शशिकांत धोत्रे

भारतीय चित्रकार


शशिकांत धोत्रे (१ एप्रिल, १९८२:शिरापूर, मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा) हे मराठी चित्रकार आहेत.

शशिकांत धोत्रे
जन्म शशिकांत
१ एप्रिल १९८२
शिरापूर, जिल्हा:सोलापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा चित्रकार
मूळ गाव शिरापूर
वडील वामन धोत्रे
आई रतन धोत्रे
संकेतस्थळ
https://shashikantdhotre.com/

पार्श्वभूमी

संपादन

धोत्रे यांचा जन्म शिरापूर तालुका: मोहोळ, जिल्हा: सोलापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबिका विद्यामंदिर, शिरापूर येथे झाले. त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे आहेत. त्यांचे वडील दगड फोडणे, त्यांना टाके घालणे अशी कामे करत असत. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शशिकांत धोत्रे यांनासुद्धा लहानपणापासून खडी फोडणे, ट्रकमध्ये वाळू भरणे अशी शारीरिक कष्टाची कामे करावी लागली.[] लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. शाळेमध्ये भिंतींवर, फळ्यावर, बाकावर ते चित्रे काढत असत. गावात दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त होणाऱ्या स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळत असे.[]त्यांना कुटुंबातून चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नाही आणि त्यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षणसुद्धा घेतलेले नाही.

मोठेपणी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेणे शक्य आहे, असे कळल्यावर धोत्रे यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि २००३ मध्ये चित्रकला शिकण्यासाठी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. मात्र अर्थार्जनासाठी काम करणे आवश्यक असल्यामुळे तीन महिन्यातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. ॲनिमेशन शिकण्यासाठी ते पुण्यात आले. पण त्या क्षेत्रातील नोकरीत ते रमले नाहीत. नंतर त्यांनी पोर्ट्रेट काढायला सुरुवात केली. कुटुंबाच्या मिळकतीला हातभार लावण्यासाठी ते पोर्ट्रेट काढून विकत असत.

कारकीर्द

संपादन

धोत्रे काळ्या कागदावर रंगीत पेन्सिलीने चित्रे काढतात. ग्रामीण भागातील सण, उत्सव, कौटुंबिक जीवन यांचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रात दिसते. ते वास्तववादी शैलीत चित्रे काढतात. चित्रातील व्यक्तींचा जिवंतपणा, भाव, कपड्यांचे पोत त्यांच्या चित्रात प्रकर्षाने दिसतात.

पुढे मुंबईत येऊन त्यांनी घरातील बेडरूम रंगवण्याची कामे करण्यास सुरुवात केली. []याच दरम्यान २००७ साली मित्राच्या सांगण्यावरून आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या स्पर्धेसाठी त्यांनी एक चित्र पाठवले होते. त्याला पारितोषिक मिळाले. [] तसेच हे चित्र अठरा हजार रुपयांना विकलेसुद्धा गेले. त्यांच्या आयुष्यातील हे महत्त्वाचे वळण ठरले. त्यानंतर त्यांनी काढलेल्या चित्रांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळाली. आता चित्रांच्या बरोबरच ते शिल्पे, मांडणी शिल्पेसुद्धा (इन्स्टॉलेशन्स) करतात. त्यांची चित्रे भारतासह इंग्लंड, अमेरिका, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इ. देशांमध्ये विकली गेली आहेत. शिरापूर गावातच त्यांचा स्टुडीओ आहे. आता चित्रांच्या बरोबरच ते शिल्पे, मांडणी शिल्पेसुद्धा (इन्स्टॉलेशन्स) करतात.

पारितोषिके

संपादन
  • आर्ट सोसायटी ऑफ इंडिया – २००७
  • बॉम्बे आर्ट्स सोसायटी पारितोषिक – प्रथम क्रमांक – २००९
  • आशादीप पुरस्कार, महाराष्ट्र २०१०[]
  • इंडिया आर्ट फेस्टिवल पारितोषिक – प्रथम क्रमांक २०११
  • राज्य कला प्रदर्शन पारितोषिक – २०१३
  • महाराष्ट्राचा कोहिनूर पुरस्कार – २०१५
  • लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार – २०१६
  • राजा रविवर्मा चित्रकार सन्मान २०१७
  • एबीपी माझा सन्मान पुरस्कार २०१९

प्रदर्शने

संपादन

एकल प्रदर्शने

संपादन
  • २०१८ -“सरमाउंटिंग द मर्क” मेटा कंटेम्पररी, नवी मुंबई
  • २०१५ -“जागर” महाराष्ट्र राज्यातील विविध गावांमध्ये फिरते प्रदर्शन[]
  • २०१५ – जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई[]
  • २०१३ – इंडिया आर्ट फेस्टिव्हल, मुंबई
  • २०१२ – जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
  • २०१२ – इंडिया आर्ट फेस्टिव्हल, मुंबई
  • २०११ – इंडिया आर्ट फेस्टिव्हल, मुंबई
  • २०१० - तुलिका आर्ट गॅलरी, मुंबई[]

गट प्रदर्शने

संपादन

गट प्रदर्शने

  • २०१८ – ‘आऊटसायडर’ झिरो एट २१ क्लर्क हाऊस इनिशिएटीव्ह, म्हैसूर यांच्या सहयोगाने
  • २०१८ – स्टुडिओ ब्लॅक ट्युलिप, नवी मुंबई[]
  • २०१८ – वर्ल्ड आर्ट दुबई, दुबई
  • २०१८ – ‘विश्वरूप – द फॉर्म ऑफ युनिव्हर्स' जॉनी एम.एल. यांनी क्युरेट केलेले प्रदर्शन, कोलकाता
  • २०१७ – एनजीएमए, मुंबई
  • २०१३ – गॅलरी वन, फ्लोरेन्स, इटली
  • २०१० – ताज विवांता, बेंगलोर, सोमा दास यांनी क्युरेट केलेले प्रदर्शन

संदर्भ

संपादन
  1. ^ Mar 14, TNN | Updated:; 2015; Ist, 1:30. "From the quarry to the art world | Pune News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-12-05 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "अफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे | थिंक महाराष्ट्र!". www.thinkmaharashtra.com. 2019-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-05 रोजी पाहिले.
  3. ^ "अफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे | थिंक महाराष्ट्र!". www.thinkmaharashtra.com. 2019-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-05 रोजी पाहिले.
  4. ^ rajesh. "गावाकडे नेणारी चित्रं |" (इंग्रजी भाषेत). 2019-12-05 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "मुलींना पालकांनी आत्मविश्वास द्यावा". Maharashtra Times. 2019-12-05 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "लोककलेचा दिसला 'जागर' सलग चौथ्या दिवशी चित्र पाहण्यासाठी रांग". Divya Marathi. 2019-12-05 रोजी पाहिले.
  7. ^ "Realistic art at its best - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-12-05 रोजी पाहिले.
  8. ^ "Tulika Arts Gallery :: Artist Room :: Indian Painting Gallery, Artists, Buy Paintings Online, Collectors Paintings, Read about Indian Art >> Shashikant Dhotre". www.tulikaartsgallery.com. 2019-12-05 रोजी पाहिले.
  9. ^ "SHASHIKANT DHOTRE". Studioblacktulip.com (इंग्रजी भाषेत). 2019-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-05 रोजी पाहिले.