चर्चा:संगणक-टंक
दर्पण
टंक V/s Font Meanings in Marathi
संपादन'Character' means 'Varna'-'वर्ण'
'Font' - a variety in shapes of a Character means 'Varnakar'-'वर्णाकार'
'Types of Fonts' means 'Varnakar Shailee'-'वर्णाकार शैली'
'टंक' means 'खटका','शिक्क्याचे मुख','typeface'
'टंक' पासून -
'टंक लेखन' च्याअैवजी - 'टंकन'- कारण 'लेखणी'पासून 'लिखाण' किंवा 'लिहणं'
तसेच 'खटकेबाजी'पासून 'टंकन' -'Typing' or 'टायपिंग कला'
'टंकीत करणे' -'to type'
'टंकक' - 'Typist'
टंक आणि Font
संपादन- I guess 'टंक' is synonymous for 'typeset'.
- Please verify. BTW article has come up well.
- With regards,
- Harshalhayat 12:25, 27 जुलै 2006 (UTC)
पारिभाषिक शब्द
संपादनहर्षल
तुमची सुचना योग्य आहे. खरेतर Font करिता मला योग्य मराठी शब्द माहित नाही.कुणी व्यक्ति - खास करून मुद्रण क्षेत्रातील - अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द सुचवु शकेल व योग्य बदल करेल तर छानच होइल.
आपला
विजय 08:29, 29 जुलै 2006 (UTC)
टंक आणि फॉण्ट
संपादनटंक म्हणजे मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह. ह्या अर्थी हा शब्द रूढ आहे. टाइपफेस/ फॉण्ट हा त्याचा इंग्रजी पर्याय ठरेल. अर्थात हा शब्द छपाईतला खिळा ह्या अर्थीही वापरतात असे वाटते. संगणाकावरच्या अक्षराकृतींनाही हाच शब्द वापरता येईल. अनेकार्थी शब्द त्या त्या संदर्भात योग्य तो अर्थ व्यक्तवतात. मराठीत बापुराव नाईक, वाकणकर इ. लेखकांनी मुद्रणाविषयी लिहिलं आहे. ते थोडं चाळून पाहावं लागेल.
Harshal,
- First of all its a good article.
- Regarding the synonym for 'Font'
- I think Font is nothing but 'set of different pattern of shapes' for writing 'set of letters in a language script'.
- Also if it is possible to call 'Devnagari script' as 'देवनागरी लिपी'
- then
- How about 'प्रतिलिपी' as a synonym for 'Font'?
- Archana_patil_harankhedkar 11:30, ४ सप्टेंबर २००६ (UTC)
- प्रतिलिपी suggests something that can be used in lieu of लिपी. Font is a means to rendering a script. So प्रतिलिपी is not appropriate.
- I believe font should be written as फॉँट rather than फॉण्ट.
- अभय नातू ०४:४२, १२ फेब्रुवारी २००७ (UTC) अगदी बरोबर. इंग्रजीत ण नाही, त्यामुळे फॉण्ट अयोग्य. फॉंट(अनुस्वार उमटत नाही, म्हणून देता येत नाही), किंवा फॉन्ट चालेल. प्रतिलिपी म्हणजे कॉपी, त्यामुळे अविचारणीय.....J २०:१८, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)
तांत्रिक सहकार्याची विनंती
संपादन- कृपया मराठी संगणकशास्त्रातील तज्ज्ञांनी या लेखातील तांत्रिक संज्ञा विभाग अद्ययावत करण्यास हातभार लावावा. संगणकशास्त्राशी पुरेसा परिचय नसलेल्यांना बर्याच संकल्पना नवीन असतात व ते त्यामुळे मराठीत लेखन करण्यापासून वंचित राहतात.
- तसेच या लेखाची किमान एक जिवंत दुवा दिलेली पीडीएफ आवृत्ती बनवण्यातही तंत्रज्ञांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती. अशी पीडीएफ आवृत्ती याहू ग्रूप mr-wiki येथे अपलोड करावी. म्हणजे गरजूंना ईमेलद्वारे सहज पाठवता येईल.
विजय ०७:२२, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
फॉन्टला मराठी शब्द बनवावा लागेल
संपादनफॉन्टला मराठी शब्द बनवावा लागेल. टंक चालणार नाही कारण टंक म्हणजे टाइप. (टंकलेखन -टायपिंग). छाप, मुद्रा, मुद्रणचिन्ह, खिळा वगैरे छापखान्याशी संबंधित, म्हणून नको. सर्वांत उत्तम शब्द म्हणजे '''फंट'''. य़ा शब्दाचा दुसरा कुठलाही अर्थ होणार नाही, व सोपा, जोडाक्षरविहीन असल्याने सहज लक्षात राहील व न सांगता अर्थ समजेल. --J १९:५७, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)
- J,
- हिंदी भाषिक फंट असाच शब्द वापरत आहेतच पण त्यांचे कारण ऑ आणि ऍ च्या उच्चारणांना हिंदीचा विरोध असे आहे. मराठी भाषेने ऑ आणि ऍ हे उच्चारण जवळपास स्विकारले आहेत तेव्हा फॉंट चे फंट/फांट तरी का करावे असा प्रशन उद्भवतो आणि फॉंट हा शब्दच बरा असे वाटण्याचा संभव आहे.
- छापखान्याशी संबंधित शब्द नको हा आग्रह मला उलगडला नाही. उलट मुद्रणशास्त्र हा विषय मराठीत पण बराच कालावधी पासून शिकवला जातो आहे असा माझा कयास आहे.त्या शिवाय DTP सारख्या क्षेत्रात संबधीत संज्ञा व्यापक प्रमाणावर वापरली जात असणार,मुद्रणशास्त्र विषयक पारिभाषिक शब्दकोशसुद्धा बहुधा उपलब्ध आहेत. नवा पारिभाषिक शब्द बनवण्यास हरकत नाही पण सोबत आपण सुचवलेल्या सर्व संबधीत शब्दांच्या टंक म्हणजे टाइप. (टंकलेखन -टायपिंग). छाप, मुद्रा, मुद्रणचिन्ह, खिळा
व्याख्या तसेच टाईप फेस ग्लिफ इत्यादी शब्दांच्या व्याख्या स्पष्ट होत गेल्या तर नवा शब्द रूळणे अधिक सोपे होईल किंवा मुद्रणशास्त्र किंवा DTP क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन होऊ शकले तरी आपला मार्ग सुलभ होतो. अर्थात शक्यतो संज्ञांची गल्लत होऊ नये या आपल्या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे.
- Mahitgar ०८:०३, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- हिंदीत फंट वापरतात म्हणून मराठीत देखील तोच शब्द वापरावा असे नाही. माझ्या मते टंक हा सर्वांत जवळचा सब्द आहे. लेखन-टंक असे नाव द्यावे. पहा या रितीने आपण मराठीत नवे शब्द रुढ करत आहोत. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १३:१७, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- विजय, माहीतगार, महाराष्ट्र एक्सप्रेस वगरेंसाठी. हिंदीत 'फंट' वापरतात हे मला माहीत नव्हते. तरीसुद्धा मी तो शब्द सुचवला. हिंदीचा विरोध अँ ला आहे, ऑ ला नसावा. कारण डॉक्टर हिंदीत स्वीकारला जातो. अँ ला विरोध कारण हँसना वगैरे अर्धनासिक उच्चाराला अडचण होते.
मला अजूनही वाटते की 'संगणक टंक'पेक्षा 'फंट' जास्त योग्य आहे. अकादमी, पोलीस, डेपो, लिफ्ट यांना प्रतिशब्द बनवूनदेखील ते कोणी वापरत नाही. आता खालील मजकूर वाचा.:-
"संगणकाच्या पडद्यावर अक्षरे उमटवण्यासाठी एक मूळाक्षरांचा कळफलक लागतो, आणि संगणकामधे भरलेले वेगवेगळ्या लिपी अणि त्यांच्या विविध रूपांचे फंट. हे फंट खालील प्रकारांमध्ये मोडतात. एब्सीडिक, बोडॉट, आन्सी, आस्की आणि युनिकोड. यातील पहिल्या दोन प्रकारचे फंट जवळजवळ अस्तंगत झाले आहेत. दुसरे दोन आठ बिटचे असल्याने संगणकावर कमी जागा व्यापतात. पण शोध-इंजिनाच्या कामासाठी हे फंट थोडे कमी पडतात. युनिकोड फंटांचा उपयोग जगातील सर्व लिपींसाठी करता येत असल्याने हे फंट आता लोकमान्य होऊ लागले आहेत. तरीसुद्धा मराठीसाठी युनिकोड फंट अपुरे पडतात. युनिकोड देवनागरी फंटांमध्ये तामीळ, तेलुगु, कन्नड लिपीकरिता लागणारे र्हस्व एकार/ओकार तसेच तामीळ/मलयाळमकरिता लागणारा ळ्हसुद्धा आहे. सिंधी, पंजाबी, नेपाळी भाषांना लागण्यार्या सोयी युनिकोड फंटात ०९०० ते ०९७५डी या क्रमांकाखाली बनवून ठेवल्या आहेत. पण मराठीसाठी लागणारा चमच्यातला च, झबल्यातला झ आणि ऍटममधला चंद्रांकित अ मात्र नाही. 'ऑ'चा चंद्र तुर्कस्तान किंवा उत्तर प्रदेशातल्या चंद्रकोरीसारखा वाकडा आहे. या फंटातला श शेंडीफोड्या नसून टकलू आहे. 'छ'च्या पागोट्यातून शेंडी बाहेर डोकावते; त्यामुळे तो थोडासा बावळा आणि छाकटा दिसतो. पण मराठी जनतेला चालत असल्याने हे असले फंट गोड मानून घ्यावे लागतात." वरील मजकुरात फंट शब्दाऐवजी संगणक टंक म्हणून पहा. किती कंटाळवाणे वाटते! J ०९:३४, २८ फेब्रुवारी २००७ (UTC) टंक शब्द किती प्रकाराने वपरता येतो ते पहा. Typeटंक; To typeटंकणे, टंकन करणे,टंकलेखन करणे; Typingटंकन, टंकलेखन; Typed टंकित, टंकमुद्रित, टंकलिखित; for typing टंकायला; after typing टंकून; तसेच टंकयंत्र, टंकलेखक, टंकशाळा(Foundry) वगैरे. या अर्थामध्ये फॉन्ट ह्या अर्थाची भर नसावी. J ०९:४८, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
- मंडळी,
- इंग्लिश विकिपीडियातील व्याख्या पुढील प्रमाणे आहेत.
- In typography, a typeface is a coordinated set of en:glyphs designed with stylistic unity. A typeface usually comprises an alphabet of letters, numerals, and punctuation marks; it may also include ideograms and symbols, or consist entirely of them, for example, mathematical or map-making symbols. The term typeface is often conflated with computer font, a term which, historically, had a number of distinct meanings before the advent of desktop publishing; these terms are now effectively synonymous when discussing digital typography. A helpful and still valid distinction between font and typeface is a font's status as a discrete commodity with legal restrictions, while typeface designates a visual appearance or style not immediately reducible to any one foundry's production or proprietary control.
- A computer font is an electronic data file containing a set of glyphs, characters, or symbols such as dingbats. Although the term "font" once referred to interchangeable typefaces using mechanical components such as a typeball element or a daisy wheel, most modern fonts are used in computing.
- In en:typography, a glyph is the shape given in a particular typeface to a specific grapheme or en:symbol.
- The term for the abstract entity represented by a glyph is character: a typographical character may be a grapheme (an element of a en:writing system), but also a en:numeral, a punctuation mark, or a pictorial or decorative symbol (such as en:dingbats, or Unicode's "en:Miscellaneous Symbols").
- Two or more glyphs representing the same grapheme, either interchangeably or context-dependent, are called en:allographs.
- In en:graphonomics, the term glyph is used for a non-character, i.e: either a sub-character or multi-character pattern.
- इंग्लिश विक्शनरीतील Font शब्दाची व्यूत्पत्ती आणि अर्थ
- Etymology 2
- Noun
- font (plural: fonts)
- (Typesetting) A grouping of consistently-designed glyphs, having the same size, typeface (e.g., Times New Roman), and style (e.g., bold). (Also more properly referred to as a type font.)
- A computer file encapsulating such a grouping, usually consisting of an association of glyphs to bytes or Unicode code points, and providing the glyphs as either precomposed bitmaps, or instructions for drawing the glyphs as a set of vectors and Bezier curves, plus additional hints and rendering guidance for different situations.
- A glyph is- any non-verbal symbol that imparts information
- A glyph is- A single formed character or symbol, usually representing a letter in a font
- A typeface is- A font, or a group thereof.
- A typeface is- Generally, the manner in which a document is typeset
- A typeset is- to set or compose written material into type
- type mean - A block of metal or wood having a raised letter or character on its surface used for printing; also, a set of such blocks.
- आपल्याला खरेतर वरील इंग्लिश परिच्छेदात येणार्या सर्व इंग्रजी संज्ञा करिता मराठी प्रतिशब्द हवे आहेत. वरील इंग्लिश परिच्छेदांचे मराठीत भाषांतर करताना कदाचीत संकल्पना अधीक स्पष्ट होऊन पारिभाषिक शब्द बनवणे सोपे जाईल. मी भाषांतर करणारच आहे पण कुणी मला ते लौकर करून दिले तर मी आभारी राहीन
- विजय १३:३५, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
आता पर्यंतच्या चर्चेचा संक्षेप
संपादनआता पर्यंत व्यक्त झालेल्या मतांचा संक्षेप
- Font करिता 'टंक'हाच शब्द वापरा म्हणणारी मते
- टंक म्हणजे मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती,संगणाकावरच्या अक्षराकृतींनाही हाच शब्द वापरता येईल. (सुशांतयांचे मत)
- Font करिता 'टंक'हाच शब्द वापरू नका म्हणणारी मते
- I guess 'टंक' is synonymous for 'typeset'. (हर्षलयांचे मत)
- फॉन्टला मराठी शब्द बनवावा लागेल. टंक चालणार नाही कारण टंक म्हणजे टाइप. (J यांचे मत)
- Font करिता 'फॉंट'हाच शब्द देवनागरीत वापरा म्हणणारी मते
- I believe font should be written as फॉँट rather than फॉण्ट.(अभय नातूंचे मत)
- Font करिता नवे शब्द सुचवणारी मते
- How about 'प्रतिलिपी' as a synonym for 'Font'? (अर्चना पाटील यांचे मत)
- 'प्रतिलिपी'शब्दाचा ऊपयोग नको म्हणणारी मते - अभय नातू आणि J
- How about 'प्रतिलिपी' as a synonym for 'Font'? (अर्चना पाटील यांचे मत)
- छापखान्याशी संबंधित, म्हणून नको. सर्वांत उत्तम शब्द म्हणजे फंट. य़ा शब्दाचा दुसरा कुठलाही अर्थ होणार नाही, व सोपा, जोडाक्षरविहीन असल्याने सहज लक्षात राहील व न सांगता अर्थ समजेल. --J
- फंट शब्द नको म्हणणारी मते माहीतगार आणि महाराष्ट्र एक्सप्रेस
- छापखान्याशी संबंधित, म्हणून नको. सर्वांत उत्तम शब्द म्हणजे फंट. य़ा शब्दाचा दुसरा कुठलाही अर्थ होणार नाही, व सोपा, जोडाक्षरविहीन असल्याने सहज लक्षात राहील व न सांगता अर्थ समजेल. --J
चर्चा पुढे चालू
संपादन- Type किंवा टंक म्हणजे मुद्रणासाठी धातूच्या किंवा लाकडाच्या ठोकळ्यावर कोरलेली/ल्या अक्षरचिन्हे/विशिष्ट अक्षरचिन्हांचा समूह. *Type म्हणजे अक्षरमुद्रणाकरिता वापरलेला मराठीत टंक Typeset म्हणजे मराठीत टंकसंच
- बहुधा वर दिलेल्या दोन व्याख्यांबद्दल मतभिन्नता नसावी असे वाटते.
- माझे मत भिन्न आहे. माझ्या मते टंक म्हणजे मुद्रणासाठी लाकडाच्या किंवा धातूच्या चौकोनी ठोकळ्यावर उभारलेली(कोरलेली नाही) अक्षराची किंवा आकृतीची दर्पण प्रतिमा. Type साठी 'भौतिकशास्त्र परिभाषा कोशा'त मुद्राक्षर(न), मुद्र(पु) आणि टंक(पु) हे शब्द दिले आहेत. याशिवाय छाप, ठसा, खिळा, मुद्रा(स्त्री), मुद्रणचिन्ह वगैरे शब्द वापरात आहेत. 'अक्षरचिन्ह'किंवा 'चिन्हसमूह' चालणार नाही, कारण ते लेखी अक्षरासाठी राखून ठेवावे. Set म्हणजे संच! त्यामुळे Typesetसाठी 'टंकसंच' योग्य. Typefaceसाठी टंकमुद्रा. Typewriterटंकलेखन यंत्र, Typistटंकलेखक, Typographyछपाई/मुद्रण. टंकमुद्रा म्हणजे छपाईसाठी बनवलेली मुद्रा. --J २०:२६, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- खालील व्याख्या आणि पारिभाषिक शब्द योजावेत काय या बद्दल आपले मत नोंदवा.विजय १४:०२, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- A typeface is- A font, or a group thereof. पारिभाषिक शब्द : अक्षराकृती / टंकलय / टंकवळण / लक्षणा (?)
- व्याख्या In typography, a typeface is a coordinated set of glyphs designed with stylistic unity.
फारच क्लिष्ट.--J २०:२६, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Glyph पारिभाषिक शब्द : अक्षरचिन्ह (?)
नाही मुळीच नाही. मला वाटते, Glyph म्हणजे अक्षर नसलेले चिन्ह- नुसतीच मुद्राकृती. ^, <, > वगैरे. चू.भू.द्या.घ्या.--J २०:२६, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- (Typesetting) A grouping of consistently-designed glyphs, having the same size, typeface (e.g., Times New Roman), and style (e.g., bold). (Also more properly referred to as a type font.)
- Font[२] : सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या समप्रमाणात साकारलेल्या अक्षराकृती (e.g., Times New Roman), आणि प्रकृतीच्या (e.g., bold) संचास Font असे म्हणता येईल (?)
एकाच आकाराच्या म्हणजे size or shape? आकार की आकृती/रूप ? समप्रमाणात कसे काय? i पेक्षा n आणि त्याहून m रुंद असतो. विशिष्ट रूपाच्या ठरावीक प्रमाणात चालेल.
- A computer file encapsulating such a grouping, usually consisting of an association of glyphs to bytes or Unicode code points, and providing the glyphs as either precomposed bitmaps, or instructions for drawing the glyphs as a set of vectors and Bezier curves, plus additional hints and rendering guidance for different situations.
- संगणकाच्या दृष्टीने Font म्हणजे bytes किंवा Unicode code points शी अक्षरचिन्हांचे नाते जुळवणारी, आणि एकतर पूर्वसंस्कारित bitmaps स्वरूपात अक्षरचिन्हांची प्रस्तुती करणारी, किंवा vectors आणि Bezier curves च्या संचस्वरूपात आकृती काढण्याच्या सूचना देऊन अक्षरचिन्हांची प्रस्तुती करून वर जास्तीच्या क्लृप्त्या योजून वेगवेगळ्या परिस्थितीत उद्भवणार्या अडचणींमध्ये मदत करणारी अक्षरचिन्हांचा समूह असणारी संगणकीय संचिका..J २०:२६, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
वरील चर्चेनंतर माझे मत पुन्हा एकदा
संपादन- माझ्या दृष्टीने Fontच्या वरील दोन व्याख्यांचा अर्थ लक्षात घेता संगणकीय संचिकेतील वैशिष्ट्यपूर्ण उपयोजित अक्षरचिन्ह समूह म्हणजे Computer Font.टंक म्हणजेसुद्धा अक्षरचिन्ह समूह ; आता संगणकाच्या बाबतीत फक्त हा अक्षरचिन्ह समूह लाकडाच्या किंवा धातूच्या ठोकळ्यावर न राहता Soft अभासी प्रणाली स्वरूपात असल्यामुळे टंक हा शब्द टाळून नवा शब्द शोधणे व उपयोजीत करणे गरजेचे आहे काय ? वरील व्याख्यांची भाषांतरे केल्या नंतर मला सुशांतचे मत पटावयास लागले आहे जे की मी नंतर येणार्या प्रतिसादांना अभ्यासून बदलू शकतो व सद्य चर्चा स्थितीत मी "संगणक टंक" या शब्दाचीच बाजू मांडतो.विजय १६:२१, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
--'फंट' मान्य नसेल तर 'संगणक टंक' हे शब्दद्वंद्व चालेल.J २०:२६, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- संगणक टंक हा fontकरॊता सुयोग्य शब्द आहे. अक्षरचिन्हे हा glymph करिता ठीक वाटतोय. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १५:०८, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
शब्दांच्या वापरात काहीवेळा रूढी प्रभावी ठरत असते. टायपिंगसाठी सुरुवातीच्या काळात टंकलेखन हा शब्द प्रचलित नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळात पदनामकोशानंतर तो प्रचलित झाला. आधीच्या शब्दकोशांत हा शब्द नाही. the 20th chentury english dictionary - n. b. ranade या द्विखंडात्मक कोशात टंक हा शब्द नाही. टंक या शब्दाला भारतीय भाषांच्या परंपरेत मुद्रणाशी संबंधित काही व्युत्पत्ती असावी असे वाटत नाही. टायपरायटरच्या आवाजाशी व typing या शब्दाशी ध्वनिसाधर्म्य साधणारा टंकलेखन हा शब्द खास मराठीतच तयार केला गेला आहे. फॉंट शब्दासाठीही मुद्रणाचा खिळा, छपाईसाठीची मुद्रा इत्यादी स्पष्टीकरणे व शब्द आढळतात. टंक शब्द तेथे नाही. टंक शब्दाला दुसरा संदर्भ टांकसाळ, नाणी पाडावयाच्या कारखान्याचा असल्याचे दिसते. टंकसाळ हा शब्द टांकसाळ या अर्थी नोंदवला गेला आहे. (आदर्श मराठी शब्दकोश- प्र. न. जोशी) त्या प्रक्रियेचे मुद्रणकलेशी नाते आहेच. टायपिंगसाठी टंकलेखन असा शब्द प्रचलित असेल तर संगणकीय टायपिंगसाठी संगणकीय टायपिंगसाठीही संगणकीय टंकलेखन असेच म्हणायला हवे. व्यवहारातही ही बातमी मोठ्या टाईपात छापली असे म्हणत असताना आपण टाईप व फॉंट हे दोन्ही शब्द एकाच अर्थी वापरतो. यावरून फॉंट शब्दासाठी टाईपिंगसाठी प्रचलित असलेल्या टंकलेखन शब्दातून टंक शब्द निवडण्यास हरकत नाही. परंतु रूढीला ते मान्य व्हावयाला हवे. टायपिंगसाठी टंकलेखन हा शब्द रूढ झाला असला तरी. सर्वच छापील मजकूराच्या बाबतीत अनुषंगिक शब्द रूढ झाले नाहीत. टाईप हा शब्द अन्य संदर्भात तसाच मराठीने स्वीकारला असल्याचे दिसते. तेव्हा टंक हा शब्द सुचवायला वा वापरायला हरकत नाही. परंतु त्याचे प्रमाणिकरण करावे इतका तो प्रचलित नाही हे मान्य करावे लागेल. संगणकीय व्यवहार करणार्यांना त्या मराठी प्रतिशब्दाची निव़ड करण्याची गरज वाटली पाहिजे. ओढूनताणून तो बदल शक्य नाही. त्याची गरजही नाही. अन्य भारतीय भाषांत फॉंट स्वीकारला गेला आहे. मराठीने तो स्वीकारलाच आहे. तर टंक-फंट ने गोंधळ वाढवण्यात काय हशील? टंक एकवेळ टायपिंगशी संबंधित संदर्भ जागवणारा तरी आहे, परंतु फंट हा शब्द निव्वळ अट्टहास ठरेल. -उदय
चर्चा आढावा
संपादनJे यांच्या स्विकारलेल्या सुचना अंतर्भूत करून पारिभाषिक शब्दांची व व्याख्यांच्या भाषांतरणांची यादी पुन्हा देत आहे. तरी पण Font ला टंक आणि computer Font संगणक टंक म्हणावे काय ही चर्चा पुढेही काही काळ चालू ठेवावी लागेल असे वाटते. Font हा शब्द व्याख्येनुसार टंक पेक्षा अधिक काही असे वाटते. टंक शब्दा दर्पण प्रतिमा गृहीत धरली आहे तशी मुद्रा शब्दात दर्पण प्रतिमा गृहीत धरलीजाण्याची शक्यता नाही.मुद्रा शब्दाचे अनेकवचन पण मुद्राच होते.मुद्रा शब्दात Font ची मुद्राकृती, टंकमुद्रा व शैली ही तीन्ही वशिष्ट्ये गृहीत धरता येऊ शकतात तेव्हा Font टंक ऐवजी मुद्रा शब्द वापरावा हे मला आता पटत आहे.computer Font ला 'संगणक मुद्रा' हे शब्दद्वंव्द वापरले तर त्याचा अर्थ कुणी संगणकाचे किंवा संगणकातील चित्र काधू नये अशी एक् काळजी वातते. या संदर्भात तुमचे काय मत आहे ते जरूर नोंदवा. विजय ०७:१५, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Type साठी 'भौतिकशास्त्र परिभाषा कोशा'त मुद्राक्षर(न), मुद्र(पु) आणि टंक(पु) हे शब्द दिले आहेत.
- Typeset 'टंकसंच'
- Typeface टंकमुद्रा {टंकमुद्रा म्हणजे छपाईसाठी बनवलेली मुद्रा)
- Typewriterटंकलेखन यंत्र,
- Typistटंकलेखक,
- Typographyछपाई/मुद्रण.
- Glyph मुद्राकृती (म्हणजे अक्षर नसलेले चिन्ह- नुसतीच मुद्राकृती. ^, <, > वगैरे.)
- Font[1] : (Typesetting) A grouping of consistently-designed glyphs, having the same size, typeface (e.g., Times New Roman), and style (e.g., bold). (Also more properly referred to as a type font.)
- Font[1] : विशिष्ट रूपाच्या ठरावीक प्रमाणात ढाळलेला मुद्राकृतींचा आणि टंकमुद्रांचा(e.g., Times New Roman) व त्यांच्या शैलींचा(e.g., bold) संग्रह.
- टंक म्हणजे मुद्रणासाठी लाकडाच्या किंवा धातूच्या चौकोनी ठोकळ्यावर उभारलेली अक्षराची किंवा आकृतीची दर्पण प्रतिमा.
- A computer file encapsulating such a grouping, usually consisting of an association of glyphs to bytes or Unicode code points, and providing the glyphs as either precomposed bitmaps, or instructions for drawing the glyphs as a set of vectors and Bezier curves, plus additional hints and rendering guidance for different situations.
- संगणकाच्या दृष्टीने Font म्हणजे bytes किंवा Unicode code points शी मुद्राकृतींचे नाते जुळवणारी, आणि एकतर पूर्वसंस्कारित bitmaps स्वरूपात मुद्राकृतींची प्रस्तुती करणारी, किंवा vectors आणि Bezier curves च्या संचस्वरूपात आकृती काढण्याच्या सूचना देऊन अक्षरचिन्हांची प्रस्तुती करून वर जास्तीच्या क्लृप्त्या योजून वेगवेगळ्या परिस्थितीत उद्भवणार्या अडचणींमध्ये मदत करणारी अक्षरचिन्हांचा समूह असणारी संगणकीय संचिका
विजय,महाराष्ट्रप्रेमी, संकल्पद्रविड, महाराष्ट्र एक्सप्रेस इत्यादींसाठी;-- आता मूळ फाँट शब्दाकडे वळूया. Font चा बाराव्या शतकातील अर्थ--बाप्तिस्म्यासाठी अंगावर ओतलेले पाणी जमा करण्याचे दगडी पात्र. हा मूळचा स्कॉटिश अर्थ इंग्रजीने १५४२ मध्ये स्वीकारला. Font चा दुसरा अर्थ Fountain म्हणजे जमिनीतून किंवा दगडातून उगम पावणारा पाण्याचा झरा.(माउंट आणि माउंटन प्रमाणे) तिसरा अर्थ:--Fount, Found किंवा Fund म्हणजे आपला टंक. या शब्दाचे अमेरिकन स्पेलिंग Font. म्हणजे फॉंन्ट़चा छापखान्याशी संबंध आहे. आता भविष्यकाळात Fontला संगणकाबाहेरील क्षेत्रात , समजा संगीतात, छायाचित्रणात, जैविक गुणसूत्रात वेगळाच अर्थ मिळाला तर आपण बनवलेला संगणक टंक हा अर्थ निरुपयोगी होईल. त्यापेक्षा मुळातच असा शब्द स्वीकारावा की तो आपल्याला बदलावा लागू नये. मी काही शब्द सुचवतो.--घडण, घडणी, घडाई, घडवण, घाट. धाट, धाटणी. नूर, वळण, गोलाई, सौष्ठव, बांक, शैली. थाट. यातले काही शब्द Font शी यमक साधतात. जर फंट नको असेल त्यातला एक घेण्यास हरकत नसावी.J १०:५३, ११ मार्च २००७ (UTC) आणखी काही शब्द:-(अक्षराचे) रूप, रंगरूप, गुणरूप. (अक्षराचा) ढंग, छब. (अक्षराची) छबी, ढब, कांती, अंगकांती, अंगकाठी, वगैरे. किंवा पूर्ण नवीन शब्द-रूपिका. Change font म्हणजे अक्षराचे रूप , अंगकाठी, रूपिका इ. बदला. जीजस क्राइस्टला आपण येशू ख्रिस्त म्हणतो. मॅक्समुल्लरला मोक्षमुल्लर, अकॅडमीला अकादमी, एल्फिंस्टनला अळुपिस्टन, कॅप्टन स्टुअर्टला इस्टुर फाकडा तर फ़ाँटला फंट का नको? --J १८:३७, ११ मार्च २००७ (UTC)
'संगणक टंक' याचा खरा अर्थ 'संगणकाकरिता टंक' किंवा 'संगणकाचा टंक' असा असेल तर 'संगणकटंक' असा सामासिक शब्द तयार होईल. कृपया या मुद्द्याचाही विचार व्हावा.
--संकल्प द्रविड ०८:३२, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
टंक/येशू ख्रिस्त - अवांतर
संपादनजीजस क्राइस्टला आपण येशू ख्रिस्त म्हणतो. मॅक्समुल्लरला मोक्षमुल्लर,...
जीझस क्राइस्ट हा इंग्लिश उच्चार आहे. जीझस (Jesus) या शब्दाचा स्पॅनिश व पोर्तुगीझ उच्चार हेसुस असा होतो व Christचा क्रिस्त. गोव्यातील पोर्तुगीझांकडून मुळात आलेला हा शब्द तेथे उतरलेल्या पादर्यांकडून किंवा एतद्देशीय ख्रिश्चनांकडून अपभ्रंशित झालेला आहे. जीझसचे थेट येशू झालेले नाही. येशू हे नाव हिब्रू भाषेत आहे. येशू नावाचा संतही होउन गेला आहे. येशू/जीझसवर मीमांसा येथे पहा.
त्याच लेखात इतरत्र ...
Since at least the 12th century the standard Hebrew name for Jesus has been Yeshu. As well, according to articles in The Jewish Encyclopedia (1906), by professor of Hebrew literature Joseph...
अभय नातू १४:४७, २८ मार्च २००७ (UTC)
अक्षर रचना अथवा अक्षर आकृती अथवा अक्षर वळण
संपादनफॉंन्टचा अर्थ अक्षरांचे विशिष्ठ वळण किंवा एखाद्या विशिष्ठ वळणाची अक्षरे. हा अर्थ लक्षात घेऊन नवीन शब्द बनवला पाहिजे. अक्षरशैली हा शब्द मला उत्तम पर्याय वाटतो
संपादनजनहितवादी १८:१०, ११ मार्च २००७ (UTC) जनहितवादी, शैली हा शब्द मी वर सुचवला आहे. तुम्हीपण तोच सुचवला हे बरे केलेत.--J १८:४२, ११ मार्च २००७ (UTC)
टंक आणि फॉण्ट इ.
संपादनसर्वप्रथम अशी भारदस्त चर्चा होते आहे हे खरंच फार छान आहे. शब्दाविषयी माझं मत नोंदवण्याआधी एका आनुषंगिक मुद्द्याचं उत्तर देतो. फॉण्ट हया लेखनाविषयी आक्षेप असा आहे की इंग्रजीत ण नाही, त्यामुळे फॉण्ट अयोग्य. इंग्रजीत आपण जसा ट-वर्गाचा उच्चार मूर्धन्य करतो तसा करत नाहीत हे मान्य. तिथे तो सबंध वर्ग दन्ततालव्य आहे. मराठी माणसांना त्याचा उच्चार टला जवळता असा ऐकू येतो. तो त-वर्गाला जवळचा उच्चार आहे असं मेजर कॅण्डीचं मत होतं. त्यामुळेच तो लंदन, साक्रेतिस अशा लेखनाचा आग्रह धरायचा. विविधज्ञानविस्तारात त्याच्या ह्या मतातलं वैयर्थ रा. भि. गुंजीकरांनी दाखवलं आहे. आक्षेपकांनी ट वापरला आहे ह्यावरून ते कॅण्डीच्या मताचे नाहीत हे स्पष्ट आहे.
आता प्रश्न उरतो तो न् लिहायचा की ण्. इंग्रजीतला ट-वर्ग मराठीतील ट-वर्गाहून भिन्न आहे. font ह्याच्या उच्चारात शेवटच्या व्यंजनाआधी येणारं अनुनासिक व्यंजन त्या शेवटच्या वर्णाशी जुळतं येतं. इंग्रजी रूढ लेखनात ती वेगवेगळी अनुनासिक व्यंजनं दाखवणार्या वेगवेगळ्या खुणा नाहीत. n ह्या खुणेचा उच्चार संदर्भाने वेगवेगळा समजतात. उदा. sing = सिङ. nचं लिप्यन्तर आपण नेहमी न् असंच सरधोपटपणे करतो.
font ह्याच्या उच्चारात मराठीतला ट् नाही तसाच मराठीतला न्सुद्धा नाही. म्हणून लिप्यन्तर करताना आपल्या भाषेतली धाटणी मोडून दोन वेगळ्या वर्गां फॉन्ट असं जोडाक्षर कारण नसताना करू नये. फॉंट हे शिरोबिंदुयुक्त अर्थातच चालेल कारण शिरोबिंदूचा उच्चार संदर्भानुसारच ठरतो. तात्पर्य जाणीवपूर्वक लेखन करणार असू तर फॉन्ट मुळीच चालणार नाही.
आता टंक ह्या शब्दाविषयी. माझ्यापुढे टंक हा fontचा योग्य प्रतिशब्द आहे की नाही हा प्रश्नच नाही. मला जो अर्थ (संगणकावर मला दिसणार्या विशिष्ट अक्ष्रराकृतींचा संच) अभिप्रेत आहे तो व्यक्तवायला हा शब्द योग्य आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. माझ्यामते तो योग्य आहे.
टंक हा मूळ मुद्रणासंदर्भात वापरला जात असला तरी तिथेही त्याचा अर्थ विशिष्ट अक्ष्रराकृतींचा संच हा आहेच. हा अक्षराकृतींचा संच हा अर्थ केवळ मुद्रणाशी निगडित नाही. शेगडी हाच शब्द कोळशावर पेटणार्या नि इंधनवायूवर पेटणार्या वस्तूला दर्शवण्यासाठी वापरतातच की.
टंकाला रूढीचं पाठबळही आहे. बापुराव नाईकांनी typeच्या संदर्भात मुद्राक्षर हा शब्दही वापरला आहे. पण तरी टंक हा शब्दच अधिक रुळलेला आहे. टंकलेखनात तो आहे ही इष्टापत्तीच आहे. कारण हाताने रेखलेल्या अक्षराकृतींहून वेगळी, अन्य साधनांच्या साहाय्याने उमटणारी, विशिष्ट वळणाची अक्षराकृती हा अर्थ त्याने ठाशीव होतो. टंकलेखन म्हणजे अशा उमटणार्या टंकांच्या साहाय्याने केलेलं लेखनच आहे.
संगणकीय व्यवहार करणार्यांना त्या मराठी प्रतिशब्दाची निव़ड करण्याची गरज वाटली पाहिजे हा मुद्दा अडचणीचा आहे. आपल्या ज्ञानव्यवहाराचंच मराठीकरण होण्याची आवश्यकता आहे. लोक मराठीतून व्यवहार करत नाहीत कारण असा व्यवहार होईल अशा व्यवस्थाच नाहीत. त्यामुळे मराठी शब्दांचीच काय पण मराठी लेखनाचीही आवश्यकता नाही. व्यवहार करणार्या लोकांना इंग्रजीच सरावाचं, प्रतिष्ठेचं नि म्हणूनच सोयीचंही आहे. त्यामुळे हा मुद्दा धरायचा असेल तर हा सर्वच व्यापार व्यर्थ आहे.
मॅक्समुल्लरला मोक्षमुल्लर, अकॅडमीला अकादमी, एल्फिंस्टनला अळुपिस्टन, कॅप्टन स्टुअर्टला इस्टुर फाकडा तर फ़ाँटला फंट का नको? ह्याला उत्तर इतकंच की स्पष्ट बोलता येत असेल तर तोतेरं का बोलायचं? फंट हे अपभ्रष्ट रूप विनाकारण म्हणजे रूढी नसताना घ्यायचे कारण नाही. (खरं तर प्रचलित मराठीत उपरोक्त पर्याय कोण वापरतो हे मला जाणून घ्यायला आवडेल.)
अक्षरशैली हा शब्द हाती रेखलेल्या अक्ष्रराकृतींनाही लागू पडेल. तो अतिव्याप्त वाटतो. रूढही नाही.
संगणाकाचा विशिष्ट संदर्भ देऊन जर संगणकटंक हा सामासिक शब्द वापरायचा असेल तर त्याची घटकपदं जोडूनच लिहायला हवीत. मराठीच्या सध्याच्या लेखनात हे भान सुटत चाललेलं दिसतं.
सुशांत, तुम्हाला आवडलेला टंक हा शब्द खरोखरीच चांगला आहे. वापरून वापरून रूढ होण्यासारखा आहे. संगणकटंक असा जोडशब्द मात्र अजिबात नको. (त्याचा उच्चार संगण-कटंक करायचा की सं-गण-कटंक करायचा हा सं-भ्रम नको.) किंवा संगणक टंक असे शब्दद्वंद्वपण नको.
इंग्रजीत ट वर्गाच्या वर्णांचा उच्चार दंततालव्य होतो, म्हणजे मराठीतील च़, छ़, ज़ झ़ प्रमाणे ही माहिती कधी ऐकलेली/वाचलेली नाही. आपल्या खुलाशासाठी--Pantचा उच्चार इंग्रजी-मराठी शब्दकोशात पॅन्ट असा दिलेला असतो. इंग्रजीत ङ, ण, आनि न हे तीनच मुख्य अनुनासिक उच्चार आहेत. गांव सारख्या मराठी अर्धअनुस्वारित शब्दांचा उच्चार दाखवण्यासाठी 'л'अशा दिसणार्या उच्चारखुणेचा वापर करतात. हा इंग्रजीतील चौथा अनुनासिक उच्चार म्हणता येईल.
--J ०७:१७, २८ मार्च २००७ (UTC)
संगणकटंक ह्या जोडशब्दाचे अवयव कसे करायचे ह्यासंदर्भात मराठी माणसं गोंधळतील असं मला खरंच वाटत नाही. पण काही वेळा माणसं (शब्द सामासिक नसला तरी) गोंधळतात हे मला मान्य आहे. उदा. सरवटे हे आडनाव काही जण सर्-वटे असं वाचतात तर काही सरव्-टे असं. मात्र सामासिक शब्दाचे अवयव कसे दाखवायचे ह्याची सोय मराठी लेखनात आहे (आपण वर आक्षेप नोंदवताना ती वापरलीच आहे.). संगणकटंक हे विकल्पाने संगणक-टंक असं लिहिता येईल आणि त्यामुळे गोंधळ व्हायचा टळेल. माझा आग्रह इतकाच आहे की सामासिक शब्दांचे घटक संगणक टंक असे तोडून मुळीच लिहू नयेत.
इंग्रजीत ट वर्गाच्या वर्णांचा उच्चार दंततालव्य होत असला तरी तो मराठीतील च़, छ़, ज़ झ़ ह्यांप्रमाणे होत नाही. उच्चाराचं स्थान एकच असले तरी उच्चाराच्या प्रयत्नामुळे ध्वनी वेगळे ठरतात. इंग्रजी ट-वर्गाच्या उच्चारात जिभेच्या टोकाची कड दंततालव्य ह्या स्थानी लागते तर मराठी च़-वर्गाच्या वर्णांचा उच्चार होताना जिभेच्या टोकाच्या वरच्या भागचा स्पर्श स्थानाला होत असतो.
इंग्रजी आणि मराठीतले नचे (आपण दोहोंना न-च म्हणतो.) उच्चार वेगळे आहेत. मराठीतला नेम (नियम) नि इंग्रजीतला नेम (नाव) ह्यांच्या उच्चारात भेद आहे. संदर्भासाठी आपण ह्या वर्णांचं आंतरराष्ट्रीय ध्वनिलिपीतील (IPA- International Phonetic Alphabate) लिप्यन्तर पाहू शकता.
http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language
http://en.wikipedia.org/wiki/International_Phonetic_Alphabet_for_English
चर्चेचा संक्षेप २
संपादनसंगणकावरील मराठी टंकलेखन आता विविध उपलब्ध आयएमईमुळे सुलभ झाले आहे, परंतु अँड्रॉईड व इतर प्रणालींचे काय? आज बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही टॅब्लेटवर आपण मराठी इनपुट करू शकत नाही. (आयपॅडचा अपवाद) कोणत्या अँड्रॉईड टॅब्लेटवर मराठी इनपुट उपलब्ध आहे? समजा मी टॅब्लेट घेतली, तर त्यावर मराठीत लिहायचे कसे?
- उपरोक्त सही न केलेला प्रतिसाद प्रथमदर्शनी विशेष:योगदान/114.143.79.179 अंकपत्त्यावरून आला असावा.
- हम्म... महत्वाचा प्रश्न आहे खरा. पण हे पी हळद, आणि हो गोरी एवढे सोपे नाही. उपकरण निर्मात्यांना प्रमाणित मराठी टंकांची Fontस ची माहिती उत्पादनाच्या पुर्वीस व्हावयास हवी . दुसरा मार्ग सरकार मराठी/भारतीय टंकलेखन उपलब्ध असण्यासाठी कायदे करू शकते पण त्या साठी टंकांच्या प्रमाण पद्धतींबद्दल व्यापक सहमती घेतली जाणे गरजेचे ठरते आणि ते काम केले गेले नाही. त्या शिवाय संगणक टंकन केवळ उपकरणांवर उपलब्ध असून चालत नाही. सर्वाधीक वापरले जाणारे संगणक टंकन डिफॉल्ट मध्ये वापरले जावयास हवे आणि इतर मुख्य मराठी टायपिंग पर्याय सुलभतेने निवडता आले पाहीजेत पण त्या साठी माझी स्वत:चीच टायपिंग पद्धतीच अधीक बरोबर याबाबत आंधळा अत्याग्रह सोडून स्वत: ऑनलाईन टायपींग स्पर्धांमध्ये मोकळेपणाने सहभाग नोंदवून प्रत्येक पद्धतीत सर्वाधिक वेग प्राप्त करणारे लोक शोधून वेग साधण्यात मध्ये सर्वाधिक वेग विवक्षीत पद्धतीं शोधावयास हव्या. टायपिंग पद्धती तयार करणाऱ्यांचे तर्कही अनुभव महत्वाचे असतात नाही असे नाही पण स्पर्धात्मकते शिवाय गुणवत्ता प्राप्त करणे प्रगती करणे कठीण रहाते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:१५, ११ सप्टेंबर २०१४ (IST)
संज्ञा/शब्द निश्चिती
संपादनक्रमांक | इंग्रजी भाषेतील संज्ञा | सध्या प्रचलीत शब्द | शासकीय पारिभाषिक कोशातील सुवणी | नवीन सुचवण्या |
---|---|---|---|---|
१ | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
२ | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
३ | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
४ | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
५ | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
७ | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
८ | glyphography | उदाहरण | उत्कीर्ण लेखन (न. (ग्रंथालयशास्त्र कोश) ) | उदाहरण |
९ | hieroglyphics | उदाहरण | चित्रलिपि (स्त्री.) (ग्रंथालयशास्त्र कोश) चित्रलिपिचिन्ह (न.) (साहित्य समीक्षा कोश) | उदाहरण |
१० | glyph | उदाहरण | खोबण, नक्षीदार ऊर्ध्व खाच (मराठी विश्ववकोश परीभाषा कोश) | उदाहरण |
११ | Type Foundry Foremen | उदाहरण | मुद्राक्षर ओतशाळा कार्यदेशक | उदाहरण |
१२ | type foundry | उदाहरण | मुद्राक्षर ओतशाळा (स्त्री.) | उदाहरण |
१३ | Type Store Keeper and Lino Foreman | उदाहरण | मुद्राक्षर भांडारपाल आणि पंक्तिमुद्रण कार्यदेशक (लायनी) | उदाहरण |
१४ | Type Rubber | उदाहरण | मुद्राक्षर घर्षक (पदनाम कोश) | उदाहरण |
१५ | Type Store Keeper | उदाहरण | मुद्राक्षर भांडारपाल | उदाहरण |
१६ | type metal | उदाहरण | मुद्रण धातु (रसायनशास्त्र कोश) | उदाहरण |
१७ | typewriter | उदाहरण | टंकलेखन यंत्र | उदाहरण |
१८ | Typewriter Attendant | उदाहरण | टंकलेखक यंत्र परिचर (पदनाम कोश) | उदाहरण |
१९ | typewriting | उदाहरण | टंकलेखन (न.) | उदाहरण |
२० | typewritten | उदाहरण | टंकलिखित | उदाहरण |
२१ | ascender type | उदाहरण | आरोही मुद्र | उदाहरण |
२२ | font | मुद्रावर्ग | उदाहरण | उदाहरण |
२३ | type | उदाहरण | मुद्र (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |
२४ | typecase | उदाहरण | मुद्रधानी (स्त्री.) (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |
२५ | typeface | उदाहरण | अक्षरवळण (न.) (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |
२६ | typography | उदाहरण | मुद्राक्षरकला (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |
२७ | casting of type | उदाहरण | मुद्र ओताई, अक्षर ओताई (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |
२८ | cold type setting | उदाहरण | शीत मुद्ररचना (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |
२९ | black letter type | उदाहरण | ठळक मुद्र, गोथिक मुद्र (ग्रंथालयशास्त्र कोश)
(also Gothic antique or Gothic type) - See more at: http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=Type&field_pratishabd_value=&page=1#sthash.tgTArUIY.dpuf%7C%7C उदाहरण | |
३० | bold types | उदाहरण | ठळक मुद्राक्षरे (ग्रंथालयशास्त्र कोश) | उदाहरण |