सदस्य चर्चा:ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था

Active discussions

या लेखाचे प्रयोजन काय?
कोण विकिपीडियावर येऊन अशा लेखांना हुडकेल?
माझे इतर आक्षेप खालीलप्रमाणे आहेत

 • कमीत कमी लेखाचे नाव शिवाजी महाराज यांचे नाव दिलेल्या संस्था असे असावे.
 • आणि तसे असेल तर "माता जिजाऊ पुरस्कार" हे या यादीत का आहे?
 • "शिवसृष्टी नांदेड (गीता दस्तापुरे यांचा बंगला)" याचे औचित्य काय असावे? "शिव...." असे नाव असणारे हजार बंगले माझ्या पाहण्यात आले असतील.
 • " महाराष्ट्राबाहेरच्या बहुसंख्य भारतीयांनी छत्रपती शिवाजीचे चरित्र कधीच वाचलेले नसले आणि शिवाजीच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या बाबतीत ते अनभिज्ञ असले तरी, शिवाजी हा फार मोठा माणूस होऊन गेला असे भारतातील अनेकांना मान्य आहे." ही विकियोग्य भाषा नव्हे. विशेषत: संपूर्ण प्रस्तावनाच "Original research" किंवा ललित लेख असावा अशी आहे.
 • संस्थांची यादी असेल तर, "राजाराम पूल, पुणे" हे कसे काय आले?
 • "शिवाजीची मूर्ती, सोलापूर" हे तर हास्यास्पदच आहे. (I am sorry, I have no other words)

क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:३१, २५ फेब्रुवारी २०१३ (IST)[]

 • "शिवसृष्टी नांदेड (गीता दस्तापुरे यांचा बंगला)" : या बंगल्यामध्ये शिवाजीच्या आयुष्यातील काही प्रसंगांचे कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. ते प्रदर्शन भेट देणाऱ्या जनतेसाठी खुले असते. ’शिव’ नावाच्या दुसऱ्या बंगल्यात अनाहूत जनता खुल्लंखुल्ला जाऊ शकत नाही.
 • ’शिवाजी महाराज यांचे नाव दिलेल्या संस्था’ या लांबलचक नावापेक्षा त्याच अर्थाचे ’शिवाजी नावाच्या संस्था’ हे नाव सुटसुटीत नाही? विकीच्या संकेतांप्रमाणे महाराज, श्रीयुत वगैरे शब्दांना बंदी आहे.
 • "माता जिजाऊ पुरस्कार" हे या यादीत का आहे? -- ’जिजाबाई नावाच्या संस्था’ असा आणखी एक लेख लिहिण्याचे टाळण्यासाठी या लेखात ते नाव आले आहे. त्याच कारणासाठी संभाजी, राजाराम आणि शाहू या नावांच्या संस्था याच लेखात टाकल्या आहेत.
 • "शिवाजीची मूर्ती, सोलापूर" हे हास्यास्पद आहे? सोलापूरच्या शिवाजीच्या मूर्तीवर कुणीतरी एक सबंध लेख लिहावा, त्या दृष्टीने हे नाव यादीत आले आहे. पुण्यातील श्री शिवाजी मराठी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल

(SSPMS) या संस्थेच्या आवारात असलेल्या शिल्पकार करमरकर यांनी बनवलेल्या शिवाजीच्या पुतळ्यावर डझनभर तरी लेख लिहिले गेले असतील. सोलापूरच्या शिवाजीच्या मूर्तीवरही एखादा लेख होऊ शकतो. मूर्ती, पुतळा आणि अनेकदा व्यक्ती या संस्था(Establishments) असतात. कोणतीही कायमस्वरूपासाठी स्थापिलेली गोष्ट ही एका अर्थाने संस्थाच असते. संस्कृतमध्ये संस्थ म्हणजे स्थावर; संस्था म्हणजे आकार, रचना, स्वरूप; संस्थान म्हणजे आकृती, वगैरे वगैरे.

 • या लेखात दिलेली यादी हा एक विकिपीडियावरचा वर्ग आहे असे समजून, यादीतील प्रत्येक संस्थेच्या नावावर एकेक लेख प्रकाशित झाल्यास, ह्या लेखाचे प्रयोजन फलास येईल....J (चर्चा) २१:४८, २८ मार्च २०१३ (IST)[]

तुर्तस लेख वगळु नयेसंपादन करा

हा लेख शिवाजि महाराज ह्या लेखाचा पुरक लेख म्हणुन उपयोगात येवु शकतो का ते पहावे. लेखाचि चिकित्सा होने आवश्यक आहे. - Hari.hari (चर्चा)

उल्लेखनीयते बद्दलची सांशंकता कायमचसंपादन करा

ह्या लेखातील पाडळकरांनी निर्देशकेलेले व्यक्तिगत मते (ओरीजनल रिसर्च) ललित लेखन वगळले.

