विकिपीडिया:उल्लेखनीयता/प्रगल्भता
विकिपीडिया ज्ञानकोशांचे वेगळेपण आणि विकिपीडियाचा परिघ लक्षात घेता या विषयाची चर्चा शक्यतो मराठी विकिपीडियाच्या परिघातच होणे अभिप्रेत असते तरीसुद्धा मराठी विकिपीडियावर नियमीत भेट देऊ न शकणार्या सदस्यांच्नासुद्धा आपले मत माडता यावे या दृष्टीने चर्चेची सुरवात प्रथमतः mr-wiki या मराठी विकिपीडियन्सच्या याहूग्रूपवर घेण्यात आली ती चर्चा आणि आलेल्या प्रतिसादाने चर्चेची सुर्वात देत आहे. प्रथमतः चर्चा या पानावरच करून नंतर चर्चा पानावर हलवण्याचा प्रस्ताव आहे.माहितगार ०८:१४, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
चर्चेस सुरवात
संपादनआपणा सर्वांनाच काही अंशी विकिपीडियाच्या वेगळेपणाबद्दल कल्पना आहेच.विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
विश्वकोशात कोणतीही पडताळलेल्या संदर्भासहीत उपलब्ध वस्तुस्थिती दडवणे अपेक्षीत नसते.विकिपीडिया सर्व विषयांवर लिहिण्यास सर्वांना सर्वकाळ मुक्त आहे.साधारणतः येथील लेखन माहितीपूर्ण आणि संदर्भासहित असणे अभिप्रेत असते.माहितीच्या प्रगल्भतेवर विकिपीडियात माहितीचे कोणतेही प्रतिबंधन केले जात नाही,विकिपीडीया सर्व वाचकांच्या आणि संपादकांच्या विवेकावर -निरपवाद- विश्वास ठेवते, काही वेळा प्रगल्भ विषयांवरील लेखन विकिपीडियावर असू शकते..सर्वलेखनाचे समसमीक्षण झालेलेच असेल असेही खात्रीने सांगता येत नाही.
अशा तटस्थ आणि काही न दडवता केलेल्या लेखन पंपरेची मराठीस कमतरता नाही,परंतु आंतरजालाच्या तुलनेत पुस्तकांच्या माध्यमाने केले गेलेले बहुतांश लेखन सर्वसामान्यांच्या सहज हाती लागण्यासारखे होतेच असे नाही, त्या शिवाय बरचस ज्ञान आणि माहिती इंग्रजी आणि संस्कृतातून मराठीत आणली गेली असे ही नाही त्यामुळे वत्त माध्यमे आणि राजकारण्यानी प्रसिद्धी दिलेले अपवाद वगळता ज्यांना संस्कृत अथवा इंग्रजी येते त्यांच्याकरिता ज्ञान आणि माहितीची कवाडेही जवळपास मुक्त होती/असते.
काही माहिती इतर भाषात बंदीस्त राहिल्याने सामान्य समाजाच्या विवीध मनात जपलेल्या श्रद्धास्थानांना धक्का लागण्याचेही टळते.ग्रंथात काय आहे जो पर्यंत वाचावयास लागत नाही तो पर्यंत त्यांच्यावर स्तुती सुमने टाकणे सोपे असते. कालीदास आणि शेक्सपिअर आणि अशा असंख्य प्रभृतींच्या लेखनातील प्रगल्भता प्रत्यक्ष डोळ्या समोर येत नाही तोवर ठिक,सोबतच असंख्य धर्मग्रंथातूनही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रगल्भ विषय चर्चेस येतात. विकिपीडीया संस्कृती वाचकाच्या विवेकावर -निरपवाद-विश्वास ठेवण्यास सांगते ,कोणताही अपवाद करणे टाळते, ढळढळीत सत्य आणि प्रगल्भता वस्तुत: ज्ञानाचे म्हणून ज्ञानकोशांचेही खरे अलंकार . मराठी विकिपीडियाची सावकाशपणे का होईना वाढ होते आहे आणि मराठी जनते समोर सर्व माहिती निरपवाद समोर येत जाणार.
ज्या गोष्टीची सवय नाही ती अचानक समोर आल्यानंतर आम्ही(मराठी समाज) समोर जाण्याकरिता विवेकी,प्रगल्भ तयार आहे का विरोध करेल ? राजवड्यांसारखी मंडळी काही गोष्टीत धजली नाही,तीथे तुमच्या आमच्या सारखे संपादक तोंड देऊ शकतील काय ?, तुम्हाला काय वाटते मराठी विकिपीडियाने कोणत्याही किमतीवर ज्ञान आणि माहितीची बाजू घ्यावयाची, का समाजास नको वाटणारी माहिती विवीध कारणांनी टाळावयाची ? टाळावयाची झाल्यास नेमकी कोणती,किती ? आणि कशी ? .काही माहिती दुसरा एक तात्पुरता उपाय दाखवा लपवा साचात ठेवणे आणि त्या साचावर प्रगल्भ माहिती असे लिहिणे जेणेकरून दाखवा अशी कळ दाबल्या नंतरच ती माहिती दिसेल. यामुद्द्यावर तुमचे मत काय आहे.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेस घेण्याची गरज आहे तो म्हणजे व्यक्तीचित्रणाच्या संदर्भात,सहसा मानवी स्वभाव व्यक्तीचित्रणात दोन पद्धतीने वागतो एकतर व्यक्ती पूर्ण हिरो अथवा पूर्ण व्हिलन असे चित्र रंगवण्याकडे कल आणि सहसा मृत व्यक्ती बद्दल नपटणार्या खासकरून नकारात्मक चित्रण होईल असे वाटणर्या गोष्टींचे उल्लेख टाळणे आणि हिबाब भारतीय त्यातल्या त्यात मराठी समाजास बरीच लागू पडते.भारतीय समाजाचा जिवंतपणी टोकाची कडवी संदर्भरहीत बदनामी करण्यापर्यंत मजल सहज जाते आणि मृत्यूनंतर त्याच व्यक्तीची व्यक्तीपुजाही व्हावयास लागते.पण विश्वकोश असलेल्या विकिपीडियाच्या बाबतीत चित्रण हे तटस्थपणे आणि सर्व बाजू दाखवणारे असणे अभिप्रेत असते.
मराठी विकिपीडियाचे एकुण मराठी भाषेस आणि समाजास असलेले महत्त्व पहाता सर्व मराठी विकिपीडियन्सची भूमीका सहसा संयत रहात आली आहे.पण मराठी विकिपीडिया जसा वाढत जाईल तशा या गोष्टी काही प्रमाणात चर्चेत येणार आणि चर्चेत येणारी बरीच मडळी नवागतही असणार,त्यांच्या साशंक मनांना उत्तरे देणारे वैचारीक चिंतन गरजेचे आहे . या ग्रूपवर चर्चा झाल्या नंतर हिच चर्चा प्रत्यक्ष मराठी विकिपीडियावरही घेऊन जाऊयात असा मानस आहे.
वरील विषयावर आपले सर्वांचे मनमोकळे अभिप्राय आणि चर्चा होईल असा विश्वास आहे
माहितगार ०८:१४, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
- माहितगार,
- या दोन अतिमहत्त्वाच्या विषयांना हात घातल्याबद्दल धन्यवाद. अनेक वर्षे हे माझ्याही मनात घोळत होते पण चर्चेची वेळ आली नव्हती.
- १. ज्या गोष्टीची सवय नाही ती अचानक समोर आल्यानंतर आम्ही(मराठी समाज) समोर जाण्याकरिता विवेकी,प्रगल्भ तयार आहे का विरोध करेल ?
- अशा परिस्थितीत आपण (मराठी समाज) अजून प्रगल्भतेने विचार करून नीरक्षीरविवेकाने प्रतिक्रिया दाखवेल अशी परिस्थिती आलेली नाही. मला वाटते जगातील फार कमी समाज (भाषिक, धार्मिक, बौद्धिक) या पातळीवर पोचलेले आहेत. मराठी माणूस सामान्यतःच भडक डोक्याचा समजला जातो (अर्थात, हे generalization झाले :-]) आणि established opinionच्या विरुद्ध आणि बऱ्याचदा wishful thinkingच्या विरुद्ध माहिती पुढे आल्यास माहिती देणाऱ्यालाच पळता भुई थोडी करतो. उदा. जेम्स लेन, राजवाडे, अण्णा आणि र.धों. कर्वे, इ. इ.
- दुर्दैवाने परिस्थिती अधिकच वाइट होत चाललेली आहे. आत्तापर्यंत माहिती आणि ज्ञान दोन्ही मिळवण्यासाठी किमान साक्षरता आणि सहसा कॉलेजशिक्षण आवश्यक होते. आताच्या माध्यमविस्फोटाने समाजाच्या लसाविलासुद्धा माहिती मुबलकपणे मिळू शकते. हे अत्युत्तमच आहे परंतु या माहितीबरोबर ज्ञान शून्य मिळते ही वस्तुस्थिती आहे. Disseminate होणाऱ्या माहितीला जास्तीत जास्त भडक रंग कसा दिला जाईल यावरच माहिती देणाऱ्यांचा रोख असतो. यात फक्त टीव्ही किंवा आंतरजालच नव्हे तर वर्तमानपत्रे, नियतकालिके, इतकेच काय तर साहित्यासारखी जुनी माध्यमेही तितकीच दोषी आहेत.
- अर्थात यात "आमच्या काळातील" गोष्टींचे थोरवी गाण्याचा उद्देश नाही. वरील वस्तुस्थितीला सन्माननीय अपवादही आहेतच आणि त्यांची जोपासना करणे हे जबाबदार समाजाची निशाणी आहे.
- २. राजवड्यांसारखी मंडळी काही गोष्टीत धजली नाही,तीथे तुमच्या आमच्या सारखे संपादक तोंड देऊ शकतील काय ?
- एकएकट्याने कदाचित नाही पण सामूहिकरीत्या आपण ही गोष्ट करू शकी याची मला खात्री आहे. अर्थात यासाठी अनंत चिकाटी आणि गेंड्याच्या १,०००पट जाड कातडीची आवश्यकता आहे.
- प्रत्येक माणसाचे पूर्वग्रह असतात. किंबहुना पूर्वग्रह नसता माणूस समाजात वावरुच शकणार नाही. असे असता वरील ध्येय कसे साधावे? तर यासाठी टोळकेशाही (झोंडशाही नव्हे) (crowd-sourcing, not mob-mentality) हा उपाय आहे. "एका माणसाने केलेले लिखाण त्याचे पूर्वग्रह नक्कीच दाखवेल पण हेच लिखाण ५, १०, १०० व्यक्तींकडून लिहिले गेले तर त्यांच्यातील पूर्वग्रह एकमेकांना neutralize करतील." हा crowd-sourcing मध्ये गृहित धरले जाते. अर्थात यासाठी टोळक्यातील बहुतांश (तसेच त्यातील अधिकारी) व्यक्तींचे डोके ठिकाणावरच असेल हेही गृहित धरले जाते. असे असता प्रत्येक व्यक्ती इतर सगळ्यांवर counter-weight होते व गटाचे एकत्रित शहाणपण (collective wisdom) उत्स्फूर्तपणे निदर्शनास येते. विकिपीडिया (इंग्लिश व काही इतर सुद्धा) याचे मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण आहे.
- ३. तुम्हाला काय वाटते मराठी विकिपीडियाने कोणत्याही किमतीवर ज्ञान आणि माहितीची बाजू घ्यावयाची, का समाजास नको वाटणारी माहिती विवीध कारणांनी टाळावयाची?
- होय, कोणत्याही किमतीवर ज्ञान आणि माहितीची बाजूच घ्यावयाची. वर नमूद केल्याप्रमाणे असे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावते आहे. जर मराठी समाजाला प्रगल्भतेकडे न्यायचे असेल तर सोयीस्कर सत्ये किंवा "नरो वा कुंजरोवा" अर्धसत्येसुद्धा टाळलीच पाहिजेत. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही, या न्यायाने विकिपीडियावर खोटेनाटे लिहिल्याने असत्याचे सत्य (किंवा उलट) होत नाही. तर मग खोटेपणा कशाला? जोपर्यंत कटू सत्याचा *स्वीकार* होत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलत नाही हे खरेच खरे. आणि समाजास नको असलेली म्हणता समाज म्हणजे कोण? प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात आणि प्रत्येक बाजूचे पुरस्कर्तेही असतात. बहुमताने खोटी किंवा लंगडी बाजू उचलून धरली तर त्याकारणास्तव ती बाजू खरी होत नाही.
- ४. टाळावयाची झाल्यास नेमकी कोणती,किती ? आणि कशी ?
- याहून महत्त्वाचा प्रश्न आहे की या प्रश्नाचे उत्तर वारंवार कोण देणार? बेळगांव प्रश्नाबद्दल माहिती टाळायला नागपूरकराची हरकत नाही (नागपूर हे फक्त एक उदाहरण), पण निपाणी, कारवारमधील मराठी समाजाला सगळीच्या सगळी हकीगत वर्णन करणे महत्त्वाचे वाटते. मग एखाद्या वैदर्भीयाने केलेल्या संपादनावरून खडाजांगी होणे स्वाभाविकच आहे. आणि हे जवळजवळ सगळ्याच बाबतीत होणार. हे टाळण्यासाठी Honest is the best policy हे स्मरुन लिखाण करावे हेच बरे.
- ५. दुसरा एक तात्पुरता उपाय दाखवा लपवा साचात ठेवणे आणि त्या साचावर प्रगल्भ माहिती असे लिहिणे जेणेकरून दाखवा अशी कळ दाबल्या नंतरच ती माहिती दिसेल.
- माझा याला विरोध आहे. माहिती लपवायचीच असेल तर ती लिहूच नये. लिहुन लपवणे म्हणजे भ्याडपणा ठरेल. थोडेसे विषयांतर - गॅलिलियोने सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे म्हणल्यावर पोपने त्याचा अनन्वित छळ करवून त्याच्याकडून पृथ्वी स्थिरच आहे असे वदवून घेतले. गॅलिलियोने त्यावेळी "(मी असे म्हणले तरीही) पृथ्वी फिरतेच" असे हळूच म्हणून घेतले. माहिती लिहून लपवणे हे समाजाच्या रोषाला घाबरून "पृथ्वी स्थिर आहे" आणि "तरीही ती फिरतेच" असे म्हणणे होईल :-) गॅलिलियो एकटा होता. त्याचे शरीर मानवी होते. छळाला बळी पडून नाहक मरण्यापेक्षा सोयीस्कर खोटे बोलणे हे त्याला स्वाभाविकच होते. विकिपीडिया ही और चीज आहे. यातील एका संपादकाला धमक्या देऊन किंवा त्याची मुस्कटदाबी करून सत्य लपवले तरी इतर शेकडो, लाखो लोक ते सत्य बाहेर आणतातच. अशा मानवी शरीर नसलेल्या, मानवी लोभ, क्षोभ नसलेल्या nebulous लेखकाची मुस्कटदाबी कशी करणार?!! आणि म्हणूनच विकिपीडिया ही माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतिकारी झेप आहे. मराठी समाजाने याचा लाभ घेउन स्वतःची उन्नती करण्याचा मोका साधावा ही माझी इच्छा आणि आशा आहे!!!
