रायसेन जिल्हा
हा लेख रायसेन जिल्ह्याविषयी आहे. रायसेन शहराविषयीचा लेख येथे आहे.
रायसेन जिल्हा रायसेन जिल्हा | |
मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा | |
मध्यप्रदेश मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | मध्यप्रदेश |
विभागाचे नाव | भोपाळ विभाग |
मुख्यालय | रायसेन जिल्हा |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ८,३९५ चौरस किमी (३,२४१ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १३,३१,६९९ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १५७ प्रति चौरस किमी (४१० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७४.३ |
-लिंग गुणोत्तर | १.१ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | मोहनलाल |
-लोकसभा मतदारसंघ | होशंगाबाद |
-खासदार | उदयप्रताप सिंग |
संकेतस्थळ |
रायसेन जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.रायसेन जिल्हा भारतातील राज्य मध्यप्रदेशचा एक जिल्हा आहे मध्यकालीन काळात रायसेन सिलहाटी राजपूत सरदारांचा मजबूत गढ होता बाबरच्या काळात येथील शासक शिलादित्य होता तो ग्वाल्हेरच्या विक्रमादित्य, चित्तोडगढचा राणा सांगा, चंदेरीचे मेदनीराय आणि इतर राजपूत राजांबरोबर खानवाच्या युद्धात बाबर विरुद्ध लडाख दिला. १५५३ इ. मध्ये रायसेनच्या दुर्ग वर शेरशाह ने आक्रमण केले होते. रायसेन मुगलांचा एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय केंद्र होता येथे बलुआ दगडांनी निर्मीत केलेला किल्ला आहे आणि त्यांच्या भिंतींवर शिकार केल्याचे चित्र आहेत. येथील दर्शनीय स्थळ भोजपुर, सांची, भीमबेटका, मॉ हिंगलाज मंदिर बाडी भोजपुर- प्राचीन काळापासून हे नगर उत्तर भारतातील सोमनाथ म्हणले जाते. हे स्थळ भोपाळ पासून २५ किलोमीटर दूर रायसेन जिल्ह्यातील वैत्रनदी काठी स्थित आहे. गावातील लागूनच टेकडीवर एक विशाल शिवमंदिर आहे. या नगराची व शिवमंदिराची स्थापना धारचे प्रसिद्ध परमार राजा भोज ने (१०१० इ. -१०५३ इ.) केली. याला भोजपुर मंदिर किंवा भोजेश्वर मंदिर पण म्हणतात. शिवमंदिराच्या गर्भगृहात एक मोठ्या पॉलिश केलेल्या दगडापासुन हे लिंग तयार करण्यात आले आहे. याची उंची ३.५८ मीटर आहे. हे भारतातील मंदिरात असलेल्या सर्वात उंच असलेल्या लिंगांपैकी एक आहे. सांची- प्राचीन काळापासून वसलेले हे नगर भोपाळ पासून ४५ किलोमीटर वर स्थित आहे हे रायसेन जिल्ह्यातील वैत्रवती नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील एका टेकडीवर हे विशाल स्तुप आहे या स्तुपात बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. भीमबेटका- हे मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ मधील रायसेन मध्ये स्थित आहे.हे पुरापाषाणीक स्थळ आहे. हे आदिमानव ने बनवलेले शैलचित्र व शैलाशयसाठी प्रसिद्ध आहे. येथील शैलचित्र हे ९००० वर्षापूर्वीचे आहेत. इतर पुरावशेषांमध्ये प्राचीन किल्ल्यांची भिंत, लघु स्तुप, पाषाण निर्मित भवन, शुंग गुप्त कालीन अभिलेख, शंख अभिलेख आणि परमार कालीन मंदिराचे अवशेष सुद्धा सापडले आहेत. भीमबेटका क्षेत्रला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण भोपाळ मंडळ ने अॉगस्ट १९९० मध्ये राष्ट्रीय धरोहर म्हणून घोषित केले आहे.जुलै २००३ला युनेस्को ने ही याला विश्व धरोहर (महत्त्वाचे स्थान)घोषित केले आहे. असे म्हणले जाते की हे स्थान महाभारतातील चरित्र भीमशी संबंधित अाहे. या वरून याचे नाव भीमबेटका पडले. येथील गुहा मध्य भारताच्या पठारातील दक्षिण किनाऱ्यावर स्थित विंध्याचलच्या टेकडीच्या खालील भागात आहे. याच्या दक्षिणेपासून सातपुड्याच्या रांगा सुरू होतात.1957-58 साली डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर ने याचा शोध लावला. जामगढ- रायसेन जिल्ह्यातील बरेली तालुक्यात जामगढ हे आदिमानवाच्या आश्रय स्थळ म्हणून ओळखले जाते.येथे जामवंतची गुहा आहेत. शैलकला व शैलचित्र येथे ७५० शैलाश्रय आहेत जे ५०० शैलचित्रांनी सुसज्जित आहेत व ही बहुमूल्य धरोहर आता पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. भीमबेटका मध्ये प्रवेश केल्यावर येथे भिंती वर शैलचित्र दिसतात. हे चित्र शिकार, सामूहिक नाच, पशु पक्षी, युद्ध, मानव जीवनातील दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारीत आहे. येथील शैलचित्र खनिज रंगाने बनवले असुन यात मुख्यतः लाल, पांढरा रंगाचा उपयोग केला आहे तसेच पिवळा रंग आणि हिरव्या रंगाचा ही कुठे तरी उपयोग केला आहे. शैलाश्रयच्या भिंती वर उत्कीर्ण तांब्या सारखे चित्र एक हजार वर्ष पूर्वीचे आहे. येथील चित्रात दैनंदिन जीवनातील प्रसंग चित्रित केले आहे. हे हजार वर्षांपूर्वीचे जीवन दर्शविते. येथील चित्र मुख्यतः दागिने, हत्ती, घोडे, उंटावरच्या सफरी चे, मद गोळा करतानाचे आहे. याच्या व्यतिरिक्त सिंह, वाघ, रान डुक्कर, मगरी यांचे ही चित्र यात दर्शविले आहे.येथील भिंती धार्मिक संकेतांने समरू्द्ध आहे जे पूर्व एेतिहासिक कलाकारांमध्ये लोकप्रिय होते. अशा प्रकारे या स्थानाला मानवविकासाचे आरंभिक स्थान मानण्यात काही हरकत नाही. अलीकडे होशंगाबाद शहरातील बुधवार या गावात दगडी खोद कामात शैलचित्रे सापडले आहेत.भीमबैटका से ५ किलोमीटर के अंतर पर पैगावन में ३५ शैलचित्र सापडले आहेत जे अतिदुर्लभ सांगितले जात आहे. गोरखपुर देवरी से चैनपुर बाडी पर्यंत निघालेली भिंत लोकांच्या आकर्षणाचे स्थान आहे. विन्ध्याचल पर्यंत हुन निघालेल्या या रांगा ८० किलोमीटर लांब व १४ किलोमीटर रूंद आहे. जगातील दूसरी सर्वात मोठी भिंत- येथे जगातील दोन नंबर वर असलेली भिंतचे निर्माण परमार कालीन राजांनी केले. भिंत बनवन्याचे उद्देश परमार राजांच्या राज्यातील सीमा सुरक्षित रहावे हे होते. विन्ध्याचल पर्वत पासून तर किती तरी किलोमीटर बनविलेली ही भिंत आज पण लोकांसाठी रहस्यचा विषय आहे. रायसेन जिल्हा मुख्यालय पासून ४० किलोमीटर अंतरावर स्थित ग्राम गोरखपुर देवरी पासून या प्राचीन भिंतची सुरुवात झाली आहे. ही भिंत शेकडो गावातून बाडीच्या चौकीगढ़ किल्ल्यापर्यंत आहे जयपूर जबलपूर नेशनल हाईवे क्रमांक १२ला लागून असलेल्या ग्राम गोरखपुर पासून बाडीचे अंतर ८० किलोमीटर आहे परंतु प्राचीन भिंत विन्ध्याचल पर्वत वरून तर काही ठिकाणी गावाच्या वेशीजवळून निघाली आहे. असे पाहता या भिंतची लांबी अजून काही किलोमीटर असू शकते. तसेच अनेक ठिकाणी या भिंतला तोडले गेले आहे या तोडलेल्या भिंतीचे अवषेश गावात पाहायला मिळतात. संदर्भ- १) भीमबेटका की गुफाएं (एच एम टी) इंक्रेडिटेबल इंडिया