चर्चा:शिवाजी गोविंदराव सावंत

(चर्चा:शिवाजी सावंत या पानावरून पुनर्निर्देशित)

>>१९८३मध्ये बडोदा येथे(?) भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.<<

१९८३साली बडोद्यात कॊणते मराठी साहित्य संमेलन भरले होते? त्या वर्षी अंबाजोगाई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, आणि त्याचे अध्यक्ष व्यंकटेश माडगूळकर होते. बडोद्यामध्ये १९०९, १९२१ आणि १९३४साली संमेलने भरली होती, आणि त्यांचे अध्यक्ष अनुक्रमे का.र. कीर्तिकर, न.चिं. केळकर आणि ना.गो. चाफेकर होते.

>>मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी व हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली.<<

कोणती नाटके?

गोव्यात(?) ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अध्यक्षपदी असताना ???? ७६वे अधिवेशन कऱ्हाडमध्ये भरले होते आणि त्याचे अध्यक्ष डॉ.सुभाष भेंडे होते.....J (चर्चा) १४:४८, १४ मे २०१३ (IST)Reply

१९९५ की १९९६? संपादन

शिवाजी सावंत यांना १९९४ सालचा मूर्तिदेवी पुरस्कार मिळाला होता. तो प्रत्यक्ष हातात पडला तेव्हा १९९५ साल उजाडले असणार. त्याप्रमाणे लेखात १९९५ असे साल दिले होते पण सुप्रियासोनावाणे (SupriyaSonawane) यांनी ते बदलून १९९६ केले. कां ते समजले नाही. कारण समजल्यास बरे वाटेल.

कृपया हि लिंक पाहा.
http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5346128095888887940&PreviewType=books
सदस्य:SupriyaSonawane (चर्चा)

हेही पहा : मूर्तिदेवी_पुरस्कार आणि,

[१]

J (चर्चा) २३:०१, १६ मे २०१३ (IST)Reply

१) पुरस्कार प्रदान सोहोळा झालेल/प्राप्त झालेल वर्ष
२) पुरस्कार जाहीर झालेल वर्ष
३) पुरस्कार ज्या वर्षा करता आहे ते वर्ष
हि तिन्ही वर्ष वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळी असू शकतात. विकिपीडिया लेखात पुरस्कार नमुद करण्याकरता कोणत वर्ष निवडणार आणि का ? इतरांची मत वेगळी असू शकतात.माझ मत तीसऱ्या पर्यायाला जात, कारण पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा/शासनाचा उद्देश संबधीत वर्षा करताच असतो. पुरस्कार जाहीर होणारा उशीर परिक्षकांना झालेल्या उशीरा मुळे असू शकतो, पुरस्कार प्रदान करण्यास झालेला उशीर राष्ट्रपतींना विनंती केली, हो म्हणाले पण राष्ट्रपतींनी पुढच्या वर्षातली तारीख दिली. हि उदाहरण होती विलंबास उशीर विवीध कारणाने होउ शकतो.ज्ञानकोशीय नोंद घेताना सन्मानित व्यक्तिचा सन्मान कोणत्या वर्षा करता झाला हे महत्वाचे.
सदस्य:SupriyaSonawane यांचा बूकगंगा डॉटकॉमवर उपलब्ध पुस्तकाच्या कॉपीचा संदर्भ (१९९६) तपासला,बरोबर आहे पण अचूक नाही कदाचित प्रकाशक महाशयांनी, 'सदस्य:जे' लावतात तसा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला असा काही क्रायटेरीया लावला का कल्पना नाही. अचूक एवढ्या करता नाही. भारतीय ज्ञानपीठाच्या या अधिकृत संकेतस्थळावर पुरस्कार वर्ष १९९४च दिले आहे आणि म्हणून १९९४ हे वर्ष मराठी विकिपीडियावर वापरावे असे माझे मत आहे.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०३, २० मे २०१३ (IST)Reply

आपणास जो योग्य बदल वाटेल तो करावा.

सदस्य:SupriyaSonawane (चर्चा)
१९९४ केले....J (चर्चा) १७:०२, २५ मे २०१३ (IST)Reply
धन्यवाद.माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२५, १४ जून २०१३ (IST)Reply
"शिवाजी गोविंदराव सावंत" पानाकडे परत चला.