लानचौ (देवनागरी लेखनभेद : लानझोऊ चिनी: 兰州市) ही चीन देशातील वायव्य भागातील कान्सू प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर गोबी वाळवंटाच्या दक्षिण टोकाजवळ पिवळ्या नदीच्याच्या काठावर वसले असून ते मध्य आशियाचे प्रवेशद्वार मानले जाते. २०२० साली लानचौ शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाख होती.

लानचौ
兰州市
चीनमधील शहर


लानचौ is located in चीन
लानचौ
लानचौ
लानचौचे चीनमधील स्थान

गुणक: 36°03′38″N 103°50′0″E / 36.06056°N 103.83333°E / 36.06056; 103.83333

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत कान्सू
क्षेत्रफळ १३,३०० चौ. किमी (५,१०० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,२०० फूट (१,६०० मी)
लोकसंख्या  
  - शहर ४३,५९,४४६
  - घनता ७६० /चौ. किमी (२,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
अधिकृत संकेतस्थळ

प्राचीन इतिहास असलेले लानचौ रेशीम मार्गावरील एक प्रमुख व्यापार केंद्र व हान राजवंशाच्या प्रमुख शहरांपैकी एक होते. इ.स. पाचव्या ते ११व्या शतकांदरम्यान लानचौ बौद्ध धर्मारील अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. इ.स. १२३५ मध्ये हे शहर मंगोल साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. छिंग राजवंशकाळात इ.स. १६५६ साली लानचौ हे शहराचे नाव रूढ झाले. १९३८ सालच्या दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान जपानी साम्राज्य व चीनच्या प्रजासत्ताकादरम्यान अनेक हवाई चकमकी लानचौ परिसरात घडल्या होत्या ज्यामध्ये सोव्हिएत संघाने चीनला हवाई मदत पुरवली.

१९४९ नंतर उद्योगीकरण करणारे लांगचौ हे चीनमधील सर्वात पहिले शहर होते. आजच्या घडीला लानचौ ह्या परिसरामधील सर्वात महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे अनेक पेट्रोलियम तसेच अवजड उद्योग एकवटले आहेत.

वाहतूक

संपादन

चीनला मध्य आशियासोबत जोडणारे लांगचौ हे एक महत्ताचे प्रादेशिक वाहतूककेंद्र आहे. येथून बीजिंग-ल्हासा महामार्ग, ज्यांग्सू-शिंच्यांग महामार्ग असे अनेक देशव्यापी महामार्ग धावतात. शुचौ-झेंगचौ-शीआन-लानचौ-उरुम्छी ह्या ३,४२२ किमी लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्गामुळे लांगचौ येथून चीनमधील अनेक प्रमुख शहरांसाठी जलद रेल्वेसेवा उपलब्ध आहे. लानचौ झोंगच्वान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील लानचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)