वास्को द गामा (गोवा)

गोव्यातील शहर, भारत


वास्को द गामा (स्थानिक वापर: वास्को) हे गोव्यामधील एक शहर व मुरगांव तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहराला प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को द गामा ह्याचे नाव दिले आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व झुआरी नदीच्या मुखाजवळ, राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे.

वास्को द गामा
भारतामधील शहर

वास्को बस स्थानक
वास्को द गामा is located in गोवा
वास्को द गामा
वास्को द गामा
वास्को द गामाचे गोवामधील स्थान
वास्को द गामा is located in India
वास्को द गामा
वास्को द गामा
वास्को द गामाचे Indiaमधील स्थान

गुणक: 15°23′53″N 73°48′40″E / 15.39806°N 73.81111°E / 15.39806; 73.81111

देश भारत ध्वज भारत
राज्य गोवा
जिल्हा दक्षिण गोवा जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १५४३
समुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ५ किमी अंतरावर आहे. वास्को द गामा रेल्वे स्थानक हे मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून सुरू होतो.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत