विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका

(विद्युत वर्गाच्या नौका या पानावरून पुनर्निर्देशित)
विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका (mr)

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका भारतीय आरमाराच्या लढाऊ नौका होत्या. या प्रकारच्या नौका सोव्हिएत युनियनच्या ओसा १ प्रकारच्या नौकांची सुधारित आवृत्ती होती.

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारताकडे अशा एकूण आठ नौका होत्या. जानेवारी १९७१ ते एप्रिल १९७१ दरम्यान या नौका सेवेत दाखल झाल्या. यांपैकी शेवटची नौका आयएनएस विजेता ३ जून, १९९२ रोजी निवृत्त झाली. या आठही नौका भारतीय आरमाराच्या २५व्या घातक क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे भाग होत्या.

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील ऑपरेशन ट्रायडेंट या मोहीमेत यांपैकी तीन नौकांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. आयएनएस वीर, आयएनएस निर्घात आणि आयएनएस निपात या नौकांनी पाकिस्तानी आरमाराच्या विनाशिका आणि सुरूंग पेरणाऱ्या नौका बुडविल्या तसेच पाकिस्तानला रसद नेणारे व्यापारी जहाजही बुडवले होते.

या वर्गातील नौका

संपादन
नाव ध्वज सेवेत दाखल निवृत्त नोंदी
वीर K82 २ एप्रिल, १९७१ ३१ डिसेंबर, १९८२
विद्युत K83 १६ फेब्रुवारी, १९७१ ३१ मार्च, १९९१
विजेता K84 २७ मार्च, १९७१ ३० जून, १९९२
विनाश K85 २० जानेवारी, १९७१ १५ जानेवारी, १९९०
निपात K86 २६ एप्रिल, १९७१ २९ फेब्रुवारी, १९८८
नाशक K87 १९ मार्च, १९७१ ३१ डिसेंबर, १९९०
निर्भिक K88 २० फेब्रुवारी, १९७१ ३१ डिसेंबर, १९८६
निर्घात K89 २९ जानेवारी, १९७१ ३१ जुलै, १९८९