शीनिंग

चीनमधील एक शहर


शीनिंग (देवनागरी लेखनभेद : लानझोऊ चिनी: 西宁市) ही चीन देशातील पश्चिम भागातील छिंगहाय प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर तिबेटच्या पठारावरील सर्वात मोठे शहर असून ते ह्वांगशुई नदीच्या काठावर वसले आहे. २०२० साली शीनिंग शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख होती.

शीनिंग
西宁市
चीनमधील शहर


शीनिंग is located in चीन
शीनिंग
शीनिंग
शीनिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 36°37′21″N 101°46′49″E / 36.62250°N 101.78028°E / 36.62250; 101.78028

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत छिंगहाय
क्षेत्रफळ ७,५९६ चौ. किमी (२,९३३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,४६४ फूट (२,२७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २४,६७,६९५
  - घनता ३२० /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
अधिकृत संकेतस्थळ

वाहतूक

संपादन

चीनला मध्य आशियासोबत जोडणारे शीनिंग हे एक महत्त्वाचे प्रादेशिक वाहतूककेंद्र आहे. येथून बीजिंग-ल्हासा महामार्ग, ज्यांग्सू-शिंच्यांग महामार्ग असे अनेक देशव्यापी महामार्ग धावतात. लानचौ-उरुम्छी हा १,७७६ किमी लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्ग शीनिंगमधूनच धावतो. तसेच छिंगघाय–तिबेट रेल्वे शीनिंगला तिबेटची राजधानी ल्हासासोबत जोडते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील शीनिंग पर्यटन गाईड (इंग्रजी)