मेव्ह लिकी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लिकी, मेव्ह: (२८ जुलै १९४२). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. ‘मेव्ह इप्स्ʼ या नावानेही परिचित. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. नॅार्थ वेल्स विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९६५ ते १९६८ दरम्यान नैरोबी येथील टिगोनी प्रायमेट रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करून विख्यात पुरामानवशास्त्रज्ञ लुई लिकी (१९०३–१९७२, Louis Leakey) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी संपादन केली. केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लिकी यांच्या लेक तुर्काना भागातील कूबी फोरा (Koobi Fora) या पुराजीवशास्त्रीय स्थळाच्या शोधमोहिमेत त्या सहभागी झाल्या (१९६९). पुढे रिचर्ड लिकी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या (१९७०).
मेव्ह लिकी यांनी १९८९ मध्ये केन्याच्या ‘नॅशनल म्यूझीअमʼमध्ये समन्वयक म्हणून काम केले. १९८२ ते २००१ या काळात त्या पुराजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस (Australopithecus anamensis) या नव्या प्रजातीचा शोध त्यांनी १९९४ मध्ये लावला. त्यांनी व त्यांची कन्या लुईस लिकी (Louise Leakey) यांनी १९९९ मध्ये एक नवीन होमिनिन प्रजात शोधली. त्यांनी या प्रजातीला केन्यान्थ्रोपस प्लॅटिओप्स (Kenyanthropus platyops) असे नाव दिले.
मेव्ह आणि लुईस लिकी या मायलेकींनी कूबी फोरा संशोधन प्रकल्पात भरीव कार्य केले असून नॅशनल जिऑग्रफिक सोसायटीने प्रतिष्ठीत हब्बर्ड पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले (२०१६). मेव्ह लिकी केन्यात स्थायिक असून त्या पुरामानवशास्त्रात संशोधनकार्य करतात.
तसेच त्यांनी संशोधन कार्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे .तसेच त्यांनी होमिनीं जातीच्या लोकांसाठी महत्त्वाची कामगिरी केली होती .म्हेव आणि लुईस यांनी आपल्या मायबोलीतून अनेक संशोधन करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयन्त केला .या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामा मुले त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले .तसेच त्यांनी अनेक नवीन प्रजातींचा शोध लावला आणि अनेकांना त्यांनी अनेक स्थरांवर जाऊन वेगवेगळे संशोधन केले आणि लोकांना करण्यासाथ तयार केले .म्हेव लेव्ही हा मोठा आणि प्रख्यात संशोधक होता .त्याने वेगवेगळ्या स्थरावर मोठ्या प्रमाणावर कामगिरी केली होती .त्याच्या या कामगिरी मुले त्याला अनेक ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.
म्हेव लेव्ही यांचा विवाह नंतर रिचर्ड लीकी यांच्या बरोबर झाला पण तरीसुद्ध त्यांनी आपली संशोधन प्रक्रिया थांबवली नाही .त्यांनी आपले काम कायम सुरू ठेवले .