- ६. व्यक्तीचित्रणाच्या संदर्भात,सहसा मानवी स्वभाव व्यक्तीचित्रणात दोन पद्धतीने वागतो एकतर व्यक्ती पूर्ण हिरो अथवा पूर्ण व्हिलन असे चित्र रंगवण्याकडे कल आणि सहसा मृत व्यक्ती बद्दल नपटणार्या खासकरून नकारात्मक चित्रण होईल असे वाटणर्या गोष्टींचे उल्लेख टाळणे आणि हिबाब भारतीय त्यातल्या त्यात मराठी समाजास बरीच लागू पडते.भारतीय समाजाचा जिवंतपणी टोकाची कडवी संदर्भरहीत बदनामी करण्यापर्यंत मजल सहज जाते आणि मृत्यूनंतर त्याच व्यक्तीची व्यक्तीपुजाही व्हावयास लागते.पण विश्वकोश असलेल्या विकिपीडियाच्या बाबतीत चित्रण हे तटस्थपणे आणि सर्व बाजू दाखवणारे असणे अभिप्रेत असते.
- आणि असेच तटस्थ चित्रणच व्हावे ही अपेक्षा. हा मुद्दा वरील मुद्द्यांशी निगडीतच आहे. महात्मा गांधी असो वा अकबर, त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली आहे किंबहुना केली गेली आहे. ही कोणी केली, का केली हे येथे गौण आहे पण असेच करावे का? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून ठामपणे "नाही" हेच आहे. कोणताही माणूस (स्त्रीयांसह) पुरुषोत्तम नाही. प्रत्येकात काही व्यंग आहेच आहे. अगदी रामाच्या जीवनातसुद्धा असे अनेक प्रसंग घडले जे आज एखाद्या माणसाने केले असता (जर त्याचे नाव राम नसेल तर....इद्रिस/जॉन/शलोम ही नावे घ्या) त्यांवर रामाची पूजा करणाऱ्या व्यक्तीसुद्धा छी-थू करतील. तर असे असता ही व्यंगे लपवावीत कशाला? एडगर ऍलन पो हा थोर लेखक मानला जातो पण त्याने १४ वर्षांच्या मुलीशी लग्न केले होते. पोबद्दल लिहिताना याच्यावरच ५ पॅरेग्राफ लिहू नयेत पण दोन वाक्यांत त्याचा उल्लेख जरूर करावा. हे लिहिणे हे पोच्या साहित्यिक क्षमतेचा अपमान नसून फक्त सत्यवदन आहे.
- शिवाय, कोणाला कशाबद्दल चीड/राग येईल हे कसे कळणार? आज शिवाजीमहाराजांवर शिंतोडे उडवल्यास ९०% मराठी समाज चवताळून उठतो पण टिळकांवर किंवा आगरकरांवर आरोप केले तर शनिवार, सदाशिव सोडून कोठेही फारसे ढवळत नाही. याचा अर्थ आगरकरांची अब्रू शिवाजीमहाराजांपेक्षा कमी लेखायची? आणि साधारण १००वर्षांपूर्वी हीच टक्केवारी अगदी उलट होती. म्हणून दोन्ही व्यक्तींची व्यंगे लपवायची?मग विश्वकोष लिहिण्याचा प्रपंच आणि आव कशाला? चरित्रलेखन किंवा ललितलेखन हेच जास्त उचित ठरेल.
- मला वाटते की अशा कोंबडझाकी मनोवृत्तीमुळेच भारतीय (आणि मराठीसुद्धा) समाजाचा विकास पाहिजे तितका झालेला नाही. आपल्याच मनोराज्यात राहणाऱ्यांना वस्तुस्थितीची चपराक बसते तेव्हा ती झणझणीतच असते. मग ती इंग्रजांनी मारलेली असो वा देशी राजकारण्यांनी.
- असो. अजून बरेच काही लिहिता येईल व लिहावेसे वाटते पण आधी *तुमचे* मत जाणून घेण्याची उत्कंठा आहे.
- लिहिलेले परखड असले तरी दुखवण्याचा हेतू नाही. राग न मानता उत्तर देण्याचे अगत्य करावे.
- क.लो.अ.
- अभय नातू