मिग-२९ के

(मिग-२९ या पानावरून पुनर्निर्देशित)

मिग २९ के हे एक रशियन बनावटीचे विमान आहे.

मिकोयान मिग-२९ के

मिकोयान मिग-२९ के विमान

प्रकार लढाऊ विमान
उत्पादक देश रशिया
उत्पादक
रचनाकार मिकोयान डिझाईन ब्युरो
पहिले उड्डाण २१ ऑगस्ट १९८२
समावेश रशिया हवाई दल
सद्यस्थिती रशिया व भारतीय हवाई दलात.
मुख्य उपभोक्ता रशिया व भारत
प्रति एककी किंमत $४६.२५ मिलियन
मूळ प्रकार मिकोयान मिग-२९

स्वरूप

संपादन

याचा कमाल वेग २४०० कि.मी. प्रतितास आहे. या विमानाचा पल्ला ८५० कि.मी. आहे. हवेत उडत असतानाच यात इंधन भरल्यास याचा पल्ला ३५०० कि.मी.पर्यंत वाढतो. इ.स १९८६ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झालेल्या मिग-२९ एस या विमानांवर आधारीत मिग-२९ के ही नौदलासाठी निर्मिलेली आवृत्ती आहे. युद्धाच्या काळात शत्रूच्या दळणवळण यंत्रणेत अडथळे निर्माण करण्यासाठी जॅमर म्हणूनही याचा उपयोग करता येतो. हे दोन आसनी विमान असून यामध्ये मागील वैमानिकाच्या आसनाखाली एक जास्तीची इंधन टाकी बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी इंधन वाहक विमानाची भूमिकाही हे विमान घेऊ शकते.

जुळणी

संपादन

तंत्रज्ञान

संपादन

वैमानिक कक्ष

संपादन

या विमानात उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा (जीपीएस) बसविण्यात आली आहे. या सर्व यंत्रणांमुळे या विमानाचा पल्ला ८५० कि.मी. आहे. मिग-२९ केवर बसविण्यात आलेल्या झुक-एमई या रडारच्या साहाय्याने विमानाभोवतीच्या १२० कि.मी. परिघातील १० लक्ष्यांचा एकाचवेळी शोध घेता येतो. हा शोध घेतांनाच सर्वाधिक धोकादायक चार लक्ष्यांवर एकाचवेळी मारा करता येतो. वैमानिक कक्ष बहुपयोगी रंगीत डिस्प्ले आहेत. तसेच आधुनिक नियंत्रण यंत्रणेच्या मदतीने वैमानिकाला युद्धाच्या वेळी हल्ल्यांचे नियोजन करणे सोपे जाते.

क्षमता

संपादन

केएच-३१ ए, केएच-३१ पी, केएच-२९ टी आणि रडार नियंत्रित केएच-३५ ई जहाजभेदी क्षेपणास्त्रे या विमानांवर बसवण्यात आली आहेत. आर-६६ आणि आर-७३ ई ही हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रे ही यावर बसविण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर क्लस्टर बॉम्बस्, व अन्य शस्त्रास्त्रांसह एकूण साडेपाच टन वजनाची शस्त्रास्त्रे हे विमान वाहून नेऊ शकते. यावर ‘जीएसएच-३०१’ ही स्वयंचलित मशीनगन बसविण्यात आली आहे.

युद्धातील वापर

संपादन

खरेदी व पुरवठा

संपादन

भारतासाठी उपयुक्तता

संपादन

हे विमान असणारे भारतीय नौदल हे जगातील एकमेव नौदल आहे.

वैशिष्ट्ये

संपादन

मिग-२९ के भारतीय जहाजांवर तैनात होणार असल्याने हे हवाई दलातील मिग-२९ पेक्षा आकाराने लहान आहे. तसेच याचे वजनही तूलनेने कमी आहे. या विमानाच्ज्या पंखांच्या घड्या होत असल्याने ते कमी जागेत उभे करणेही शक्य होते. जहाजावरील मर्यादित धावपट्टीवर उतरणे शक्य व्हावे यासाठी याला आकडे बसविण्यात आले आहेत.

 
विमानाचे घडी होणारे पंख

अपघात

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन