आयएनएस निर्घात (के८९)
आयएनएस निर्घात (के८९) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २९ जानेवारी, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व ३१ जुलै, १९८९ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.
A Vidyut class missile boat of the Indian Navy | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | जहाज | ||
---|---|---|---|
चालक कंपनी | |||
| |||
हा लेख भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आयएनएस निर्घात (के४४).
ऑपरेशन ट्रायडेंट संपादन
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात निर्घातने मोठी भूमिका पार पाडली होती. ऑपरेशन ट्रायडेंट या कराची बंदराच्या वेढ्यात निर्घात शामिल होती. त्यावेळी पाकिस्तानी लढाऊ नौकांच्या तांड्याशी दोन हात करीत असताना निर्घातने दोन एसएस-एन-२ स्टिक्स प्रक्षेपास्त्रे पाकिस्तानच्या पीएनएस खैबर या विनाशिकेवर सोडले व खैबर बुडविली. या कामगिरीसाठी निर्घातवरील लेफ्टनंट कमांडर इंदरजीत शर्मा (मुख्याधिकारी) आणि मास्टर चीफ पेटी ऑफिसर एम.एल. संगल यांना वीर चक्र देण्यात आले होते.