विकिपीडिया:कौल/जुने कौल ६
Sachinvenga (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)
मी Sachinvenga (चर्चा) १९ ऑगस्ट २०१० पासुन मराठी विकिपीडियावर नाव नोंदवून संपादनास आरंभ केला. मला मराठी आणि इंग्रजी दोन्ही विकिपीडियावर ५००० च्या पेक्षा जास्त संपादनांचा व मराठीत १००० च्या पेक्षा जास्त नवीन पानांचा अनुभव झाला आहे. मला असे वाटते की मी काही काळासाठी प्रचालकपदाची जबाबदारी घेऊन प्रचालकास शक्य असलेल्या तांत्रिक बाबींचा आभ्यास करावा. आपणास विनंती करतो कि मला मराठी विकिपीडियावरील प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा. माझे योगदान येथे बघता येईल.--Sachinvenga (चर्चा) १६:३१, २१ डिसेंबर २०१७ (IST):
- मी सदस्य Sachinvenga यांनी केलेली संपादने पाहिली व त्यात मला मराठी विकिपीडियामध्ये भर घालणारी संपादने दिसली. या संपादनांत विवादास्पद काही आढळले नाही.
- प्रचालकपद असताना सदस्याने इतरही काही बाबतींमध्ये लक्ष घालणे व योगदान करणे अपेक्षित असते, उदा - वादनिवारण, नियम/संकेत यांचे विश्लेषण, नवीन सदस्यांना मार्गदर्शन व प्रस्ताव मांडणे, इ.
- Sachinvenga यांचे या बाबतीत विशेष योगदान मला आढळले नाही. जर कोठे असल्यास जरुर कळवावे म्हणजे ते पाहता येईल.
- असे असताही Sachinvenga यांनी लिहिल्याप्रमाणे मराठी विकिपीडिया समाजाने त्यांना काही विशिष्ट काळाकरिता (६ महिने?) प्रचालकपद देऊ करावे व त्यादरम्यान वरील बाबतींमधील त्यांचे योगदान पाहून, योग्य वाटल्यास पुढे ते कायम करावे अशी मी भलावण करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) २३:१६, २१ डिसेंबर २०१७ (IST)
@Sachinvenga: खालील प्रमाणे असलेली काही प्रश्नांची उत्तरे द्यावे.
- आपण कोणत्या प्रशासकीय कार्यात सहभागी होतील याचे वर्णन करा?
- विकिपीडियामध्ये आपले सर्वोत्तम योगदान कोणते आहे आणि का?
- एका सदस्याला ब्लॉक केव्हा केले जाईल?
- विकिपीडियाचे सहप्रकल्प कॉमन्स वर तुम्ही File:Sumaira Abdulali in 2012.jpg चित्र चढवले होते. काय हे चित्र कॉपीराइट मुक्त/creative commons लायसन्स मध्ये आहे?
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:२०, १३ जानेवारी २०१८ (IST)
- @Sachinvenga:,
- वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हलकेच आठवण.
- @V.narsikar, सुबोध कुलकर्णी, ज, Aditya tamhankar, आणि संदेश हिवाळे:, @ज्ञानदा गद्रे-फडके, प्रसाद साळवे, आणि आर्या जोशी: आणि इतर नेहमी योगदान देणाऱ्या सदस्यांस,
- वरील बाबतीवर लगेच कौल द्यावा किंवा Sachinvenga यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास विचारावे.
- शक्यतो पुढील १० दिवसांत हा कौल अंतिम व्हावा अशी अपेक्षा आहे.
- अभय नातू (चर्चा) १२:४६, २५ जानेवारी २०१८ (IST)
सामान्य सदस्यांच्या संपादनात आणि एखाद्या प्रचालकाच्या संपादनात थोडा फरक असतोच. प्रचारक हा लेख लिहिण्याबरोबर (अभय नातूंनी वर सांगितल्याप्रमाणे) अनेक गोष्टींचे संपादन करीत असतो. एखाद्या विशिष्ट विषयावर ही प्रचालकाचे योगदान असावे असे मला वाटते. प्रचालकाचे अधिकार घेऊन त्याचा कसा कसा सदुपयोग करता येईल याची माहिती नवीन बनणाऱ्या प्रचालकास असावी. आपण उत्तम लेखन सामान्य सदस्याप्रमाणे केले पण आपण आपणास प्रचालक पद काही अनुभव घेण्यासाठी (६ महिन्यांसाठी) हवे आहे. मला असे वाटते, हे इच्छूक आहेत म्हणून यांना ते द्यावे. मात्र सहा महिन्यात यांच्याकडून यथायोग्य काम झाले नाही अथवा जबाबदारी सांभाळता आली नाही तर हे पद काढून घ्यावे.
टायवीनने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत... --संदेश हिवाळेचर्चा १६:१२, २५ जानेवारी २०१८ (IST)
सदस्य:Sachinvenga जे स्वत: प्रचालकीय पदवीसाठी नामांकित आहेत ते खालील गोष्टींमध्ये कमी पडतात.
- ते प्रशासकीय साठी महत्वाचा आहे योग्यरित्या जावा स्क्रिप्ट कार्य करण्यास अक्षम आहे १
- ते त्यांचे चर्चापानावर पाठविलेल्या संदेशाचे जास्तकरून जवाब देत नाही.
- सदस्य:Sachinvenga माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही जे मी वर विचारले होते. मी पुरेशी साद आणि चर्चापान संदेश टाकली होती परंतु आतापर्यंत १५ दिवस पार पडली आहे एकही उत्तर आले नाही.
वरील काही कारण आहे त्यामुळे मी विरोध प्रदर्शित केले आहे. जर सदस्य:Sachinvenga यावर आपले विचार प्रकट करतील तर मी मत बदलू शकतो. परंतु आतापर्यंत माझा सदस्य:Sachinvenga हा प्रचालक म्हणून असण्यास विरोध आहे. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१३, २७ जानेवारी २०१८ (IST)
कौल
संपादन- विरोध- विरोध . - Nankjee
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - अभय नातू
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Aditya tamhankar
- पाठिंबा- अभय नातूंशी मी सहमत आहे. - ज
- पाठिंबा- समर्थन. - ज्ञानदा गद्रे-फडके
- विरोध- विरोध आहे . - Priya Hiregange
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - सुबोध कुलकर्णी
- विरोध- वरील संदेशात विरोध कारण स्पष्ट केले आहे. - Tiven2240
- विरोध- विरोध आहे . - Lucky
- विरोध- सदस्य:Sachinvenga यांनी आपली प्रचालक बनण्याची इच्छा व्यक्त केली मात्र नंतर त्यांनी कुठलाही संवाद साधला नाही किंवा प्रश्नांची उत्तरे दिली नाही. म्हणून माझा अद्याप विरोध आहे. - संदेश हिवाळे
- विरोध- मराठी विकिपीडियाची सध्याची अवस्था लक्षात घेता आपल्याला पुष्कळच काम करायचे आहे. अशावेळी हे मी स्वानुभवावरून नोंंदवते आहे की मला अनेक लेख करताना आलेल्या समस्या ज्या पद्धतीने श्री.अभय नातू यांंनी हाताळल्या आहेत त्या गुणवत्तेने काम करणारी व्यक्तीच या पदावर असणे गरजेचे आहे.कारण लेखांंचे संंपादन करणे हा महत्वाचा भाग असला तरी ज्ञानकोशीय व्यासपीठांंची धोरणे सांंभाळणेही अधिक अपरिहार्य आहे.त्यामुळे संंधी देऊन पाहू हे मत मला तरी योग्य वाटत नाही तूर्त. कोणाही विशिष्ट व्यक्तीबद्दलचे हे मत नाही हे कृृपया लक्षात घ्यावे.हे नोंंदवताना माझा भर कायमच या व्यासपीठाची गुणवत्ता सांंभाळली जाणे यावरच आहे.त्याऐवजी वर्तमान प्रचालकांंकडून काही बाबी शिकून घेण्यासाठी संंबंंधित सदस्याने काळ वापरावा व नंंतर इच्छा व्यक्त करावी असे मला वाटते.. - आर्या जोशी
- विरोध- अभय नातू सर ज्या पद्धतीने आणि समंजसपणे प्रश्न हाताळतात तसेच नव्या संपादकांना मार्गदर्शन करतात तसे मला अजून श्री sachinvenga यांच्या बाबतीत आढळले नाही. प्रचालक स्वतः लिहिणारा तर हवाच त्याशिवाय इतरांनी लिहिलेले वाचून त्यांना मार्गदर्शन करणारा हि हवा. माझाही व्यक्तीला विरोध नाही पण काही आवश्यक गुणाचा अभाव दिसला म्हणून लिहिले आहे.. - सुबोध पाठक
- *
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - श्रीनिवास कुलकर्णी