नमस्कार सुशांत,

विकिपीडिआच्या लेखांमधील चुका सदस्य स्वतःच दुरुस्त करू शकतो. एखादे टिपण हे उपयोगी ठरेल, त्याच्या पुढील वापरासाठी चर्चा केली जाऊ शकते. इंग्रजाळलेले लेख असू शकतात, त्यातील भाषा मराठीकडे अधिक झुकविण्यासाठी माझ्या बोलपानावर संदेश आणि त्यासमवेत एखादे उदाहरण ठेवणे.

Harshalhayat 06:31, 16 मे 2005 (UTC)

Re: गंजिफ़ा

संपादन

नमस्कार सुशांत,
मराठीमध्ये अनेक अशी व्यंजने आहेत ज्यांचे दोन उच्चार होतात (उदा. 'जहाज' मधील 'ज' आणि 'जन्म' मधील 'ज'). परंतू देवनागरी लिपी मध्ये याबद्दल एकच व्यंजन दाखविले आहे. माझ्या माहितीनुसार देवनागरी लिपीमध्ये संशोधन होऊन नवीन भर घालण्यात आलेली आहे जसे अर्धचंद्र (उदा. बॅक, ऑफ), अनुस्वारासह अर्धचंद्र (उदा. बॅंक, मॉंक). ही रोजची उदाहरणे आहेत. तसेच 'फ' (कठिण उच्चार, नेहमीच्या पद्धतीने आणि ओष्ठ स्वरूपाचा) आणि 'फ़' (सामान्यापणे इंग्रजीमध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा आणि दन्तौष्ठ प्रकारामध्ये येणारा) यामध्ये असा फरक करण्यात आलेला आहे. दुसरा 'फ़' मध्ये ओठ पूर्णपणे जोडले जात नाहीत. मृदू उच्चार दर्शविण्यासाठी व्यंजनचिन्हाच्या खाली एक टिंब दिला जातो. ही गोष्ठ खरी आहे की अशाप्रकारच्या व्यंजनांना मराठीत फारसे वापरण्यात येत नाही आणि हिंदीमध्ये त्यांचा बराच वापर होतो. यासंदर्भात मी अधिक माहिती शोधित आहे.
धन्यवाद
Harshalhayat 19:01, 30 जून 2005 (UTC)

तारीख/वार

संपादन

सुशांत,

मराठीत दिनांक लिहिण्याचा क्रम दिवस-महिना-वर्ष असा जरी असला, तरी मराठी विकिपीडीयाने [महिना वार] असे लिहीण्याचे ठरविले आहे. ही पद्धत बाकीच्या (ईंग्लिश, स्पॅनिश, ई.) विकिपीडीयांशी सुसंगत आहे.

सुरूवातीला मलाही हा प्रश्न पडला होता :-)

क.लो.अ.

User talk:अभय नातू

आपल्या सूचना

संपादन

सुशांत,

आपल्या सूचना उपयुक्त आहेत. त्याबद्दल आपण येथे चर्चा करू शकतो किंवा याहूवरील mr-wiki या ई-मेल यादीवरही करू शकतो. तेथे अजूनही काही विद्वान मंडळी त्यांचे मत देउ शकतात.

अभय नातू 15:35, 13 जुलै 2006 (UTC)

सुशांत,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

 
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 23:15, 14 सप्टेंबर 2006 (UTC)

धन्यवाद

संपादन

सर्व विकिपीडियाकरांना धन्यवाद. खरं तर मला पुरेसा वेळ मिळत नसल्याने मनाजोगं काम करणं जमत नाही. पण जमतील तसे प्रयत्न मी करत राहीन.

सुशांत

मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती

क.लो.अ.वि.

विजय १६:३५, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.