Meghna Gulzar (es); মেঘনা গুলজার (bn); Meghna Gulzar (hu); Мегна Гулзар (ru); Meghna Gulzar (ast); Meghna Gulzar (ca); मेघना गुलजार (mr); Meghna Gulzar (de); Meghna Gulzar (fr); Meghna Gulzar (ga); Մեղնա Գուլզար (hy); میگنا گلزار (ur); Meghna Gulzar (en); میگھنا گلزار (pnb); メグナー・グルザール (ja); Meghna Gulzar (ms); Meghna Gulzar (it); Meghna Gulzar (id); میگنا گلزار (fa); ميجنا جولزار (arz); Meghna Gulzar (nl); Meghna Gulzar (sq); मेघना गुलज़ार (hi); మేఘనా గుల్జార్ (te); ਮੇਘਨਾ ਗੁਲਜ਼ਾਰ (pa); মেঘনা গুলজাৰ (as); ميجنا جولزار (ar); Meghna Gulzar (sl); மேக்னா குல்சார் (ta) directora de cine india (es); ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালিকা (bn); réalisatrice indienne (fr); India filmirežissöör (et); directora de cinema índia (ca); Indian film director (en); cyfarwyddwr ffilm a sgriptiwr ffilm a aned ym Mumbai yn 1973 (cy); Indian film director (en-gb); کارگردان هندی (fa); regizoare de film indiană (ro); بھارتی منظر نویس، ہدایت کار اور فلم ساز (ur); במאית קולנוע הודית (he); regjisore indiane (sq); مخرجة أفلام هندية (ar); індійська кінорежисерка (uk); Indiaas filmregisseuse (nl); directora de cinema india (gl); Regista e sceneggiatrice indiana (it); индийский кинорежиссёр (ru); stiúrthóir scannán Indiach (ga); ভাৰতীয় লেখিকা, পৰিচালক তথা প্ৰযোজক (as); Indian film director (en-ca); Indian film director (en); இந்திய திரைப்பட இயக்குநர் (ta) Гулзар, Мегна (ru)

मेघना गुलजार एक भारतीय लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. समीक्षकांच्या प्रशंसा मिळवणारे चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहे असे; तलवार (२०१५) आणि राझी (२०१८). [] गुलजार आणि अभिनेत्री राखी यांच्या त्या कन्या आहे व त्या वडिलांसोबत त्यांच्या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून सामील झाल्या. तिच्या वडिलांच्या १९९९ मध्ये दिग्दर्शित हु तू तू या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहीली.[] मेघना नंतर एक स्वतंत्र दिग्दर्शिका बनल्या आणि पहिला चित्रपट, फिल्हाल... २००२ मध्ये प्रदर्शित झाला.

मेघना गुलजार 
Indian film director
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर १३, इ.स. १९७३
मुंबई
नागरिकत्व
व्यवसाय
वडील
आई
उल्लेखनीय कार्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर, त्यांनी तलवार (२०१५) दिग्दर्शित केले, ज्याने त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले व बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळाले.

२०१८ मध्ये त्यांनी गुप्तचर रोमांचक चित्रपट राझी दिग्दर्शित केला, जो सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक होता. राझीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी छपाक (२०२०) या चरित्रात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन केले ज्याला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पुढे त्यांनी सॅम बहादूर (२०२३) हा आत्मचरित्रात्मक चित्रपट दिग्दर्शित केला जो सॅम माणेकशॉच्या जीवनावर आधारीत होता.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

संपादन

गीतकार आणि कवी गुलजार आणि माजी अभिनेत्री राखी यांची मुलगी मेघना गुलजार यांचा जन्म १३ डिसेंबर १९७३ रोजी मुंबई येथे झाला . आजच्या बांगलादेशातील मेघना नदीवरून तिचे नाव तिच्या आईने मेघना ठेवले आहे.[]

कारकिर्द

संपादन

मेघनाने टाइम्स ऑफ इंडिया आणि सिनेमा इन इंडिया यासाठी स्वतंत्र लेखिका म्हणून तिच्या लेखन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची कविता पोएट्री सोसायटी ऑफ इंडियाच्या काव्यसंग्रहात प्रकाशित झाल्या होत्या. समाजशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते सईद अख्तर मिर्झा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९९५ मध्ये त्यांनी टिश स्कूल ऑफ आर्ट्स, न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी मधून चित्रपट निर्मीतीचा एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला. परत आल्यावर, त्यांनी वडील, लेखक-दिग्दर्शक गुलजार यांच्यासोबत त्यांच्या माचीस आणि हु तू तू या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम केले. मेघनाने याच वेळी दूरदर्शनसाठी माहितीपट आणि अनेक म्युझिक अल्बमसाठी म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित करण्यासोबतच स्वतःच्या चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली.

मेघनाने २००२ मध्ये पहिला चित्रपट, फिलहाल दिग्दर्शित केला,[] ज्यामध्ये माजी मिस युनिव्हर्स-अभिनेत्री सुश्मिता सेन आणि तब्बू यांनी अभिनय केला होता. त्यांचा दुसरा दिग्दर्शकीय उपक्रम २००७ मध्ये जस्ट मॅरीड होता.[] त्यांनी अमृता सिंग अभिनीत संजय गुप्ता यांच्या दस कहानिया यासाठी पूरनमासी या लघुपटाचे दिग्दर्शनही केले होते.

२०१५ मध्ये, मेघनाने विशाल भारद्वाज यांनी लिहिलेल्या आणि २००८ च्या नोएडा दुहेरी हत्याकांडावर आधारित [] तलवार रोमांचक चित्रपटाचे दिग्दर्शन केले.[] या चित्रपटात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा आणि नीरज काबी मुख्य भूमिकेत होते. प्रदर्शीत झाल्यावर त्याला समीक्षकांची उच्च प्रशंसा मिळाली आणि गुलजार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी प्रथम नामांकन मिळाले.

२०१८ मध्ये त्यांनी रोमांचक चित्रपट राझी दिग्दर्शित केले. [] [] जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटात आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.[१०] हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सेहमत या कादंबरीवर आधारित आहे.[११]  १९३ कोटी (US$४२.८५ दशलक्ष) च्या जागतिक कमाईसह, हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक ठरला. राझीने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आणि गुलजार यांना त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


मेघनावर लेखक हरिंदर सिक्का यांनी फसवणूकीचा आरोप केला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पुस्तकाचे हक्क मिळविल्यानंतर, मेघनाने कथेत, विशेषतः शेवटी, महत्त्वपूर्ण बदल केले आणि त्याच्या मंजुरीशिवाय चित्रपटात पाकिस्तान-समर्थक भूमिका घेतली. हरिंदर म्हणाले, मेघनाने त्यांना चित्रपटाचा शेवट पाहू दिला नाही, शूटिंगनंतर त्याच्याशी बोलणे संपवले, त्यांना मीडियावरील चित्रपटाशी संबंधित सर्व जाहिरातींमधून काढून टाकले. त्यांनी आरोप केला की गुलजार यांनी पेंग्विन प्रकाशकांना बोलावून हरिंदरच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला दोन महिने उशीर करायला लावला “जेणेकरून मेघनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले” आणि जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलवर दबाव टाकून त्यांना त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलण्यापासून दूर केले.[१२][१३]

२०२० मध्ये त्यांच्या पुढील दिग्दर्शनाच्या संकल्पनेसाठी, मेघनाने मुलींवर होणाऱ्या आम्ल हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर एक आत्मचरित्रात्मक चित्रपट बनवण्याचे निवडले, ज्याचे नाव छपाक होते. या चित्रपटात दीपिका पडुकोण प्रमुख भूमिकेत होत्या आणि १० जानेवारी २०२० रोजी हा प्रदर्शीत झाल्यावर समीक्षकांनी त्याची प्रशंसा केली होती. [१४]

रॉनी स्क्रूवाला निर्मित आणि माणेकशॉच्या भूमिकेत विकी कौशलची भूमिका असलेला चरित्रात्मक चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला.

फिल्मोग्राफी

संपादन
वर्ष चित्रपट दिग्दर्शक कथा पटकथा नोट्स
१९९९ हु तू तू होय
२००२ फिलहाल... होय होय
२००७ जस्ट मॅरीड होय होय होय
२००७ दस कहानियाँ होय खंड : पुरणमाशी
२०१५ तलवार होय नामांकन - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर पुरस्कार
२०१८ राझी होय होय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार
नामांकित- सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार (समीक्षक)
नामांकन - सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार
२०२० छपाक होय होय
२०२३ सॅम बहादूर होय होय [१५]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Life beyond Filhaal". द टाइम्स ऑफ इंडिया. 6 September 2006. 28 October 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 March 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Creative child of celebrities". द हिंदू. 2004-01-02. 23 September 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Megna Gulzar (2004). Because He is. Rupa & Co. p. 67.
  4. ^ Encyclopaedia of Hindi cinema. Encyclopædia Britannica (India). 2003. p. 244. ISBN 978-81-7991-066-5.
  5. ^ "Just Married". द इंडियन एक्सप्रेस. 16 March 2007. 11 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 March 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Meghna Gulzar: I will celebrate Talvar's success NOW". द टाइम्स ऑफ इंडिया. 15 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "Aarushi murder: How Meghna Gulzar's Talvar presented a bang-on prediction of what was to come". 14 October 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 October 2017 रोजी पाहिले.
  8. ^ Nihalani, Govind; Chatterjee, Saibal (2003). Encyclopaedia of Hindi Cinema (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-066-5.
  9. ^ "Alia Bhatt a spy, Vicky Kaushal a Pak army man in Meghna Gulzar's Raazi". Deccan Chronicle. 23 June 2017. 23 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "ALIA BHATT KICKS OFF MEGHNA GULZAR'S UPCOMING ESPIONAGE THRILLER, RAAZI, IN JULY". MumbaiMirror. 23 June 2017. 25 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2017 रोजी पाहिले.
  11. ^ "Alia Bhatt a spy, Vicky Kaushal a Pak army man in Meghna Gulzar's Raazi". DeccanChronicle. 23 June 2017. 23 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2017 रोजी पाहिले.
  12. ^ https://www.hindustantimes.com/bollywood/letting-meghna-gulzar-direct-raazi-was-the-biggest-blunder-rues-calling-sehmat-author-harinder-sikka/story-3ghzvrTRrMzGtKNRP3euBM.html
  13. ^ https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/writer-harinder-sikka-launches-fresh-attack-on-raazi-director-meghna-gulzar-8242038/
  14. ^ "Deepika Padukone's Chhapaak begins, director Meghna Gulzar shares first pic". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 14 February 2019. 13 January 2020 रोजी पाहिले.
  15. ^ "Meghna Gulzar shares picture with Vicky Kaushal from 'Sam Bahadur' shoot". ThePrint. ANI. 16 March 2023. 10 August 2023 रोजी पाहिले.