiki/பயனர்_பேச்சு:Prasannakumar (तमिळ विकिवरील माझी तमिळ विकिपीडियन्ससोबत झालेली इंग्रजी चर्चा)
  3. http://ta.wiktionary.org/wiki/முதற்_பக்கம் (तमिळ विक्शनरीवरील एकुण शब्दलेखसंख्या 1,20,281, जी सर्वात मोठ्या पहिल्या १५ विक्शनरींपैकी एक आहे.)
  • अरेच्चा,असो,मला वाटले चिन्मयच आहे,काही हरकत नाही,त्याची मदत घेतल्याचे कुठेतरी पहाण्यात आले,त्यामुळे मला वाटले,Prasannakumar १८:२२, १४ ऑगस्ट २०१० (UTC)

विनंती

संपादन
  • नमस्कार माहितगार,मी ह्याद्वारे आपणांस दोन विनंत्या करतो,
  1. आपल्या विक्शनरीला आवश्यक ते मनुष्यबळ हवे आहे,आणि सध्या श्रीहरि जे प्रबंधक आहेत त्यांचे एकही संपादन पहाण्यात नाही,तेव्हा कृपया आपण जर मला ते अधिकार दिलेत तर मी विक्शनरीत आपणाशी चर्चा करुन आवश्यक ते बदल घडवून आणेन,तसेच इतरांच्या मदतीने विक्शनरी अधिक समृद्ध आणि सुटसुटीत,समजण्यास सोपी कशी होईल ते करण्याचा प्रयत्न करेन
  1. आपण माझ्या आणि श्री सेल्वाकुमार ह्यांच्या चर्चा अधुनमधुन पहाव्या,तसेच आम्ही तयार केलेले लेख,शब्द पहावेत व आवश्यक ते बदल सुचवावेत

माझी मराठी विक्शनरीबद्दलची एक साधी सोपी कल्पना आहे,तीची शब्द संपदा अधिक समृद्ध असावी,तसेच त्यात क्लिष्ट भाग कमी व आवश्यक तेवढाच भाग अधिक असावा,कारण सहसा शब्दकोशाचा वापर हा त्याक्षणी आवश्यक तो अर्थ शोधण्यासाठी अधिक होतो,तेव्हा आपल्या विक्शनरीला इतर भाषातील विक्शनरीप्रमाणे नवे रूप देण्याची गरज आहे,ह्यासाठी आपण सहाय्य करावे,कळावे,Prasannakumar ०४:०७, १५ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिमार्गदर्शक

संपादन

सदस्य:Samirshekh.2008‎ यांनी आपले सदस्यपानावर विकिमार्गदर्शकाबाबत विनंती केलेली आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:०२, १३ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रबंधकपद

संपादन

कृपया #१.२ प्रबंधक बघा.पूर्वीच मी माझे म्हणणे सदस्य:Gypsypkd यांचेसमोर मांडले आहे.विकिची प्रतवारी प्रबंधकपदामुळे कमी होउ नये अशी माझी ईच्छा आहे.या सर्व कमतरतांसह आपणास मी चालत असल्यास माझी ना नाही. मी प्रबंधक बनण्याबाबत पुनर्विचार करुन बघावा अशी मी आपणास पुन्हा कळकळीची विनंती करतो.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:५१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

  • कृपया मेल बघा.

वि. नरसीकर (चर्चा) १७:०८, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

धन्यवाद

संपादन

तुम्ही केलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद. मी नरसीकरांची चर्चा पाहिली त्यातील एक वाक्य माझे मराठीचे ज्ञान फक्त ७वा वर्ग पास ईतकेच आहे.(नंतर ईंग्रजी माध्यम.)मी शुद्धलेखनात कमी पडतो.माझ्या त्यात अनेक चुका होतात. नविन शुद्धलेखनाचे नियम मला अवगत नाहीत, माझ्यासाठी सुध्दा लागु होते.

मला स्वत:ला विकि खूप efficient system वाटते व हि system समजुन घेण्यात मला खूप interest आहे. कदाचित प्रचालक झाल्यानंतर मला हि system समजण्यास मदत होइल व सध्या साच्यामध्ये येणार्‍या अडचणी तसेच विविध ब्राउजर्स मध्ये येणारे formating errors मी कदाचीत योग्य रितीने सोडवू शकेल. ह्या कारणासाठी मी प्रचालक होउ इच्छितो.

मी आत्ताच यादी पाहिली त्यात असे जाणवले की सध्या विकि वर २२ (Active) सदस्य योगदान करता आहेत व ८ प्रचालक आहेत. त्यामुळे नविन प्रचालकाची गरज आहेका हाच मला पडलेला प्रश्न आहे.

Maihudon ०४:४३, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

विक्शनरी

संपादन

नवीन लेखांची संरचना फॊर्मॆटींग कशी असावी असा काहीसा प्रश्न

मी विक्शनरीवर एक-दोन लेख पाहिले पण फॉर्मॅटिंग मध्ये एकवाक्यता आढळली नाही. फॉर्मॅटिंगसाठी काही नमून्यादाखल लेख आहेत का, की ज्यांचा आढावा घेउन सूचना करता येईल? किंवा तेथे यावर काही चर्चा झालेली आहे का?

अभय नातू ०९:१७, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

विक्शनरी आराखडा

संपादन

माहितगार,

विक्शनरीवरील लेखांचा आराखडा पाहिला. आत्तापर्यंत फारसे न्याहाळून पाहिले नव्हते (व आत्ताही पाहिजे तितका वेळ खर्च नाही केला), पण आराखडा छानच आहे. वरवर पाहता एकच सूचना करावीशी वाटते की प्रत्येक पानावर अनुक्रमणिका नको. असे केल्याने मजकूर खाली ढकलला जातो व वाचकाचे लक्ष विचलित होते. अनुक्रमणिका न घालण्यासाठी __NOTOC__ असे घालता येते.

प्रसन्नकुमारना संदेश देउन मुखपृष्ठाबद्दलची माझी निरीक्षणे कळवली आहेत. तुम्हीही जमल्यास थोडेसे लक्ष घालावे ही विनंती.

अभय नातू १५:२२, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

  • विक्शनरी लोगो- विक्शनरीला नविन लोगो देण्याचा विचार आहे,ते कुठे आणि कसे करतात ते कळवावे,मी लोगो तयार केला आहे तो अपलोड करावा लागतो का? कुठे करावा? इतर विक्शनरीच्या फॉरमॅट्स वरुन घेतलेलाच विक्शनरीचाच लोगो एडीट केला आहे,कळवावे,तो केव्हा आणि कुठे द्यावा ते कळाले तर बरे होईल.Prasannakumar १२:४२, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

समर्थन कौल दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०५:३५, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

काम चालु साचा

संपादन

कृपया येथे बघा. काही मोजके अपवाद वगळता,व त्या साच्याची पाने सोडुन,किमान २ महिने वा त्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेला 'काम चालु साचा' लेखातुन काढण्यात आला आहे. त्यास पर्याय म्हणुन भाषांतर साचा किंवा विस्तार साचा लावला आहे.

  • पुढे विनंती अशी की अश्या प्रकारची कामे आपल्या लक्षात आली असतील किंवा येतील तर मला जरुर कळवावे.त्याचा निपटारा करावयाचा मी शक्यतोवर प्रयत्न करेन.
  • भाषांतरसाचा लावलेले माझे व ईतर लेख पूर्ण करण्याचाही पुढील प्रयत्न राहील.

वि. नरसीकर (चर्चा) १०:०२, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

      • साच्यांच्या मुळ लेखाव्यतिरिक्त तेथे हे साचे लावलेले फक्त ५-७ लेखच उरले आहेत.साचा राहु देण्याचा कालावधी हा किमान ७ दिवस ठेवावा असे माझे मत आहे.कारण एखाद्या सदस्यास अचानक एखादे महत्वाचे काम पडुन तो लेख अर्धवट सोडुन जाउ शकतो. किमान ७ दिवस वेळ मला रास्त वाटतो.तरीपण याबाबत इतरांशी चर्चा करुन बघावी.
      • तसेच या साच्यात तो साचा लावण्याचा दिनांक व वेळ टाकता येउ शकेल काय? तसे केल्यास व त्यात सुचना दिल्यास ते बरे होईल.'प्रचालक हा साचा त्यानंतर कधीही काढतील' अशा प्रकारची.

वि. नरसीकर (चर्चा) १४:२४, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

भाषांतर

संपादन
  • भाषांतरणासाठी माझा एकट्याचाच नव्हे तर आपल्यासह बहुतेकांचा हातभार लागला असणार.मी त्यातील एक अत्यल्प भागच केला.आपण केलेले आवाहनही तेवढेच महत्वाचे होते. त्याशिवाय कसे कळले असते?

वि. नरसीकर (चर्चा) १४:०७, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

कवेलु

संपादन

रुफिंग टाईल यासाठी मराठीत नेमकी काय शब्दयोजना करावी? आमचेकडे(विदर्भात) 'कौल' म्हणतात(कौलारु घर).पण देवीचा 'कौल' याचेशी त्याचे साधर्म्य आहे. 'कवेलू' पण म्हणतात. तो हिंदी शब्द आहे.कउल असे म्हणणे अशुद्धलेखन होईल. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५८, २५ ऑगस्ट २०१० (UTC)


नाना फडणवीस की फडणीस

संपादन

नाना फडणवीस हा लेख आहे ,पण अन्य लेखामद्ये नाना फडणीस असा उल्लेख आढळतो व ते पानही आहे,नक्की कोणत्या लेखाचे संपादन करावे.

विक्रम साळुंखे

हितसंघर्ष साच्याबद्द्ल धन्यवाद!

संपादन

नमस्कार!

हितसंघर्ष साच्याचा वाओअर सदाखेडकरांच्या पानावर केल्याचे पाहिले. नवागतांना गोष्टींची जाणीव करून देण्याची चांगली पद्धत वाटते. मनःपूर्वक धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, २६ ऑगस्ट २०१० (UTC)

I am trying the beta version, but i am not been able to access the marathi writing option. can you please let me know the reasons for this problem.

Maihudon १२:३९, २७ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिपीडिया:सजगता

संपादन

विकिपीडिया:सजगता/३५ ते विकिपीडिया:सजगता/५० या मधील किरकोळ टंकनदुरुस्त्या आपली परवानगी असेल तर करु काय?

वि. नरसीकर (चर्चा) ०८:४४, ३० ऑगस्ट २०१० (UTC)

गौरव चिन्हाबद्दल आभार.आपल्या माणसाने कौतुक केले तर जास्त चांगले वाटते. वि. नरसीकर (चर्चा) १३:४९, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)

मार्गदर्शक

संपादन
 
सदैव मार्गदर्शक दीप हातात घेउन आजवर केलेल्या वाटचालीबद्दल.


वि. नरसीकर (चर्चा) ०३:३९, १ सप्टेंबर २०१० (UTC)




नवीन वैशीष्ट्ये

संपादन

नवीन वैशीष्ट्ये बघुन ट्रांसलेट विकीत काही सुधारणा केल्या आहेत.थोड्या टंकनदुरुस्त्याही होत्या. त्यापण केल्यात. वि. नरसीकर (चर्चा) ०७:०२, २ सप्टेंबर २०१० (UTC)

पत्रव्यवहार

संपादन

आपले(विक्शनरीवर) पत्र मिळाले,वाचून आनंद झाला,खरतर ह्यापूर्वीच असे काहीतरी व्हायला हवे होते,असो,शुभस्य शिघ्रम,आता मला हे सांगा हा पत्र व्यवहार कोण करणार आहे? आणि कधी,का आपण भेटून प्रिंट/छापील स्वरूपात हा पत्र व्यवहार करावयाचा आहे? प्रत्यक्ष विद्यापीठांना नेऊन देणे शक्य नसल्याने त्या त्या विभागातील विकिपिडियन्स ला आव्हानाद्वारे हे काम सोपविले जाऊ शकते,आपले काय मत आहे,ते सविस्तर कळविणे,तसेच सर्व विद्यापीठांना आपण इमेलद्वारे नक्कीच संपर्क साधू शकतो,हे आणि असे एक दोन नमुने तयार करूनच पत्रव्यवहार करावा असे वाटते,अजुन काही सूचना मुद्देसूदपणे मांडुन आकर्षक पत्र/जाहिरातीप्रमाणे तयार केले जाऊ शकते,बाकी काही मदत हवी असल्यास कळवावे,मी अवश्य अगदी जातीने ह्यात सहभाग घेऊ इच्छितो,धन्यवाद प्रसन्नकुमार १७:२९, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

बापरे !

संपादन

एका मिनीटात ९ संपादने.आजचा पूर्ण दिवस रिकाम्याचाच आहे असे वाटते.'अलीकडील बदल' मध्ये पूर्ण रिकाम्याच दिसतो आहे.मी घाबरुन काम करणे बंद करीत आहे.त्यांचे काम संपल्यावर बघु.:)

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४६, १० सप्टेंबर २०१० (UTC) नोंद घेतली. वि. नरसीकर (चर्चा) ०९:२२, १० सप्टेंबर २०१० (UTC)

विक्शनरीवर साचा

संपादन

{{rand}} नसल्यामुळे तो दोष येत होता. सध्या तो दोष दिसत नाही आहे, पाहुन कळवावे.

मला त्याशिवाय आणखी एक दोष दिसुन आला तो खालील प्रमाणे आहे,

  • wikt:साचा:Mod आणि wikt:साचा:mod हे सारखे नाही आहेत. सर्वसाधारणपणे विकिवर पहिले अक्षर Capital घेतले जाते उदाहरणार्थ {{Mod}} <<-->> {{mod}} हे सारखेच आहेत.

Maihudon ११:१६, १३ सप्टेंबर २०१० (UTC)

विकिपीडिया:विकिभेट/मुंबई/मुंबई१

संपादन

विकिपीडिया:विकिभेट/मुंबई/मुंबई१ येथील भाषांतर केले आहे. तपासुन, हवे तेथे ईच्छित बदल करुन, अनावश्यक साचे व इंग्रजी मजकूर कृपया उडवावा ही विनंती.जे मला जमले नाही(दुवे/साचे) ते तसेच ठेवले आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०९:२१, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

छायाचित्र दिसत नाही

संपादन

switch expression वापरल्यामुळे अडचण होत होती , आता काहि दोष नाही आहे.

Maihudon ११:२६, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

Please re-upload

संपादन

Please re-upload चित्र:West_Indies_Cricket_Board_Flag.svg It has got some problem.

विकिपीडिया मिलन

संपादन

विकिपीडिया मिलन पेक्षा विकिपीडिया भेट हा अधिक मराठी वाटतो.

अभय नातू १४:२८, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

विकिभेट छायाचित्र

संपादन

आता चित्र दिसत आहे. ही भेट पुणे विद्यापीठात होणार असल्यामुळे हे चित्र वापरावे का?

 

अभय नातू १४:३१, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

खरेतर, आपल्याला meet या इंग्रजी शब्दाने चालावयाचे झाल्यास त्या शब्दाचे पुढीलप्रमाणे अर्थ होतात- गाठभेट,भेटणे, सामोरा येणे,बैठक, सभा,विशिष्ट हेतूने अनेक लोकांचे एकत्र येणे -या सर्वांपैकी ठळक केलेला मजकूर येथे लागु होतो असे माझे मत आहे.'मिलन' हा शब्द जेंव्हा दोन-तीनच वस्तु असतील (नद्या, व्यक्ति,धातु इत्यादी) तर वापरण्यात येतो. मुळात हा हिंदी शब्द आहे. आपल्याकडे या समकक्ष 'मेलन' हा शब्द आहे.(गुणमेलन).'विकीभेट' हा शब्द तसा ठिक आहे पण त्याचा अर्थ फक्त भेटणे असाच निघतो. भेटी दोन प्रकारच्या राहु शकतात- उद्देशासहित व निरुद्देश.'विकीभेट मध्ये तो अर्थ ध्वनित होत नाही.मेळावा मध्ये- group of people gathering together असा अर्थ निघु शकतो.एकत्रिकरण हा ही एक शब्द आहे पण तो बोजड वाटतो.एक विशिष्ट संघटना हा शब्द नेहमी वापरते.

त्यातल्यात्यात, मला 'विकीसभा' हा शब्द बरा वाटतो.त्याने योग्य तो अर्थ ध्वनित होतो असे माझे मत आहे. बघा ! आपणास काय योग्य वाटते ते.ईतरांचेही मत अजमावावे.


वि. नरसीकर (चर्चा) १५:४६, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्ग : विस्तार विनंती

संपादन

सध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्‍या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.

ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे

Maihudon ०६:३६, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

तुम्ही केलेल्या सुचना बद्दल धन्यवाद.

सर्वसाधारण पणे मराठी विकि वरील लेख खालील वर्गात मोडतात,

  • देश, शहर इत्यादी
  • भारतीय इतिहास, इतर ऐतिहासिक घटना
  • व्यक्ती (कला,क्रिडा,राजकारणी)
  • खेळ
  • मनोरंजन

सुरवातीचा प्रयत्न म्हणुन आपण ह्या वर्गातील लेखांवर लक्ष केंद्रित करू शकतो. मला असे वाटतेकी प्रत्येक सदस्याला एखाद्या विषयात काम करण्यास इछा असतो. अभिजित साठे, प्रसन्नकुमार इ. सदस्यानाजर पाहिलेतर त्यांना विषेश विषयाची आवड आहे व त्यात ते भरघोस काम करत आहेत.

क्रिडा दालनवर काम केल्यानंतर मला अश्या वर्गीक्रुत कामाची कल्पना मिळाली. मोठ्याप्रमाणावर जर हि संकल्पना अमलात आणायची असेल तर काय कराव लागेल ह्या बद्दल मी सध्या काहि स्पष्टपणे सांगु शकत नाही, परंतु काहि तरी कराव लागेल अस वाटत आहे.

Maihudon ०६:११, २३ सप्टेंबर २०१० (UTC)

विकिभेट

संपादन

विकिभेटीत कायकाय झाले याची उत्कंठा आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५६, १९ सप्टेंबर २०१० (UTC)

अवर्गीकृत पाने

संपादन

विशेष :अवर्गीकृत पाने येथील लेखांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.'श' पर्यंत पोचलो आहे.थोडा वेळ असेल तर आपल्या सवडीने ते तपासुन आपला सुस्पष्ट अभिप्राय द्यावा ही विनंती.त्यातील काही न जमणारे लेख सोडुन दिले आहेत.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:०२, १९ सप्टेंबर २०१० (UTC)

आपण सुचविलेले बदल केलेत. वर्गःसातारा जिल्ह्यातील गावे हा एक नवीन वर्ग सापडला. ती गावे त्यात लवकरच टाकत आहे. वि. नरसीकर (चर्चा) १५:३८, २१ सप्टेंबर २०१० (UTC)

  • कौल घेउन जवळपास १ महिना झाला. प्रबंधकपदाचे काय झाले?

वि. नरसीकर (चर्चा) १५:४१, २१ सप्टेंबर २०१० (UTC)

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:१७, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

आपला संदेश मिळाला. काही अडचण येणार नाही असे सध्यातरी वाटत आहे.विकिपीडिया:प्रचालक या पानावरील मजकूर मी अर्ज केल्यावरच वाचला व समजून घेतला आहे. गरज पडल्यास मार्गदर्शनास आपण आहातच.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:२५, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Maihudon ०७:४६, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्गवारी

संपादन

en:Wikipedia:Categorization या लेखाचे समकक्ष विकिपीडिया:वर्गवारी (वा वेगळे नाव असलेला) असा काहीसा लेख आपल्या मराठी विकिवर उपलब्ध आहे काय कृपया कळविणे. मी बराच शोधला पण सापडला नाही.नसेल तर बनवावा काय?

वि. नरसीकर (चर्चा) १४:५२, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

अवर्गीकृत लेख

संपादन

या पानावरील जवळपास ६० % लेखांचे वर्गीकरण झाले आहे.माझे काम ठिक सुरु आहे काय? वि. नरसीकर (चर्चा) १५:२९, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

Regarding your request at Sinhala Wikipedia

संपादन

Hi, I tried to answer your question there. But my knowledge in the script is very limited. I hope there’s something in what I’ve said that can guide you in the correct direction. --Lee ०८:४५, ५ ऑक्टोबर २०१० (UTC)

अब्यूझ फिल्टराबद्दल माहिती

संपादन

नमस्कार माहीतगार,

अब्यूझ-फिल्टराबद्दल अधिक माहिती विकिपीडिया:कौल-पानावर नोंदवली आहे.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:५०, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)

नमस्कार

संपादन

अलीकडील बदल मध्ये तुमचे नाव पाहिले, खूप दिवसांनी भेट होत आहे. सहजच लिहिले. [१] येथील आवाज ऐकले का ? काही कमी-जास्त असेल तर कळवा. gypsypkd (चर्चा) ०५:३६, २९ नोव्हेंबर २०१० (UTC)

अनामिक संपादना बाबत सुचना

संपादन

नमस्कार मला नुकताच अनामिक संपादना बाबत सुचना देणारा आपला संदेश मिळाला. माझ्याकडून कधीतरीच विनासदस्य खाते प्रवेश काही लेखन झाले असेल. त्यातही मी कधी चुकीचे अथवा अयोग्य लेखन केले नाही. तरीही हा संदे पाहुन आश्चर्य वाटले. तरीही माझा IP , प्रतिबंधीत करु नये ही विनंती. Vishal1306 ११:१७, २९ नोव्हेंबर २०१० (UTC)

सुट्टी

संपादन

नमस्कार,

आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!! मित्रमंडळी आणि कुटुंबीय जवळजवळ पाच वर्षांनी भेटत असल्यामुळे त्यांना वेळ देणे तर अत्यावश्यक आहेच, पण आता मराठी विकिपीडियावरही अनेक प्रियजन भेटले आहेत. तुमची भेट राहिली, पण लवकरच जगाच्या पाठीवर कोठेतरी भेटूयाच!!

चला तर, परत जरा मित्रांकडे वळतो...

अभय नातू १९:२६, १ डिसेंबर २०१० (UTC)

दादोजी कोंडदेव या लेखात जरूर मदत करेन. वर्तमान घटनांचे औचित्त्य ओळखून आपण या लेखात भर घालायचे ठरवून बरे केले.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, २८ डिसेंबर २०१० (UTC)

गुन्ह्यास प्रोत्साहन

संपादन

नमस्कार,

मी सहसा लेख वगळत नाहीच पण या लेखात कोणताच मजकूर न सापडल्याने मी तो उडवला. जर पुढे लेख वाढवणे अभिप्रेत असेल तर विस्तार साचा किंवा इंग्लिश (अथवा इतर कोणत्याही भाषेकडे) आंतरविकि दुवा दिल्यास लक्षात येते. प्रस्तुतस्थितीत वरील लेख पुनर्स्थापित करण्यास माझी हरकत नाही.

अभय नातू ०१:४१, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

नववर्षाभिनंदन

संपादन

* हॅप्पी न्यु इयर २०११* नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !*

प्रसन्नकुमार १४:३९, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

कॉमन्सवरील प्राधिकार विषयक साचा

संपादन

केले.

अभय नातू ०१:४२, ८ जानेवारी २०११ (UTC)

Return to the user page of "Mahitgar/जुनी चर्चा ४".