ऑगस्टस फिट्झरॉय
ऑगस्टस फिट्झरॉय, ग्राफ्टनचा तिसरा ड्यूक (इंग्लिश: Augustus FitzRoy, 3rd Duke of Grafton; २८ सप्टेंबर, इ.स. १७३५ - १४ मार्च, इ.स. १८११) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. वयाच्या ३३व्या वर्षी पंतप्रधानपद मिळालेला फिट्झरॉय हा त्या काळी सर्वात तरुण पंतप्रधान होता. परंतु ग्रेट ब्रिटनचे वाढते जागतिक सामर्थ्य सांभाळण्याची जबाबदारी त्याला पेलवली नाही व केवळ सव्वा वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर त्याने हे पद सोडले.
ऑगस्टस फिट्झरॉय | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १४ ऑक्टोबर १७६८ – २८ जानेवारी १७७० | |
राजा | जॉर्ज तिसरा |
---|---|
मागील | विल्यम पिट, थोरला |
पुढील | फ्रेडरिक नॉर्थ |
जन्म | २८ सप्टेंबर, १७३५ |
मृत्यू | १४ मार्च, १८११ (वय ७५) युस्टन हॉल, सफोक, इंग्लंड |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत