नमस्कार,

आपले स्वागत आहे.

  • वैज्ञानिक व तांत्रिक पारिभाषिक शब्दांसाठी पर्यायांची निश्चिती करताना अर्थाची निश्चितता व सुबोधता यावर अधिक भर द्यावा. शक्यतोवर अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये वापरता येतील असेच पर्याय निवडावेत; परंतु, निवडलेले पर्याय हे मराठी भाषेच्या प्रकृतीशी विरोधी असू नयेत.अडचणीच्या व अपवादात्मक परिस्थितीत संस्कृत भाषेतील क्रियापदे,उपसर्ग,वगैरेंचा आधार घ्यावा .मात्र भाषेच्या शुद्धीकरणाचे धोरण ठेवू नये. संदर्भ परिभाषेच्या_निर्मितीसाठी_निदेशक_तत्त्वे#वैज्ञानिक‌_व_तांत्रिक_पारिभाषिक_पर्यायांची_निश्चिती

या कडे आपण लक्ष द्याल तसेच मिडियाविकी:मराठी अनिवार्यता हे ही पहावे हि नम्र विनंती.

आपल्या आवडीचे लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.

धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:००, २४ मे २०१३ (IST)Reply

ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

Hello DerekWinters,

Welcome and thank you for your recent edit/s using English language or a non-Marathi language.

This is Marathi language Wikipedia and here Marathi (in Devanagari script) it is the most preferred language of USAGE. Marathi Wikipedia provides you a comprehensive Marathi language support. You are welcome to practise your test edit/s using Marathi typing skills at our own local sandbox.

One can use non-Marathi language only on limited pages like Wikipedia embassy, but not in main article space, one will be appreciated if one removes non-Marathi text on their own from the main article namespace, if it is so used, otherwise your failure to do so may tempt other editors to edit/delete the same according to various agreed Marathi Wikipedia norms.


You are always WELCOME to participate in our Translation Project and you can make your {{Translate}} requests there.

Attention! Kindly note that for all ARTICLES other than few essential exceptions, the article name has to be essentially in Marathi language (Devanagari script). For more information regarding this, you may refer to our विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत. Please consider an option to create your own account, if you still do not have any at "Marathi language Wikipedia"/mr wiki.

For all those who are here with little or no familiarity with some or other form of Devanagari script, kindly take a note that grammar, usage of alphabets and pronounciation of "Devanagari script" in Marathi language is substantially different than in all other languages which use Devanagari script for writing, including that of Hindi language. We at "Marathi Wikipedia" hereby encourage you to have your first edits in Devanagari script at our discussion page (sandbox), where you can write your request/s before editing any NEW or MAIN article in Marathi Wikipedia. This will help you to acquaint with "Marathi Devanagari Script", grammar, language specific skills and tools used on this Wikipedia.

If you wish to help us by participating in this Wikipedia Project, kindly visit this Wikipedia Project page for more information.
Thank you for your visit! - Marathi Wikipedia Team.

Marathi Wikipedia HELP-DESK

~~~~

काय करावे ? संपादन

@अभय नातू:

या सदस्य महोदयांचे विशेष:योगदान/DerekWinters हे योगदान पहावे. आंतरजालावरील अत्यंत जुन्या पाणिनी कालीन डिक्शनरी शोधून संस्कृत शब्द योजना करण्याचा सोबतच सहसा सर्वच विज्ञान विषयक शब्द बदलण्याचा शिरस्ता दिसतो. माझा संस्कृत प्रचूरते बद्दलही आक्षेप नाही. नवे मराठी शब्द घडवणे वापरणे मलाही आवडते. उदाहरणार्थ कार्बन साठी प्रांगार हा शब्द त्यांनी परस्पर योजला आहे त्या एवजी कार्बनच्या चर्चा पानावर सहमती घेऊन वापरण्यास हरकत नसावी. दुसरे हे मराठी करणाचे काम केलेच तर मराठी व्यक्तीने करावे असे माझे प्रांजळ मत आहे. हे सदस्य बहुधा गुजराथी भाषी असावेत असा प्राथमीक अंदाज आहे.

हे सदस्य महोदय कोणत्याही विकिवर सहसा पुरेसा संवाद साधताना दिसत नाहीत. प्रथमदर्शनी सदस्याच्या संवादाच्या अभावामुले नेपाळी विकिपीडियाने यांचे सदस्यत्व प्रतिबंधीत केलेले दिसते आहे. परिभाषेच्या_निर्मितीसाठी_निदेशक_तत्त्वे#वैज्ञानिक‌_व_तांत्रिक_पारिभाषिक_पर्यायांची_निश्चिती हा संदर्भ देऊन संवाद साधण्याचा मागे केलेल्या प्रयत्नास यश आलेले नाही. गाळणी लावून पाहता येईल पण गाळणी ही मुख्य लेख नामविश्वात किती प्रभावी होईल माहित नाही पण मुख्य नामविश्वातून लेखन प्रतिबंधीत करून चर्चा पानांवर लेखनास गाळणीच्या माध्यमाने मुभा देता येईल. काय करावे असे तुमचे मत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०२, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

उत्तर संपादन

@Mahitgar: माहितगार,

१. या सदस्याने काही महिन्यांनी दोन-चार बदल केलेले दिसतात. हे बरोबर असले/नसले तरी ठोक प्रमाणात बदल नाहीत.

२. मराठी करणाचे काम केलेच तर मराठी व्यक्तीने करावे असे माझे प्रांजळ मत आहे. हे आपले मत मला संपूर्णपणे अमान्य आहे. मराठी विकिपीडिया घडविण्याची नैतिक जबाबदारी मराठी लोकांची असली तरी हा मक्ता कोणीही मराठी व्यक्तींना दिलेला नाही. नियमांमध्ये बसत असलेले बदल कोणीही केले तरी चालतील. नव्हे चालायलाच पाहिजेत.

३. संवाद न साधता बदल करणे हे चूकच परंतु त्यांच्याशी आपणही (मराठी विकिपीडियन लोकांनी) अधिक संवाद साधला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या मूळप्रकल्पावर संदेश दिला तर कदाचित लवकर उत्तर मिळेल.

४. गाळणी लावण्यास हरकत नाही पण ही गाळणी संपादन काढण्यासाठी नव्हे तर एखाद्या जाणत्या सदस्यास (तुम्हाला?) बदलाची सूचना देण्यापुरती असावी.

५. या निमित्ताने आपण शीर्षक तसेच पारिभाषिक शब्दांबद्दल (विशेषतः शास्त्रीय शब्द) नियम तयार करण्यास सुरुवात करावी.

६. आपण या सदस्याच्या ज्या बदलांना आक्षेप घेतला तसेच बदल इतरही सदस्य करताना दिसतात. त्यांच्याशीही संवाद साधाल ही खात्री आहे. यांनी आंतरजालावरीलच जुना शब्दकोश वापरला आहे पण आपल्यापैकी अनेक सदस्य इतर शब्दकोश वापरतात त्यांतील कोणता ग्राह्य, कोणता नाही याचे निकष स्पष्ट करावे लागतील.

अभय नातू (चर्चा) १५:२८, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply


मराठी भाषेत एखादा शब्द व्यवस्थीत रुळतो की नाही हे मराठी माणसास व्यवस्थीत समजण्याची शक्यता अधीक असते. मराठीएतर लोकांना एखादा शब्द मराठी व्याकरणात रुळतो की नाही हे समजणे अवघड असते. जीथ पर्यंत शीर्षकांचा संबंध आहे तिथ पर्यंत सध्याची अधिकृत निती मराठी एतर लोकांनी शीर्षके बनवू नयेत अशीच आहेत.
संबंधीत सदस्याच्या इतर विकिवरून संपर्क इतर स्थितीत आनंदाने केलाही असता. पण आपण म्हणता आहात की मराठी आणि इतर व्यक्तींनी केलेल्या संस्कृतकरणात फरक पडत नाही तेव्हा त्यांना ते अजून करून पाहू द्यात. काही वेळा व्यक्ती स्वत: समस्या अनुभवत नाहीत तो पर्यंत जाणीव होत नाही. तेवढी जाणीव मराठी विकिपीडियन्सना होई पर्यंत माझी वाट पहाण्याची तयारी आहे.
२. >> नियमांमध्ये बसत असलेले बदल कोणीही केले तरी चालतील.<< येथ पर्यंत ठिक आहे.
>> मराठी विकिपीडिया घडविण्याची नैतिक जबाबदारी मराठी लोकांची असली तरी हा मक्ता कोणीही मराठी व्यक्तींना दिलेला नाही << आपल्या भूमीकेने मराठी विकिपीडियाचे स्वातंत्र्य बाधीत होते आहे हे आपण लक्षात घेतले नसावे मी आणि इतर सर्व मराठी लोकांच्या दृष्टीने आम्ही या चळवळीत मराठी विकिपीडियास स्वत:ची भूमीका घेण्याचे स्वातंत्र्य आहे आणि मराठी भाषेचे भारताच्या एकात्मतेचे हित आहे म्हणूनच सामील आहोत. भाषा ही विचारांचे साधन असते पारतंत्र्याची सुरवात भाषिक गुलामीतून होते. मराठी भाषेच्या हितास किंवा भारताच्या एकात्मतेच्या हितास बाधा येत असेल तेथे स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास कोणताही मराठी मागे पुढे पहात नाही तसेच मीही मागे पहात नाही. मक्ता असण्या नसण्याची भाषा मी काढलेली नाही आपण काढलीच आहे तर निक्षून सांगतो मराठी लोकांच्या तर्कसुसंगत निर्णयापुढे मराठी विकिपीडियावर माझ्यासहीत कोणीही मोठा असणार नाही. मक्ता हा शब्दावर आपले जो पर्यंत संबंध आहे अंतीम मक्ता मराठी लोकांचाच आहे आणि असेल यात तडजोड होणार नाही. या भाषेने कडवटपणा येणार असेल तर तो मला आनंदाने मान्य आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१६, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply


उत्तर २ संपादन

माहितगार,

तुमचे येथील दोनतीन तर्क अजब वाटले.

मराठी भाषेत एखादा शब्द व्यवस्थीत रुळतो की नाही हे मराठी माणसास व्यवस्थीत समजण्याची शक्यता अधीक असते. मराठीएतर लोकांना एखादा शब्द मराठी व्याकरणात रुळतो की नाही हे समजणे अवघड असते.

"मग मोल्सवर्थ फेकून द्यायला पाहिजे काय?" इतकेच विचारतो.

जीथ पर्यंत शीर्षकांचा संबंध आहे तिथ पर्यंत सध्याची अधिकृत निती मराठी एतर लोकांनी शीर्षके बनवू नयेत अशीच आहेत.

आँ?! ही निती कोणी बनवली? कधी बनवली आणि त्याची नोंद कोठे आहे? (जाउन स्वतः शोधून घे म्हणलेत तर त्याकडे दुर्लक्षच होईल.) मराठ्येतर म्हणजे कोण? त्यांना कळते कि नाही हे ठरवणार कोण? येथे मराठी नावे असलेले आणि गचाळ शु्द्धलेखन, व्याकरण असलेले नमूने अनेक मिळतील तसेच शासकीय किंवा प्रमाण मराठी शाळेत न शिकलेले आणि तरीही उत्तम मराठी लिहिणारे नमूने सुद्धा मिळतील. हे पाहता तुमचा वरील तर्क साफ पांगळा ठरतो.

आपल्या भूमीकेने मराठी विकिपीडियाचे स्वातंत्र्य बाधीत होते आहे हे आपण लक्षात घेतले नसावे

ही भूमिका (मराठी विकिपीडियावर कोणासही काम करण्यास स्वातंत्र्य आहे) फक्त माझीच नव्हे तर विकिमीडियाचीच (implcitly तरी) आहे. मराठी विकिपीडियाच्या रक्षणाचा झेंडा आपण खांद्यावर घेतलात ते उत्तमच परंतु त्यात exclusionary आणि ते सुद्धा जहाल भूमिका आपण घेऊ नये ही कळकळीची विनंती. इतरही अनेक शिलेदार येथे लढत आहेत आणि खस्तही होत् आहेत. कसले स्वातंत्र्य? कोणापासून स्वातंत्र्य?

इतर सर्व मराठी लोकांच्या दृष्टीने आम्ही या चळवळीत मराठी विकिपीडियास स्वत:ची भूमीका घेण्याचे स्वातंत्र्य आहे आणि मराठी भाषेचे भारताच्या एकात्मतेचे हित आहे म्हणूनच सामील आहोत

अंशतः मान्य. मराठी विकिपीडियास स्वतःची भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे. त्यात कोणी ढवळाढवळ करू नये हे सुद्धा मान्य परंतु मराठी कोण आणि अमराठी कोण हे ठरविण्याचा अधिकार तुम्हा-आम्हांस नाही. जो मराठी विकिपीडियावर योगदान देतो त्यास मराठी विकिपीडिया घडविण्यात मत आहे.

मराठी भाषेच्या हितास किंवा भारताच्या एकात्मतेच्या हितास बाधा येत असेल तेथे स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास कोणताही मराठी मागे पुढे पहात नाही तसेच मीही मागे पहात नाही.

अहो कोठे सुतावरुन स्वर्ग गाठता आहात?! मराठी विकिपीडियावरील शीर्षक बदलेले (चुकीचे का होईना) तर त्याने भारताची एकात्मता धोक्यात येत आहे हे जरा आततायीपणाच झाला. असो. हे माझे मत...खात्री आहे आपल्या मनात या दोन गोष्टी जोडलेल्या असतील, तरीसुद्धा कृपया याचे समर्थन करण्यास पाचपन्नास वाक्यांचा वापर करू नये. तुमचे मत असल्यास तुम्हास लाभो, माझे मत मला लखलाभ!

मक्ता असण्या नसण्याची भाषा मी काढलेली नाही आपण काढलीच आहे तर निक्षून सांगतो मराठी लोकांच्या तर्कसुसंगत निर्णयापुढे मराठी विकिपीडियावर माझ्यासहीत कोणीही मोठा असणार नाही.

भाषा काढण्याची गरज नाही. तुमच्या वक्तव्यात ते जाहीरच आहे. "अधिकृत निती मराठी एतर लोकांनी शीर्षके बनवू नयेत...मराठीएतर लोकांना एखादा शब्द मराठी व्याकरणात रुळतो की नाही हे समजणे अवघड असते" ही असली patronizing आणि passive-aggressive भूमिका घेतल्यावर अधिक सांगणे न लगे. तुम्ही आडवळणाने बोललेले मी स्पष्ट केले इतकेच.

मक्ता हा शब्दावर आपले जो पर्यंत संबंध आहे अंतीम मक्ता मराठी लोकांचाच आहे आणि असेल यात तडजोड होणार नाही.

कोण मराठी लोक? ज्यांना मराठी विकिपीडिया जिवंत आहे कि मेला याचा गंधही नाही ते लोक कि जे येथे काम करण्याचा प्रयत्न करतात (चुकतमाकत का होईना) ते लोक? आपली ही भूमिका (हा विकिपीडिया एका विशिष्ट गटाचाच आहे आणि इतरांना त्यात वाव नाही) मराठी विकिपीडियाच्या विकासास मोठा अडसर आहे हे मी सुद्धा ठामपणे, निक्षून आणि इतर जे काही assertive शब्द योजता येतील ते योजून सांगतो.

कडवटपणा म्हणलात तर तुम्हीच सुरुवात केलेली आहे. मी शक्यतो वातावरण अधिक गढूळ न करण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:३८, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply


>> "मग मोल्सवर्थ फेकून द्यायला पाहिजे काय?" इतकेच विचारतो. <<
मोल्सवर्थच्या कामाचा आदर सत्कार सर्व करू. पण मोल्सवर्थ ब्रिटीश होता त्याने शब्द कोश मराठी लोकाम्च्या सेवेसाठी नव्हे ब्रिटन मधून यॅणाऱ्या गोऱ्यांना मराठी शब्द समाजावेत म्हणुन लिहिला त्याची पहिली बांधीलकी ब्र्टीष क्राऊनला होती मराठी आणि भारताला नव्हे. केवळ शब्दकोश लिहिला म्हणून मोल्सवर्थची मराठी विकिपीडियाच्या निर्णयांमध्ये हस्तक्क्षेप करू लागला असता तर मोल्सवर्थ आणि त्याचा शब्दकोश दोघांचीही हकाल पट्टी केली. इंग्रजांच्या काळात जसे त्यांची चाटू गिरी करणारे होते तसेच वासुदेव बळवंत फडकेही होते ह्याचा विसर पडू नये. माझी मराठी माणस दोन अक्षर लिहितील तुमच्या शब्दात अशुद्ध लिहितील पण मराठीचा अभिमान बाळगणारी माणस जशी आहेत तशी माझी, त्यांचा यत्कैंचीत अपमानही खपवून घेतला जाणार नाही . 'मक्ता हा शब्दावर आपले जो पर्यंत संबंध आहे अंतीम मक्ता मराठी लोकांचाच आहे आणि असेल यात तडजोड होणार नाही.
कुणी हातवर आणि पाय खाली करून लिहिले तरीही
जीथ पर्यंत शीर्षकांचा संबंध आहे तिथ पर्यंत सध्याची अधिकृत निती मराठी एतर लोकांनी शीर्षके बनवू नयेत अशीच आहेत.
मराठी विकिपीडियाच्या अपणाशि चर्चा झालेल्या नितींचे आपणास विस्मरण होते आहे का हा वादा करता आपल्यासाठी सोइचा मुद्दा आहे हे माहित नाही. पण त्या संबंधाने विवीध ठिकाणी स्पष्टीकरणे लिहिली आहेत आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तीला मी दुवे देत बसणार नाही. वर म्हटल्या प्रमाणे समस्या येऊन नाका तोंडात पाणी जाई पर्यंत बऱ्याच जणांचे डोळे उघडत नाहीत तेव्हा मी तुर्तास या बाबी कडे दुर्लक्ष करतो.
माझी भूमीका कुणाच्या जन्मावरून मातृभाषेवरून कुणास exclude करणारी नाही. मराठी न येणाऱ्या आणि कच्चे असणाऱ्यांचेही मी वेळोवेळी स्वागत केले आहे इंग्रजी बुक्सवर इंग्रजीतून मराठी शिक्षणाचा लेख मी लिहिले आहेत. ज्या मंडळींना मराठी भाषेचा गंधच नाही त्यांच्या मराठी विकिपीडियावरील शीर्षके मराठी शुद्धलेखनास अनुरूप असणार नाहीत. आणि हा शुद्धलेखनाचा आग्रह तुम्हा लोकांचा म्हणून तुमच्या वतीने मी जीथ पर्यंत शीर्षकांचा संबंध आहे तिथ पर्यंत सध्याची अधिकृत निती मराठी एतर लोकांनी शीर्षके बनवू नयेत अशीच आहेत.

याचा आग्रह ठेऊन होतो, एरवी त्या शुद्धलेखनाची त्याचा दुराग्रह धरणाऱ्यांची कुणी काशी घातली तरी मी पर्वा केली नसती तरीही स्वत:च्या इच्छेखातर नव्हे तर मराठी विकिप्डियाच्या झालेल्या चर्चांच्या बळावर हा आग्रह होता तुम्हालाच नको असेल तर मला काय त्याचे पडलेले एंजॉय :) . DerekWinters सारख्या केवळ डिक्शनरीतून शब्द शोधून सर्व शब्द एका फटक्यात बदलणाऱ्या व्यक्तीला मराठीच्या व्याकरणात अक्षरही कळत नाही आहे या महोदयांची इतर अनेक विकिपीडियांवरची वागणूक अभ्यासली आणि नंतर ही पोस्ट टाकली त्यांनी इथे वाद चालू करण्याचा माझा तर उद्देशही नव्हता वाटले की आपण त्यांनी केलेली दोनचार तरी पाने उघडून पहाल आणि प्रतिक्रीया द्याल पण तसे होणे नसावे. आणि जे मराठी भाषेस मातृभाषा मानतच नाहीत त्यांना मराठी विकिपीडियाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रीयेत मुळीच स्थान असणार नाही. मराठीची माझी व्याख्या साधी सोपी आहे महाराष्ट्रात बोलली जाते ती मराठी. आणि हि मराठी बोलणारी लिहिणारी मंडळीच मराठी विकिपीडियावरील निर्णय करतील इतरांना स्थान असणार नाही. या विषयावर गढूळणाऱ्या वातावरणाची जबाबदारी आपली राहील. धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१७, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

तुमच्या भडकवू पाहणाऱ्या लेखनाकडे दुर्लक्ष करून लिहीत आहे.

आपण त्यांनी केलेली दोनचार तरी पाने उघडून पहाल आणि प्रतिक्रीया द्याल पण तसे होणे नसावे.

मी काय केले आणि काया नाही याची माहिती तुम्हास नाही, तरी उगीचच गृहीत धरून लिहू नये.

जे मराठी भाषेस मातृभाषा मानतच नाहीत त्यांना मराठी विकिपीडियाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रीयेत मुळीच स्थान असणार नाही.

ही तुमची भूमिका मराठी विकिपीडियास मारक ठरणारी आहे. मराठी मातृभाषा न मानणारे असे अनेक लोक आहेत ज्यांचे मराठी अशांपेक्षा सरस आहे जे मराठीस मातृभाषा मानतात. यांची मदत घेणे नाकारून तुम्ही मराठी विकिपीडियाचे अहितच करीत आहात. मातृभाषेवरून discrimination करणे व मराठी विकीपीडिया हा आपली घरची ठेवण असल्यासारखे वागणे आपणास शोभत नाही. माझे स्पष्ट पण कठोर बोलणे मनाला बोचत असले तरी त्यावरून थोडेसे आत्मपरीक्षण करावे ही आग्रहवजा विनंती.

या विषयावर गढूळणाऱ्या वातावरणाची जबाबदारी आपली राहील.

स्वतः हेकेखोरपणा करून वातावरण गढूळ करायचे आणि मग त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायची हे निरर्थक बोलणे आहे. वरील (वि)संवादावरून स्पष्टच आहे की तुम्हाला प्रश्नांची समर्पक उत्तरे न देता एकच हेका चालवायचा आहे. असे असता मी तुमचा माझ्यावरचा हा आरोप/assertion धुडकावून लावतो आहे. येथून पुढे वाद वाढविण्याची इच्छा माझी नाही. तुमची असल्यास कृपया चावडीवर जावे. या सदस्याचे चर्चापान अधिक वापरू नयेत.

अभय नातू (चर्चा) २३:२९, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply


मी पुढील प्रमाणे बदल केला आहे. "मराठीची माझी व्याख्या साधी सोपी आहे महाराष्ट्रात बोलली जाते ती मराठी. आणि हि मराठी बोलणारी लिहिणारी मंडळीच मराठी विकिपीडियावरील निर्णय करतील इतरांना स्थान असणार नाही."
तुम्ही याला हेका म्हणा ठेका म्हणा का मक्ता या बाबत तडजोड नाही. वातावरण गढूळ करण्याची जबाबदारी मराठी भाषेच्या स्वातंत्र्याशी गद्दरी करणाऱ्यांचीच असेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३३, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

येथेच वाद घालायचा तर घालूयात.

>> "मग मोल्सवर्थ फेकून द्यायला पाहिजे काय?" इतकेच विचारतो. <<

मोल्सवर्थच्या कामाचा आदर सत्कार सर्व करू. पण मोल्सवर्थ ब्रिटीश होता त्याने शब्द कोश मराठी लोकाम्च्या सेवेसाठी नव्हे ब्रिटन मधून यॅणाऱ्या गोऱ्यांना मराठी शब्द समाजावेत म्हणुन लिहिला त्याची पहिली बांधीलकी ब्र्टीष क्राऊनला होती मराठी आणि भारताला नव्हे.

आणि तरीही मराठी विकिपीडियावर मोल्सवर्थचे वाक्य प्रमाण मानले जाते. ते मानायचे कि नाही याचे उत्तर द्या उगीचच भडक शब्दात निरर्थक वाद घालू नका.

माझी मराठी माणस दोन अक्षर लिहितील तुमच्या शब्दात अशुद्ध लिहितील पण मराठीचा अभिमान बाळगणारी माणस जशी आहेत तशी माझी, त्यांचा यत्कैंचीत अपमानही खपवून घेतला जाणार नाही

आता माझी मराठी माणस वगैरे वापरून लघळपणा करू नका. अशुद्ध/चुकीचे लिहिण्यावर तुमचा आक्षेप आहे. माझा नाही. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका. मराठीचा अभिमान घेणारी माणसे महाराष्ट्राशिवाय मॉरिशस, बंगळूर, अमेरिका आणि इंग्लंडापासून बेळगांवापर्यंत सगळ्या ठिकाणी आहेत. त्यासाठी पेठेत/पुण्यात राहणे गरजेचे नाही. त्यांच्याबद्दल हे फुटकळ उद्गार काढून तुम्ही त्यांचा अपमान करणे बंद करा. मराठी बोलणाऱ्या एकाही माणसाचा केवळ मातृभाषा मराठी नाही म्हणून तुमच्याकडून सतत होणारा अपमान सहन केला जाणार नाही. त्याबद्दल आवाज उठवणारच!

तुम्ही याला हेका म्हणा ठेका म्हणा का मक्ता या बाबत तडजोड नाही.

तडजोड(?) करायची कि नाही हे तुम्ही एकतर्फी ठरवायला मराठी विकिपीडिया तुम्हाला आंदण मिळाला का? जर उद्या मराठी विकिपीडियाच्या सदस्यांनी ठरवले तर येथील कोणताही नियम ते बदलू शकतात. त्यापुढे हेका/ठेका/मक्ता घेणारा एखादा सदस्य यःकश्चित आहे याची जाण आपणास असेलच. उगीचच खांद्यावर झेंडा घेउन आणि डोळे मिटून आरडत सुटल्याने भाषेची सेवा होत नाही. मराठी विकिपीडियाचा विकास करण्यासाठी इतरांची मदत व मते घेउन पुढे जाणे हेच श्रेयस्कर. यात आपल्याला न पटलेल्या मतांचा आदर करून (जो तुमची येथील भाषा व एकंदर आव पाहता येथे तुमच्याकडून अजिबात होत नाही आहे) ती मते सुज्ञपणे बदलण्याचा प्रयत्न करणे हे अतिमहत्वाचे.

वातावरण गढूळ करण्याची जबाबदारी मराठी भाषेच्या स्वातंत्र्याशी गद्दरी करणाऱ्यांचीच असेल.

मराठी विकिपीडियाचा विकास रोखून धरून भाषेशी गद्दारी तुमची चाललेली आहे. आणि त्याद्वारे वातावरण तुम्ही गढूळ करीत आहात. ही गद्दारी करणे त्वरित थांबवा.

भाषेचे स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्ही इतरही ठिकाणी जाउन लढाल, नव्हे लढताच, ही खात्री आहे.

अभय नातू (चर्चा) २३:४६, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply