श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६
श्रीलंका क्रिकेट संघाने ८ मे पासून ५ जुलै २०१६ पर्यंत इंग्लंडचा दौरा केला. ह्या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ३-कसोटी सामन्यांनंतर, ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्याचे आयोजन केले गेले होते. त्याशिवाय कसोटी मालिकेअगोदर एसेक्स आणि लीस्टरशायरविरूद्ध प्रथम-श्रेणी सामन्यांचाही समावेश होता. याचबरोबर एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.[१]
पहिले दोन प्रथम श्रेणी सामने अनिर्णित राखल्यानंतर, श्रीलंकेला कसोटी मालिकेत २-० असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आयर्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेने २-० असा विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-० आणि एकमेव टी२० सामना सुद्धा जिंकला.
एप्रिल २०१६, मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने, मालिकेत गुण-पद्धत वापरण्याचा प्रस्ताव ठेवला, आणि दोन्ही संघांनी त्यासाठी सहमती दर्शवली.[२][३] त्यानंतर, गुण पद्धतीला सुपर सिरीज असे नाव दिले गेले आणि ह्या आणि इंग्लंडच्या पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी मान्यता दिली गेली.[४] कसोटी मध्ये विजेत्या संघाला ४ गुण दिले जातील, तर एकदिवसीय आणि टी२० सामन्यासाठी २-गुण दिले जातील. सर्व जमेस धरून चषक दिला जाणार नसला तरी £25,000चे पारितोषिक सर्व खेळाडूंमध्ये विभागुण देण्यात येइल.[४]
इंग्लंड दौरा
संपादनश्रीलंकेचा इंग्लंड दौरा २०१६ | |||||
इंग्लंड | श्रीलंका | ||||
तारीख | १९ मे – ५ जुलै २०१६ | ||||
संघनायक | अलास्टेर कुक (कसोटी) आयॉन मॉर्गन (ए.दि., टी२०) |
अँजेलो मॅथ्यूज | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉनी बेरस्टो (३८७) | कुशल सिल्वा (१९३) | |||
सर्वाधिक बळी | जेम्स अँडरसन (२१) | नुवान प्रदीप (१०) | |||
मालिकावीर | जॉनी बेरस्टो (इं) व कुशल सिल्वा (श्री) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेसन रॉय (३१६) | दिनेश चंदिमल (२६७) | |||
सर्वाधिक बळी | डेव्हिड विली (१०) लियाम प्लंकेट (१०) |
सुरंगा लकमल (५) नुवान प्रदीप (५) | |||
मालिकावीर | जेसन रॉय (इं) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोस बटलर (७३) | दनुष्का गुणतिलके (२६) | |||
सर्वाधिक बळी | लियाम डॉसन (३) | अँजेलो मॅथ्यूज (२) | |||
सुपर सिरीज गुण | |||||
इंग्लंड २०, श्रीलंका ४ |
खेळाडू
संपादनकसोटी | एकदिवसीय सामने | टी-२०इ | |||
---|---|---|---|---|---|
इंग्लंड | श्रीलंका | इंग्लंड | श्रीलंका | इंग्लंड | श्रीलंका |
सराव सामने
संपादनतीन दिवसीयः एसेक्स विरुद्ध श्रीलंकन
संपादनवि
|
||
- नाणेफेक: श्रीलंकन, फलंदाजी
- पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द.
- ॲरन बिअर्डचे (एसेक्स) प्रथम श्रेणी पदार्पण
तीन दिवसीयः लीस्टरशायर विरुद्ध श्रीलंकन
संपादनवि
|
||
- नाणेफेक: श्रीलंकन, फलंदाजी
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, गोलंदाजी.
- १ल्या दिवशी पावसामुळे अवघ्या ५३ षटकांचा खेळ होऊ शकला.
- २ऱ्या दिवशी अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ लवकर संपवण्यात आला.
- ३ऱ्या दिवशी पावसामुळे जेवणाआधी खेळ थांबला आणि १५:३० वाजता पुन्हा सुरू झाला.
- कसोटी पदार्पण: जेम्स विन्स (इं) आणि दासुन शनाका (श्री).
- जेम्स अँडरसनची ४५ धावांत १० बळी ही श्रीलंकेविरूद्ध इंग्लंडच्या गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
- गुण: इंग्लंड - ४, श्रीलंका - ०
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- रंगना हेराथचे ३०० कसोटी बळी पूर्ण.
- जेम्स अँडरसनचे ४५० कसोटी बळी पूर्ण.
- अलास्टेर कुक हा कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा जगातील सर्वात लहान आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज.
- ४थ्या दिवशी दुपारच्या सत्रानंतर पंच अलिम दर यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या जागी रॉड टकर यांनी पंच म्हणून काम पाहिले, ज्यांच्या जागी डेव्हिड मिल्न्स यांनी तिसऱ्या पंचाची कामगिरी पार पाडली.
- गुण: इंग्लंड - ४, श्रीलंका - ०
३री कसोटी
संपादन९–१३ जून २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- ४थ्या दिवशी पावसामुळे खेळ १४:४० वाजता सुरू करण्यात आला तर ५व्या दिवशी फक्त १२.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
- गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - २
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- ख्रिस वोग्सच्या नाबाद ९५ ह्या ८व्या क्रमांकावरील फलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम.
- गुण: इंग्लंड - १, श्रीलंका - १
२रा सामना
संपादनवि
|
||
ॲलेक्स हेल्स १३३* (११०)
|
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- अलेक्स हेल्स आणि जासन रॉय दरम्यान इंग्लंडतर्फे १ल्या तसेच कोणत्याही गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी[५].
- इंग्लंडची श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलीच २०० धावांची भागीदारी.
- १० गडी राखून मिळवलेल्या विजयात ही दुसऱ्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या.[५]
- अलेक्स हेल्स च्या १३३* धावा ह्या इंग्लंडतर्फे श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त वैयक्तिक धावा[६].
- गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- इंग्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबण्यात आला आणि पुढचा खेळ होणे शक्य नसल्याने रद्द करण्यात आला.
- इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा पावसामुळे रद्द करण्यात आलेला पहिलाच एकदिवसीय सामना.
- गुण: इंग्लंड - १, श्रीलंका - १
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- श्रीलंकेच्या डावादरम्यान १८.१ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ४२ षटकांमध्ये ३०८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- जासन रॉय हा इंग्लंडतर्फे दुसऱ्या डावात तसेच ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करणारारा फलंदाज (१६३ धावा).
- एकदिवसीय इतिहासातील इंग्लंडमध्ये यशस्वी पाठलाग केली गेलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या होय.
- गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०.
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: चंमिडा बंदरा (श्री)
- श्रीलंकेतर्फे एकदिवसीय क्रिकेट मध्ये चंमिडा बंदरा हा पदार्पणात सर्वाधिक धावा (८३) देणारा गोलंदाज ठरला.
- गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०
टी-२० मालिका
संपादनएकमेव टी-२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: लियाम डॉसन, टायमल मिल्स (इं) आणि चंमिडा बंदरा, कुशल मेंडीस व नुवान प्रदीप (श्री)
- गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०
आयर्लंड दौरा
संपादनश्रीलंकेचा आयर्लंड दौरा 2016 | |||||
आयर्लंड | श्रीलंका | ||||
तारीख | १६ जून – १८ जून २०१६ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | अँजेलो मॅथ्यूज | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विल्यम पोर्टरफिल्ड (८१) | कुशल परेरा (१६७) | |||
सर्वाधिक बळी | बॅरी मॅककार्थी (४) टिम मुर्तघ (४) |
दासुन शनाका (६) | |||
मालिकावीर | दासुन शनाका (श्री) |
खेळाडू
संपादनएकदिवसीय सामने | |
---|---|
आयर्लंड | श्रीलंका |
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- पावसामुळे आयर्लंडसमोर विजयासाठी ४७ चेंडूंमध्ये २९३ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- एकदिवसीय पदार्पण: बॅरी मॅककार्थी (आ) आणि धनंजय डिसील्वा, कुशल मंडीस, दासुन शनाका (श्री)
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "इसीबीतर्फे २०१६ आंतरराष्ट्रीय उन्हाळी मोसमाच्या तारखांची घोषणा".
- ^ "इसीबी तर्फे गुण-आधारीत पद्धत श्रीलंका मालिकेसाठी वापरण्याचा मुद्दा उपस्थित" (इंग्रजी भाषेत). १७ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान आणि श्रीलंकेची इंग्लंड दौर्यासाठी गुण पद्धतीला सहमती" (इंग्रजी भाषेत). ४ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "इंग्लंड वि श्रीलंका: 'सुपर सिरीज' मध्ये विविध प्रकारच्या क्रिकेटसाठी गुण दिले जाणार" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "हेल्स आणि रॉयच्या विक्रमी भागीदारीने इंग्लंडचा १० गड्यांनी विजय" (इंग्रजी भाषेत).
- ^ "इंग्लंड / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / सर्वात जास्त धावा" (इंग्रजी भाषेत). २५ जून २०१६ रोजी पाहिले.