लेखातील माहिती गोळा करताना सदस्य 'जे' खूप मेहनत करत आहेत. तरी सुद्धा सद्य स्थितीत,काही तुरळक अपवाद वगळता, या लेख पानातील बहुतांश मजकुराची जसे की शिवाजीनगर बसस्टॉप आणि शिवाजी हौसींग सोसायटी अशा नोंदींची विश्वकोशीय उल्लेखनीयतेची सांशंकता कायमच आहे.

जो मजकुर कालौघात वगळला जाईल त्यावर मेहनत करण्या पेक्षा परिच्छेद लेखनावर भर देणे कदाचित अधीक उचीत ठरते किंवा कसे.जे म्हणतात >>SSPMS या संस्थेच्या आवारात असलेल्या शिल्पकार करमरकर यांनी बनवलेल्या शिवाजीच्या पुतळ्यावर डझनभर तरी लेख लिहिले गेले असतील.<< खरेतर अशा लेखांचा संदर्भ देऊन लेखनावर अधिक वेळ देणे बरे पडेल असे वाटते.

इतर त्रयस्थ माध्यमात पुर्व प्रसिद्ध झालेला एखाद परिच्छेद तरी विश्वकोशीय लेखन संदर्भ देउन करता येईल असे लेखन उपलब्ध असेल किंवा अशा शक्यतांची यादी केली तर मेहनतीस फळ मिळेल.

सदस्यांची सहमती असेल तर यादीचा भाग विकिपीडिया नामविश्वात प्रकल्प स्वरूपात नेता येईल. अथवा लेख स्वरूपात येई पर्यंत धूळपाटीवर नेता येईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४३, १९ मे २०१३ (IST)[]

