रवींद्र ठाकूर

मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक, कवी, नाटककार व समीक्षक

प्र. डाॅ. रवींद्र नारायण ठाकूर (जन्म : उत्राण-जळगाव, १४ एप्रिल इ.स. १९५५]) हे सामाजिक जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक, कवी, नाटककारसमीक्षक आहेत..त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्यामुळे रवींद्र ठाकूर यांना वाचनाची गोडी लागली.

रवींद्र ठाकूर
चित्र:रवींद्र ठाकूर.jpg
रवींद्र ठाकूर
रवींद्र ठाकूर
जन्म नाव रवींद्र नारायण ठाकूर
जन्म एप्रिल १४, इ.स. १९५५
उत्राण, ता. चाळीसगाव जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापक
साहित्य प्रकार कथा, कविता, कादंबरी, नाटक
विषय सामाजिक, ग्रामीण
प्रसिद्ध साहित्यकृती महात्मा
मराठी आणि ग्रामीण कादंबरी
पत्नी नलिनी
अपत्ये शर्मिष्ठा, प्रसाद

ठाकूर यांनी डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र.वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून १९९० साली पीएच.डी. मिळवली.

शैक्षणिक कारकीर्द संपादन

  • प्राथमिक शिक्षण – जीवन शिक्षण विद्या मंदिर, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
  • माध्यमिक शिक्षण – शेट जमनादास जाजू विद्यालय, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
  • उच्च माध्यमिक शिक्षण – संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव, जि. जळगाव
  • पदव्युत्तर शिक्षण – औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (एम.ए. मराठी)
  • पीएच.डी. – पुणे विद्यापीठ (१९९०)

अध्यापकीय कारकीर्द संपादन

  • उदयगिरी महाविद्यालय, उदगीर-जि. लातूर
  • यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर.(१९८५ ते १९९२)
  • मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.(१९९२ ते २०१७)
  • कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर
  • २०१७मध्ये प्रोफेसर आणि विभागप्रमुख या पदावरून शिवाजी विद्यापीठातून सेवानिवृत्त..

प्रकाशित साहित्य संपादन

  • अनिकेत (कविता संग्रह, १९८१)
  • आत्मसंवाद (संपादित, २००६)
  • आनंद यादव : व्यक्ती आणि वाङ्मय (समीक्षा, १९९३)
  • साहित्यिक आनंद यादव (समीक्षा, २०११)
  • आविष्कार (संपादित, २०१३)
  • उद्या पुहा हाच खेळ (कादंबरी, १९९९)
  • क्रांतिजागर (महात्मा फुले यांची संपादित कविता, १९९९)
  • क्रांतिसंगर (नाटक, २०११)
  • चर्चा आणि चिकित्सा (समीक्षा, २०११)
  • तात्पर्य (आगामी - समीक्षात्मक पुस्तक)
  • दस्तुरखुद्द (कविता संग्रह, २००४)
  • दाही दिशा (आगामी कादंबरी)
  • धर्मयुद्ध (कादंबरी, २००३)
  • निवडणुकीतील घोटाळे ( अनुवादित, २००१)
  • पीळ आणि इतर कथा (कथासंग्रह, २०१६)
  • ना.वि. जोशीकृत पुणे वर्णन (संपादित,२००१)
  • प्रवाह आणि प्रतिक्रिया : १९७५ नंतरच्या कवितेचा साक्षेपी आढावा (समीक्षा, १९९९)
  • मराठी आणि ग्रामीण कादंबरी (समीक्षा, १९९३)
  • मराठी कादंबरी : समाजशास्त्रीय समीक्षा (समीक्षा, २००७)
  • महात्मा (कादंबरी, १९९९)
  • Mahatma - The Great Soul (मराठीतून इंग्रजीत अनुवादित, २००९)
  • महानायक : महात्मा फुले (मराठीतून हिंदीत अनुवादित, २०१६)
  • महारथी कर्ण (नाटक, २०१७)
  • कादंबरीकार : र.वा.दिघे (समीक्षा, १९९५)
  • व्हायरस (कादंबरी, २००८)
  • साहित्य संवाद (संपादित,२००३)
  • साहित्य : समीक्षा आणि संवाद (समीक्षा, १९९९)

आकाशवाणीवरील प्रसारणे संपादन

  • सोलापूर : महात्मा कादंबरीचे क्रमश: प्रसारण (कोल्हापूर आकाशवाणी २००१ व सोलापूर आकाशवाणी, २००२)

रवींद्र ठाकूर यांच्या साहित्यावर झालेले संशोधन संपादन

एम.फिल. संपादन

  • अनुसया पाटील - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • गंगा लोंढे - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • बाजीराव लवटे - मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • मनीषा हरिहर - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पीएच.डी. संपादन

  • आशा महाजन - नागपूर विद्यापीठ
  • जी.एस. रंदिल - मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद)
  • स्नेहल पाटील - राणी चन्नम्मा विद्यापीठ zve45678990isIandwasof(बेळगाव.

प्रकल्प संपादन

  • Minor Resrarch Project - डॉ. विनोद राठोड - रवींद्र ठाकूर यांच्या कादंबऱ्यांची समाजशास्त्रीय चिकित्सा (दिल्लीचा विद्यापीठ अनुदान आयोग).

विशेषांक संपादन

  • वारूळ - रवींद्र ठाकूर विशेषांक, डिसेंबर २०१६, जाने./फेब्रु. २०१७

संमेलनाचे अध्यक्षपद संपादन

  • ग्रामीण साहित्य संमेलन, पलूस. २०१२
  • दहावे जनसाहित्य संमेलन, मोझरी. २००५
  • पारिवारिक साहित्य संमेलन, आरग (मिरज) २००४
  • समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन, कोल्हापूर. २०१२

पुरस्कार संपादन

  • भि.ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५. (मराठी ग्रामीण कादंबरी या पुस्तकासाठी)
  • शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५.('आनंद यादव : व्यक्ती आणि वाङ्मय'साठी)
  • महानुभाव विश्वभारती पुरस्कार, १९९६ ('कादंबरीकार र.वा. दिघे'साठी)
  • पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे रणजित देसाई पुरस्कार, २०००. ('महात्मा'साठी)
  • रा.तु. पाटील परखड पुरस्कार, २००२. ('महात्मा'साठी)
  • शिवाजी विद्यापीठाची उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार. २००६. ('साहित्य : समीक्षा आणि संवाद'साठी)
  • शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २००७
  • अमरावतीचा जनसारस्वत पुरस्कार,
  • डॉ. जे.पी. नाईक पुरस्कार, २००८. ('महात्मा'साठी)
  • सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार, जळगाव.
  • पुण्याच्या ) स्नेहवर्धन प्रकाशनाचा वि.भि. कोलते ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार,२०१३.('साहित्यिक आनंद यादव'साठी)

संदर्भ संपादन

  • वारूळ - रवींद्र ठाकूर विशेषांक, जाने./फेब्रु. २०१७