विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २७
एर इंडिया की एअर इंडिया
संपादनएअर इंडियाच्या लोगोवर एअर इंडिया असाच उल्लेख असताना येथे "एर इंडिया" असा प्रयोग का? शब्द उच्चारताना देखील एअर असाच उच्चारला जातो, एर असा नव्हे.
- लोगोवरील उल्लेख हिंदीमध्ये आहे. इंग्लिश/इतर भाषेतील शब्दांचे मराठीत रुपांतर करताना हिंदी व मराठीत वेगळेपण आहे.
- air शब्दाचा उच्चार एअर न होता दीर्घ ए वापरून एर असा होतो. कानडी लिपीत असा दीर्घ ए (तसेच दीर्घ ओ) आहे. देवनागरीत नाही.
- अभय नातू १९:३८, ३ जून २०१० (UTC)
तमिळ चित्रपट नावातील हलंत शब्द
संपादनमराठीत हलंत शब्द लिहू नये असा नियम आहे. इतर भाषेतील शब्दांना हा नियम लागू होतो का? तमिळ भाषेतील अनेक चित्रपटांची नावे हलंत असल्याचे दिसते. त्यांबद्दलच्या लेखांची शीर्षके तशीच ठेवावी कि शब्दांती पूर्ण व्यंजने करावी?
अभय नातू १९:४७, ३ जून २०१० (UTC)
होय काही हरकत नाही,निदान लेखाचा शोध घेतांना शिर्षक पूर्ण व्यंजनातच असलेले बरे,लेखात नंतर योग्य उल्लेख होईलच,खरतरं हलंत व्यंजनांचा उच्चारादरम्यान स्थानिकांकडून विशेष उल्लेख होतांना दिसत नाही असा माझा अनुभव आहे.इथे एक गोष्ट आवर्जुन उल्लेख कराविशी वाटते ती म्हणजे अगदी प्राचीन काळापासून लेखी व बोली तमिळ मध्ये भिन्नता जपण्यात आली आहे,तसे त्यांचे व्याकरणाचे नियमही आहेत.त्यामुळे लेखी तमिळचे बोली भाषेशी साधर्म्य असेलच असे नाही.तेव्हा सद्य परिस्थितीत शब्द जशेच्या तसे लिहून त्यांचा उच्चार लेखात नमूद करु.Pra.K. ०३:०२, ४ जून २०१० (UTC)
- चर्चेकरिता संदर्भ
शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ प्रमाणे :
- 'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.
- उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित,अर्थात,अकस्मात,विद्वान,'
- कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
- उदाहरणार्थ : 'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस.
- इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.
- उदाहरणार्थ :'एम.ए. , पीएच.डी., अमेरिकन,वॉशिंग्टन .
संदर्भ: शुद्धलेखनाचे नियम#नियम १.४
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
- उदाहरणार्थ:
- वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
- देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.
- लिहिण्याच्या पद्धतीमुळे अर्थात महत्वपूर्ण (अर्थाचा अनर्थ होण्या इतपत) तरच शुद्धलेखनाचे नियम#नियम १.४ पर-सवर्णा सहीत लवचीकता दाखवताना आढळतो. अशीच लवचिकता तत्वतः हलंतांच्या बाबतीत स्विकारण्यास हरकत नाही पण परकीय भाषेवर संपूर्ण प्रभूत्व असलेल्या व्यक्तींची उपलब्धता आपणास होण्याची शक्यता कमी असल्यामुळे गोची होऊ शकते. जाणीवपूर्वक हलंत लिहिणार्या व्यक्तीस उच्चारणांचा काहीसा अंदाज असण्याची शक्यता आहे.
- तेव्हा मराठी,इंग्रजी, हिंदी, भाषा; मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द सोडून इतर भाषातील हलंत उच्चारणांचे माहितीपूर्वक झालेले लेखन स्विकारावे असे वाटते,पण लेखन करताना येणार्या त्रूटीमुळे चुकीने हलंत येणार नाही येणार नाही याची दक्षता घेण्याकरिता हलंताचा उपयोग माहितीपूर्वक असल्यास तसे संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर आवर्जून नमुद करावे (शिवाय लेख मथळ्यात ऊजवीकडे दिसणारा विशेष साचा बनवून घेतल्यास आणि वापरल्यास बरे) .
- Pra.K. म्हणतात त्या प्रमाणे (तामीळप्रमाणे) एखाद्या भाषेत हलंत केवळ लेखनात शिल्लक असेल आणि उच्चारणात नसेल तर हलंत लेखन मराठीत करू नये पण त्या भाषेत तो शब्द लिहिताना केवळ लिहिताना हलंत येतो असे लेखाच्या पहिल्या परिच्छेदात नमुद करावे. (शिवाय लेख मथळ्यात ऊजवीकडे दिसणारा विशेष साचा बनवून घेतल्यास आणि वापरल्यास बरे).
- असे माझे मत आहे. इतरांनी आपली मते मांडावीत
- खालील साचे कसे वाटतात , त्यातील चित्र व्यंजनान्त अक्षराचे बनवून घ्यावे.
हे परभाषिय लेखशिर्षक/त्यातील संबंधीत शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार तत् भाषिय शब्दोच्चारणांमुळे, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले आहे .असे लेखन मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्या |
- {{जाणीवपूर्वकहलंत}} [ जाणिवपूर्वक हलंत लेखन]
हे परभाषिय लेखशिर्षक/त्यातील संबंधीत शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार तत् भाषिय शब्दोच्चारण हलंत नाही म्हणून , जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले नाही.परंतु त्याभाषेत प्रत्यक्ष लेखन व्यंजनान्त होते .मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार |
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतातील विसंगती
संपादन- व्यंजनान्त नावाद्यांचे लेखन
- महामंडळाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार संक्षेपांचे लेखन व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये असे सुचविले आहे. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत येथे रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतराच्या उदाहरणातून व्यंजनान्त(हलंत) रूपांतरणे दाखविली आहेत. या दोन गोष्टी परस्पर विसंगत वाटतात.जाणकारांनी मार्गदर्शन करावे.माहितगार १२:०३, ६ जून २०१० (UTC)
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत:रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतरा.... उदा.: MSN या नावाचे लेखन "एम्.एस्.एन्." असे करण्याऐवजी "एम्एस्एन्" असे करावे; मात्र "H. G. Wells" याचे लेखन मधल्या पूर्णविरामचिन्हांसह "एच्. जी. वेल्स" असे करावे. (रोमन लिपीतून मराठी देवनागरीत लिप्यंतर कराताना पाळायचे संकेत हा विषय खरे तर स्वतंत्र लेखाकरिता पात्र आहे. इथे त्या लेखाचा दुवेजोड देऊन संक्षेपाने आशय लिहिणे अपेक्षित आहे.)
व्यंजनान्त लेखन
संपादनमराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार न् आणि अन् हे दोन शब्द सोडले तर दुसरा कुठलाही शब्द व्यंजनान्त लिहू नये. त्यामुळे ’कुर्यात सदा मंगलम’ किंवा ’वंदे मातरम’ मराठीत लिहिताना अन्त्य अक्षारांचा पाय न मोडता लिहावे लागतात. इंग्रजी शब्ददेखील पाय न मोडताच लिहायचे. नाही तर टंकलेखनाचा सगळा वेळ पाय मोडण्यातच जाईल. कॅट/कॅन असेच लिहायचे कॅट्/कॅन् असे नाही. तमिळ शब्दही याला अपवाद नसावेत. MSN हा एम्एस्एन असाच लिहिला पाहिजे. एम ए पीएच्डी, एल्एल बी यांतल्या मधल्या अक्षरांचे पाय मोडले आहेत, शेवटच्या नाहीत.-J १९:१५, १२ जून २०१० (UTC)
साचा:माहितीचौकट विमानतळ
संपादनसाचा:माहितीचौकट विमानतळ हा साचा तयार करून देण्यास कोणी मदत करा ही विनंती.या पानावर अपेक्षित मसुदा ठेवला आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०९:५३, ६ जून २०१० (UTC)
मी सल्ला देणे सोपे
संपादन- कोशांचे लेखन करताना आणि खासकरून विकिपीडिया:लेखनभाषा संकेतांनुसार अंलंकृत भाषा आणि विशेषणे टाळणे अभिप्रेत असते.मी स्वतः या संकेतांचा ठाम पुरस्करता असुनसुद्धा प्रत्यक्षात विकिकरण करताना किंवा मार्गदर्शन करताना प्रत्यक्षात खूप अडचणी येतात विशेषणे टाळणे बरेच अवघड जाते. उदाहरणार्थ en:Quebec City लेखाचे मराठी भाषांतर क्वेबेक सिटी पाहिले, भाषांतरकार विकिपीडिया संपादकांकडून आपसूकपणे विशेषणांचा वापर झाला आहे जसे खरोखरीच, प्रसिध्द्,अतिसुन्दर, रमणीय, अगदी . पण टाळावयाचे म्हटले तरी कसे ? आणि टाळले तर भाषा कृत्रीम आणि कदाचित तोच तो पणा येणारी रटाळ होईल का असे वाटते.अलंकृत भाषा आणि विशेषणे हि मराठी भाषेची अगदीच न टाळता येणारी वैशिष्ट्ये आहेत काय ? आपण (म्हणजे मराठी विकिपीडियाने) विशेषणांचा वापर आणि अलंकृत भाषा स्विकार्ह ठरवावी काय ? तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास आवडेल .
माहितगार ०७:५६, ८ जून २०१० (UTC)
- याबाबत सहसा एक संकेत पाळता येईल - बहुसंख्य लोकांना मान्य होतील, अशी गुणवाचक विशेषणे 'माफक प्रमाणात वापरायला हरकत नाही. उदा.: रमणीय, प्रेक्षणीय, प्रसिद्ध इत्यादी. तर-तमभाववाचक विशेषणे पुराव्याशिवाय वापरणे टाळावे. म्हणजे, प्रमाण पुरावांनुसार अमुक एखादे शहर/देश लोकसंख्या/घनता वगैरे पैलूमध्ये सर्वोच्च स्थानी असेल, तरच 'सर्वोत्तम/सर्वाधिक/सर्वोच्च/उच्चतम' वगैरे तर-तमभाववाचक शब्दयोजना करावी; अन्यथा मोघम गुणवाचक विशेषणे वापरावीत उदा.: 'चांगले/अधिक/उच्च'.
- व्यक्तिपर लेखांमध्ये आलंकृत भाषा व गैरवाजवी विशेषणे कटाक्षाने टाळावीत. वर नोंदवलेले मुद्दे तेथेही वापरता येतील.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४७, ८ जून २०१० (UTC)
- संकल्पच्या मताशी सहमत. मला वाटते की सर्वोत्तम, अत्युच्च, महान, इ. विशेषणांचा (मुबलक) उपयोग केल्यानेच भाषेत कृत्रिमपणा येईल. मग जसे गल्लोगल्ली थोर, परमपूज्य, लोकहृदयसम्राट नेते जसे उत्पन्न झाले आहेत, तसेच वाटायला लागेल... :-) जनरल जॉर्ज आर्मस्ट्राँग कस्टर याला अत्युत्तम/महान सेनापती म्हणता येईल पण नेपोलियन बोनापार्ट, पहिले बाजीराव, प्रतापराव गुजर, इतकेच काय जुलियस सीझरसमोर त्याचा पराक्रम फिकाच पडतो. असे असले तरी अमेरिकेत कस्टरला महानच म्हणले जाते.
- विशेषणे लिहिताना एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की मराठी विकिपीडिया विश्वकोष आहे तरी लावलेली विशेषणे वैश्विकदृष्ट्या valid असावी.
- शिवाय अशी विशेषणे वापरताना व्यक्तिगत दृष्टिकोन/bias नक्कीच येईल, जो विकिपीडिया/विश्वकोषात मुळीच उपयोगाचा नाही. पुण्यातील ५०% (तरी) लोकांना पर्वती अतिसुंदर रमणीय स्थळ वाटते. महाबळेश्वरच्या माणसाला तेथे फक्त झोपडपट्टी आणि घाण वास आढळतात. तरी अशी विशेषणे वापरताना ती वादातीत असतील तरच वापरावी - उदा. पर्वती ऐतिहासिकदृष्ट्या अतिमहत्त्वाचे स्थळ आहे. याला महाबळेश्वरच काय, कोलकात्याच्या माणूसही आक्षेप घेऊ शकत नाही.
- अभय नातू १८:३६, ८ जून २०१० (UTC)
- प्रतिसादांबद्दल धन्यवाद, मला वाटते ह्या चर्चेत इतरही सभासद भाग घेतील आणि त्यांचे मत /प्रतिक्रीया नोंदवून पुढेही हि चर्चा चालू राहील.माहितगार
सयूक्तिकता ?
संपादन- आर्या आंबेकर लेखात सदस्य:Prabodh1987 यांनी खालील मजकुर मथळ्यात जोडला आहे.अशा पद्धतीने मजकुर जोडणे सर्व सामान्य संपादकांना विनाकारण भांबावणारे आणि अनावश्यक आहे असे वाटते. आपण विकिपीडीयात मजकुरावर ऍक्यूरसीची अपेक्षा बाळगतो, मागत नाही आणि १००% खात्री केवळ copyright content च्याबाबतीतच अपेक्षीत ठेवतो.सर्व संपादने मॉडरेट होतात पण मॉडरेट होण्याची आपण खात्री देत नाही.त्याशिवाय सर्वांत महत्त्वाचे उत्तरदायक्त्वास नकार (डिसक्लेमर) आणि टर्म्स ऑफ यूज मध्ये हि माहिती येतेचच आहे.असा स्वरूपाचे मजकुर सर्व लेखांना सामायिक असतात.आणि विकिपीडीयाच्या बाबतीत काही संपादक सरळ विभाग संपादन करतात त्यांच्याही नजरेस हा मजकुर पडणार नाही .सामायिक सर्व दर्शनी सुचनांअध्ये काही कमतरता असल्यास त्या दूर कराव्यात पण लेखाच्या मजकुर विभागात अशी सूचना लावू नये असे मला वाटते. त्या शिवाय will be removed पेक्षा लाईक्ली टू बी रिमूव्हड असे हवे. माहितगार ०६:०१, १२ जून २०१० (UTC)
- <!--
Dear Editors, please edit this page only if you are 100 % sure of the information you are adding. The edit will be scrutinized and approved by the moderators of wikipedia around the world. Spam, illegal, objectionable and / or copyright content will be removed. Putting such content may invite for a judicial action. Please note that your IP Addresses are recorded with every edit you make.
-->
माहितगार, तुमचे म्हणणे पटते. वरील मजकुर या आधीच कोणीतरी काधून टाकला आहे. मी या पुढे याची काळजी घेईन. धन्यवाद!!
conflict of interestकरिता [मराठी शब्द सुचवा]
संपादन- conflict of interest [मराठी शब्द सुचवा]
-- साटेलोटे? अभय नातू ०७:४३, १२ जून २०१० (UTC)
हितसंघर्ष
संपादनसाटेलोटे म्हणजे स्वतःची कन्या एका वराला देऊन त्याची बहीण सून करून घेणे. थोडक्यात देवाणघेवाण. संगनमत. Conflict of Interest चा अर्थ बरोब्बर विरुद्ध. म्हणून हितसंघर्ष.--J १८:५९, १२ जून २०१० (UTC)
इंग्लिश मजकुराविषयी धोरण
संपादननमस्कार मंडळी!