शिवाजी पुतळा-संख्या-खुलासासंपादन करा

 • वगळलेले वाक्य : "आंबेडकर, गांधी, नेहरू, आणि शिवाजी ही अखिल भारतीय जनतेची दैवते आहेत. या प्रत्येकाच्या नावाने भारतात असंख्य संस्था आहेत." हे वाक्य ओरिजिनल रिसर्च असा ठपका ठेवून वगळले आहे. वाक्यात सांगितलेली गोष्ट वस्तुस्थिती आहे की नाही? असल्यास आणि तरीही वाक्य वगळल्यास विकिपीडियाचा वस्तुस्थितीने सिद्ध केलेल्या वास्तविकतेला विरोध आहे असे सिद्ध होईल.- जेंचा१ला मुद्दा
क्षमा असावी अंक पत्त्या वरून आलेल्या प्रतिसादास प्रतीमुद्दा प्रतिसाद देणे चर्चा करणे सोपे जावे म्हणून इनलाईन प्रतिसाद नोंदवत आहे.
१) आंबेडकर, गांधी, नेहरू यांचा 'शिवाजी नावाच्या संस्था' लेखाशी वस्तुत: काही संबध नाही म्हणून तो उल्लेख अयोग्य स्थळी/लेखात/पानात अनावश्यक म्हणून अनुल्लेखनीय ठरतो. "या प्रत्येकाच्या नावाने भारतात असंख्य संस्था आहेत" हेच वाक्य "भारतातील थोर व्यक्तिंच्या नावे असलेल्या संस्था" नावाच्या लेखात फिट बसेल.पण या लेखा करता हे वाक्य विनाकारण अविश्वकोशीय वर्णनात्मकते कडे नेते आहे.
२) शिवाजी हे अखिल भारतीय जनतेच दैवत आहे म्हणून भारतभरात त्यांच्या नावे संस्था आहेत" हे वाक्य लेखात बसवता येइल वस्तुस्थिती असली तरी ; शिवाजी महाराजांच नाव असलेल्या वाक्यावर किस पाडणे नको म्हणून निष्पक्ष विश्लेषणा करिता " 'अबकड' हे अखिल भारतीय जनतेच दैवत आहे म्हणून भारतभरात त्यांच्या नावे संस्था आहेत" हे वेगळ वाक्य घेतो. आता या वाक्यात आपल्याला दोन उपवाक्ये दिसतील लेखन पहिल वाक्य अप्रत्यक्ष प्रमाणपत्र आहे आणि प्रमाणपत्र स्वत:च असेल तर ओरीजनल रिसर्च होतो.तिसऱ्या व्यक्तीच प्रमाणपत्र चालत पण संदर्भ हवा.भारतभर असलेल्या संस्थांचा दैवत असल्याशी अन्योन्य संबंध आपण स्वत: जोडत असालतर ओरीजन रिसर्च आहे तीसऱ्या व्यक्तीचा मताचा संदर्भ असेल तर संदर्भ हवा.-माहितगार
 • वगळलेले वाक्य : "महाराष्ट्राबाहेरच्या बहुसंख्य भारतीयांनी छत्रपती शिवाजीचे चरित्र कधीच वाचलेले नसले आणि शिवाजीच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या बाबतीत ते अनभिज्ञ असले तरी, शिवाजी हा फार मोठा माणूस होऊन गेला असे भारतातील अनेकांना मान्य आहे." हे अनुभवावर बेतलेले वाक्य आहे. -जेंचा २रा मुद्दा
  • जबलपूरमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ’जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग एका विशाल मैदानावर चालू होता. ज्या जबलपूर शहरात कित्येक हजार मराठी माणसे राहतात आणि जे घरी मराठी बोलतात, अशा कार्यक्रमाला आलेल्या मराठी प्रेक्षकांतली अंदाजे २५ टक्के माणसे काही समजत नाही म्हणून उठून गेली. किमान २५ टक्के घरून आलेले खाद्यपदार्थ खात खात गप्पागोष्टी करीत होती. त्यांच्या बोलण्यावरून समजले की त्यांना शिवाजीच्या चरित्रातले हे बारकावे कधीच माहीत नव्हते. उरलेली माणसे मनापासून कार्यक्रम पहात होती की, पैसे खर्च केले आहेत म्हणून बसली होती, हे समजले नाही.
  • अशी स्थिती असेल तर अ-मराठी लोकांना शिवाजी कितपत माहीत असणार? शिवाजी हा एक लुटारू होता, हे जवाहरलाल नेहरूंनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेच होते. (याच कारणाने ’प्रतापगडवरच्या शिवाजी पुतळ्याचे नेहरूंनी उद्‌घाटन करू नये’, असे संयुक्त महाराष्ट्र समितीचे मागणे होते. नेहरूंना अडविण्यासाठी वाईच्या घाटात हजारो मराठी माणसे जमली होती.
दुसऱ्या मुद्द्यातील उपरोक्त वाक्य आपल्या व्यक्तिगत अनुभवावरील व्यक्तिगत मतांच सरळसरळ प्रतिबिंब आणि म्हणून सरळ सरळ ओरीजनल रिसर्च आहे. आपल मत अबकड पद्धतीच का आहे योग्य आहे अयोग्य आहे याचा उपरोक्त वाक्याच्या विश्वकोशीय वर्णनात मला काही संबंध दिसत नाही. -माहितगार
 • वगळलेले वाक्य : "त्यांशिवाय खासगी संस्थांच्या इमारतींत, सार्वजनिक उत्सव मंडळांच्या कार्यालयांत, राजकीय पक्षांच्या ताब्यात, अन्य गावांमध्ये, आणि इतरत्र गल्लोगल्ली असलेल्या देवळांच्या आश्रयाने असलेल्या शिवाजीच्या पुतळ्यांची नोंद घेतली, तर त्यांची संख्या उत्तर प्रदेश सरकारने उभारलेल्या हत्तींच्या व व्यक्तींच्या पुतळ्यांपेक्षा नक्की जास्त भरते. ही गोष्ट महाराष्ट्राला अभिमानास्पदच आहे." या सत्याची अनुभूती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कोणत्याही गावातून डोळे उघडे ठेवून फेरफटका मारला तरी पुरेसे आहे. वाक्य गाळण्यापूर्वी जरूर सर्वेक्षण करावे. -जेंचा ३रा मुद्दा
आपल्या तीसऱ्या मुद्द्यातील पहिल वाक्य '....पुतळ्यांची नोंद घेतली' हे सरळसरळ व्यक्तिगत अनुमान आहे. आणि म्हणून ओरीजनल रिसर्च या स्वरूपातच मोडत , वाक्याचा दुसरा भाग सुद्धा पुन्हा एकदा व्यक्तिगत अनुमान आणि म्हणून ओरीजन रिसर्च आहे.जसा आंबेडकर, गांधी, नेहरू यांचा या लेखाशी काही संबंध नाही तसा दुसऱ्या वाक्यात केलेल्या तुलनेचाही मला या लेखपान विषयाशी काही संबध दिसत नाही किंवा काही असेलच तर ओढून ताणून आणलेला दिसतो.-माहितगार
 • पुण्यातील शिवाजीच्या पुतळ्यांची यादी लेखात दिलीच आहे. ही संख्या चाळीसहून अधिक होईल तेव्हा ’संदर्भ’ मागायची गरज पडणार नाही. तूर्त [१] हा संदर्भ पहावा....J (चर्चा) १२:२७, १९ मे २०१३ (IST) -जेंचा मुद्दा ४था[]
चौथ्या मुद्द्यात आपण चर्चेला घेत असलेल सध्याच वाक्य "एकट्या पुणे शहरात, जानेवारी.२०११ पर्यंत, सार्वजनिक खर्चाने सार्वजनिक जागी उभे केलेले शिवाजीचे चाळीसहून अधिक पुतळे होते" अस आहे.
१) एकट्या शब्दाचा वापर वाक्यास वार्तांकन (आणि वर्णनात्मक) शैलीकडे झुकवतो वाक्य व्यक्तिगत अनुमान आणि ओरीजनल रिसर्च असण्याच्या शक्यतेचा निर्देश करतो.(शिवाय येथे 'एकट्या' शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात हे आपण कदाचित लक्षात घेतले नसावे;पहिला मुख्य आपणास अभिप्रेत असलेला अर्थ पुण्यातच एवढ तर बाहेर किती असा अनुमानात्मक म्हणून ओरीजनल रिसर्च कडे झुकवणारा आहे; दुसरा विरुद्ध अर्थ केवळ पुणे शहरात इतरत्र नाही असा घेतला तर व्यक्तिगत अनुमानाच्या जोरावर मेजर क्लेम केला जातो आहे म्हणून संदर्भ हवा)


२) 'जानेवारी.२०११ पर्यंत' या माहितीस काही स्रोत असणे अभिप्रेत आहे स्रोत असेल तर संदर्भ नमुद करणे अवघड जाउ नये. मात्र एखादी व्यक्ति म्हणेल कि मी जानेवारी.२०११ पर्यंत पुण्यात होतो तोपर्यंत क्ष संख्या होती हि माहिती व्यक्तिगत ठरते, माहिती पडताळता येणे शक्य नाही म्हणून संदर्भ हवा
३) उभे केलेले पुतळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक खर्चाने झाले आहेत याही माहितीस काही स्रोत असावा.स्रोत असेल तर संदर्भ नमुद करणे अवघड जाउ नये माहिती पडताळता येणे शक्य नाही म्हणून संदर्भ हवा.
४) आपण दिलेली ४० पुतळ्यांची यादीच आपण संदर्भात भरू शकता पण या यादीतील उल्लेखांना संदर्भ अद्याप उपलब्ध केले गेले नाहीत शिवाय आपण निर्देश केलेल्या यादीतील सर्व पुतळे सरसकट सार्वजनिक ठिकाणीच आणि सार्वजनिक खर्चानेच झाले आहेत असाही अर्थ निघतो आहे असा अर्थ निघत असेल तर त्या करताही संदर्भ हवा.
क्षमा असावी खूप कीस पाडला. पण 'जे' आपण विवीध याद्यांवर लेखांवर खूप मेहनत घेत आहात आपल्या मेहनतीच कौतुक आणि अभिमान दोन्ही आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२६, १९ मे २०१३ (IST)[]

उत्तरसंपादन करा

१)’आंबेडकर, गांधी, नेहरू यांचा 'शिवाजी नावाच्या संस्था' लेखाशी वस्तुत: काही संबध नाही’. संबंध एवढ्यापुरता आहे की या सर्व व्यक्ती भारतीयांना बहुधा वंदनीय असाव्यात, आणि त्या सर्वांच्या नावाच्या भरपूर संस्था आहेत. त्यांधील ’गांधी नावाच्या संस्था’ हा लेख यापूर्वीच लिहिला गेला आहे, इतरांवरचे लेख अजून लिहावयाचे आहेत. प्रत्येक लेखाची सुरुवात एखाद्या प्रारंभिक परिच्छेदाने करावी असा संकेत आहे. त्यानुसार, हे वाक्य प्रस्तावनावजा आहे आणि पुढील लेखांचे सूतोवाच करणारे आहे. मात्र जर ’त्या’ व्यक्ती वंदनीय आहेत हे सिद्ध करण्यासाठी संदर्भ मागितले तर देणे शक्य होईल असे वाटत नाही.

२. जग हे मिथ्थ्या आहे हे एका शिष्याला पटवून देत असताना आदी शंकराचार्यांच्या दिशेने एक मत्त हत्ती चाल करून आला. शंकराचार्य पळाले आणि त्यांनी स्वत:ला वाचविले. शिष्याने विचारले, जग मिथ्थ्या आहे, तर तुम्ही का पळालांत? शंकराचार्य म्हणाले की, तो हत्ती मिथ्थ्या होता आणि मी पळालेला दिसलो हेही मिथ्थ्या होते. या न्यायाने ’त्या’ व्यक्ती मिथ्थ्या आहेत, त्यांचे वंदनीयत्व मिथ्थ्या आहे, आणि ते सिद्ध करण्यासाठी मी जर दिलेच तर, ते संदर्भही मिथ्थ्या ठरविले जातील. म्हणून कृपया संदर्भ मागू नयेत.

’भारतातील थोर व्यक्तींच्या नावे असलेल्या संस्था’ नावाचा लेख विकीवर मावेल असे वाटत नाही. त्यासाठी एक अनेक खंडी ग्रंथ लिहावा लागेल.

