थोरला पिट
(विल्यम पिट या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्यम पिट, चॅटहॅमचा पहिला अर्ल (इंग्लिश: William Pitt, 1st Earl of Chatham; नोव्हेंबर १५, इ.स. १७०८ - मे ११, इ.स. १७७८) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विल्यम पिट(थोरला) | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ३० जुलै १७६६ – १४ ऑक्टोबर १७६८ | |
राजा | तिसरा जॉर्ज |
---|---|
मागील | चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ |
पुढील | ऑगस्टस फिट्झरॉय |
जन्म | १५ नोव्हेंबर, १७०८ लंडन |
मृत्यू | ११ मे, १७७८ (वय ६९) केंट |
सही |
या विल्यम पिटने फ्रेंच व इंडियन युद्धादरम्यान परराष्ट्रसचिवपदावर असताना कीर्ती मिळवली.अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहराला याचे नाव आहे. याशिवाय न्यू हॅम्पशायरमधील पिट्सबर्ग व व्हर्जिनियातील पिट्सिल्व्हेनिया काउंटीलाही याचेच नाव आहे. चॅटहॅमचा पहिला अर्ल असल्याने ते नाव न्यू जर्सीतील चॅटहॅम गावाला व चॅटहॅम विद्यापीठाला देण्यात आले.
या विल्यम पिटच्या मुलाचे नावही विल्यम पिट होते व तोही युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता, म्हणून वडिलांना थोरला पिट तर मुलास धाकटा पिट म्हणतात.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत