विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २

२५ फेब्रुवारी (शनिवार) व २६ फेब्रुवारी (रविवार), इ.स. २०१२ रोजी झालेल्या दुसर्‍या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.

वेळ व ठिकाण

संपादन

वेळ : शनिवार, २५ फेब्रुवारी, इ.स २०१२ व रविवार, २६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ - स्थानिक कालविभागांनुसार पूर्ण दोन दिवस
ठिकाण : मराठी विकिपीडिया
औचित्य : मराठी भाषा दिवस

म्हणजे काय ?

संपादन

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो. २५ फेब्रुवारी (शनिवार) व २६ फेब्रुवारी (रविवार), इ.स. २०१२ रोजी होणार्‍या संपादनेथॉनेत खाली नोंदवलेल्या रूपरेषांनुसार नियोजित उद्दिष्टांसाठी संपादने करणे अपेक्षित आहे (अर्थात तसे बंधन पाळता, मनपसंत विषयांवर अथवा व्यक्तिगत प्राधान्यांनुसार संपादने करण्यास कोणतीही आडकाठी नाही).

पूर्वतयारी

संपादन

या संपादनेथॉनेस विशेष पूर्वतयारीची आवश्यकता नाही. मराठी विकिपीडिया अ‍ॅक्सेस करू शकणार्‍या कोणत्याही संगणकावरून सदस्यांना या संपादनेथॉनेत सहभाग घेता येईल.

उद्दिष्टे

संपादन

या संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :

  • मराठी विकिपीडियन सदस्यांनी एका दिवसात शक्य तितकी संपादने करायची व यातून एका दिवसात आपण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीला आपल्या सर्व ताकदीनिशी शक्य तितका मोठ्ठा रेटा द्यायचा हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • मराठी विकिपीडियनांनी पूर्ण ताकदीनिशी संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.
  • या संपादनेथॉनेच्या औचित्याने विविध ऑनलाइन (फेसबूक, ट्विटर, ब्लॉग/अनुदिनी, इ) व छापील माध्यमांमधून (वृत्तपत्रे, नियतकालिके इ.) या कार्यक्रमाचे वार्तांकन घडवून आणून मराठी विकिपीडिया प्रकल्पाची जाहिरात करणे.

नियोजित रूपरेषा

संपादन

या संपादनेथॉनेत राबवण्यासाठी कृतिआराखड्यांचे प्रस्ताव सदस्यांनी खाली मांडावेत. सुचवलेल्या आराखड्यानुसार संपादने करण्याशिवाय मनपसंत विषयांवर अथवा व्यक्तिगत प्राधान्यांनुसार संपादने करण्यास अर्थातच कोणतीही आडकाठी असणार नाही.

(!-- याच उपविभागात येथून खाली प्रस्तावित कॄतिआराखडे मांडावेत. --)

भीमपिडियाला टाळता ?

संपादन

जयभीम, संकल्प द्रविड तुम्ही धोका घडी केली आहे. तुम्ही एकीकडे माझ्या चर्चा पानावर बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी आपणास आस्था असल्याचे गोड गोड बोलता आणि भीमपिडियाला टाळता ? येथील कार्यक्रम हे आपल्या पूर्वनियोजित मर्जी प्रमाणे आपण करीत आहात. सदस्यांच्या मर्जीचा आपण विचार केलेला नाही. आनंदरावांनी म्हटल्या प्रमाणे आपण आणि अभय नातू ह्यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच नैतिक अधिकार नाही. आपण लोक राजकारणच खेळत आहात यात वाद नाही. Meshram १८:५२, २३ जानेवारी २०१२ (UTC)


मराठी नाटक, मराठी नाटकाचा इतिहास, मराठी रंगभूमी.....

संपादन

अमोल पालेकर यांनी मराठी नाटक आणि सबंधित कोणतेही लिखाण विकिपिडीयावर नाही असे भाषणात जाहीर करून सर्व पत्रकार मंडळींना "बातमी" दिली आहे. या संदर्भात "संपादनेथॉन" च्या निमित्ताने मराठी भाषा दिवसा पर्यंत आणि विशेषत: त्या २ दिवसात आपण काम करायला हवे असे वाटते. यासाठी पुढील गोष्टी करता येतील.

  1. मराठी नाटक, मराठी नाटकाचा इतिहास, मराठी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, अनेक रंगकर्मी अशा अनेकविध विषय तयार करून त्यावर मराठी विपी वर विपुल लिखाण करता येईल.
  2. विविध नवीन साचे आणि वर्ग बनवायला लागतील.
  3. विविध लायब्ररी मधील पुस्तके धुंडाळून त्यातील योग्य मजकूर संदर्भ सहित आंत येईल.
  4. माजी संमेलनांचे फोटो मिळवून ते लेखात चढवणे

या बाबत आपली मते कळवावीत त्याप्रमाणे प्रोजेक्ट करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्य सिद्धीस नेता येईल. J यांनी यावर त्यांच्याकडून आजच काम सुरु केलेले दिसले..... ठळक मजकूर

सहभाग

संपादन

संपादनेथॉनात सहभागी होऊ इच्छिणारे सदस्य त्यांच्या सहभागाची घोषणा करण्यासाठी येथे टोकन नोंदणी करू शकतात. अर्थात येथे नोंदणी करणे संपादनेथॉनातील सहभागासाठी अजिबात आवश्यक नाही. सहभागी सदस्यांना एकमेकांसोबत समन्वयाने काम करणे सुकर करणे, एवढाच या नोंदणीचा हेतू आहे.

सहभागी होणार

संपादन
  • सचिन : नवीन लेख बनवणे, लेखांमध्ये जमेल तशी भर घालणे !
  • सदस्य:Mvkulkarni23 : नवीन लेख बनवणे, लेखांमध्ये जमेल तशी भर घालणे
  • महत्वाचे लेख तसेच इतरही लेख तयार करणे
  • असलेले लेख वाढवणे
  • उपस्थित असलेल्या सदस्यांना लागेल तसे मार्गदर्शन करणे व त्यांच्या समस्या सोडवणे
  • प्रचालकीय व प्रशासकीय मदत करणे
  • सांख्यिकी गोळा करणे आणि प्रकाशित करणे.

उत्सुक, मात्र सहभागाची हमी नाही

संपादन

मराठीतून लिहिता येत नाही, पण इतर मदत करु शकेन

संपादन

बिगर-मराठी विकिपीडियांवरील मित्रांनी येथे आपल्या प्रकल्पासह आपले नाव (उदा-इंग्लिश विकिपीडिया - en:User Talk:अमुकतमुकआडनावे) लिहावे.

Can not read/write Marathi, but will offer technical/other help

संपादन

Add your User name, including your home project, e.g. en:User Talk:MyNameIsAnthonyGonsalves

हेही पाहा

संपादन