क्षेपणास्त्र

(क्षेपणास्त्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

क्षेपणास्त्र म्हणजे स्वतःच चालू शकेल असे अस्त्र. परंतु हे अस्त्र क्षेपण करून म्हणजे फेकून अथवा अग्निबाणासारखे उडविलेही जाते. आपले इंधन घेऊन हवेतून उडत जाउन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र म्हणता येते. एक सुधारीत तंत्र अशी याची ओळख आहे.

इतिहास

संपादन

अग्निबाण मानवाला ज्ञात असला तरी क्षेपणास्त्र हे प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी ने बनवले असे दिसून येते. यातले व्ही१ व व्ही २ हे दोन उडते बॉंब म्हणून कुप्रसिद्ध होते.

तंत्रज्ञान

संपादन

लक्ष्यदर्शी किंवा गाईडेड क्षेपणास्त्रात अनेक भाग असतात.

  • लक्ष्यदर्शी व्यवस्था - अशी क्षेपणास्त्रे उष्णतेचा माग काढत लक्ष्यावर जाऊन आदळतात. तसेच यासाठी इन्फारेड किरणांचा, लेसर किरण तसेच रेडियो लहरींचा उपयोग होतो.
  • लक्ष्य बंधित - माहिती असलेल्या स्थानावर जाऊन धडकणारे. जसे की माहिती असलेले शत्रूचे शहर. यासाठी जी. पी. एस.चाही वापर केला जातो.
  • उड्डाण व्यवस्था - ही व्यवस्था क्षेपणास्त्र नेमक्या ठिकाणावर नेण्यासाठी उपयोगी असते. काही वेळा प्रगत व्यवस्थेद्वारे क्षेपणास्त्र मार्ग बदलूनही हव्या त्या ठिकाणी डागले जाते.
  • इंजिन - हे बहुदा अग्निबाणाच्या स्वरूपात असते. काही वेळा यासाठी जेट इंजिन वापरले जाते. जसे की क्रुझ क्षेपणास्त्र. अनेकदा क्षेपणास्त्रांना टप्पेदार इंजिने लावलेली असतात. जी निरनिराळ्या टप्प्यांवर काम झाले की गळून पडतात. ही वेग मिळवण्यासाठी उपयोगी पडतात.
  • स्फोटके अथवा स्फोटकाग्र[] - आदळल्यावर विध्वंस घडवण्यासाठी याचा उपयोग असतो.

कार्यानुसार प्रकार व वर्गीकरण

संपादन

क्षेपणास्त्राचे प्रकार व वर्गीकरण हे बहुदा त्यांच्या डागण्याच्या प्रकारावरून किंवा ते कोणते लक्ष्य भेदणार यावरून केले जाते.

भूपृष्ठ ते भूपृष्ठ

संपादन

एखाद्या भूपृष्ठावरून भूपृष्ठावरच[] मारा करणारे क्षेपणास्त्र.

आकाश ते भूपृष्ठ

संपादन

आकाशातून भूपृष्ठावरील एखाद्या ठिकाणी[]मारा करणारे क्षेपणास्त्र.

आकाश ते आकाश

संपादन

आकाशातून आकाशातच[] असणाऱ्या एखाद्या लक्ष्यावर मारा करणारे क्षेपणास्त्र.


प्रक्षिप्तक क्षेपणास्त्र

संपादन

प्रक्षिप्तक[] क्षेपणास्त्र म्हणजे ते क्षेपणास्त्र जे डागल्यावर प्रक्षिप्तक गती[] प्रकारच्या उड्डाणमार्गाचा वापर करते व आपले लक्ष्य भेदते..

 
आर३६ जातीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रशिया

क्रुझ

संपादन
 
टॉम हॉक जातीचे क्षेपणास्त्र अमेरिकेची संयुक्त संस्थाने

जहाज भेदी

संपादन
 
एक्झोसेट जहाजभेदी क्षेपणास्त्र फ्रांस

हार्पून (क्षेपणास्त्र) हे एक जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे.

रणगाडा भेदी

संपादन

विमान भेदी

संपादन

लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र

संपादन

भूपृष्ठावरून आकाशातील कमी उंचीच्या लक्ष्यावर मारा करण्यास उपयुक्त असणारे क्षेपणास्त्र.

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र

संपादन

भूपृष्ठावरून आकाशातील मध्यम उंचीच्या लक्ष्यावर मारा करण्यास उपयुक्त असणारे क्षेपणास्त्र.

=क्षेपणास्त्र भेदी

संपादन

उपग्रह भेदी

संपादन

आंतरखंडीय क्षेपणास्त्रे

संपादन

एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करू शकणाऱ्या आणि मोठा पल्ला असणाऱ्या क्षेपणास्त्रांना आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असे म्हणतात.हे क्षेपणास्त्र अवकाशात मारा करणारे यंत्र आहे.या यंत्रात अग्नी वायव्येचा समावेश असतो.हे यंत्र अवकाशीय यंत्र असुन ते अग्नी वायव्या वर चालते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ इं: वॉरहेड,Warhead
  2. ^ इं:सरफेस-टू-सरफेस, Surface-to-Surface
  3. ^ इं:एर-टू-सरफेस,Air-to-Surface
  4. ^ इं:एर-टू-एर,Air-to-Air
  5. ^ इं:बॅलिस्टिक,Ballistic
  6. ^ इं:प्रोजेक्टाइल गती,Projectile motion