वॉटर्लूची लढाई
वॉटर्लूच्या लढाईवरील चित्र
वॉटर्लूच्या लढाईवरील चित्र
दिनांक १८ जून इ.स.१८१५
स्थान वॉटर्लू, बेल्जियम
परिणती ७ व्या युतीचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष
फ्रान्स फ्रान्सचे साम्राज्य सातवा संघ:
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
प्रशियाचे राजतंत्र प्रशियाचे राजतंत्र
नेदरलँड्स नेदरलँड
साचा:देश माहिती Hanover हॅनोव्हर
नासाऊ
ब्राउनश्वाइग
सेनापती
फ्रान्स नेपोलियन बोनापार्ट,
फ्रान्स मिशेल ने
=युनायटेड किंग्डम आर्थर वेलेस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टन,
प्रशियाचे राजतंत्र गेबहार्ड फॉन ब्ल्युचर
सैन्यबळ
७२,००० ६८,००० ब्रिटिश व मित्रपक्ष
५०,००० प्रशियन
बळी आणि नुकसान
२५,००० ठार व जखमी
७,००० युद्धबंदी
१५,००० बेपत्ता
२२,००० ठार व जखमी

वॉटर्लूची लढाई ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील वॉटर्लू येथे (वर्तमान बेल्जियम) झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या सैन्याने फ्रेंच सम्राट नेपोलियन याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच साम्राज्याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला.

पार्श्वभूमी

संपादन

१८१५ मध्ये नेपोलियन एल्बा येथुन नजरकैदेतून सुटून पुन्हा पॅरिसला आला व आपले साम्राज्य पुनःप्रस्थापित करण्याच्या उद्योगाला लागला. त्याने आपले मोठे सैन्य पुन्हा एकत्र केले व आपल्या जुन्या शत्रुंविरुद्ध आघाडी उघडली. हॉलंड, प्रशिया, बेल्जियमयुनायटेड किंग्डम यांनी देखिल प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्व जनरल आर्थर वेलस्ली कडे देण्यात आले. व १८ जून १८१५ रोजी वॉटर्लु येथे दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या.

वेलस्लीने पारंपारिक व्यूहरचना केलेली होती. आसपासच्या प्रदेशाची टेहळणी करून त्याने आपल्या सैन्याचा मुक्काम हा एका टेकडीच्या उतारावर ठोकला. तेथून त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व लढण्यास भाग पाडले. नेपोलियनला या व्यूहातील आपला गैरफायदा माहिती होता परंतु अधिक वेळ काढला असता मागून चालून येणारे प्रशियन सैन्य व ब्रिटिश या दोघांशी लढणे अधिकच कठीण गेले असते. असे असता त्याने वेलस्लीवर चाल केली. सुरुवातीला वेलस्लीने बचावाचे घोरण स्वीकारले व पर्शियन सैन्य येईपर्यंत वेळकाढूपणा अवलंबला. दरम्यान फ्रेंच सैन्याच्या अनेक चाली ब्रिटिश सैन्याने परतवून लावल्या. सरतेशेवटी नेपोलियनने आपले इंपिरियल गार्ड ब्रिटिशांवर घातले परंतु ते देखील फसले. नेपोलियनने आपली सगळी हुकमी पाने वापरलेली पाहून वेलेस्लीने आता आपले सैन्य आक्रमक पवित्र्यात आणले व तो फ्रेंचांवर चाल करून गेला. काही वेळातच फ्रेंच सैन्याला पराभव स्पष्ट होऊ लागला व त्यांनी तेथून काढता पाय घेण्यास सुरू केले.