वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये विस्डेन ट्रॉफीसाठी तीन-कसोटी आणि त्याशिवाय एक ट्वेंटी१० आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.[१][२][३]
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १ ऑगस्ट – २९ सप्टेंबर २०१७ | ||||
संघनायक | ज्यो रूट(कसोटी) आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०) |
जेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.) कार्लोस ब्रेथवेट(टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अलास्टेर कुक (३०४) | शाई होप (३७५) | |||
सर्वाधिक बळी | जेम्स अँडरसन (१९) | केमार रोच (११) | |||
मालिकावीर | जेम्स अँडरसन (इं) आणि शाई होप (वे) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉनी बेरस्टो (३०२) | इव्हिन लुईस (२००) | |||
सर्वाधिक बळी | लियाम प्लंकेट (८) | अल्झारी जोसेफ (५) | |||
मालिकावीर | मोईन अली (इं) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲलेक्स हेल्स (४३) | इव्हिन लुईस (५१) | |||
सर्वाधिक बळी | लियाम प्लंकेट (३) आदिल रशीद (३) |
कार्लोस ब्रेथवेट (३) केस्रिक विल्यम्स (३) |
कसोटी मालिकेआधी, वेस्ट इंडीजचे डर्बीशायर, एसेक्स आणि केंट विरुद्ध प्रथम श्रेणी सराव सामने खेळवण्यात आले. तसेच लीस्टरशायर संघाला २०१७ नॅटवेस्ट टी२० ब्लास्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान न मिळाल्याने, लीस्टरशायर आणि वेस्ट इंडीज दरम्यान दोन दिवसीय सामना खेळवण्यात आला.[४]
ऑक्टोबर २०१६ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पुष्टी दिली की एजबॅस्टन येथील पहिली कसोटी दिवस/रात्र म्हणून खेळली जाईल.[५] ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, "आम्ही आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी उत्साहित आहोत".[६] एजबस्टन कसोटी सामन्यानंतर वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलास्टेर कुक आणि नील स्नोबॉल यांनी सांगितले की, इंग्लडमध्ये आणखी एक दिवस / रात्र कसोटी आयोजित करण्याच्या बाबतीत "ज्यूरी विचार करत आहेत".[७][८] ईसीबीने ह्याकडे यश म्हणून पाहिले आणि म्हणून दर वर्षी एक दिवस / रात्र कसोटी ठेवण्याची एक शक्यता व्यक्त केली.[९] इंग्लंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली, ज्यात जेम्स अँडरसनने तिसऱ्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील ५०० बळी पूर्ण केले.[१०]
वेस्ट इंडीजने एकमेव टी२० सामना २१ धावांनी जिंकला.[११] पहिल्या एकदिवसीय सामन्यात, इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला, त्यामुळे वेस्ट इंडीजला क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेत थेट प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आणि आता त्यांना पात्रतेसाठी २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता लढणे भाग पडले.[१२] तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ब्रिस्टल येथे बेन स्टोक्सला अटक झाल्याने इंग्लंडच्या चवथ्या एकदिवसीय सामन्याच्या तयारीत अडथळा आला.[१३] ह्या घटने नंतर स्टोक्स आणि अॅलेक्स हेल्स दोघांनाही इसीबीने निलंबीत केले, म्हणजेच पुढील सुचनेपर्यंत त्यांना खेळण्यास मज्जाव करण्यात आला.[१४][१५] ह्यानंतरही, इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली.[१६]
संघ
संपादनकसोटी | ए.दि. | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
इंग्लंड[१७] | वेस्ट इंडीज[१८] | इंग्लंड[१९] | वेस्ट इंडीज[२०] | इंग्लंड[१९] | वेस्ट इंडीज[२१] |
दौरा सामने
संपादनप्रथम श्रेणी: एसेक्स वि वेस्ट इंडीज
संपादन१–३ ऑगस्ट २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: एसेक्स, गोलंदाजी.
- दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणा दरम्यान आलेल्या पावसामुळे नंतर खेळ होऊ शकला नाही.
