विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ५
जुलै ५: अल्जीरिया व केप व्हर्दे देशांचा स्वातंत्र्यदिवस
- १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९५० - इस्रायलच्या क्नेसेटने एका कायद्याद्वारे जगातील सर्व ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये स्थायिक होण्याचा व नागरिकत्व मिळवण्याचा हक्क दिला.
- १९७७ - पाकिस्तानचा लष्करप्रमुख मोहम्मद झिया उल-हकने एका लष्करी बंडामध्ये पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टोची राजवट उलथवून लावली.
- १९८० - १९८० सालच्या विंबल्डन स्पर्धेत विजय मिळवून ब्यॉन बोर्ग ही स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकणारा पहिलाच टेनिसपटू ठरला.
जन्म:
- १८८२ - इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १९४६ - राम विलास पासवान, राजकारणी.