३)’उपरोक्त वाक्य आपल्या व्यक्तिगत अनुभवावरील व्यक्तिगत मतांच सरळसरळ प्रतिबिंब’. ’मी’ हे एक उदाहरण आहे. माझ्याऐवजी एखादा वार्ताहर असता आणि त्याने त्याला आलेला अनुभव बातमीत दिला असता, तर तो संदर्भ ठरला नसता? ’मी’ विकीचा वार्ताहर आहे, असे समजावे, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीच्या प्रमाणपत्राची गरज उरणार नाही.

४)’ ....पुतळ्यांची नोंद घेतली' हे सरळसरळ व्यक्तिगत अनुमान आहे. ’ मान्य. ते अनुमान व्यक्तिगत राहू नये यासाठी इतरांनीही पुतळ्यांच्या नोंदी कराव्यात, माझी अजिबात हरकत नाही.

५) ’आपण दिलेली ४० पुतळ्यांची यादीच आपण संदर्भात भरू शकता पण या यादीतील उल्लेखांना संदर्भ अद्याप उपलब्ध केले गेले नाहीत शिवाय आपण निर्देश केलेल्या यादीतील सर्व पुतळे सरसकट सार्वजनिक ठिकाणीच आणि सार्वजनिक खर्चानेच झाले आहेत असाही अर्थ निघतो आहे असा अर्थ निघत असेल तर त्या करताही संदर्भ हवा.’ जनतेच्या वर्गणीतून सार्वजनिक जागी पुतळे उभे करायची कल्पना आता इतिहासजमा झाली आहे. वर्गणीतून पुतळे उभारले गेलेच तर ते हल्ली संस्थांच्या खासगी परिसरात असतात. पुतळे सार्वजनिक ठिकाणीच झाले आहेत, याला संदर्भ देण्यासाठी एखादा रस्ता, चौक किंवा बगीचा सार्वजनिक आहे हे सिद्ध करावे लागेल. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ते ठिकाण सार्वजनिक असल्याचा पुरावा माहितीच्या अधिकारात मागावा लागेल. ठिकाण सार्वजनिक असले की खर्च सार्वजनिक असणारच. सार्वजनिक ठिकाणी झोपडपट्ट्या, साईबाबांचे पुतळे आणि तत्सम गोष्टी यांखेरीज काहीही खासगी उभे राहिले, तर सरकारी अधिकारी ते बांधकाम पाडून टाकतात.

६) ’'एकट्या' शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात हे आपण कदाचित लक्षात घेतले नसावे;’ कबूल. ते लक्षात आले नव्हते. मग काय शब्द हवा? फक्त पुण्यात? पुण्यातच? परत दोन अर्थ होतील. इतर शहरांतील पुतळ्यांची कुणी मोजदाद केली असल्याची माहिती नाही, पुण्यातील पुतळ्यांबद्दल आहे. त्यामुळे ’एकट्या पुण्यातच’ हे चालावे. ’च’ ने अर्थ पूर्णपणे बदलला. भवभूतीच्या उत्तररामचरितातील ’रात्रिरेव व्यरंसीत्‌’ या वाक्यातल्या ’व’वर अनुस्वार देऊन कालिदासाने वाक्य अधिक समर्पक केले अशी दंतकथा आहे, याची आठवण झाली.

७) २०११ साल यासाठी की, पुतळ्यांची संख्या तेव्हा मोजलेली होती. त्यानंतर काही पुतळे नव्याने आले असणारच. पुतळ्यांच्या संख्येसंबंधी वर्तनमान पत्रात बातमी आली होती, तिचा संदर्भ ऑर्कुटमधील एका प्रतिसादात आला होता, याचा संदर्भ दिला आहे. पुन्हा घ्या. [२]

८) नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने अत्यल्प काळात किती योजना निघाल्या ते [३] या बातमीत वाचावे. बातमी मूळ टाइम्स ऑफ इंडियात वाचली होती, शोधली की सहज सापडावी.....J (चर्चा) १८:०७, १९ मे २०१३ (IST)[]

आदरणीय 'जे',
आपल्या या (काहीशा मिश्किल) प्रतिसादाची मला गंमत वाटली :) . असो, मुळ विषया कडे येतो, संदर्भांचे महत्व अधोरेखीत करताना, मला आपणच इतरत्र उपस्थित केलेल्या 'चर्चा:शिवाजी सावंत' पानाकडे लक्ष वेधावेसे वाटते.आणि (माझ्यासह कुणाच्याही) माहितीत अथवा तर्कात तर्कांमध्ये उणीवा शिल्लक राहील्या तर वस्तुनिष्ठता कशी प्रभावित होते ते लक्षात येते.आता आपला याच विभागातील मुद्दा २ कडे या या मध्ये आपण आपली इच्छा व्यक्त करता कि , 'संदर्भ मागू नयेत ' !

"

उत्तरसंपादन करा

>>विकिपीडियावर जेम्स टोड ने नोंदवलेली स्टोरीच संदर्भ म्हणून स्विकारली जाइल.<< ’नेर’ हे एका मित्राचे नाव आहे, हे कोणत्याही विद्वानाने सांगितले तरी स्वीकारायची गरज नाही. असे असेल तर जामनेर, अंमळनेर, वाकानेर, या शब्दांत नेर कोठून आला. नेर हा शब्द संस्कृत नीवर या शब्दावरून आला. नीवर म्हणजे व्यापार; वाणी; चिखल किंवा राहण्यास योग्य असलेली जागा. अंमळनेर म्हणजे आमलानीवर, म्हणजे आवळ्याची झाडे असलेली राहाण्यासाठीची योग्य जागा. जाम हा शब्द जंबूफला या संस्कृत शब्दावरून आला. अर्थात जामनेर म्हणजे जंबूनीवर, जांभळाची झाडे असलेली रहाण्याजोगी जागा. याच नियमाने पिंपळनेर, पळसनेर, संगमनेर, थाळनेर, पारनेर, वाकानेर, बिकानेर, सावनेर, सामनेर, चिंचणेर, अंजनेरी, लोहोनेर, वगैरे.--इति वि.का. राजवाडे समग्र साहित्य, खंड सहावा.

दुसरे एक, माझा प्रतिसाद मिश्किल नव्हता. गांधी, शिवाजी, आंबेडकर हे वंदनीय आहेत यासाठी संदर्भ काय द्यायचा? चौक, रस्ता या गोष्टी सार्वजनिक आहेत यासाठी संदर्भ कुठून मिळवणार? अनेक गोष्टी स्वयंसिद्ध असतात. आणि पुन्हा संदर्भ अनेकदा चुकीचे असतात, हे मान्यच केले गेले आहे.

पुरस्काराचे वर्ष अनेकदा २०१२-१३ असे असते. ते बहुधा २०१२ सालातील ९ महिने आणि २०१३ सालातले ३ महिने यांचे बनलेले असते. अशावेळी ते वर्ष २०१३ आहे, असे समजावे. त्यावर्षी तो पुरस्कार प्रदान केला असण्याची बरीच शक्यता असते.

उत्तर लिहिणे चालू
आपण वर क्रमांक २ मध्ये हत्ती वगैरेची कथा वाचताना मला हसू आले म्हणून त्या कथेच्या वापरास आणि शिवाय ओरिजनल रिसर्च ह्या विषयाचा आपणास चांगला परिचय असण्याची शक्यता आहे,कदाचीत माझेही कुठे चुकत असेल आणि म्हणून आपण आमची परिक्षा तर घेत नाही आहात असे वाटून मिश्किल म्हणालो.
ज्या गोष्टी सर्वांना परिचीत/वंदनीय आहेत त्या बद्दलच्या संदर्भांची उपलब्धताही तर सहज असणार मग संदर्भ देण्यात वावगे काय.वंद्य व्यक्तींची यादी अनंत आहे प्रत्येक जण आपापल्या वंद्य व्यक्तींची यादी प्रत्येक लेखात एनकेन प्रकारेण जोडतो म्हणू लागला ज्ञानकोशाचे स्वरूप केवळ आरती कोशाचे होणार नाही ना  ? आपण शब्दांचा फुलोरा वाढवत नाहीना या बद्दल आपणच काय ठरवावे.
१)विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे, २) विकिपीडिया:मर्यादा#.विश्वकोश संकल्पना, हि सहाय्य पाने ३) आकाश निळे असल्याचा संदर्भ देण्याची आवश्यकता नाही, ४) आकाश निळे असण्याचा संदर्भ देण्याची सुद्दा आवश्यकता नाही आणि हे दोन मार्गदर्शन निबंध पहावेत हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५५, २१ मे २०१३ (IST)[]
शब्दांचा फुलोरा बनव

अविश्वकोशीय उल्लेख टाळावेतसंपादन करा

नमस्कार,
>>या चौकात सरकारी खर्चाने संभाजीचा पुतळा उभा करावा अशी आजी-माजी नगरसेवकांची मागणी आहे.<<
विकिपीडिया हि नगरसेवकांच्या मागण्या मांडण्याची जागा नव्हे, असे अविश्वकोशीय उल्लेख करण्याचा मोह पुर्णपणे टाळला जाणे गरजेचे आहे आणि नविन सदस्यांना विकिपीडिया संकेतांची माहिती होण्यास वेळ लागू शकतो पण जाणत्या सदस्यांनी खासकरून काळजी घेऊन सहकार्य करावयास हवे. सदर उल्लेख वगळला जावा अशी नम्र विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१४, २५ जुलै २०१३ (IST)[]

ठीक आहे. पण जेव्हा तो पुतळा अस्तित्वात येईल, तेव्हा त्या पुतळ्यासंबंधीच्या लेखात तो उभा करण्याची आजी-माजी नगरसेवकांची मागणी होती असा उल्लेख येईल, तो खात्रीने विश्वकोशीय असेल. ’मागणी’चा उल्लेख जरा जास्तच आधी केला एवढेच. तूर्त ते वाक्य गाळून टाकायला हवे....J (चर्चा) १४:४४, २६ जुलै २०१३ (IST)[]

सरमिसळसंपादन करा

१) या पानातील मजकुरात विषय आणि व्यक्तींची सरमिसळ मुळे काही संपादन सुधारणा करण्याच्या दृष्टीने सध्या साधे वाचन सुद्धा लेखात अवघड जात आहे. वाचक कसे वाचन करू शकतील असा प्रश्न उपस्थित होतो. यातील स्मृती-स्मारक-संस्था विषयाच्या, व्यक्ती एकाच घराण्यातील असतील तरी, त्यांना स्वतंत्र उल्लेखनीय व्यक्तिमत्वे होती. त्यामुळे व्यक्ती आणि विषयवार किमान वेगळे विभाग बनवावेत अथवा इतर सदस्यांनी विभाग वेगळे बनवण्यात सहाय्य करावे म्हणजे उल्लेखनीयता चर्चा वाक्यवार आणि घटकवार पुढे नेता येईल.

२) पुतळ्यांबद्दलचा मजकुर वेगळ्या लेखांमध्ये हलवता यावा म्हणून विकिपीडिया:चित्रशिल्पकला प्रकल्प#नवीन प्रस्तावित लेख येथे पुतळ्यांबद्दल प्रस्तावित लेख नावे नमुद केली आहेत,जसे मुंबई शहरातील पुतळे,पुणे जिल्ह्यातील पुतळे, महाराष्ट्रातील पुतळे , भारतातील पुतळे , विश्वकोशीय उल्लेखनीयतेस धरून अजूनही काही (व्यक्तीवार) लेख शीर्षके नमुद करता येतील आणि कृपया विश्वकोशीय उल्लेखनियता असलेले पुतळ्यांचे उल्लेख नवीन संबंधीत लेखात स्थानांतरीत करावेत.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५०, २९ जुलै २०१३ (IST)[]

शिवाजीनगर एस्टी स्टॅन्ड, पुणे आणि शिवाजीनगर कोर्ट, पुणे यांची लेखातील उल्लेखनीयतासंपादन करा

शिवाजीनगर परिसरात असंख्य संस्था असू शकतात. त्या परिसराचे नाव आणि त्या संस्थेचे तेथील अस्तीत्व यांचा अन्योन्य संबंध क्वचीतच असतो.कोर्ट आणि एस्टी स्टॅन्ड शिवजीनगर परिसरात आहेत म्हणून त्यांच्या विशेष नामात शिवाजीनगर असेलच असे नाही. अधिकृत संदर्भ असल्याशिवाय असे उल्लेख जोडू नयेत हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:०१, २९ जुलै २०१३ (IST)[]

पण आहेसंपादन करा

"परिसराचे नाव आणि त्या संस्थेचे तेथील अस्तित्व यांचा अन्योन्य संबंध क्वचितच असतो. कोर्ट आणि एस्टी स्टॅन्ड शिवजीनगर परिसरात आहेत म्हणून त्यांच्या विशेष नामात शिवाजीनगर असेलच असे नाही." पण आहे!.....J (चर्चा) १५:२९, २९ जुलै २०१३ (IST)[]

मला हि माहिती नव्हती धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१७, २९ जुलै २०१३ (IST)[]

वेरूळ-अजंठा ते ताजमहालसंपादन करा

ऐतिहासीक काळापासून शिल्पकला आणि स्मारकात सार्वजनिक निधी आणि सार्वजनिक स्थळांचा वापर झालेला आहे.यात वेरूळ-अजंठा ते ताजमहाल यांचा सुद्धा समावेश होतो.लोकमान्य टिळकांनी हे पुतळ्यांचे आणि स्मारकांचे समर्थन त्यांच्या लेखातून केले होते असे आठवते. लेखात पुतळा या विषयावर इतर काहीच विश्वकोशीय लेखन न होता त्यावरील केवळ सार्वजनिक निधी आणि स्थळाचा उल्लेख काहीसा खटकणारा ठरतो.पुतळा संबंधीत घटक आणि लेखन इतर लेखात स्थानांतरीत करताना पुतळा विषयावर अधिक विश्वकोशीय लेखन होईल हे पाहून सहकार्य करावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:११, २९ जुलै २०१३ (IST) --[]

मायावती आणि हत्तीसंपादन करा

"लोकमान्य टिळकांनी हे पुतळ्यांचे आणि स्मारकांचे समर्थन त्यांच्या लेखातून केले होते असे आठवते." अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील मायावतींच्या आणि हत्तींच्या असंख्य पुतळ्यांवर निवडणूक काळात पांघरूण घालण्याची सक्ती केली होती, याकडे दुर्लक्ष करू नये. टिळकांच्या काळातील पुतळ्यांच्या संस्कृतीचा भविष्यात भस्मासुर होऊ शकेल याची टिळकांना कल्पना नव्हती. आणि त्या काळात लोकवर्गणीतून पुतळे उभारले जात, त्यामुळे त्यांची संख्या मर्यादित असे.

गणपती उत्सवाचा अतिरेक होऊन महाराष्ट्रात आवरता न येईल इतकी वाईट परिस्थिती निर्माण होईल असा इशारा टिळकांना (बहुधा आगरकरांनी-संदर्भ शोधावे लागतील) दिला होता. .....J (चर्चा) १५:१०, २९ जुलै २०१३ (IST)[]

नमस्कार,'जे' तुमच्या मनात खदखदणाऱ्या भावनांचा निचरा होऊन जाऊ द्यावा म्हणून मी मुद्दाम विषय काढला. या निमीत्ताने आपण हे लक्षात घ्यावयास हव की व्यक्तिगत आत्मीयता असलेल्या संदर्भ असलेल्या विषयांची दखल विश्वकोश निश्चितपणे घेऊ शकतो पण अस करताना त्यास शक्यतो एकांगीपणा येणार नाही याची काळजी घेण्याची गरज असते. सोबतच विकिव्यासपीठाचा उपयोग व्यक्तीगत, सामाजिक अथवा राजकीय मते नोंदवण्याच अथवा समस्या सोडवण्याच्या उद्देशानी होऊ नये. एखाद्या विषया बद्दल व्यक्तीगत आत्मीयता असूनही तटस्थता बाळगत त्याची दखल घेण ठिक पण हे करताना संपूर्ण लेखाचा कल बदलला जाणार नाही हे बघीतल तर बर पडेल किंवा कस .
उत्सवांवरचा खर्च आपण व्यर्थ म्हणतो तर चाणक्य निती त्याच चक्क समर्थन करते, केवळ समस्यांकडे लक्ष राहून सत्तेच्या स्थीरते सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्या पेक्षा लोकांच लक्ष वेगळ्या मुद्दाकडे वेधल जाण्याच स्वत:च महत्वही असू शकत, वेगवेगळ्या समाज घटकांचे हित जपण्याची शासन व्यवस्था आणि राजकारण्यांची आपली कारणही असू शकतात, कलेस प्रोत्साहन कलाकारांना रोजगार असेही विषय असू शकतात त्याचवेळी ताजमहालच्या निर्मितीचा बोजा सरकारी तिजोरीवर येत असतो हेही स्विकाराव लागत. सांगण्याचा मुद्दा हा कि एकाच गोष्टी कडे पहाण्याचे एकापेक्षा अधिक दृष्टिकोण असू शकतात आणि ज्ञानकोशात दोन्ही बाजूंची दखल समतोल पणे घ्यावयास हवी.
पुतळे,स्मारके अथवा विवाह उत्सव असू द्यात त्या बद्दलच्या लेखातून दोन्ही बाजूंची समतोल दखल घेत संदर्भ विश्वकोशीय उल्लेख करावेत. वर्तमानातील मनात खदखदणाऱ्या समस्या ज्ञानकोशातील लेखाचा कल बदलल्या मुळे सुटणार नाहीत त्या साठी समाजाकडे इतर व्यासपीठ आहेत. ज्ञानकोशीय लेखांनी आपली तटस्थता जपावयास हवी >>व्यक्तीगत किंवा राजकीय मते नोंदवण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध असतांना विकिचा उपयोग टाळण्याबाबत हि विन्ंती आहे.<< अशी भावना काही सदस्यांनी प्रचालक निवेदन वर पोहोचवली , ती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण मोठ्या मनाने स्विकाराल अशी आशा आहे. त्यांनाही मी आपणाशी मोकळा संवाद साधण्याची विनंती केली आहे.
पुढील मनमोकळ्या संवादा करता सर्वांना शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:११, २९ जुलै २०१३ (IST)[]

प्रबोधनकार ठाकरेसंपादन करा

‘टिळकांनी लादलेलं थोतांड’ म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा विरोध केला होता....J (चर्चा) १५:२६, २९ जुलै २०१३ (IST)[]

Return to the user page of "ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था".