सध्या बर्याचश्या लेखांमध्ये इंग्लिश मजकूर भविष्यकाळात अनुवादण्यासाठी ठेवलेला दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठी विकिपीडियावर अनुवादण्याच्या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने असे इंग्लिश परिच्छेद महिनोन्महिने त्या लेखात पडून राहण्याचा आणि त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या वाचनीयता/दर्जा वाचकांच्या/ अभ्यागतांच्या मनातून घसरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे तूर्तास लेखांमध्ये इंग्लिश मजकूर ठेवू नये, अशी विनंती करावीशी वाटते. इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा आंतरविकी दुवा देणे/ संदर्भाचे दुवे नोंदवणे, एवढी तजवीज करणे, हे सध्या श्रेयस्कर राहील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०८, १५ जून २०१० (UTC)
- आता साचा:भाषांतर मध्ये २% पेक्षा अधिक लेख भाषांतराच्या प्रतीक्षेत राहू नयेत असे नमुद केले आहे. गणिती प्रक्रीयेने हि संख्या साचातच दाखवता आली तर बरे होईल या बाबतीत सहाय्य हवे आहे. साचात अजून सुधारणा करावयास हवी आहे.
माहितगार ०५:२६, १६ जून २०१० (UTC)
- लेखात इंग्लिश मजकूरामुळे विकिपीडियाच्या वाचनीयता/दर्जा वाचकांच्या/ अभ्यागतांच्या मनातून घसरण्याच्या संकल्पच्या मताशी सहमत. त्याचवेळी इंग्लिश मजकूर असल्याने लेखाचा दर्जा वाढवणे सोपे जाते हेसुद्धा मान्य.
- यासाठी मध्यममार्ग सुचवावासा वाटतो की इंग्लिश मजकूर शक्यतो असूच नये, जरी ठेवला तरी तो कॉमेंटमध्ये <!--असे करून-->घालून ठेवावा म्हणजे वाचकांना दिसणार नाही पण संपादकांना दिसेल.
- अभय नातू ०५:४४, १६ जून २०१० (UTC)
- माझी मतभिन्नता :
- धोरणात प्रथमतः साचे आणि सहाय्य विषयक सहाय्य आणि विकिपीडिया नामविश्वांतील पानांबद्दल खूप अधिक लवचिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. एखादे सहाय्य पान मराठी विकिपीडियात नसण्या पेक्षा इंग्रजी मजकुरात असेल तरी चालेल , कारण सहाय्यपाने शोधत तेवढ्याकरिता मराठी विकिपीडियातून मला बाहेर जावयास लागू नये.
मुख्य लेख नामविश्वात मर्यादित प्रमाणात (२% लेखात) इंग्रजीतील मजकुर येऊ द्यावा. वर्ग:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे आणि वर्ग:भाषांतर या दोन्ही वर्गीकरणात मिळून ४००च्या वर लेख नाहीत. मराठी विकिपीडिया लेखांची एकुण लेख संख्या ३०,००० च्या घरात असल्याचे लक्षात घेता वाचकांच्या हाती असे लेख लागण्याची शक्यता (probability) ५० लेखांच्या मागे १ पेक्षाही कमी येते.मराठी विकिपीडियाच्या दर्जाबद्दलचे मत वाचक केवळ याच लेखांवर वलंबून बनवणार नाहीत तर ते इतर ४९ लेखांवरही अवलंबून असेल. इतर ४९ लेख व्यवस्थित असतील तर वाचक हा एक लेख का नाही खपवून घेणार ? आणि इतर ४९ लेख व्यवस्थीत होण्यापूर्वीच तुम्हाला जाणवणारा हा प्रश्न संपलेला असेल कारण अशा स्थितीत आपल्या कडे पुरेसे संपादक लेखक आणि भाषांतरकार उपलब्ध असतील. (त्यामुळे खरा प्रश्न अधिक संपादक बळ मिळवण्याचा आहे आणि तो वेगळ्या स्तरावर निपटावा लागेल)
अर्थात अतिरेक टाळण्याच्या दृष्टीने हे प्रमाण ढोबळपणे २%च्या पुढे जाऊ नये या बाबत मी सहमत आहे.भाषांतर साचाचा प्रयोग व्हावा, सोबतच पहिला परिच्छेद आणि विभाग नावे मराठीत असावीत आणि लेखाच्या तळांशीच इंग्रजी-मराठी शब्दकोश असावा. एकदा का सुरवात झाली असेल तर नविन भाषांतरकारांना प्रोत्साहन मिळते.
भाषांतर आधी व्यक्तीगत संगणक किंवा इतरत्र करून मग इथे आणून चिटकवावे हा पर्याय अनेक कारणांमुळे प्रॅक्टीकल वाटत नाही.एकतर माझ्या सारखी काही भ्रमंती करणारी आणि इंटरनेट सेंटर वापरणारी मंडळीस प्रत्येकवेळी विशीष्ट संगणक उपलब्ध असेलच असे नाही शिवाय एखादा मोठा लेख भाषांतरअस घेतला त्यात काही दिवस गेले तो पर्यंत इतर व्यक्तींनी काही चांगली संपादने केली तर दोन्हीचे एकत्रीकरण एक नवाच प्रश्न समोर उभा करू शकते.
इंग्रजी मजकुर मराठी विकिपीडियात आणण्याचे मला जाणवणारे फायदे म्हणजे विश्वकोशीय लेखनाची संस्कृतीशी मराठी लोक फारसे परिचीत नाहीत., लेख मराठी विकिपीडीयात न आणता भाषांतरकरणारी मंडळी बहुतांश वेळा स्वैर भाषातंरे करण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यात अविश्वकोशिय लेखन शैलीचा/शब्द लेखनाची शक्यता वाढते. अशी बहुतेक मंडळी लेख भाषांतरीत असल्याचे कुठेही नमुद करताना आढळत नाहीत.
लेख आधी मराठी विकिपीडियावर घेण्याने team work शक्य होऊ शकते. पर्यायी मराठी शब्द कोणते योजावेत या बद्दल चर्चा before hand आधी शक्य होऊ शकते. लग्न या लेखात एक नवे संपादक आले आणि अंशतः का होईना भाषांतर करून गेले. रोडरोलर लेखात एक संपादक आले आणि propulsion शब्दाकरिता प्रतिशब्द योजून गेले.असे आढळते
शिवाय आपण आयात केलेल्या लेखाचे भाषांतर झालेले नसेल तर संबधीत विषयाशी असलेल्या आत्मियतेमुळे मुळ संपादक कालांतराने परत फिरून स्वतःच भाषांतर करतो.(किमान मी तसे करतो त्यामुळेही कदाचित मला तसे वाटत असावे)
भाषांतरात आपण(मराठी विकिपीडियाने) अजून बॉट आणि विकएडीट आदी उपलब्ध तंत्रांचा व्यवस्थीत उपयोग केलेलेला नाही असा उपयोग करावयाचा झाल्यास आपण या विषयात पुरेशी लवचिकता दाखवावयास हवी.
महत्त्वाचा फायदा भविष्यातील कुणाही मशिन ट्रान्सलेशन तंत्रज्ञानावर संशोधन करून असे तंत्र आपल्याला उपलब्ध करून देणार्या व्यक्तींना येथील लेखांच्या इतिहासातून चांगल्या दर्जाची विदा सहज उपलब्ध होऊ शकेल आणि हे मराठी भाषेच्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे असेल असे मला वाटते.
अर्थात या विषयावर अजून मुद्यांचे आणि चर्चेचे स्वागत आहे.
माहितगार ०७:३३, १६ जून २०१० (UTC)
मि करत असलेलि काही महत्त्वाच्हि नोन्द
संपादन- माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
- हि मराथि साइत खूपच्ह चान्गली आहे बर्याच्ह वर्शने मि मराथितुन् लिहित आहे बरेच्ह बरे आहे आणी सोपे पण आहे---अजय
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:अप्पा
- appa ०७:४६, १६ जून २०१० (UTC)~~
कार/मोटार/गाडीसाठी मराठी प्रतिशब्द
संपादनCar/Automobile या इंग्लिश शब्दासाठी कोणता मराठी शब्द योजावा?
कार, मोटार, मोटर, इ. उमेदवार आहेत. इतर काही?
कार इंजिन, कार कंपन्या, कार अपघात, इ. अनेक लेख आणि वर्ग या शब्दावर अवलंबून आहेत, तरी तुमचे मत जरूर द्या.
अभय नातू १६:५१, १८ जून २०१० (UTC)
- कार ,मोटार हे शब्द बर्यापैकी मराठी झाल्याचे वाटते. ज्या अर्थी कार हा शब्द कार्ट या शब्दापासून झाला त्या अर्थी गाडी हा शब्दशः अर्थ बरोबर वाटतो; पण तो मराठी भाषकांनी केवळ कारसाठी न वापरता बर्याचदा दुचाकी आणि बस अशा सर्व स्वयंचलित वाहनांसाठीसुद्धा वापरला आहे त्यामुळे एकापेक्षा अधिक अर्थ होऊन पंचाईत होते. गाडी, दुचाकी(सायकल हीसुद्धा दुचाकीच, मोटर बाईकला स्वयंचलित दुचाकी म्हणता येईल पण त्याने स्कूटर/मोटरसायकल या दोघांतला भेद उलगडत नाही ) ,बोली भाषेत चारचाकी म्हणजे जास्तकरून कार याच अर्थाने वापरले जाते, पण शासकीय मराठीत चारचाकी हा शब्द शब्दशः चारचाके असलेली सारी वाहने.
कार साठी वापरावयाचाच झाला तर मोटारगाडी हा अधीक बरा वाटतो. 61.17.11.124 १३:०४, २० जून २०१० (UTC)
कार, मोटार
संपादनटुअरिंग कारसाठी वापरला जाणारा मोटार हा स्त्रीलिंगी शब्द पूर्णपणे मराठी झाला आहे. त्याचे अनेकवचन मोटारी आणि प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप मोटारी-. शिवाय मोटारगाडी, टमटम, घोडागाडी, बैलगाडी, छकडा, एक्का, बग्गी, व्हिक्टोरिया, ट्राम, लोकल, जलदगाडी, थेट गाडी, रेकला, हातगाडी, धकलगाडी, बस, आगगाडी, मालगाडी, मालवाहक गाडी, टेंपो, रिक्षा, सायकलरिक्षा, सहाआसनी, मेल(गाडी), टपालगाडी, कचरागाडी, फटफटी, सायकल. स्कू्टर(अनेकवचन स्कूटरी) वगैरे विविध शब्द आहेतच. सर्वच चारचाकींसाठी सरकारी शब्द ’चारचाकी वाहन’ असा आहे, नुसता चारचाकी नाही. त्यामुळे कुठलाही घोटाळा होण्याचे कारण नाही. स्वयंचलित वगैरे शब्दांची अजिबात गरज नाही. --J १३:३५, २८ जून २०१० (UTC)
विकिपीडिया धूळपाटी
संपादन- विकिपीडिया:धूळपाटी येथील विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload सुविधा व्यवस्थितपणे वापरले गेल्याचे आढळत नाही.
- ही सुविधा सुरू ठेवावी ?
- ही सुविधा काढून टाकावी ?
कृपया आपले मत सांगा
-माहितगार ही सुविधा काढून टाकावी. काही नवीन सदस्यांकडून दुरुपयोग होतो आहे असे वाटते. वि. नरसीकर (चर्चा) ०६:२६, २३ जून २०१० (UTC)
- थोडा बदल करून पाहिला आहे, पाहू काय होते ते, सुविधा पूर्ण बंद केली तर इतर लेखांच्या पानात trial and error चे प्रमाण आणि उत्पात वाढेल की काय? फायदा किती होतो आहे याची नक्की कल्पना नाही.
सुविधा मुख्य धूळपाटीवरून काढून एखाद्या धूळपाटी उपपानावर स्थानांतरित करून पाहू. कदाचित अधिक फायदा होईल.
माहितगार ०७:२७, २३ जून २०१० (UTC)