संत रामपाल
संत रामपाल दास (इंग्रजी: Sant Rampal Das) हे भारतीय आध्यात्मिक कबीर पंथी गुरु आहेत आणि कबीर साहेबांना देव (परमेश्वर) म्हणून संबोधतात. भारतातील विविध राज्यांसह हरियाणातील हिसार भागात असलेल्या सतलोक आश्रमाचे ते संस्थापक आहेत.[१]
संत रामपाल दास | |
संत रामपाल दास | |
मूळ नाव | रामपाल सिंह जाटयान |
जन्म | ८ सप्टेंबर, १९५१ धनाना, पंजाब (आता हरियाणा) |
संप्रदाय | कबीर पंथ |
कार्य | सतलोक आश्रमाचे संस्थापक |
जीवन
संपादनरामपाल दास यांचा जन्म ८ सप्टेंबर १९५१ रोजी सोनीपतच्या धनाना गावात झाला होता. त्यांच्या अधिकृत चरित्रानुसार, ते लहानपणापासूनच सर्व हिंदू देवी-देवतांचे कट्टर भक्त होते. पण या भक्तीतून त्यांना कधीच आध्यात्मिक शांती लाभली नाही. एके दिवशी संत रामपालजी कबीरपंथी गुरू स्वामी रामदेवानंद यांना भेटले. त्यांना समजावून सांगितले की त्यांच्याकडून चालत असलेल्या उपासनेची पद्धत आपल्याच धर्मग्रंथांशी जुळत नाही. त्यामुळे त्यांना या भक्ती पद्धतीद्वारे मोक्ष मिळू शकत नाही कारण श्रीमद्भगवद्गीता अध्याय १६ श्लोक २३ नुसार जो मनुष्य शास्त्राचा त्याग करून आपल्या इच्छेनुसार आचरण करतो, त्याला ना यश मिळते, ना सुख मिळते, ना परम आनंद मिळतो. [२]
१७ फेब्रुवारी १९८८ रोजी संत रामपाल जी यांनी स्वामी रामदेवानंद जी यांना आपले गुरू मानले आणि भक्तीची शिकवण घेतली.[३] त्यांचे अनुयायी हा दिवस बोध दिवस म्हणून साजरा करतात. संत रामपाल दास सांगतात की यानंतर त्यांनी श्रीमद्भगवद्गीता, कबीर सागर, गरीबदासांनी लिहिलेले सत् ग्रंथ, पुराणे, वेद आणि इतर अनेक ग्रंथ वाचले. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांना या पुस्तकांमध्ये स्वामी रामदेवानंद यांनी दिलेल्या शब्दांचे पुरावे मिळाले, त्यानंतर त्यांनी स्वामी रामदेवानंदजींनी दिलेल्या मंत्रांचा जप सुरू केला, त्यानंतर त्यांना १९९४ मध्ये स्वामी रामदेवानंद यांनी गुरुपद दिले. त्यानंतर ते ‘संत रामपाल दास’ झाले. १९९५ मध्ये त्यांनी अभियंता पदाचा राजीनामा दिला, जो २००० मध्ये स्वीकारण्यात आला. आणि नंतर त्यांनी करोंथा गावात सतलोक आश्रम स्थापन केला, जरी त्यांच्या अटकेनंतर २ आश्रम सरकारच्या देखरेखीखाली आहेत.[४][५]
सध्या, २० हून अधिक मोठे आश्रम आणि ५०० हून अधिक लहान आश्रम आणि भारत आणि परदेशात १५ कोटींहून अधिक अनुयायी असल्याचा त्यांचा दावा आहे.
शिक्षण आणि नियम
संपादनसर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा हवाला देत रामपाल दास कबीरांना सर्व देवी-देवतांसह[६] संपूर्ण विश्वाचा निर्माता मानतात आणि भक्तीला सर्व सांसारिक कर्मापेक्षा श्रेष्ठ मानतात, आणि सर्व वाईट गोष्टी बाजूला ठेवून कबीरांच्या भक्तीची प्रेरणा देतात.[७] दुष्कृत्यांचा त्याग करण्यासाठी आणि समाजसुधारणेसाठीही काही नियम ते देतात ज्यांना भक्ती मर्यादा म्हणतात. जसे: [१]
- बिडी, सिगारेट, तंबाखू, सल्फी, गांजा, दारू, अंडी, मांस[८] इत्यादी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन सोडा, ते कोणाला आणूनही नका देऊ.
- जुगार खेळणे, पत्ते खेळणे, चोरी करणे, फसवणूक करणे इ. करू नका.[१]
- अंत्यसंस्कार मृत्युभोज, हुंडाबळी, दिखाव्याच्या नावाखाली फालतू खर्च, तोंसुरी, समाधीपूजा, पितरपूजा, मूर्तीपूजा इत्यादी करू नये..[१]
- कबीर देवाशिवाय इतर कोणत्याही देवतेची पूजा करू नका, सर्वांचा आदर करा.[१]
- अश्लील गाणी गाणे, नाचणे, व्यभिचार करणे इ. पूर्णपणे निषिद्ध आहे.[१]
रामपाल दासचे अनुयायी त्यांच्या ज्ञानाने विशेषतः आकर्षित होतात, जे सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांशी सुसंगत असल्याचा दावा केला जातो. संताने दिलेले ज्ञान आम्ही धर्मग्रंथात मिसळले, मग आमच्या धार्मिक ग्रंथात तेच सापडले, त्यानंतर आम्ही त्यांच्यात सहभागी झालो, असे त्यांचे बहुतेक अनुयायी सांगतात. तथापि, ज्ञान हा एकमेव विषय आहे ज्यामुळे बहुतेक समाज त्यांचा विरोध करतात.[९]
जगाला आपल्या ज्ञानाची जाणीव करून देण्यासाठी रामपाल दास यांनी ज्ञान गंगा, जीने की राह, गीता तेरा ज्ञान अमृत, गरिमा गीता की, गहरी नजर गीता में इत्यादी पुस्तकेही लिहिली आहेत.[९]
सृष्टि रचना आणि मोक्षाची संकल्पना
संपादनसंत रामपाल यांची व्यक्तिगत कोणतीही कल्पना नाही. ते मुख्यतः कबीरसागर, सद्ग्रंथसाहेब, वेद, श्रीमद्भगवद्गीता, गुरू ग्रंथ साहिब, बायबल, कुराण इत्यादींचा दाखला देऊन सृष्टि रचनेची माहिती देतात.[१०] याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये, ज्ञान गंगा, जगण्याचा मार्ग इत्यादींमध्ये सुद्धा वाचायला मिळतो, जो खालीलप्रमाणे आहे:
"सर्व प्रथम फक्त एक स्थान 'अनामी (अनामय) लोक' होते, ज्याला 'अकह लोक' सुद्धा म्हंटले जाते. पूर्ण परमेश्वर त्या अनामी लोकामध्ये एकटा राहत होता. त्या परमेश्वराचे वास्तविक नाव 'कविर्देव' अर्थात 'कबीर परमेश्वर' आहे. सर्व आत्मे त्या पूर्ण मालकांच्या शरीरामध्ये सामावलेली होती. याच कविर्देवाचे रूपकात्मक (पदवीचे) नाव 'अनामी पुरूष' असे आहे. अनामी पुरुषाच्या रोम कूपाचा प्रकाश असंख्य सुर्यांच्या प्रकाशापेक्षा जास्त आहे.
विशेष:- जसे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाचे शरीराचे नाव वेगळे असते, परंतु पदाचे रूपकात्मक (पदवीचे) नाव 'पंतप्रधान' असते. बऱ्याच वेळेस पंतप्रधानाच्या खाली विविध विभाग सुद्धा ठेवतात. जेव्हा त्या विभागांच्या कागदपत्रांवर ते हस्ताक्षर करतात, तेव्हा त्याच पदाचा उल्लेख केला जातो. जसे, गृहमंत्रालयाच्या कागदपत्रांवर हस्ताक्षर केले तर 'गृहमंत्री' लिहितात. तिथे त्या व्यक्तीच्या हस्ताक्षराची किंमत कमी होते.
अशाच प्रकारे भिन्न-भिन्न लोकांमध्ये कबीर परमेश्वरांच्या प्रकाशामध्ये फरक असतो. पूर्ण परमेश्वर कविर्देव (कबीर परमेश्वर) यांनी आणखी तीन लोकांची (अगमलोक, अलखलोक, सतलोक) रचना शब्दाने (वचनाने) केली. हाच पूर्णब्रह्म परमेश्वर कबीर अगम लोकांमध्ये प्रकट झाला, तसेच कविर्देव (कबीर परमेश्वर) अगम लोकाचा सुद्धा स्वामी आहे, आणि तसेच याचे रूपकात्मक (पदवीचे) नाव अगम पुरूष अर्थात अगम प्रभू आहे. याच अगम प्रभूचे मानव सदृश शरीर खूप तेजोमय आहे. त्याच्या एका केस बीजकोशाचा प्रकाश एक लाख कोटी सूर्यांच्या प्रकाशापेक्षा सुद्धा जास्त आहे. हा पूर्ण कबीर परमेश्वर अलख लोकाचा सुद्धा स्वामी आहे. म्हणून तिथे त्याचे रूपकात्मक (पदवीचे) नाव अलख पुरूष आहे. इथे त्याचा प्रकाश एक अब्ज सूर्यापेक्षा जास्त असतो. हाच पूर्ण प्रभू सतलोकामध्ये प्रकट झाला, तसेच सतलोकाचा अधिपति हाच आहे.
यामुळे याचे रूपकात्मक (पदवीचे) नाव सतपुरूष (अविनाशी प्रभू) आहे. याचेच नाव अकालमुर्ती-शब्द स्वरूपी राम, पूर्ण ब्रम्ह, परम अक्षर ब्रम्ह इत्यादी आहे. या सतपुरूष कविर्देवाचे (कबीर प्रभू) मानव सदृश्य शरीर तेजोमय आहे. त्याच्या एका केस बीजकोशाचा प्रकाश कोटी सूर्य तसेच इतक्याच चंद्रांच्या प्रकाशाहून सुद्धा जास्त आहे. या कविर्देवाने सतपुरूष रूपामध्ये प्रकट होऊन, सतलोकामध्ये विराजमान होऊन प्रथम तिथे अन्य रचना केली. एक शब्दाने (वचनाने) सोळा द्वीपांची रचना केली. नंतर सोळा शब्दांनी सोळा पुत्रांची उत्पत्ती केली. एक मानसरोवराची रचना केली, ज्यामध्ये अमृत भरले.
सोळा पुत्रांची नावे:- १) "कूर्म", २) "ज्ञानी", ३) "विवेक", ४) "तेज", ५) "सहज", ६) "सन्तोष", ७) "सुरति", ८) "आनन्द", ९) "क्षमा", १०) "निष्काम", ११) "जलरंगी", १२) "अचिन्त", १३) "प्रेम", १४) "दयाल", १५) "धैर्य", १६) "योग संतायन" अथवा "योगजीत"
सत्यपुरूष कविर्देवांनी त्यांच्या पुत्र अचिंतला, सत्यलोकच्या अन्य रचनेची जबाबदारी सोपविली तसेच शक्ती दिली. अचिंतने अक्षर पुरूषाची (परब्रह्म) शब्दाने उत्पत्ती केली, तसेच त्याला म्हंटले की माझी मदत कर. अक्षर पुरूष स्नान करण्यासाठी मानसरोवरावर गेला. तेथे आनंद घेऊन झोपी गेला तसेच खूप वेळेपर्यंत बाहेर आला नाही.
तेव्हा अचिंतच्या प्रार्थनेमुळे अक्षर पुरूषाला झोपेतून जागे करण्यासाठी, कबीर परमेश्वराने त्याच मानसरोवरातून काही अमृत घेऊन एक अंडे बनविले. त्यात एक आत्मा प्रवेश केला आणि मानसरोवरात सोडले. अंड्याच्या गडगडाटाने अक्षर पुरूषाची झोप मोडली. त्याने अंड्याकडे क्रोधाने पाहिले, ज्यामुळे अंड्याचे दोन भाग झाले. त्यातून ज्योती निरंजन (क्षर पुरूष) निघाला, ज्याला पुढे "काल" म्हंटले गेले. ज्योति निरंजन आणि अक्षर पुरूषाला, परमात्म्याने अचिंतच्या लोकामध्ये राहायला सांगितले.[११]
तेव्हा कबीर परमेश्वराने स्वतः सृष्टीची रचना केली. आपल्या शरीरापासून स्त्री-पुरूषाला आपल्या आकृतीप्रमाणे उत्पन्न केले.[१२]
ज्योती निरंजनाची इच्छा झाली कि १६ भावांसारखाच त्याला सुद्धा वेगळा लोक मिळायला पाहिजे तसेच त्यामध्ये रचना करण्यासाठी सामग्री आणि सोबत राहण्यासाठी आत्मे पाहिजेत. त्याने एका पायावर उभे राहून तप केले. परमेश्वराने त्याला २१ ब्रम्हांड आणि रचनेसाठी तीन गुण आणि पाच तत्व प्रदान केले. परंतु आत्म्यांसाठी अट ठेवली कि जो आत्मा आपल्या इच्छेनुसार जाऊ इच्छितो, तो जाऊ शकतो आणि आत्म्यांना सुद्धा सावध केले, परंतु काही आत्म्यांनी ज्योती निरंजन सोबत जाण्याची इच्छा दाखविली. तेव्हा परमेश्वराने, सर्व प्रथम इच्छा दाखविणाऱ्या आत्म्याला, स्त्री रूप दिले, जिला दुर्गा म्हंटले जाते आणि अन्य सर्व आत्म्यांना तिच्यात प्रवेश करविला. तसेच शब्दाने सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती देऊन ज्योती निरंजन बरोबर पाठविले.[१३]
ज्योती निरंजनाने, दुर्गाचे (जी ज्योती निरंजनाची लहान बहीण सुद्धा होती) तेजस्वी रूप पाहून, दुर्गाची इच्छा नसताना दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परमेश्वराने ज्योती निरंजनाला २१ ब्रम्हांड आणि दुर्गासहित सतलोकाच्या बाहेर काढले. यावर नाराज होऊन, ज्योती निरंजनाने सोबत आलेल्या आत्म्यांना त्रास देण्यास सुरुवात केले. तसेच तीन गुणांना ब्रम्हा, विष्णु, महेशामध्ये प्रविष्ट करून आत्म्यांना जाळ्यामध्ये फसवू लागला.
हे बघून कबीर परमेश्वर वारंवार येथे येऊन सूक्ष्म वेदाच्या रूपात, आपले ज्ञान देऊन, आत्म्यांना पुनः आपला, स्वतःचा लोक, जो सुखमय आहे, तेथे जाण्याचा मार्ग सांगतात. जो आत्मा या ज्ञानाला समजतो, तो योग्य मार्ग मिळाल्यामुळे सतलोकामध्ये जातो आणि ज्योती निरंजनाच्या जाळ्यापासून मुक्ती मिळवितो. यालाच पूर्ण मोक्ष म्हणतात." [१४]
भविष्यवाणी
संपादनजगभरातील अनेक पैगंबरांची भविष्यवाणी संत रामपाल दास यांना अचूक बसते, असे संताचे अनुयायी सांगतात.[१५][१६]
- जयगुरुदेव पंथाचे तुळशीसाहेब ७ सप्टेंबर १९७१ रोजी म्हणाले की आपण ज्या महापुरुषाची वाट पाहत आहोत ते आज २० वर्षांचे झाले आहेत. त्या दिवशी संत रामपाल २० वर्षांचे झाले.[१७]
- नॉस्ट्राडेमस म्हणाले होते की २००६ मध्ये एक संत अचानक प्रकाशात येईल ज्याला प्रथम दुर्लक्ष केले जाईल परंतु नंतर जगाकडून कौतुक केले जाईल.[१८]
- त्याचप्रमाणे अमेरिकेची जगप्रसिद्ध भविष्यवक्ता फ्लोरेन्स, इंग्लंडचा ज्योतिषी 'किरो', हंगेरीची महिला ज्योतिषी "बोरिस्का" इत्यादी इतर भविष्यवेत्त्यांची भविष्यवाणी संत रामपाल दास यांच्यावर अचूक असल्याचा दावा केला जातो.[१९]
समाज-सुधार
संपादनसमाज-सुधारण्याच्या दिशेने संत रामपाल, यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत, कारण कि, त्यांच्या अनुयायांसाठी, नियमांचे सक्तीने पालन करणे आवश्यक आहे.[२०]
हुंडा प्रथेचे निर्मूलन
संपादनसंत रामपाल यांच्या अनुयायांमध्ये हुंडा आणि अनावश्यक खर्च रहित, साध्यापणाने विवाह हा चर्चेचा विषय झाला आहे.[२१] ज्या प्रमाणे सती प्रथा निर्मूलनासाठी राजा राममोहन राय यांचे प्रयत्न सफल झाले होते, त्याच प्रमाणे संत रामपाल, हुंडा प्रथा निर्मूलनासाठी क्रांतिकारी सिद्ध झाले आहेत.[२२]
जेथे आजच्या समाजामध्ये हुंडा न दिल्याने किंवा कमी दिल्याने मुलींना त्रास दिला जातो. अगदी हत्या आणि आत्महत्ये पर्यंतच्या घटना समोर येऊ लागल्या असता, संत रामपाल ह्यांचा कोणताही अनुयायी हुंडा देणे-घेणे करीत नाही तसेच दिखावा आणि अनावश्यक खर्च मुक्त १७ मिनिटांमध्ये रमैनी द्वारे विवाह करतात, ज्यामध्ये मोजक्याच लोकांना बोलाविले जाते, तसेच कोणताही खर्च केला जात नाही जो समाजासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे.[२३]
अस्पृश्यता आणि जातिभेद मिटविणे
संपादनसंत रामपाल यांच्या सत्संग समागमामध्ये विशिष्ट लोकांसाठी वेगळी व्यवस्था नसते. सर्व वर्गांतील अनुयायी एकत्र बसून सत्संग ऐकतात, सोबतच आंतरजातीय विवाहाची उदाहरणे सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येतात. जे जातीयवाद नष्ट करण्याच्या दिशेत एक महत्वाचा पाऊल आहे.[२४]
शास्त्रविरूद्ध साधनेचे निर्मूलन
संपादनसंत रामपाल यांनी आपल्या अनुयायांसाठी मूर्तिपूजा, पितृपूजा, अन्न-पाणी न घेण्याचे उपवास,[२५] तीर्थ स्थानावर स्नान करणे, वास्तु आणि ज्योतिष यांच्यावर विश्वास ठेवणे, जुगार खेळणे, देव धामांवर डोके ठेवण्यासाठी जाणे, मृत्यू भोजन इत्यादींवर पूर्णपणे प्रतिबंध लावले आहेत. याचे कारण असे, काळाच्या जाळ्यातून निघण्याच्या हेतूने परमेश्वराची भक्ती आवश्यक आहे, जी शास्त्रानुसारच असली पाहिजे.[२६][२०]
नशा निर्मूलन
संपादनसंत रामपाल यांच्याशी उपदेश घेण्यासाठी कोणत्याही मादक वस्तू, जसे बीडी, सिगारेट, तंबाखू , तपकीर ओढणे, सुल्फा, गांजा, दारु, अंडी, मास[२७] इत्यादींचे[२८] सेवन तर दूरच, पण या गोष्टी कोणाला आणून देण्यावरसुद्धा पूर्णपणे प्रतिबंध आहे. उल्लेखनीय विषय असा आहे कि त्यांचा कोणताही शिष्य ह्या प्रकारच्या मादक वस्तूंचा उपयोग करीत नाहीत.[२४]
रक्तदान
संपादनसंत रामपाल यांच्या अनुयायांद्वारे रक्तदान शिबिरांचे आयोजन वेळो-वेळी "कबीर परमेश्वर भक्ति मुक्ति ट्रस्ट" च्या देखरेखीखाली केले जाते.[२९] संतांनी दावा केला आहे, युद्ध किंवा आणीबाणीच्या परिंस्थितीत त्यांचे अनुयायी हजारो युनिट रक्त दान करू शकतात.[३०]
वाद
संपादन२००६ मध्ये, संत रामपाल दास यांनी सत्यार्थ प्रकाशाच्या काही भागांवर सार्वजनिकपणे आक्षेप घेतला होता[३१] यामुळे संतप्त झालेल्या हजारो आर्य समाज समर्थकांनी १२ जुलै २००६ रोजी करौथा येथील सतलोक आश्रमाला घेराव घातला आणि हल्ला केला. बचावात सतलोक आश्रमाच्या अनुयायांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सोनू नावाचा आर्य समाजाचा अनुयायी ठार झाला. ज्यामध्ये संतरामपाल दास यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. काही महिने तुरुंगात घालवल्यानंतर २००८ मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली.[३२]
या प्रकरणात २० डिसेंबर २०२२ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राकेश सिंह यांच्या न्यायालयाने संतासह २४ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.[३३]
नोव्हेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने पुन्हा त्यांच्या अटकेचे आदेश दिले. मात्र सतलोक आश्रम बारवाला येथे हजारो समर्थकांची उपस्थिती असल्याने पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही.[३४] समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांना १९ नोव्हेंबर २०१४ रोजी अटक करण्यात आले. यामध्ये ५ महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला असून संत रामपाल दास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ ऑगस्ट २०१७ रोजी ओलीस ठेवल्याप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.[३५][३६] मात्र खून आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यांमुळे ते अजूनही तुरुंगात आहेत. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी, हिसार न्यायालयाने बरवाला घटनेतील हत्येसाठी त्यांना आणि त्यांच्या काही अनुयायांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.[३७][३८] २६ जुलै २०२१ रोजी, न्यायाधीश वेद प्रकाश सिरोही, सत्र न्यायाधीश हिसार यांनी, संत रामपाल दास यांच्या ४ अनुयायांसह डॉ. ओम प्रकाश सिंग हुड्डा, राजेंद्र, बलजीत, बिजेंद्र यांच्यावर गुन्हा क्रमांक ५, ड्रग्स एंड कॉस्मेटिक्स कायद्याच्या अभावामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. कारणे आणि आरोप निराधार असल्याचे सिद्ध करून त्यांना सन्मानपूर्वक निर्दोष सोडण्यात आले आहे.[३९][४०][४१]
संदर्भ
संपादन- ^ a b c d e f "गुरु दीक्षा के नाम पर संत रामपाल के थे 11 अजीबो गरीब नियम". m.jagran.com (हिंदी भाषेत). 2022-08-03 रोजी पाहिले.
- ^ वरिन्दर भाटिया; दीपांकर घोसे (२३ नोव्हेंबर २०१४). "Sant Rampal: From the most followed, to the most wanted". इंडियन एक्सप्रेस. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
- ^ NEWS, SA (2022-02-14). "17 फेब्रुवारी बोध दिवस - तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज". SA News Channel (इंग्रजी भाषेत). 2022-08-03 रोजी पाहिले.
- ^ "संत रामपाल जी महाराज जी की जीवनी - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (हिंदी भाषेत). 2022-08-03 रोजी पाहिले.
- ^ "Saint Rampal Ji - Biography - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (इंग्रजी भाषेत). 2022-08-03 रोजी पाहिले.
- ^ "गुण तीनों की भगती में भूल पढ़ो संसार , कह कबीर निज नाम बिना". नेशनल राजस्थान. 2020-03-16.
- ^ "मोक्ष मार्ग पर आगे बढ़ने से पहले हमे बुराईया त्यागनी होंगी:संत रामपाल". दैनिक भास्कर. 2018-04-16.
- ^ "...तो क्या इस वजह से फैल रहा है कोरोना वायरस ? सोशल मीडिया पर ट्रेंड हो रहा #NoMeatNoCoronavirus | Coronavirus no meat no coronavirus trending on Social Media". Patrika News (हिंदी भाषेत). 2020-03-04. 2022-08-06 रोजी पाहिले.
- ^ a b "गीता फोगाट ने ट्वीटर पर दिया ज्ञान, लोगों ने कहा, संत रामपाल की किताब पढ़िए ज्ञान बढ़ेगा!". Jansatta (हिंदी भाषेत). 2017-08-23. 2024-10-19 रोजी पाहिले.
- ^ सामरिया, सुरेंद्र (2020-02-17). "सच्चे संत ही सृष्टि रचना का पूर्ण ज्ञान बताते है: संत रामपाल जी". दैनिक सीमांत रक्षक.
- ^ "All About ParBrahm & Establishment of His Seven Sankh Brahmands - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (इंग्रजी भाषेत). 2024-10-19 रोजी पाहिले.
- ^ "God is in Form According to the Holy Bible - See Proof - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (इंग्रजी भाषेत). 2024-10-19 रोजी पाहिले.
- ^ "How were the Souls Caught in Kaal's (Brahm, Satan, Shaitan, Devil) Trap? - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (इंग्रजी भाषेत). 2024-10-19 रोजी पाहिले.
- ^ "सृष्टी रचना - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (हिंदी भाषेत). 2024-10-19 रोजी पाहिले.
- ^ "नास्त्रेदमस व अन्य भविष्यवक्ताओं की भविष्यवाणियां-नास्त्रेदमस की भविष्यवाणी 2020". S A NEWS (इंग्रजी भाषेत). 2020-01-19. 2021-08-02 रोजी पाहिले.
- ^ "Twitterati Wonder if Nostradamus Had Predicted Indian Self-Styled Saint #Rampal". sputniknews.com (इंग्रजी भाषेत). 2021-06-25 रोजी पाहिले.
- ^ "तुलसीदास महाराज, जय गुरुदेव - इटावा ज़िला यह क्या है |". ww.in.freejournal.info (हिंदी भाषेत). 25 जून 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-25 रोजी पाहिले.
- ^ "रामपाल दास कहता था कि नास्त्रेदमस ने की थी उसके अवतार लेने की भविष्यवाणी". News18 Hindi (हिंदी भाषेत). 2021-06-25 रोजी पाहिले.
- ^ "11 reasons why Saint RampalJi Maharaj is trending Number 1 on Twitter". Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2021-06-25 रोजी पाहिले.
- ^ a b "जेल में हुआ सत्संग, कैदियों को बुराई त्यागने का संकल्प दिलाया". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-03-10. 2022-08-05 रोजी पाहिले.
- ^ "बिना दान दहेज व बैंड बाजे के करवाई 101 जोड़ों की रमेनी". दैनिक भास्कर. 2019-06-18.
- ^ "अनोखी शादी- ना डीजे, ना निमंत्रण, ना दूल्हा चढ़ा घोड़ी, महज 15 मिनट में एक दूसरे के हुए लड़का लड़की". DailyHunt. 2022-08-05 रोजी पाहिले.
- ^ "51 जोड़ों का हुआ दहेज मुक्त आदर्श विवाह". DailyHunt. 2022-08-05 रोजी पाहिले.
- ^ a b "बुराई छोड़ भक्ति का संकल्प लिया". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-02-18. 2022-08-05 रोजी पाहिले.
- ^ कुमारी, पल्लवी (2019-10-17). "सोशल मीडिया में लोगों ने बयां की करवा चौथ की हकीकत,टॉप ट्रेंड में है#reality_of_करवाचौथ". Lokmat news.
- ^ "संत रामपाल दास के भगतो ने ग्राम सिंधुपुरा में मृत्यु भोज पर लगाई रोक।". सीमा संदेश. 2019-07-24.
- ^ Yadav, Sidharth (2019-08-13). "On ID,Twitter War rages over animal sacrifice and rights". The Hindu.
- ^ "नशा,दहेज व जातिवाद भगवान से दूर करने के नुस्खे:संत रामपाल". दैनिक नवज्योति. 2018-04-16.
- ^ ਸਾਂਚ, ਇਕਬਾਲ (2018-05-14). "ਜੇਲ ਚ ਬੰਦ ਰਾਮਪਾਲ ਦੇ ਪੈਰੋਕਾਰਾਂ ਨੇ ਸਿਰਸਾ ਜਿਲੇ ਚ ਆਰੰਭਿਆ ਸਰਗਰਮੀਆਂ।". ਪੰਜਾਬੀ ਟ੍ਰਿਊਨ.
- ^ "पुलिस सेना के घायल जवानों को रक्त की जरूरत पड़ी तो अब एक मिस्ड काल पर मिल सकेंगे हजार डोनर ।". दैनिक भास्कर. 2019-05-26.
- ^ "Rohtak clash: Sant Rampal triggered it". २० जुलै २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Karontha incident". १० जुलै २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Awasthi, Ashwani (2022-12-20). "सतलोक आश्रम मामले में कथित संत रामपाल समेत 24 आरोपित कोर्ट से बरी | Hari Bhoomi". www.haribhoomi.com (हिंदी भाषेत). 2022-12-22 रोजी पाहिले.
- ^ "Sant Rampal acquitted in two criminal cases". २ सप्टेंबर २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "संत रामपाल दो मामलों में बरी, रहेंगे जेल में". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2021-06-25 रोजी पाहिले.
- ^ "सतलोक आश्रम के प्रमुख संत रामपाल दास बरी, लोगों को बंधक बनाने का था आरोप". आज तक (हिंदी भाषेत). 2021-06-25 रोजी पाहिले.
- ^ "Sant Rampal, 14 others sentenced to life for murder of four women".
- ^ "रामपाल कहता था कि नास्त्रेदमस ने की थी उसके अवतार लेने की भविष्यवाणी". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2018-10-17. 2024-10-19 रोजी पाहिले.
- ^ "ड्रग्स एवं कॉस्मेटिक केस में संत रामपाल जी सहित पांच अनुयायी हुए बरी | SA News". S A NEWS (इंग्रजी भाषेत). 2021-07-27. 2021-08-17 रोजी पाहिले.
- ^ "हरियाणाः हिसार कोर्ट ने इस मामले में रामपाल दास समेत 5 को बरी किया, 7 साल पहले हुए थे गिरफ्तार". आज तक (हिंदी भाषेत). 2021-08-17 रोजी पाहिले.
- ^ "कथित संत रामपाल को राहत नहीं, जमानत पर हाई कोर्ट दोबारा करेगा सुनवाई". jagran.com. २४ मार्च २०२४ रोजी पाहिले.