मिडियाविकी:असंसदीयता? (मुख्य नामविश्व)

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनांत पुढाकार घेण्यास उत्तेजन देतो. मराठी विकिपीडियाच्या 'चर्चापानावर' आपण करू इच्छित असलेल्या लेखनात विकिपीडियावर लिहिणाऱ्या इतर सदस्यांप्रती;अथवा संबंधीत लेखाच्या दृष्टीने ज्ञानकोशीय उल्लेखनियता नसलेले '"विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप"' / असभ्य अथवा असंसदीय भाषा नाही याची खात्री करून घ्यावी. असभ्यता असलेले लेखन कोणत्याही क्षणी वगळले जाऊ शकते. सातत्याने किंवा गंभीर स्वरूपाचे अस्वीकारार्ह वैयक्तिक हल्ले केल्यास संपादनांस अटकाव केला जाऊ शकतो.


विशिष्ट विचारांबद्दल अथवा कृतींबद्दल आपली निराळी मते - अगदी टीकाही - ऐकून घेण्यास मराठी विकिपीडिया समुदाय नेहमीच उत्सुक असतो आणि असेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीची, समूहाची कृती अथवा विचार आपल्याला पटणारे असतीलच असे नाही. "महात्मा गांधी" म्हणतात त्याप्रमाणे विशिष्ट अशा कृतीबद्दल अथवा विचाराबद्दल आपले अभ्यासपूर्ण, मुद्देसूद मतांतर व्यक्त करण्यापर्यंतच आपली टीका मर्यादित ठेवावी. आपण करत असलेल्या टीकेचे रूपांतर चारित्र्यहननात, व्यक्तिद्वेषात अथवा समूहद्वेषात होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. एखादा विचार/मुद्दा/कृती पटत नसेल तर काय करावे, याची माहिती पुढे दिली आहे; ती जरूर वाचावी.

विकिपीडिया ज्ञानकोश म्हणजे सामूहिक लेखन-योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक, वांशिक अथवा लैंगिक स्वरूपांचे आरोप करू नयेत.



आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.



__असंपादनक्षम__