प्रथम श्रेणी: केंट वि वेस्ट इंडीज
संपादन
प्रथम श्रेणी: डर्बीशायर वि वेस्ट इंडीज
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- प्रथम श्रेणी पदार्पण: कॅलम ब्रॉड्रिक, मॅथ्यू सन्कझॅक आणि जेम्स टेलर (डर्बीशायर).
दोन-दिवसीयः लीस्टरशायर वि वेस्ट इंडीज
संपादन२–३ सप्टेंबर २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे २ऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळ होऊ शकला नाही.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: मार्क स्टोनमॅन (इं) आणि काईल होप (वे).
- इंग्लंडमधील हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना.[२२]
- तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचे १९ खेळाडू बाद झाले. कसोटीच्या एकाच दिवशी वेस्ट इंडीजचे १९ फलंदाज बाद होण्याची ही पहिलीच वेळ.[२३]
- वेस्ट इंडीच्या दुसऱ्या डावात शेन डाउरिचला बाद करून स्टुअर्ट ब्रॉडने ३८४ बळींसह इयान बॉथमचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी गडी बाद करण्याचा विक्रम मोडला[२४]
२री कसोटी
संपादन२५–२९ ऑगस्ट २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ज्यो रूटची (इं) ए.बी. डी व्हिलियर्स (द) च्या सलग १२ कसोटी अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी.[२५]
- शाई होपचे (वे) पहिले कसोटी शतक.[२६]
- शाई होपच्या एकाच कसोटीत दोन शतके केली. ह्या मैदानावरील प्रथम श्रेणी सामन्यात असे पहिल्यांदाच घडले.[२७]
- २००० सालानंतर हा वेस्ट इंडीजचा इंग्लंडमधील पहिलाच विजय.[२८]
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- १ल्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे ११ षटकांचा तर दुसऱ्या दिवशी ओल्या मैदानामुळे २५ षटकांचा खेळ होऊ शकलाम नाही.
- कसोटी मध्ये ५०० बळी घेणारा जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा १ला आणि जगातील ६वा गोलंदाज.[२९]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादनएकमेव टी२०
संपादनवि
|
||
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादन
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
अॅलेक्स हेल्स १०* (१७)
|
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- पावसामुळे इंग्लंडच्या डावा दरम्यान पावसामुळे थांबवला गेला आणि पुढे खेळ होवू शकला नाही.
३रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- मोईन अलीने (इं) इंग्लंडमधील सर्वात जलद आणि इंग्लिश फलंदाजातर्फे दुसरे सर्वात जलद शतक झळकावले (५३ चेंडू).[३२]
- लियाम प्लंकेटचे (इं) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[३३]
- ह्या सामन्यात इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम झाला (२८).[३४]
४था एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- अल्झारी जोसेफचे (वे) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[३५]
- वेस्ट इंडीजची ३५६/५ ही धावसंख्या, इंग्लंड विरुद्ध सर्वात मोठी तर कोणत्याही संघाविरुद्ध चवथी सर्वात मोठी धावसंख्या.[३६]
५वा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: टॉम कुर्रान (इं) आणि सुनील अंब्रिस (वे).
- जेसन मोहम्मदचा (वे) वेस्ट इंडीजचा कर्णधार म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.[३७]
- जॉनी बेरस्टो ने नाबाद १४१ धावा करून वेस्ट इंडीजविरुद्ध इंग्लंड फलंदाजातर्फे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा मार्कस ट्रेस्कोथिकचा १३० धावांचा विक्रम मोडला.[१६]
- एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात कमी डावात ४००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूट चवथ्या स्थानावर (९१ डाव).[१६]
संदर्भ आणि नोंदी
संपादन
- ^ "दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचा प्रदीर्घ इंग्लंड मोसम जाहीर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड २०१७ सामने जाहीर". ECB (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड २०१७: चॅम्पियन्स ट्रॉफी, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "२०१७ मोसमातील दौरे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एजबॅस्टनवर इंग्लंड-वेस्ट इंडीज दरम्यान दिवस-रात्र कसोटी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एजबॅस्टन: ऑगस्ट २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदरम्यान दिवस-रात्र कसोटी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "प्रोत्साहन देणार्या एजबस्टनच्या गर्दीकडून दिवस-रात्र कसोटी क्रिकेटला भविष्यातही स्थान असण्याचे सुचित". इव्हिनिंग स्टँडर्ड (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "'ज्यूरी स्टील आऊट' डीस्पाईट डे-नाईट सक्सेस". द टाइम्स (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इसीबी कन्सीडर्ड अॅन्यूअल डे-नाईट टेस्ट आफ्टर एजबॅस्टन सक्सेस". द टेलिग्राफ (इंग्रजी भाषेत). २४ ऑगस्ट २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: जेम्स अँडरसन हॉल सिल्स सिरिज विन". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गेल अँड लुईस सेट द अजेंडा अॅज वेस्ट इंडीज आऊटमसल इंग्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बेन स्टोक्स: ब्रिस्टल नाईटक्लब घटनेनंतर इंग्लिश क्रिकेटपटूला अटक" (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "स्टोक्स, हेल्स सस्पेंडेड आफ्टर व्हिडीओ फुटेज एमर्ज्स ऑफ ब्रिस्टल स्ट्रीट ब्राउल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ब्रिस्टल घटनेनंतर इंग्लंडने बेन स्टोक्स आणि अॅलेक्स हेल्सला वगळले". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: जॉनी बेरस्टो आणि जेसन रॉयच्या कामगिरीच्या जोरावर यजमानांचा मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजविरुद्ध इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड दौर्यासाठी रोचचे पुनरागमन, रेफरची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "वेस्ट इंडीजविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर" (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गेल, सॅम्युएल्सचे एकदिवसीय संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध टी२० साठी नर्सची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुलाबी चेंडूने खेळण्यासाठी इंग्लंड सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजचा खराब दिवस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ शेमिल्ट, स्टीफन. "कसोटी बळींचा मैलाचा दगड पार केल्यानंतर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची २०१९ अॅशेस मध्ये खेळण्याची इच्छा" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ सीर्वी, भारत. "रूटची डी व्हिलियर्स आणि गॅब्रिएल रोचच्या डबल अक्टशी बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ हेन्री, मॅथ्यू. "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: क्रेग ब्रेथवेट आणि शाई होपचे हेडींग्लेमध्ये वर्चस्व" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ स्केल्टन, जॅक. "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: शाई होपचे पाहुण्यांना थरारक कसोटीविजयात मार्गदर्शन" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजने २००० नंतर इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजय खेचून आणला". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ गार्डनर, अॅलन. "अँडरसन जॉइन्स ५०० क्लब अॅट सीन ऑफ टेस्ट डेब्यू" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गेल अँड लुईस सेट द अजेंडा अॅज वेस्ट इंडीज आऊटमसल इंग्लंड" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बेरस्टोच्या पहिल्यावहिल्या शतकामुळे वेस्टइंडीजला विश्वचषक पात्रताफेरीत खेळणे भाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मोईन्स मेहेम: १० चेंडूत ४८ धावा आणि १४ मध्ये ८ षटकार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मोईनच्या ५३ चेंडूतील फटकेबाजीने इंग्लंडचा दणदणीत विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ब्रिस्टलमधील विजयात मोईन अलीचे ५३-चेंडूत शतक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लुईस, जोसेफ डिनाईड बाय इंग्लंड्स लेट डीएसएल डॅश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इव्हिन लुईसच्या १७६ धावांनंतर मोईन अलीची विजयी खेळी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). 2013-12-11 रोजी मूळ पान Check
|दुवा=
value (सहाय्य) पासून संग्रहित. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. - ^ "होल्डर शेवटच्या एकदिवसीय सामन्याला मुकणार, जेसन मोहम्मद पहिल्यांदाच नेतृत्व करणार" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
संपादन